Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शेंडेनक्षत्र, एखाद्या रोगाचे
शेंडेनक्षत्र, एखाद्या रोगाचे जेव्हा निदान होते तेव्हा त्याचे दुष्परिणाम टाळण्याचा प्रयत्न सुरू होतो. कँन्सर पेशंटला जेव्हा तुमच्या हातात पाच वर्षे आहेत असं डॉक्टर सांगतात आणि तो पेशंट सहा वर्षे जिवंत राहतो तेव्हा त्या मागे डॉक्टरांनी केलेल्या उपाययोजना असतात. असेच काहीसे पर्यावरण बदलाच्या बाबतीत होत आहे. हेच y2k च्या बाबतीत झाले होते. याचा अर्थ रिस्क खरी नव्हती असा होत नाही.
There are many mitigation efforts to curb temperature rise and that has averted the predicted frequency of events. याचा अर्थ predictions चुकीची होती असा काढणं वेडेपणा आहे.
केवळ हवामानबदल एवढाच मुद्दा नाहीये. ज्या वेगाने आपण पृथ्वीवरची संसाधने वापरतो आहोत तितकी पृथ्वीची regenerative ताकद नाही. आपल्या मानवी व्यवहारामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत आणि हा वेग प्रचंड आहे. We have no clue what this mass extinction will bring yet.
आपले उर्जेचे साठे संपत आहेत. या साऱ्या संसाधनाच्या वापरामुळे निर्माण होणारा कचरा ही एक वेगळीच मोठी समस्या आहे.
एकूणच हवामानबदल आणि त्या अनुषंगाने संपूर्ण पर्यावरण हा मुद्दा आजिबातच राजकीय नाही. There is no debate about this. राजकारण, आपल्या आवडत्या पक्षाला, नेत्याला सपोर्ट करणं ठीक आहे. But there are certain things that go beyond politics. तुमच्या सारख्या विचारी माणसाला योग्य काय ते समजणं अवघड नाही. खूप resources आहेत available. एखादा ecology चा कोर्स करा. जेव्हा पृथ्वीवरचे जीवनचक्र कसे चालते ते कळेल तेव्हा त्यातील बदलांचे परिणाम देखील आपोआप कळतील. I really urge you to reconsider your opinions.
>>
>>
एखादा ecology चा कोर्स करा. जेव्हा पृथ्वीवरचे जीवनचक्र कसे चालते ते कळेल तेव्हा त्यातील बदलांचे परिणाम देखील आपोआप कळतील. I really urge you to reconsider your opinions.
<<
आपल्या सारख्या प्रकांड अभ्यासू व्यक्तीने हक्काने सल्ला दिला त्याबद्दल आभारी आहे. आपणही जमल्यास दुसरी बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर बरे.
पृथ्वीचे हवामान कायम बदलत असते. माणसाने प्रदूषण केल्यामुळेच पृथ्वीचे वातावरण बदलते आहे असे आजिबात नाही. अनेक प्राचीन संस्कृती हवामान बदलामुळे नष्ट झाल्या असे इतिहास संशोधक मानतात (उदा. मोहांदजरो). महाभयंकर दुष्काळ भारतात, चीनमधे अनेक शतकांपूर्वीही पडलेले आहेत. तेव्हा सगळ्या हवामान बदलाचे श्रेय माणसाच्या प्रदुषणाला देणे तितकेसे योग्य नाही.
आणि ह्यावरील तथाकथित उपाय हे खरोखर उपाय आहेत का शिक्षा आहेत ते कळत नाही. उदा. कॅलिफोर्नियात अधिकाधिक जाचक कारपूल, HOV वगैरे सुरु केले आहे. ह्याने खरोखर प्रदूषण कमी होते का ह्याकडे कोणी पहात नाही. फक्त नव्याकोर्या, महागड्या इलेक्ट्रिक कार कुठलासा स्टीकर लावून दिमाखात त्या लेनमधे सुसाट धावतात. क्वचित काही कारपूल करणारे. अनेक दिवस स्पेअर दी एअर डे जाहीर होतो. जर हवेच्या स्वच्छतेची इतकी काळजी असेल तर त्या दिवशी कारपूल मुक्तपणे वापरू देतात का? नाही.
त्यामुळे हे तथाकथित उपाय हे राजकीय आहेत असेच वाटते. ह्यात विज्ञान फार दिसत नाही.
सोलिंड्रा वगैरे कंपन्यांच्या नावाखाली ह्या पर्यावरणप्रेमाचा गैरवापर करून उच्चपदस्थ राजकारणी लोकांनी लक्षावधी डॉलरला गंडवले आणि सरकारी डॉलर लाटले आहेत. कदाचित इलेक्ट्रिक कार, सोलर पॅनेल ह्यातही असाच भ्रष्टाचार उघडकीस येईल.
समस्या काय आहे ह्याचे पूर्ण आकलन नसताना केलेले उपाय हे मूळ रोगापेक्षा घातक असतील असे मला वाटते.
पर्यावरण, क्लायमेट चेंज हे एखादे कल्ट असावे असे वाटते आहे. विज्ञानाची शाखा वाटत नाही. कुणीही प्रश्न विचारयचा नाही. देवाने काही प्रेषित पाठवले आहेत आणि त्यांनी जे काही सांगितले आहे तेच चिरंतन सत्य मानायचे. जो त्याला प्रतिप्रश्न करेल तो पाखंडी. त्याला वाळित टाका, शिक्षा करा. विज्ञानात असे नसते. कुणीही हव्या तेवढ्या शंका घ्या. त्याचे निरसन केले जाते. त्याला पाखंडी ठरवले जात नाही.
मुळात अशा प्रकारे भाकिते करणे हे परफेक्ट सायन्स नाहीच मुळी. त्यात प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स वगैरे अनिश्चिततेवर आधारित शास्त्रे आहेत. जसे ४ दिवसांनंतर हवामान काय असेल ते अचूक सांगता येत नाही तसेच १० वर्षांनी जग बुडणार का तेही अचूक सांगता येत नाही. अशा विषयांवर संशोधन करणारे लोकांना मिळणारी ग्रँट ही ते ह्या कल्टचे किती श्रद्धाळू भक्त आहेत त्यावर ठरणार असेल तर त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष त्या पद्धतीने कलुषित असणारच.
शेंडेनक्षत्र, मी तुम्हाला
शेंडेनक्षत्र, मी तुम्हाला म्हणूनच ecology चा अभ्यास करायला सांगते आहे. Don't fall prey to any political agendas by any party anywhere in the world. They are not going to serve to the nature. तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि मग ठरवा काय योग्य आणि काय अयोग्य ते. तुम्हाला फार वेळ लागणार नाही हे लक्षात यायला की सगळेच उपाय कसे trade offs आहेत आणि त्यातल्या त्यात बरे trade offs स्विकारण्याची वेळ देखील बरीचशी उलटून गेली आहे. You are correct that our understanding of the earth as an ecosystem is extremely limited. However, even with this limited knowledge what is observed and predicted is pretty scary. It is always good to err on the side of caution in such cases. उदाहरणार्थ, कोरोनाच्या साथीच्या सुरूवातीला सर्वच देशांनी शक्य तितके कडक प्रतिबंधक उपाय योजले. जोवर कोरोनाच्या संपूर्ण समस्येची उकल झाली नव्हती तोवर हे उपाय योग्यच होते. आता आपल्याला जसे जसे अधिक ज्ञान होत आहे आपण अधिक specific आणि परिणामकारक उपायांकडे वळतो आहोत. त्याच प्रमाणे अनेक पर्यावरणसंबंधी उपाययोजनांच्या बाबतीत देखील असे व्हायला हवे आहे. One size fits all असे उत्तर याला नाही. तेव्हा आपण स्वतः जागरूक राहावे आणि अभ्यास करून मगच ठरवावे हे उत्तम. Policy level changes are only effective when the citizens are aligned with the correct mindset. नाहीतर 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली की 51 मायक्रॉनच्या पिशव्या बाजारात येण्यापलीकडे बदल दिसत नाही.
Climate change is an absolute nightmare - this is why (https://youtu.be/uqwvf6R1_QY) हा एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे. तो नक्की पहा.
नवीन मजकूर - मी हा वरचा व्हिडिओ पुन्हा पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की तो पूर्णपणे योग्य नाहीये. 23 मिनिटांच्या पुढच्या गोष्टी ज्यात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबद्दल माहिती दिली आहे ती तितकीशी योग्य नाही. त्यातील दाव्यांच्या फोलपणा साठी Michael Moor याने तयार केलेली planet of the humans ही डॉक्युमेंटरी युट्यूबवर बघता येईल. (https://youtu.be/Zk11vI-7czE). Honestly, there is no easy and simple solution to the mess we are in currently. All we can do is dial down our consumption and start using the resources as wisely as possible (the trade offs). It's not easy but it is not impossible either. If we are able to stay away from the politics then we can definitely improve our situation.
आपल्या सारख्या प्रकांड
आपल्या सारख्या प्रकांड अभ्यासू व्यक्तीने हक्काने सल्ला दिला त्याबद्दल आभारी आहे. >> मी प्रकांड अभ्यासू वगैरे मुळीच नाही. मी एक खूप घाबरलेली व्यक्ती आहे जिला आपली भीती दुसऱ्याला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. Convince me otherwise and I'll be the happiest soul on the planet!
हा जो म्हणतो ते खरंच आहे का
हा जो म्हणतो ते खरंच आहे का?की इम्पोस्टर?
https://twitter.com/RVAT2020/status/1313649181475704832
>>मी एक खूप घाबरलेली व्यक्ती
>>मी एक खूप घाबरलेली व्यक्ती आहे जिला आपली भीती दुसऱ्याला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही.<<
"फियर इज द पाथ टु डार्क साइड. फियर लिड्स टु अँगर, अँगर लिड्स टु हेट, अँड हेट लिड्स टु सफरिंग..." - योडा
मागच्या पेक्षा हे डिबेट जास्त
मागच्या पेक्षा हे डिबेट जास्त सिव्हिल झाले. दोघांनीही अनेक महत्त्वाचे प्रश्न स्किप केले. पेन्स नंतर नंतर व्यवस्थित बोलत होता पण पहिली ४०-५० मिनीटे "हरचंद पालवाच्या दुकानाची बिजागरी गंजून खल्लास!" च्या पुढे सरकायलाच तयार नव्हता. प्रश्न कोणताही विचारला तरी हा फ्रॅकिंगवरच.
त्याला कोणताही प्रश्न विचारला
त्याला कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर न देता कमलाच्या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलत बसलेला.
त्याच्या डोक्यावर बसलेली माशी ट्रेंड होतेय आता.
I liked Kamala, she reminded me of #44..
44 is love..
ट्रम्पसाहेबांच्या अथक
ट्रम्पसाहेबांच्या अथक प्रयत्नांनी ट्रेडर जोमध्ये मिसळ मिळू लागली. आणि म्हणे ट्रम्प भारतद्वेष्टा!
आणखी चार वर्षं मिळाली तर पाटवड्या, शेवभाजी, अळूचं फदफदं, काही विचारू नका!
व्वा, व्वा, सा.
व्वा, व्वा, सा.
अगदी खरे. ट्रंपने चक्क एक्झिक्युटिव ऑर्डरच काढली - सा. रहातात तिथल्या त्रेडर जो मधे ताबडतोब मिसळ करी ठेवा.
आमच्याकडे ओबामाने तर शॉपरिइट मधे पाटक मसाले, ट्रेडर जो मधे लँब व्हिन्डालू ठेवायला कायदाच पास करून घेतला, ओबामाकेरच्या आधीच.
सगळ्या अमेरिकेचे लक्षच मुळी भारताचे कल्याण कसे होईल यावर लागले आहे!
>>ट्रम्पसाहेबांच्या अथक
>>ट्रम्पसाहेबांच्या अथक प्रयत्नांनी ट्रेडर जोमध्ये मिसळ मिळू लागली. आणि म्हणे ट्रम्प भारतद्वेष्टा!
पण हा जो कुणी जो आहे तो जो डेमोक्रॅटिक जो आहे त्याच्याशी संबंधित तर नाही?
असो. कॅलिफोर्नियातील काही अती पुरोगामी (SJW, Woke इ.) मंडळी ट्रेडर जो कडे विविध उत्पादनांची नावे बदलावीत म्हणून मागे लागली आहेत. कारण ती नावे रेसिस्ट आहेत. उदा. ट्रेडर होजे आणि ट्रेडर मिन्ग. मेक्सिकन आणि चिनी पद्धतीचे खाणे ह्यांना ही नावे होती. ती त्यांना बदलावी लागली. कारण नाहीतर कॅलिफोर्नियात धंदा कसा करणार!
जो सत्तेवर आल्यावर ह्या लोकांना मोकळे रान मिळेल. कदाचित हे लोक मग अमुक कुजिन तमुक कुजिन ह्यालाही रेसिस्ट ठरवून त्यावर बंदी आणावी असे म्हणू लागतील. काहीच्या काही अतिरेक चालू आहे. पॉलिटिकली करेक्ट च्या नावाखाली लोकप्रिय उत्पादने बंद करायला लावून नव्या नावाने ती आणायला भाग पाडणे. ह्याचा खर्च ग्राहकांवरच पडणार. त्या व्यापार्याला काही स्वातंत्र्य देणार का नाही? प्रत्येक बारीक्सारिक गोष्टीत वर्णद्वेष खोदून खोदून शोधून काढणे हा मूर्खपणा आहे. उद्या व्हाईट राईस, ब्राउन राईस, ब्लॅक राईस हेही रेसिस्ट समजले जाईल असा माझा अंदाज आहे.
फ्रॉम द डेस्क ऑफ - ऑनरेबल
फ्रॉम द डेस्क ऑफ - ऑनरेबल प्रेसिडेण्ट ऑफ युनायटेड स्टेट्स,
१६००, पेनसिल्वानिया अवेन्यू, एनडब्ल्यू, वॉशिंग्टन डीसी.
(स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शल, फॉर युअर आइज ओन्ली!)
हे देअर माय डिअर बडी नमो, हौडी!! मी कालच इस्पितळातून परत आलो. ऑल इज वेल! इथल्याच एका लष्कराच्या इस्पितळात मला दाखल करण्यात आले होते. खरे सांगायचे तर मला कुठलाच त्रास नव्हता. पण रिस्क नको असे सगळ्यांचे मत पडले. लोकांच्या शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडला. पण सगळ्यांत स्पेशल शुभेच्छा तुमच्या होत्या. तुम्ही पाठवलेले ‘गेट वेल सून’चे कार्ड मला इस्पितळातच मिळाले. ते वाचले आणि ताबडतोब कोविड नेगेटिव झालो! केवढा हा परिणाम! आय वॉज झॅप्ड!!
माझी चाचणी पॉझिटिव आली आहे, असे मला ज्या सीआयएच्या अधिकाऱ्याने पहिल्यांदा सांगितले, त्याला मी ताबडतोब कामावरून काढून टाकले. नॉन्सेन्स!! असल्या बेकार बातम्या थेट मला येऊन सांगण्याचा त्याचा आगाऊपणा मला आवडला नाही. निवडणुकीतील माझे स्पर्धक जो बायडन यांच्या माणसांनी व्हाइट हौस पोखरले आहे, असा भास मला कधी कधी होतो. तसे मला बऱ्याच प्रकारचे भास होतात. पण ते जाऊ दे.
असल्या बंडल व्हायरसला घाबरणारा मी नव्हे. म्हणूनच मी कधी मास्क तोंडाला लावला नाही. परवा इस्पितळात दाखल होताना लावला, तेव्हा तोंडाची आग आग झाली. मास्कआडून मी सगळ्यांना फैलावर घेतले. जो बायडन हे गृहस्थ अगदीच घाबरट आहेत. मध्यंतरी आमची आमनेसामने चर्चा झाली. त्यावेळी त्यांना छत्तीस वेळा शेकहॅंड करायचे मी ठरवले होते. (तुम्हीच तर ही आयडिया मला शिकवली, टीचर! हाहा!!) पण जो बायडन दहा मीटर अंतर राखून उभेच राहिले. मला शेकहॅंड करता आला नाही. जाने दो.
डिअर नमो, यू आर माय गुरु, माय फिलॉसफर, माय गाइड!! डिट्टो तुमच्यासारखाच मी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. परवा इस्पितळातून बाहेर पडून मोटारीत बसून उगीच नसलेल्या गर्दीला हात दाखवून परत येऊन आडमिट झालो!! परवा त्या तुमच्या अटल बोगद्याचे उद्घाटन केलेत, तेव्हाही तुम्ही जीपमध्ये बसून कोणाला तरी हात करत होता? तेही समोर कुणीही नसताना! ते बघूनच मी प्रेरणा घेतली. उगीच मोटारीने एक चक्कर मारून आलो.
यंदाचे इलेक्शन मी तुमच्या स्टाइलनेच लढणार आणि जिंकणार! आपल्या दोघांची दोस्ती जगजाहीर आहे. ती तशीच राहायला हवी, म्हणून तरी मला ही निवडणूक जिंकायलाच हवी! रादर (पक्षी : किंबहुना) हा विचारच मला प्रेरणा देतो. त्यात तुमचे शुभेच्छा कार्ड मिळाले. त्यावर एक पिसारा फुललेला मोर होता आणि खाली लिहिले होते,- डिअर फ्रॅंड डोलांड, गेट वेल सून! त्या क्षणालाच मी खडखडीत बरा झालो!
बाय द वे, व्हाइट हौसच्या हिरवळीवर पाच-दहा मोर आणून सोडा, असे फर्मान मी सीआयएच्या लोकांना सोडले आहे. या घटकेला किमान डझनभर सीआयए एजंट मोर पकडायला देशोदेशी पळत असतील, याची खात्री आहे! आठवड्याभरात मीदेखील मोर आणून त्यांना दाणे खिलवणार आहे. निवडणुकीत चांगला इफेक्ट होईल, असे वाटते. बघूया!
टिल देन, बाय बाय! सी यू सून.
युर्स डोनाल्ड (डोलांड)
ता. क. : मला कोरोना झालाच नव्हता! मीच कोरोनाला झालो, असे लोक आता म्हणतात. हाहा!!
(सकाळ मध्ये आलंय हे
कोणी काहीही म्हणो शेवटी
कोणी काहीही म्हणो शेवटी जिंकून येणार ते ट्रम्प तात्याचं
यावेळेला बायडन येइल असे वाटते
यावेळेला बायडन येइल असे वाटते.
जो सत्तेवर आल्यावर ह्या
जो सत्तेवर आल्यावर ह्या लोकांना मोकळे रान मिळेल. कदाचित हे लोक मग अमुक कुजिन तमुक कुजिन ह्यालाही रेसिस्ट ठरवून त्यावर बंदी आणावी असे म्हणू लागतील. काहीच्या काही अतिरेक चालू आहे. >>> बराच बिनडोकपणा सुरू आहे. पण हे लोक निवडून आल्यावर फार काही होणार नाही.
बाय द वे, कुझिन वर बंदी नाही. नाव बदलायला सांगत आहेत. ते ब्रॅण्ड मधे "मॅमी" चे चित्र असलेला तो ब्रॅण्ड सोडला तर बाकी ब्रॅण्ड मधे फारसे रेसिस्ट काही नाही. "रेसिझम फिशिंग" सुरू आहे सध्या.
आज कुजिन वर बंदी नाही. पण
आज कुजिन वर बंदी नाही. पण सगळे विषय संपले की असे काहीतरी नवे उकरून काढले जाईल.
खगोलशास्त्रातला ब्लॅक होल ह्याला ब्लॅक म्हणणेही रेसिस्ट समजले जाऊ लागले तर आश्चर्य नको.
एका मित्राने सांगितले की त्यांच्या कंपनीत (स्पॅम संबंधित काहीतरी कोड) ब्लॅक लिस्ट, व्हाईट लिस्ट हे शब्द कोडमधून काढून टाकायला लावले. ह्या थोर कार्याकरता एक स्वतंत्र रिलिज केला गेला!
(No subject)
मजेदार आहे.
पेंड्युलम मध्यभागी येण्याआधी दूरचा झोका घेतो असं म्हणूया!
आधी मिसळीच्या तर्रीची लेम करी
आधी मिसळीच्या तर्रीची लेम करी करायची आणि मग ती ब्राउन राइसबरोबर खायची!
("तुझ्या बापाने दीर्घ काढली होती का तिखटातली ती?!"ची आठवण झाली मला उगाचच!)
बरं झालं आमच्या इथल्या ट्रेजोमध्ये मिळत नाही!
एका मित्राने सांगितले की
एका मित्राने सांगितले की त्यांच्या कंपनीत (स्पॅम संबंधित काहीतरी कोड) ब्लॅक लिस्ट, व्हाईट लिस्ट हे शब्द कोडमधून काढून टाकायला लावले. ह्या थोर कार्याकरता एक स्वतंत्र रिलिज केला गेला! >>>
अमित - हो असेल. पण माझा अनुभव असा आहे की रेसिझम म्हणजे नक्की काय याबाबतच गोंधळ असलेल्या अतिउत्साही लोकांचे हे उद्योग असतात. पण याने जे खरोखर गंभीर विषय आहेत ते डायल्यूट होतात.
हो. खरंय! आमच्या लोकल फेसबुक
हो. खरंय! आमच्या लोकल फेसबुक ग्रुपवर गारबेजडेच्या दिवशी वार्याने ब्लॅक बिन्स उडून गेले तर लोकांनी 'ब्लॅक बीन्स मॅटर'! लिहिलेलं. मग कंपोस्टिंगचा ग्रीन बीन उडालेल्या शेजार्याने 'ग्रीन बीन्स ऑल्सो मॅटर' लिहिलं.
<<पण माझा अनुभव असा आहे की
<<पण माझा अनुभव असा आहे की रेसिझम म्हणजे नक्की काय याबाबतच गोंधळ असलेल्या अतिउत्साही लोकांचे हे उद्योग असतात. पण याने जे खरोखर गंभीर विषय आहेत ते डायल्यूट होतात.>> अगदी बरोबर.
पण रेसिझमच कशाला? कुठल्या विषयाबद्दल लोकांच्या मनात गोंधळ नाही आहे? घटना काय, इलेक्टोरल कॉलेज काय, कम्युनिझम म्हणजे काय? ग्लोबल वार्मिंग, आरोग्य विमा, कुठल्याच विषयाचे कसलेच ज्ञान नाही. नुसती बोंबाबोंब करत हिंडायचे. जो जास्तीत जास्त मोठ्याने, जास्तीत जास्त वेळा बोंबलेल तो निवडून येणार.
राजकारण हे असेच असते. कुणिहि येवो, आपण आपले बक्कळ पैसे जमा करून शांत बसून गंमत पहावी.
ट्रंप, बायडेनचा वादविवाद ऐकताना भारतात रस्त्यावरची कुत्री जशी भुंकत असत, त्याची आठवण येऊन मायदेशीसाठी मन व्याकुळ झाले. त्यावेळी ते नकोसे वाटले होते, पण या वादविवादापेक्षा ते बरे.
नंद्या४३....
नंद्या४३....
जी लोक स्टँड बॅक व स्टँड बाय आहेत.. त्यांच्या अनुयायांना आज मिशिगन मधे डेमॉक्रॅट गव्हर्नर ग्रेचन व्हिटमर हिला किड्नॅप करुन ठार मारायच्या व मग तिचे तिथले सरकार उलथवुन टाकायच्या कटात अटक झाली आहे.
येणार्या भविष्यकाळात काय होइल व होउ शकते याची ही नांदी तर नव्हे?
वॉव... शब्दच नाहीत.. द्वेषाचे विष एवढे भिनले आहे? राजकिय विचार पटत नाहीत म्हणुन किड्नॅपींग व खुन?
काही जण म्हणतात की उमेदवाराची
काही जण म्हणतात की उमेदवाराची किंवा पक्षाची भारतविषयक भूमिका काय आहे हा अमेरिकेच्या निवडणूकीतील मुद्दा होऊ शकत नाही. मी ह्याच्याशी असहमत आहे. परराष्ट्र धोरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत हे जगातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. भारताशी अमेरिकेचे अनेक हितसंबंध आहेत. भारताला आणि अमेरिकेला भेडसावणारे काही प्रश्न सारखेच आहेत, ज्यावर सहकार्य होऊ शकते. त्यामुळे एखादा उमेदवार भारताशी चांगले संबंध ठेवू पाहत आहे का, हा मुद्दा मतदार विचारात घेऊ शकतात. भौतिक हितसंबंधांव्यतिरिक्तही अमेरिकन राष्ट्राची जी मूल्ये आहेत, त्या मूल्यांना जागतिक स्तरावर पाठिंबा मिळवणे आणि ती वृद्धिंगत करणे ह्यासाठी भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा एखाद्या उमेदवाराचा अजेंडा असेल, (किंवा भारताशी वाकड्यात शिरण्याचा दुसऱ्या उमेदवाराचा अजेंडा असेल) तर मतदारांनी ते विचारात घेणे चांगलेच.
अशा प्रकारे किडनॅप करण्याचे
अशा प्रकारे किडनॅप करण्याचे समर्थन करता येत नाही. पण एखाद्या गटाला कायम घालून पाडून वागवले, आपल्या आवडीच्या गटाला चांगले वागवले तर अशा प्रकारचे लोक डोके वर काढणार.
मिशिगनमधे जेव्हा BLM, Antifa वगैरे लोक मोठ्या जथ्याने आंदोलन करत होते तेव्हा गव्हर्नरने कौतुकाच्या पायघड्या घातल्या पण जेव्हा काही लोक आम्हाला आमचे कामधंदे करु द्या म्हणून रस्त्यावर आले तेव्हा त्याला विरोध केला. ते आंदोलन मोडून काढायचा मोठा प्रयत्न केला गेला. हे बहुधा रिपब्लिकन, बहुतांश श्वेतवर्णी होते.
मिशिगन गव्हर्नर कायम अशा प्रकारे दुटप्पी वागत आहे. हे चूक आहे आणि घातक आहे.
कायदा जी काही पावले उचलायची ती उचलेल आणि संबंधितांना योग्य ती शिक्षा देईल अशी आशा करू.
>>... मी ह्याच्याशी असहमत आहे
>>... मी ह्याच्याशी असहमत आहे.... <<
तुमचा मुद्दा समजला. पण इथल्या काहिंचं असं मत आहे कि कामला हॅरिस इंडियन ओरिजिन असल्याने बाय्डन्/हॅरीस टिकट इज गुड फॉर इंडिया. मग भले बाय्डनची काश्मिर किंवा भारता बाबतची भूमिका काहि का असेना; आजोळचं प्रेम बाय्डनला त्याची भूमिका बदलायला भाग पाडेल. पण हा झाला गंमतीचा भाग. प्रत्य्क्षात तसं कहिहि होत नाहि. पण कँपेनिंग करताना तसं गाजर दाखवावं लागतं, कँपेन फंडिंग करता.
विथ दॅट सेड, अमेरिकेत साधारण ३ मिलियन (चूभूदेघे) इंडियन अमेरिकन्स वोटर्स आहेत; सगळीकडे विखुरलेले. एकगठ्ठा स्विंगस्टेट्समधे असते तर दखल घ्यावी लागली असती कदाचित, पण तिथे त्यांचं प्रमाण नगण्य. तेंव्हा इंडियन मिडिया किंवा इतरांनी कितीहि रोझी पिक्चर उभं केलं तरीहि इंडियन अमेरिकन्स वोट इज नॉट दॅट इंपॉर्टंट फॉर इलेक्टिंग पोटस, बट देर डॉलर्स कम हँडि टु पे कँपेन बिल्स...
माझं कित्येक वर्षांपासुनचं निरिक्षण - आयर्नी इज पिपल हु लेफ्ट इंडिया आफ्टर गेटिंग फेडप विथ दि सोशॅलिस्ट डिमाक्रसी आर सपोर्टिंग द सेम इन युनायटेड स्टेट्स...
>> एखाद्या गटाला कायम घालून
>> एखाद्या गटाला कायम घालून पाडून वागवले, आपल्या आवडीच्या गटाला चांगले वागवले तर अशा प्रकारचे लोक डोके वर काढणार. >>
काय बोलताय नक्की????
व्हाईट सुप्रिमसिस्ट, केकेके ना घालून पाडून वागवल्याचा परिणाम आहे हा??? आणि स्टँड बॅक आणि स्टँड बाय, देअर आर फाईन पीपल ऑन इदर साईड असं चिथावणीखोर बोलल्याचा! असं व्हायला नको असेल तर व्हाईट सुप्रिमसिस्ट लोकांना चांगलं वागवा?????
चूक आणि घातक गेली चार वर्षे सगळा देश सहन करतोय. ते बंद करायला कोर्ट केसेस, इंपीचमेंट, प्रचार.. असं सगळं चालू आहे. हे किडनॅप आणि मारणं हे अविश्वसनीय आहे! आजच आमचा पंतप्रधान म्हणालाय की अमेरिकेत पीसफुल ट्रांझिशन होवो, पण नाही झालं तर कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला कॅनडाने तयार रहायला हवं. खरंय!
असो. बोलण्यात अर्थ नाही. सुधारा!
>>
>>
काय बोलताय नक्की????
व्हाईट सुप्रिमसिस्ट, केकेके ना घालून पाडून वागवल्याचा परिणाम आहे हा??? आणि स्टँड बॅक आणि स्टँड बाय, देअर आर फाईन पीपल ऑन इदर साईड असं चिथावणीखोर बोलल्याचा! असं व्हायला नको असेल तर व्हाईट सुप्रिमसिस्ट लोकांना चांगलं वागवा?????
<<
आपण आपले मराठी भाषेचे आकलन सुधारा जमले तर. मी व्हाईट सुप्रिमसिस्ट लोकांना वाईट म्हणू नये असे म्हटले असे आपल्या दिव्य दृष्टीला कुठे दिसले बरे?
तमाम श्वेतवर्णीय वंशाला (व्हाईट सुप्रिमसिस्ट नाही) कायम अपराधी ठरवले जाते. प्रत्येक श्वेतवर्णीय माणूस हा गुलाम बाळगणार्या लोकांचा वंशज समजला जातो. एक चुकीचा शब्द त्याच्या तोंडातून निघण्याचा अवकाश की त्याची नोकरी गेली, त्याला हेट क्राईमच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले असे सर्रास होत असते. काळे लोक कितीतरी धिंगाणा करतात. गुन्हे करतात. फ्लॉईड वगैरे प्रकरणी अनेक शहरात लुटालुट, जाळपोळ, विध्वंस, खून झाले. किती लोकांना पकडले? नगण्य. अनेक दिवस पोलिस राजकीय दबावामुळे काहीही कारवाई करत नव्हते. जर केली तर उलट पोलिसांवरच गुन्हे दाखल केले गेले. हे रिव्हर्स रेसिज्म आहे. हे अत्यंत घातक आहे.
आजही अमेरिकेत गोरे लोक बहुसंख्य आहेत. बहुतेक लोक कायदे पाळणारे आहेत. पण अशा प्रकारे सतत भेदभाव केला जात असेल तर काही कुंपणावरचे लोक व्हाईट सुप्रिमसीच्या बाजूला झुकणे शक्य आहे. नव्हे, त्या कळपात सामील होतच असतील. भूतकाळातील भेदभावाला रिव्हर्स रेसिज्म हे उत्तर असू शकत नाही.
https://kashmirobserver.net
https://kashmirobserver.net/2020/08/14/kamala-harris-what-do-we-know-abo...
क॑मला हॅरिस ची ही विधाने काश्मीरबाबत. काश्मीरी एकटे नाहीत. आम्ही लक्ष ठेउन आहोत व वेळप्रसंगी मधे पडू.
https://www.republicworld.com/world-news/us-news/kamala-harris-views-on-...
"Demystifying Indian identity"
"Opposing views on Kashmir Article 370 and CAA"
"Biden-Harris' support of pro-Pakistan lobbies in the US"
मला ही भीती पडली आहे.
मला ही भीती पडली आहे.
अध्यक्ष पदावर निवडून येणाऱ्या माणसाचं शेल्फ लाईफ किमान आठ वर्षं असावं ही अपेक्षा आहे. म्हातारबांकडे बघून वाटत नाही ते अजून आठ वर्षं टिकतील. बहुतेक covid ची लागण होऊन एखाद्या वर्षात गचकतील. मग सर्सी लॅनिस्टरला रान मोकळं... आणि तिची सेकंड इन कमांड चक्रम नॅन्सी.....
We are f...ed!!
कावळ्याच्या शापाने गाय मरत
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी काही तरी म्हण आहे ना.
Pages