अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हातारबा निवडून आला तर ...
स्टॉक मार्केट कोसळेल.
रिकव्हर होत असलेल्या इकॉनॉमीला खीळ बसेल. कोव्हीडच्या पॅरॅनॉईयापोटी सध्याचे निर्बंध अधिकाधिक काळ कंटिन्यु राहतील. एंटरटेनमेण्ट, ट्रॅव्हल, एअरलाईन इंडस्ट्री शेवटचा श्वास घेतिल. अनएम्प्लॉयमेंट रेट वाढेल. ऑईल इंडस्ट्री तर नष्टच करणार म्हणतोय.

ट्रम्प निवडून आला तर ...
अ‍ॅन्टिफा/बीएलेम ची जनावरं पूर्ण ताकदीनिशी बाहेर पडतील. मे महिन्यात झालं त्याची पुनरावृत्ती कित्येक पटीने घडेल. डेमोक्रॅटिक स्टेट्स मध्ये त्यांना पक्षाची आतून फूस असेल. सीअ‍ॅटल्/पोर्टलँड/सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शिटहोल्समध्ये राहाणार्‍यांचे तर देवच रक्षण करो.

थोडक्यात, वी आर फXड आयदर वे. Lets enjoy the calm before the storm!

>>हे खास राज करता<<
वैद्यबुवा, बातमी तशी जुनीच आहे, एनवाय्टिला कदाचित आत्ता जाग आली आहे. सुरुवातीला बर्‍याच मिडिया हाउसेस्ना ती बातमी द्यायचीच न्हवती. कारण, यु कॅनॉट पुट द टुथपेस्ट बॅक इन द ट्युब. Proud असो. अब्बि टुथपेस्ट बाहर आयाच है तो कुछ तो रिपोर्ट करना पडेगा ना... Wink

एनीवे, प्रकरण आता एफबीआय कडे आहे. बघुया त्यातुन काय निष्पन्न होतं ते. तोवर मिडिया सर्कस एंजॉय करुया...

सा. तुमची माहिती कुठून आली कळत नाही. सध्या तरी स्टॉक मार्केटवाले उलट म्हणत आहेत
https://www.axios.com/wall-street-feels-bullish-on-biden-fdf7015a-500b-4...

तसेही तुमची खालची टिप्पणी वाचून (अ‍ॅन्टिफा/बीएलेम ची जनावरं) तुमच्या एकंदरीत विचारसरणीची कल्पना आलीच आहे पण तरीही जरा माहिती देण्याचा प्रयत्न.

तसेही तुमची खालची टिप्पणी वाचून (अ‍ॅन्टिफा/बीएलेम ची जनावरं) तुमच्या एकंदरीत विचारसरणीची कल्पना आलीच आहे>>>

मेनस्ट्रीम मीडिया मधून मिळणारं कूल-एड घटाघटा पिणार्‍यांच्या मनात अँटिफाबद्दल बरेच गोड गैरसमज आहेत. 'बीएलएम 'आंदोलना'च्या वेळी काही ठिकाणी तुरळक घटना घडल्या असतील' अशी या मंडळीची लाडकी समजूत आहे. मी यादरम्यान सोशल मीडिया मध्ये अक्षरशः शेकडो व्हिडियोज पाहिल्या. एका पोलिसाच्या चुकीसाठी हजारो पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करणारे, झुंडी करून फिरत चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी सापडलेल्या निष्पाप नागरिकांना घेरून त्यांना जबरदस्तीने घोषणा द्यायला लावणारे, न दिल्यास त्यांच्या गाड्यांची नासधूस करणारे, व्यवस्थित प्लॅन करून उंची वस्तूंच्याच दुकांनाना लुटणारे (जॉर्ज फ्लॉईडच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बर्का Happy ), शेकडो सार्वजनिक इमारतींचे विद्रुपीकरण करणारे, बिग बॉक्स स्टोअर्स लुटून अक्षरशः सुतळीचा तोडाही शिल्लक न ठेवणारे, आपल्या मालमत्तेचं रक्षण करू पाहणार्‍यांचे खून पाडणारे ('डेव्हिड डॉर्न' नाव गुगल करा), स्मॉल बिझनेस ओनर्सचे आयुष्य उध्वस्त करणारे (आयुष्यभर खपून वाढवलेल्या आपल्या छोट्याशा दुकानाची राखरांगोळी होताना पाहून रडत-भेकत दंगेखोरांना शिव्याशाप देणार्‍या कृष्णवर्णीय म्हातार्‍याचा व्हिडियो पहा) हे लोक कोणाला पुण्यात्मे वाटत असतील तर वाटोत बापडे. खरेतर यांना जनावरे म्हणणे हा जनावरांचा अपमान आहे!

https://www.cnn.com/2020/06/08/us/st-louis-man-arrested-shooting-retired...

आणि हा पहा थोर मानवतावादी ज्याने डेव्हिड डॉर्न नामक काळ्या निवृत्त पोलिस अधिकार्‍याचा खून केला का? तर एक वस्तू गहाण ठेवण्याचे दुकान फोडून ते लुटण्याच्या वांशिक समानतेच्या कार्यक्रमाला डेव्हिड डॉर्न खोडा घालत होता.

(१) Biden has proposed policies like investing an ambitious $125 billion over 10 years to address the opioid epidemic,
(२) making housing vouchers a universal entitlement (a proposal that would help an additional 11 million low-income families get housing and would cut poverty by almost a quarter),
(३) tripling Title I funding for low-income schools, and doubling the number of school guidance counselors, social workers, and psychologists so that schools don’t have to turn to police to resolve issues.
(४) Biden has proposed additional funding for “co-response” teams, whereby mental health clinicians and social workers would respond to relevant calls alongside police officers.
(५) And some high-level congressional Democrats are even starting to support federal funding to create civilian first response units that would send unarmed professionals to deal with certain nonviolent emergencies .

उत्तम महत्वाकांक्षा. पण हे सर्व पैसे कुठुन येणार? टॅक्स्मधुन? कोणाच्या? श्रीमंतांच्या व मध्यमवर्गियांच्या? प्रश्न आहे.
___________________________________________
https://www.investopedia.com/comparing-the-economic-plans-of-trump-and-b...
इथे साधकबाधक तुलना केलेली आहे. अजुन मिळाल्यास द्या.

https://www.cnbc.com/2020/10/20/heres-where-biden-and-trump-stand-on-you...

ते २०१७ ला श्रीमंतांना दिलेल्या टॅक्स कटचे पैसे कुठून आणले होते? तेव्हा कोणी नाही विचारले असे प्रश्न Proud

गेल्या चार वर्षातील डेफिसिटचे आकडे बघा.
श्रीमंतांसाठी फिस्कली लिबरल, मध्यमवर्गीय/ गरिबांसाठी कॉन्झर्वेटिव्ह आणि सोशली अल्ट्रा कॉन्झर्वेटिव्ह असा उफराटा वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्डस प्रकार आहे तात्याचा.

पण श्रीमंतांवर जाचक कर निर्बंध लादले आणि सगळ्या फॅक्टरीज, कारखाने देशाबाहेर गेले तर Sad

https://thehill.com/policy/finance/522143-grassley-voters-should-be-skep...
(१) Grassley said that former President Obama had pledged not to raise taxes on individuals making under $200,000 and married couples making under $250,000, but then broke that promise with taxes that were used to pay for ObamaCare.
(२) Grassley also argued that business tax increases would get passed along to workers in the form of lower wages.

ते टॅक्स चे प्रॉमिस जवळजवळ सर्व प्रेसिडेण्ट्स नी केले आहे आणि मोडले आहे. मला वाटत नाही कोणीही विश्वास ठेवत असेल. डेम्स टॅक्सेस वाढवणार हे गृहीत आहे. पण रिपब्लिकन्स ही वाढवतात.

उदा: बुश सिनीयर चे फेमस वाक्य.

त्याला वाट्टेल ते कॅव्हिअ‍ॅट लावता येतील. आमची सिनेट, आमचे हाउस, आमचा पोप असेल तर आम्ही करणार. तुम्ही लोक खोडा घालता वगैरे. पण सेम लॉजिक ने प्रत्येक न पाळलेल्या प्रॉमिस ला हे लागू सहज करता येते. इतके खेळाडू यात असतात की कोणाकडेही बोट दाखवून पळवाट काढता येते.

https://www.isidewith.com/elections/2020-presidential-quiz#

ही क्विझ मी दिली तर ६४% तात्या नी ५२% म्हातारबाबा आले. (बेरीज १०० का होत नाही म्हाईती नाय!!! Wink )
_________
https://2020election.procon.org/2020-election-quiz.php
तात्या आले रे आले.
____________
https://www.opencampaign.com/quiz

स्विंग स्टेटस क्या गुल खिलाते है देखना है! फ्लोरीडा, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, मिशिगन, अ‍ॅरिझोना, आयोवा, जॉर्जिआ ......
वृत्तपत्रांच्या कव्हरेजमध्ये कसा फरक असतो. गार्डिअनची लेटेस्ट बातमी आहे - सपक अमका या या राज्यात पुढे आहे, तमका मागे आहे, हे आलेख.
याउलट
न्यु यॉर्क टाईम्स चा चार दि वसांपूर्वीचा लेख किती रंजक आहे. https://www.nytimes.com/live/2020/battleground-states-2020-प्रत्येक स्विंग रा ज्यातील काही काही काउंटींचा आढावा आहे -
(१) WAUSAU, Wisconsin - इथे पिकणारे जिनसिंग जगात सर्वोत्तम समजले जाते. या मालाचा मुख्य ग्राहक आहे चीन. पण तात्यांच्या चीन धोरणामुळे येथिल जिनसिंगचा खप एकदम घटला आहे म्हणजे १९७२ च्याही खाली दरभाव कोसळलेले आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आ लेली शेते ओस पडत आहेत. अर्थात इथले लोक कोणाला मत देतील असे वाटते? Happy
(२) आयोवा च्या २ शेतकर्‍यांचे पूर्णतः भिन्न अनुभव न्यु यॉर्क टाइम्स नोंदवतो. एका शेतकर्‍याला ट्रंप निवडुन यावासे वाटते तर दुसर्‍याला बायडेन.
(३) फिलाडेल्फियामध्ये बायडेनला जास्त स पोर्ट आहे का तर लोकं कदाचित अजुनही ओबामा-बायडेन सांगड घालतात.
(४)सेंट पॉल, मिनेपोलिस म्हटले की जॉर्ज फ्लॉईअड आठवतो. या भागातले लोकंही जागरुकतेने मतदानाकरता उतरले आहेत. अर्थात ट्रंपकरता धोक्याची घंटी.
(५) कमला हॅरिस 'अल्फा कापा अल्फा सोरोरीटी' नावाच्या ग्रुपची सद स्य आहे. या ग्रुपचा विस्कॉन्सिनमध्ये राजकारणात प्रभाव दिसतो. या ग्रुपच्या सदस्य महीला महीला, कमला हॅरिसकडे आशेने पहाताहेत.
(६) काही काउंटींमध्ये करोनाने थैमान घातलेले आहे आणि अर्थात त्या लोकां चा ट्रंप अ‍ॅडमि निस्ट्रे शनवरती व करोना संकट हाताळणीवरती रोष आहे.

मस्त लेख आहेत एकेक. प्रत्येकाचे मोटिव्हज, ट्रिगर्स कळतात की का त्या त्या लोकांना अमकाच हवा , तमका नको. हे असं जर्नॅलिझम आवडतं ब्वॉ. न्यु यॉर्क टाईम्स आहे ग्रेट.
__________________________________________________
परवा एक व्हिडीओ पाहीला ज्यात काही काही राज्यांत काही काउंटीत, मुद्दाम मतदान कसे अवघड करुन ठेवतात व लोकांना ताटकळत ठेवणे, मुद्दाम दूरवर मतदान करायला जायला लावणे, फोटो आयडी च हवा अशा अटी घालणे, 'विद्यार्थी मतदान कुठे करताय?" ..... <रियली!!!!?> ..... असे म्हणुन कॉलेजेसमधील बूथ बंद करणे प्रकार घडतात का तर त्या काउंटीमध्ये मतदान कमी व्हावे याचा पद्धतशीर अडथळा Sad ........ व्हिडीओ सापडला तर देते.
मीनव्हाईल https://en.wikipedia.org/wiki/Shelby_County_v._Holder#:~:text=Shelby%20C..., शेल्बी काउंटी-होल्डर हा लेख वाचा. पूर्वी राज्यांना कोणताही मतदानविषयक कायदा परिपारीत करण्याकरता, फेडरल गवर्नमेन्ट कडुनही मंजूरी लागे. पण ते बंद झाले व वरती उदाहरणांत नमूद केलेली पद्धतशीर मुस्कटदाबी सुरु झाली. मग बिहारलाच नावे का ठेवायची? किंचित सॉफिस्टिकेटेड स्तरावर अमेरीकेतही मतदानात ढवळाढवळ होते तर Happy

हे बघाच! smiley16.gifEE7A0A0B-0589-4D8F-AB43-A09E73F4547E.jpeg

प्राजक्ता मस्त विषय. आता ट्रान्झिटिंग प्लॅनेटस कसे या कुंडलींत फिट होतात, प्रभाव दाखवतात त्यावही काही अवलंबुन असते. मला नीट नाही येत पण लंबी रेसका घोडा व कर्माचा कारक आहे शनि. तर विन्डफॉल लक आहे गुरू, राहू बरेचदा अफाट अफाट पॉप्युलॅरिटी वमायावी संमोहन देतो. एवढे माहीत आहे.
________
अच्छा ट्रंप निवडुन येइल असे भाकित वर्तवलेले आहे वरती.

चला. म्हणजे निवडणुकीचा निकाल लागलाच.
हे आधीच केले असते तर उगाच वर एव्हढी वादावादी, शिव्यागाळी करायची गरजच पडली नसती.
शिवाय मला मतपत्रिका भरून ती कुठेतरी नेऊन टाकायचीहि गरज नव्हती.
आता कुठलाहि प्रश्न, जसे काय होणार, कधी होणार, हे सर्व त्या त्रिपाठीबाबाला विचारले की झाले.
आता त्याला विचारा की करोना कधी जाईल, मास्क न लावता हिंडायला कधी मिळेल, लग्न समारंभात कधी जाता येईल?
बरेच लोक एकमेकांना मिठ्या मारायला आतुर झाले आहेत!

हे वाचून त्रिपाठी म्हणजे आपल्या कालीन भय्याचा सपोर्ट ट्रम्प ला असं काही मीम आहे की काय असे वाटले आधी. भयमुक्त अमेरिका Happy

तेच तर म्हणतो मी. इतके सगळे असताना उगीचच हमरीतुमरी
वर येऊन चर्चा करायची, मग उगीचच मैत्री तुटते,
बरे, इथे लिहून ना कुणाचे मत बदलणार आहे ना काही फरक पडणार आहे.
आपण आपले विनोद करत रहावे. हसणे केंव्हाहि चांगले.

हे वाचून त्रिपाठी म्हणजे आपल्या कालीन भय्याचा सपोर्ट ट्रम्प ला असं काही मीम आहे की काय असे वाटले आधी. भयमुक्त अमेरिका > Lol ह्यात अजून एक शेपूट राहिले कि प्राचीन भारतीयांना तेंव्हापासून व्होटिंग फ्रॉड माहित होता Wink

कालिन भय्या >>> smiley2.gif
हे भाकित वाचुन तात्या म्हणतिल
“ look at my horoscope its a greatest horoscope its beautiful, its perfect , its all good, look at joe’s i mean its not even close to mine”

अच्छा ते कागदाचं चि टोरं व्हॉटसॅपवर फिराय. मग तसे लिहायचे तरी. मला वाटलं प्राजक्ता या आय डी ने स्वतः खटाटोप करुन कुठुनतरी हे चिटोरं मिळवलय/ कोणीतरी लि हीलय वगैरे...

इकडे वेगळीच धूम सुरुय! बिडेनने पावसात भिजत भाषण केलं तर लगे पवार साहेबांसारखा चमत्कार घडून तिकडे डेमोक्रॅटिक्स येणारे सत्तेत घोषित पण झालं!

काल मत देउन आले आता होतय ते सुशेगाद बघायचं, पॉपकॉर्न खात व कोक पीत पीत Wink सिनेमा सुरु होतोय.

Pages