अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रम्पने भारतावर चीनच्याप्रमाणे कोविदचे आकडे लपवण्याचा, dishonest असल्याचा आरोप केला. भारत कित्येक दिवस जगात डेली बेसिसवर सर्वात जास्त केसेस रिपोर्ट करतो आहे. मोअर दॅन अमेरिका. जर आकडे लपवायचेच असते तर इतकं टेस्टिंग करून रोज सर्वाधिक रिपोर्ट केलाच नसता ना. ट्रम्पला भारतीय वंशाचे लोक इतके खोटारडे वाटतात? भारतात निपाह व्हायरसचा उद्रेक झाला होता तेव्हाही भारताने तो देशाबाहेर पसरू दिला नव्हता.

दुसरा मुद्दा पॅरिस करार- क्लायमेट चेंजचा होता. मुळात अमेरिकेची लोकसंख्या भारताहून कमी असली तरी पोल्यूशनचा शेअर भारतापेक्षा दुपटीने अधिक आहे. विकसित देशांनी स्वतः भरपूर पोल्यूशन करून ठेवायचं आणि नंतर विकसनशील देशांकडे बोटं दाखवायची ही reality आहे. इतकं प्रदूषण करूनही अमेरिकेत ट्रम्प व त्याचे समर्थक क्लायमेट चेंज deny करण्यात पुढे. ट्रम्पने पॅरिस करार अमेरिकेपुरता रद्द केला. भारत मात्र एक विकसनशील देश असूनही पॅरिस करारानुसार compliant आहे. अशावेळी ट्रम्पने भारताला या मुद्द्यावर डिबेटमध्ये ओढणं अगदीच चुकीचं होतं. एखादा राष्ट्रप्रमुख स्वतः क्लायमेट चेंजसाठी काम करून मग इतरांना सांगत असेल तरी ठीक पण हा इसम स्वतः क्लायमेटबद्दल निर्बुद्ध ट्विट्स करतो आणि तोंड वर करून भारताचं नाव कशाला घेतो तेपण अंतर्गत डिबेटमध्ये!

याआधीही ट्रम्पने मला hydroxychloroquine दिलं नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या होत्या. भारताने तेव्हा ते देणार नाही वगैरे काही सांगितलंही नव्हतं पण कलर्ड लोकांशी याच टोनमध्ये बोलायचं इतकंच ट्रम्पला कळतं.

शेण्डे - डेम्स लोक हे "वोक" जनतेची, मीडियाची खुशामत करतात हे खरे आहे. मला ते मान्य नाही. पण ट्रम्प ही काही भारताचा मित्र वगैरे नव्हे. किंबहुना तो कोणाचाच मित्र नाही. गेल्या चार वर्षांचा इतिहास बघितला तर जगात भारी म्हणून त्याने तारीफ केलेल्या अनेक लोकांना ७-८ महिन्यांतच वितुष्ट आल्यावर त्याने कडवट (आणि "क्रास") टीका करून निकालात काढलेले आहे. त्याची "थ्रो अंडर द बस" लिस्ट खूप मोठी आहे.

सनव यांनी म्हंटले आहे तसे त्या डिबेट मधे नंबर्स लपवण्याबद्दल चीन व रशियाच्या जोडीने भारताचे नाव घेणे हे नुसते चुकीचेच नाही तर देशांविषयी मुलभूत अज्ञान दाखवते. चीन व रशिया हे ओपन देश नव्हेत. त्यांचे खरे नंबर्स आपल्याला कधीच कळणार नाहीत. त्याने डिबेट मधे याचेच तिसरे उदाहरण म्हणून भारताचे नाव घेतले. भारताकडून नोंदले जाणारे नंबर्स जर खरे नसतील तर ते एकूण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींमुळे असेल (जे फारसे लागू होत नाही, कारण अशा त्रुटींमुळे केवळ काही टक्के फरक पडेल) - रशिया व चीन सारखे नंबर्स लपवण्यामुळे नाही.

सनव, फा +१००

काही मुद्दे. प्रदूषणाबद्दल. जरी भारतात अमेरिकेपेक्षा कमी संख्येने वाहने असली तरी सरासरी प्रत्येक वाहन अमेरिकेच्या एका वाहनापेक्षा कितीतरी जास्त प्रदूषण करते. कारखाने, भट्ट्या ह्या गोष्टींकरता कागदोपत्री कितीही तपास केले जात असले तरी हात ओले करून त्यांना खूश ठेवले जाते आणि बिनबोभाट प्रदूषण केले जाते. उदा. डोंबिवलीत अशा प्रकारे अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत आणि चालूही आहेत.
अमेरिकेतील हवा ४०-५० वर्षापूर्वीची आणि आजची पाहिली तर खूप स्वच्छ झालेले दिसेल. हे कसले द्योतक आहे?
क्लायमेट चेंज हा वादग्रस्त विषय आहे. न्यूटनच्या गुरुत्त्व नियमासारखे किंवा आइनस्टाईनच्या रिलेटिविटीसारखे सगळे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे आणि ट्रंप त्याला नकार देतो हे चित्र चुकीचे आहे. आजही आपल्याला दोन दिवसांनी, एका आठवड्याने हवामान काय असेल ते अचूक सांगता येत नाही. अगदी सगळे आधुनिक तंत्र वापरले तरी. क्लायमेट ओळखणे हे त्यापेक्षा कितीतरी अवघड काम आहे. गेल्या अनेक शतकांची हवामानाची अचूक मोजमापे उपलब्ध नाहीत. झाडांच्या बुंध्यातील वर्तुळे वगैरे पाहून अंदाज केला जाऊ शकतो पण तो अंदाज आहे. आज ज्या प्रकारे मोजमापे केली जातात, उपग्रहाने काढलेलेल फोटो वगैरे ते तर जुन्या काळात नव्हतेच. त्यामुळे अशा अपुर्या माहितीवर आधारित जी मॉडेल बनतात त्यात अनेक त्रुटी असतात. त्यामुळे अनेक राजकीय नेते असे दावे करतात की शास्त्रज्ञांच्या मते आपल्याकडे फक्त ११ वर्षे आहेत. त्यानंतर जगबुडी येणारच वगैरे ते बिनबुडाचे दावे आहेत. ह्या विज्ञानशाखेची जागा प्रयोगशाळेत आहे. राजकीय व्यासपीठावर नाही.
अमुक एक केल्यामुळे ह्या येऊ घातलेल्या जगबुडीला थांबवता येईल ह्याविषयीही काही नीट माहिती नाही. जर मूळ मॉडेलमधेच त्रुटी असतील तर त्यावर उपाय हेही असेच त्रुटीपूर्ण असणारच. थोडक्यात क्लायमेट सायन्स हे अजून उत्क्रांत होत आहे. ते अजून अपुरे आहे. त्या अपुर्या माहितीवर प्रस्थापित तंत्रज्ञान फेकून देणे हे चूकच नाही तर घातक आहे. महागड्या टेस्ला काय कुणी गरीब मजूर वा लहानसे दुकान चालवणारा माणूस विकत घेऊ शकत नाही. मुळात टेस्ला चालवल्यामुळे क्लायमेट बदल थांबतो हाही वादग्रस्त दावा आहे.

मूळ मुद्दा हा. भारताकरता बायडन चांगला का ट्रंप. डिबेटमधे कितीही आणि कसाही उहापोह झाला असला तरी प्रत्यक्ष वागणे पाहिले पाहिजे. पाकिस्तानमधील अतिरेकी इस्लाम, चीन ह्यांच्या विरुद्ध कोण जास्त खंबीरपणे उभा राहिला आहे? निदान म्हणतो आहे?

प्रस्तुत परिस्थितीत डेमोक्रॅट हे जास्त चांगले कसे ते कुणीतरी समजवा.

>>भारताकडून नोंदले जाणारे नंबर्स जर खरे नसतील तर ते एकूण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींमुळे असेल <<
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार इ. तत्सम राज्यांतले नंबर्स आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींमुळे आहेत असा (भाबडा) विश्वास असेल तर विषयंच संपला...

बाकि, ट्रंप/पेन्स म्हणा किंवा बाय्डन/हॅरिस; निवडुन आल्यावर भारताच्या हीताकरता (इंडिया फर्स्ट?) झटुन कामं करतील अशी भाबडी आशा बाळगणार्‍या भारतीयांचे (मग ते कुठेहि रहाणारे किंवा कुठल्याहि देशाचे नागरीक असणारे असुद्या) मला नेहेमीच अप्रूप वाटंत आलेलं आहे... Wink

मग आणखी कशानेतरी असतील. भारत हा चीन आणि रशिया इतका क्लोज्ड, हुकूमशाही आणि स्टेट कंट्रोल्ड आहे असे म्हणायचे असेल तर विषय संपलाच काय, सुरूच होणार नाही Wink

आणि कोणत्याही देशाच्या मुख्यपदावर येउ शकणारी व्यक्ती त्यांची जी काही धोरणे आहेत त्यामुळे आपल्या देशाच्या हिताची आहे की नाही असा प्रश्न साहजिकच सर्वांना असतो. अमेरिकेतही इतर देशांच्या प्रमुखांबद्दल अशी चर्चा होते (सीआयए वाले केवळ चर्चा करून थांबत नाहीत असेही लोक म्हणतात). हे सगळे लोक असे बोलतात तेव्हा ती निवडून येणारी व्यक्ती बहुजनहिताय वगैरे म्हणतात तसे केवळ भारताच्या हिताचाच पहिला विचार करेल असे समजण्याइतके भाबडे असतात का? असेल, तुम्ही म्हणत आहात म्हणजे तसेच असणार.

तुम्ही नुसते उच्चासनावरून पिंका टाकता राव. कधीतरी घोड्यावरून खाली उतरा, मग चर्चा होउ शकते. अमेरिकेचे, भारताचे व एकूण आंतरराष्ट्रीय राजकारण तुम्ही सोडून कोणालाच कसे समजलेले नाही असा तुमचा समज असेल तर असू द्या. थोडे अप्रूप आम्हालाही तेवढेच.

देशातील 'अनुभवास येणारी हवा' ही दुर्दैवाने जागतिक तापमानवाढ मोजणीस मदत करणारी फुटपट्टी नाही तर दरडोई वातावरणात सोडला जाणारा कार्बन हा एक महत्त्वाचं कारण आहे.
दरडोई कार्बन फूटप्रिंट:
अमेरिका- १६ मिलियन मे.ट.
इंडिया: १.८ मिलियन मे.ट.
अमेरिकेचा आलेख बघितलात तर लक्षात येईल हे प्रमाण उच्चांकी पातळीवर २२ पर्यंत होते, जे अमेरिकेने कमी करत आज १६ वर आणले आहे, पण अजुन खूपच मोठा पल्ला लवकरात लवकर गाठणे गरजेचे आहे. त्या तुलनेत भारताचे प्रमाण आज नगण्य असले तरी विकसनशील देश असल्याने ते खूप मोठ्या वेगात वाढू ही शकते.
डोंबिवली एमआयडीसीत अनेक गैरप्रकार चालतात, हवेत आणि नाल्यात किती धोकादायक प्रकार सोडले जातात याची पूर्ण कल्पना आहे.
(रच्याकने: तुम्ही डोंबिवलीचे आहात का? तुम्ही सोन्याच्या राज्यात आहात हे माहित आहे, व्हॅली मध्ये असाल तर मिलपिटस ८८० डिक्सन लँडींग एक्झिटला सेम डोंबिवली एमआयडिसी वास येतो, तो नॉस्टेल्जिआने नाकात भरून घ्यायचो त्याची आठवण आली Lol )
पण भारतातील हवेच्या प्रदुषणाचा प्रमुख उगमस्त्रोत उद्योगधंदे नसुन घराघरात जाळण्यास वापरले जाणारे जैविक इंधन हे आहे. उद्योगधंदे फक्त ८% हवा प्रदुषणाला कारणीभूत आहेत.
बाकी पुढच्या आठवड्यातील हवामानाचा अचूक अंदाज न करता येणे ही जागतिक तापमानवाढ छद्म पुराण आहे याची सिद्धता म्हणून मांडणे इ. मनोरंजक असलं तरी त्यात तथ्य नाही हे जितकं लवकर उमजेल तितके लवकर उपाय करता येतील.
टेस्ला सर्वांना परवडेल किंवा ती ग्रीन आहे असा अजिबात दावा नाही. किंबहुना टेस्लाच्या विद्युतघट कारखान्यात काय प्रकारची हानी घडते याची कल्पना आहे.

>>तुम्ही नुसते उच्चासनावरून पिंका टाकता राव.<<
उच्चासन? ती रिलेटिव टर्म आहे, तुम्हि कुठल्या लेवलला आहात यावर अवलंबुन... Lol

बाकि, गेल्या आठवड्याच्या डिबेटमधे धोरणात्मक मुद्द्यांवर झालेल्या (किंवा टाळलेल्या) चर्चेपेक्षा फुटकळ, नानकांसिक्वेंशियल मुद्द्यांमधे रस असेल तर मात्र विषय खरोखरच संपला...

शेंडेनक्षत्र, तुम्ही युनिव्हर्सल हेल्थकेअर चे केलेले वर्णन बाळबोध आणी म्हणूनच चुकिचे आहे.
प्रत्येक रोग काही व्यायामाचा अभाव व आहारातील चुका यामुळेच होत नाही.
काही रोग अनुवंशिक असतात, कॅन्सर सारखे कही रोग अचानक उपटतात.
ज्यांना चांगली नोकरी आहे त्यांना इन्शुरंस कंपनीकडूनच मिळतो. पण बर्‍याच गरिबांना तो मिळत नाही. कारण नोकरी नसते किंवा पगार फारच कमी असतो. एखाद्या गरिबाला त्याची काहीही चूक नसताना जर कॅंसर झाला तर त्याला वाचायला अ‍ॅन रँड चे पुस्तक आणी मरायला विषाची बाटली देणार का ?

अमेरिकेत शाळांचा खर्च प्रोपर्टी टेक्स मधून चालतो. तुमचेच लॉजिक लावायचे तर ज्यांची मुले थोडी कच्ची असतात व त्यांच्यावर शिक्षकांना जास्त प्रयत्न करावे लागतात त्यांनी जास्त टॅक्स द्यावा ? ज्यंना मुलेच नाहीत त्यांनी टॅक्स देऊ नये ? किंवा मग प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून ज्याचे त्याने खर्च करून आपापली मुले शिकवावीत व गरिबांनी मुले निरक्षर ठेवावीत ?

शेंन यांची क्लायमेट चेंजवरची पोस्ट पाहून हसावे की रडावे हेच कळत नाहीये! इतक्या गंभीर संकटावर इतक्या naively आणि इतका चुकीचा (+वरवरचा) विचार करणारी व्यक्ती ज्या नेत्याला फॉलॉ करते त्या नेत्याकडून काहीही बरे घडण्याची अपेक्षाच नाही.
आपल्या प्रदुषण करणाऱ्या फॅक्टरीज चीनला हलवून हवेची क्वालिटी सुधारली याचा आनंद मानणं फारच मजेशीर आहे. सर्व environmental costs externalize करून आपणच कसे भारी असं दाखवलं की झालं! पण शेवटी चीन, अमेरिका, भारत, रशिया सगळे याच ग्रहावर आहेत आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित पापांचे परीणाम संपूर्ण मानवजात भोगेल/भोगते आहे याचा विसर पडला आहे सगळ्या नेत्यांना.

अमेरिकेत शाळांचा खर्च प्रोपर्टी टेक्स मधून चालतो. तुमचेच लॉजिक लावायचे तर ज्यांची मुले थोडी कच्ची असतात व त्यांच्यावर शिक्षकांना जास्त प्रयत्न करावे लागतात त्यांनी जास्त टॅक्स द्यावा ?
>>>
हे खतरनाक आहे Proud

महागड्या टेस्ला काय कुणी गरीब मजूर वा लहानसे दुकान चालवणारा माणूस विकत घेऊ शकत नाही>
यावर उपाय म्हणजे युनिव्हर्सल कारकेअर सिस्टीम निर्माण करून प्रत्येकाला मोफत टेस्ला उपलब्ध करून दिली पाहिजे. गरीब असणं हा काही कोणाचा दोष नाही.
आपण त्याला बायडनकेअर असं नाव देऊ.

रेकलेस माणूस आहे.
पहिली टेस्ट +व आल्यावरही दुसरीचा निकाल येईपर्यंत लोकांना भेटतो काय! हॉस्पिटल मध्ये पॉझिटिव्ह असताना फोटोऑप साठी सिक्रेट सर्विसचे जीव धोक्यात घालून गाडीतुन चक्कर काय मारतो! टॉडलर आहे का हा? की गप पडून रहाता येत नाही म्हणून गाडीतुन चक्कर मारुन आणली!

अमेरिकेत शाळांचा खर्च प्रोपर्टी टेक्स मधून चालतो. तुमचेच लॉजिक लावायचे तर ज्यांची मुले थोडी कच्ची असतात व त्यांच्यावर शिक्षकांना जास्त प्रयत्न करावे लागतात त्यांनी जास्त टॅक्स द्यावा ? >> विकू सुटलेत.

बाकि, ट्रंप/पेन्स म्हणा किंवा बाय्डन/हॅरिस; निवडुन आल्यावर भारताच्या हीताकरता (इंडिया फर्स्ट?) झटुन कामं करतील अशी भाबडी आशा बाळगणार्‍या भारतीयांचे (मग ते कुठेहि रहाणारे किंवा कुठल्याहि देशाचे नागरीक असणारे असुद्या) मला नेहेमीच अप्रूप वाटंत आलेलं आहे... >> +१ ट्रंप मोदी मित्र आहेत म्हणून भारतीयांनी ट्रंप ला मत द्या म्हणणार्‍यांचे लॉजिक मला इथल्या क्लायमॅट कंट्रोल वाल्या लॉजिक पेक्षा अधिक गम्मतशीर वाटते.

Trump Campaign Says Biden Lacks 'Firsthand Experience' of Being Infected With COVID-19
Rofl तात्याच्या कृपेने फर्स्ट हॅन्ड एक्स्पिरिअन्स अनेकांना मिळालाच आहे, आणि पुढचे काही दिवस मिळत रहाणारच आहे. त्या फर्स्ट हँड एक्स्पिरिअन्स देण्याच्या नादात काहीही न केल्याने दोन लाख लोकांचे जीव घेतले तात्याने. किती कणाहीन कसावं लीडर ऑफ फ्री वर्ल्डने! तोंड दिलंय म्हणून बोललंच पाहिजे!

वॉल्टर रीड मधून रवीवारी बाहेर निघून लोकांना वेव्ह करण्याबाबत काय म्हणणे आहे बरं ? Is it worth putting people's lives in danger here ? हा मुद्दा नानकांसिक्वेंशियल म्हणून धरला जाणार नाही असे समजायचे की 'यथा राजा, तथा प्रजा' म्हणायचे Wink

Doctors worry Trump could be ‘overtreated’ for coronavirus because he’s a VIP

Trump’s team of doctors at Walter Reed National Military Medical Center said over the weekend that the president has taken Gilead’s antiviral drug remdesivir, Regeneron’s antibody cocktail and the steroid dexamethasone in the past few days to treat his case of coronavirus.

The president could very well be the only Covid-19 patient to receive all three treatments, Dr. Leana Wen, former Baltimore health commissioner, said. She added it could be due to a medical phenomenon known as “VIP syndrome” in which the pressure to treat high-profile patients could lead to experimental treatments and potential errors.
एकतर ट्रंप खरोखर अत्यंत आजारी होता, किंवा त्याने कायच्याकाय औषधं बेस्टच्या नावाखाली स्वत:ला प्रिस्काईब करायची सक्ती केली, किंवा तो/ त्याचे डॉ. काहीही खोटं बोलताहेत. येडपटपणाचा कळस आहे! Biggrin

अपेक्षित ट्वीट आले आहेच
"Don’t be afraid of Covid. Don’t let it dominate your life. We have developed, under the Trump Administration, some really great drugs & knowledge. I feel better than I did 20 years ago!"
या माणसाला जी केअर, स्पेशल ट्रीटमेन्ट, औषधे मिळाली ती सगळ्यांना मिळणार आहेत का? पण फिकिर कोणाला आहे. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स वाल्या हिरो ने डोन्ट बी अफ्रेड म्हटल्यावर फॉलोअर्स तेवढेच ऐकून निश्चिंत होतील.

>>एखाद्या गरिबाला त्याची काहीही चूक नसताना जर कॅंसर झाला तर त्याला वाचायला अ‍ॅन रँड चे पुस्तक आणी मरायला विषाची बाटली देणार का ?<<
इतर देशातले गरीब कॅंसरग्रस्त झाले कि काय करतात, किंवा त्यांना ट्रीटमेंट कशी (आणि केंव्हा) मिळते तेहि सांगुन टाका. पण मला वाटतं मुद्दा तो नाहि. मुद्दा हा आहे कि फ्रीडम ऑफ चॉयस. गवर्नेमेंटने जबरदस्तीने (मला गरज नसताना) हेल्थ इंशोरंस घेण्यास का भाग पाडावे? जेणेकरुन मी धटधाकट असुनहि प्रिमियम्स भरत रहावे, या उदार हेतुने कि इतर आजारी लोकांची बिलं भरली (हेल्थ कॉस्ट कवर) जावीत? हेल्थ्केर कॉस्ट खाली आणण्या ऐवजी तुमचा कल किंवा धोरणं सबस्काय्ब्रर बेस वाढवण्याकडे असेल (टु फाइंड ए मिडियन), तर मग लोकं तुम्हाला बाहेरचाच रस्ता दाखवणार ना. बघा समजतंय का...

>>अमेरिकेत शाळांचा खर्च प्रोपर्टी टेक्स मधून चालतो. <<
बऽऽऽरं... Lol

BLM दंग्यांच्या वेळी पोलिसांच्या जीवांची पर्वा नसलेल्या, acab( all cops are bastards), they chose this job म्हणणाऱ्या अनेक लिबरटां ना अचानक सिक्रेट सर्व्हिसेस च्या जीवांची काळजी वाटू लागली आहे हे पाहून डोळे पाणावले.
काही दिवसांपूर्वी deonte murray नावाच्या एका काळया इसमाने
कॉम्प्टन मध्ये दोन पोलिसांना कोणत्याही कारणाशिवाय बसल्या जागी गोळ्या घातल्या. ते दोघे मृत्यूशी झगडत आहेत. लिबरट मीडिया मध्ये या घटनेला प्रसिद्धी मिळाली नाही. Guess why..

यावर उपाय म्हणजे युनिव्हर्सल कारकेअर सिस्टीम निर्माण करून प्रत्येकाला मोफत टेस्ला उपलब्ध करून दिली पाहिजे. गरीब असणं हा काही कोणाचा दोष नाही.
आपण त्याला बायडनकेअर असं नाव देऊ. >> लोल! याला rest of the world सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असं म्हणते. जगात अनेक ठिकाणी सरकार किंवा खाजगी कंपन्या ही अशी सेवा सशुल्क पुरवतात. त्यामुळे प्रदूषण कमी व्हायला मदत होते. टेस्ला न वापरता.

लोल! याला rest of the world सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असं म्हणते. >> कॅपीटॅलीस्म , फ्री मार्केट, वैयक्तिक चॉईस इत्यादी चा अर्थ ह्या देशात कोणाला लागू होणार आहे ह्याप्रमाणे सोयीस्करपणे बदलतो. Happy

>>>>> कॅपीटॅलीस्म , फ्री मार्केट, वैयक्तिक चॉईस इत्यादी चा अर्थ ह्या देशात कोणाला लागू होणार आहे ह्याप्रमाणे सोयीस्करपणे बदलतो. Happy>>>>> तो कसा? कॅपिटॅलिझममध्ये हे अंतर्भूत असते की प्रत्येक व्यक्तीने अन्य कोणालाही न दुखवता, तिच्या फायद्याचे रक्षण केले (गार्ड युअर ओन इन्टरेस्ट) तर त्या व्यक्तीची प्रगती होते व अशा रीतीने संपूर्ण समाजाची प्रगती होते.

हा अर्थ सोईस्कररीत्या कसा बदलला याचे उदाहरण कोणते? मी टॅक्स भरते. फ्रीलोडर म्हणुन मला कोणत्या सुविधा फुकट मिळतायत? तुमच्या म्हणण्याप्रमाणे, श्रीमंतांना काही सुविधा फुकट मिळतायत बरोबर? त्या कोणत्या?

शेतकर्‍यांना मिळणारी सबसिडी, बॅम्कांना मिळालेले बेल आऊट (किंवा कॉमन माणसाला न मिळलेले बेल आऊट ), एअर लाईन ना मिळणारी मदत हि सगळी कॅपीटॅलिस्म च्या मूळ तत्वांशी विसंगत आहेत. जेंव्हा प्रश्न सामान्या माण्साचा असतो तेंव्हा बाकीची तत्वे पुढे येतात पण बँक, शेतकरी व्होट बँक वगैरे असले की हे ईकॉनॉमी साठी कसे जरुरी आहे हे पुढे येते. तुमच्या विधानात "कॅपिटॅलिझममध्ये हे अंतर्भूत असते की प्रत्येक व्यक्तीने अन्य कोणालाही न दुखवता, तिच्या फायद्याचे रक्षण केले (गार्ड युअर ओन इन्टरेस्ट)" ह्यात जो बोल्ड केलेला भाग आहे हा होतो असे तुम्हाला खरच वाटते ?

>>
>>
>>
>>शेंडेनक्षत्र, तुम्ही युनिव्हर्सल हेल्थकेअर चे केलेले वर्णन बाळबोध आणी म्हणूनच चुकिचे आहे.
प्रत्येक रोग काही व्यायामाचा अभाव व आहारातील चुका यामुळेच होत नाही.
काही रोग अनुवंशिक असतात, कॅन्सर सारखे कही रोग अचानक उपटतात.
ज्यांना चांगली नोकरी आहे त्यांना इन्शुरंस कंपनीकडूनच मिळतो. पण बर्‍याच गरिबांना तो मिळत नाही. कारण नोकरी नसते किंवा पगार फारच कमी असतो. एखाद्या गरिबाला त्याची काहीही चूक नसताना जर कॅंसर झाला तर त्याला वाचायला अ‍ॅन रँड चे पुस्तक आणी मरायला विषाची बाटली देणार का ?
<<
प्रत्येकाला होणारा रोग हा त्याच्या वा तिच्या निष्काळजीपणामुळे न होता (जसे वाटेल तसे खाणे, पिणे, झोपणे इ.) केवळ अनुवान्शिक दोषामुळेच होतो असे समजणे हेही बाळबोध नाही का? आपापली वंशावळी पाहून त्याप्रमाणे योग्य वयात योग्य त्या तपासणी करून घेणे ह्याचे शिक्षण सरकारने द्यावे इतपत ठीक आहे.

सरकारने सगळ्यांना एका मापाने तोलण्यापेक्षा प्रत्येकाला आपापले आरोग्य साम्भाळू द्या हेच जास्त योग्य आहे. दारिद्र्य, अनारोग्य ह्याकरता अनेक वेळा त्या व्यक्तीची जीवनपद्धती, निष्काळजीपणा, आळस हा जबाबदार असतो. आणि सगळे काही सरकार करणार ह्या तत्त्वात ह्या लोकांचा बोजा प्रामाणिक, जागरूक, श्रीमंत लोकांनी उचलावा हा जुलूम आहे.

>>
शेंन यांची क्लायमेट चेंजवरची पोस्ट पाहून हसावे की रडावे हेच कळत नाहीये! इतक्या गंभीर संकटावर इतक्या naively आणि इतका चुकीचा (+वरवरचा) विचार करणारी व्यक्ती ज्या नेत्याला फॉलॉ करते त्या नेत्याकडून काहीही बरे घडण्याची अपेक्षाच नाही.
<<
मूळ संकट नीट कळलेले नसताना त्यावर वाट्टेल ते उपाय करत सुटणे हे कसले लक्षण आहे? अगदी सायन्स सायन्स करुन डेमोक्रॅट लोक नाचतात. पण सायन्स कधी चुकले नाही का आजवर? y2k ला जगबुडी येणार, उडणारी विमाने कोसळणार, एटीएम बंद पडणार, जगभराचा विजेचा प्रवाह खंडित होणार वगैरे नाना तर्‍हेचे अंदाज "जाणकार", "तज्ञ" वैज्ञानिक सांगत होते. ह्यातले काय घडले २००० साल सुरु होताना? काआआआआआही नाही.
जगातले सर्वश्रेष्ठ हवामान शास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रवीण (असे जे स्वतःला मानतात ते) अल गोर ह्यांनी आपल्या २००६ साली प्रदर्शित केलेल्या माहितीपटात अनेक भाकिते केलेली आहेत जी साफ चुकलेली आहे. उदा. पुढील १० वर्षात हरिकेन वादळे प्रचंड संख्येने होतील. प्रत्यक्ष डेटा असे काहीही घडल्याचे दाखवत नाही.
जेव्हा हवा थंड असते आणि मग ट्रंप विचारतो की ग्लोबल वॉर्मिंग कुठे आहे? तेव्हा त्याला अनेक लहानमोठे क्लायमेट आणि वेदर कसे वेगळे आहे ह्याचे बोधामृत पाजतात. मात्र कॅलिफोर्नियात आग लागली, दोन हरिकेन झाली की ते मात्र ग्लोबल वॉर्मिंगच आहे असे छातीठोकपणे सांगितले जाते. तेव्हा गूढरित्या क्लायमेट आणि वेदर एकरूप होतात !

कॅलिफोर्नियातील महान द्रष्टे राज्यपाल न्यूसम ह्यांनी पंधरा वर्षात पेट्रोलवर चालणारी वाहने कॅलिफोर्नियातून हद्दपार करायचा कायदा पास केला आहे. ह्या थोर उपायामुळे ग्लोबल वॉर्मिंग का क्लायमेट चेंज जे काही आहे ते थांबणार आहे का मंदावणार आहे ह्याचा शास्त्रीय (सायंटिफिक) डेटा पाहिलेला नाही. पण इलेक्ट्रिक कार चालवणे हे पुरोगामीत्वाचे, पर्यावरणाबद्दल जागरूक असण्याचे फ्याशन स्टेटमेंट आहे म्हणून त्याचे फ्याड सुरु.
जेव्हा अपुर्या ज्ञानावर आधारित भाकिते आणि उपाय केले जातात आणि भाकिते खोटी ठरताना दिसतात तेव्हा हे खरोखर विज्ञान आहे का उगाचच काहीतरी बागुलबुवा उभा करून सोशलिज्म आणले जात आहे अशी शंका येते. आणि ते स्वाभाविक आहे.

Pages