Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जर अमेरिकेतील बहुतांश जनता
जर अमेरिकेतील बहुतांश जनता बेकायदा घुसखोरांना नागरिकांपेक्षा जास्त सन्मानाने वागवू इच्छिते आहे, त्यांचे कोडकौतूक पुरवू इच्छित आहे आणि जर दंगली, जाळपोळ, लुटालूट, हिंसा आणि खून हे सगळे जातीय सलोख्याकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्यामुळे ज्यांचे नुकसान होते ती ह्या महान कार्याकरता मोजावी लागलेली किरकोळ किंमत आहे असे समजत असेल तर ह्या इच्छेपुढे मान तुकवावीच लागेल!
आकडे 16 मध्ये हिलरीच्या
आकडे 16 मध्ये हिलरीच्या बाजूने होते. तरी ट्रम्प आला. याहीवेळी तोच येईल.
ट्रम्प निवडून येणे भारताच्या
ट्रम्प निवडून येणे भारताच्या हिताचे आहे, डेमोक्रॅट्सचे धोरण भारतविरोधी आहे.
>>
>>
ट्रम्प निवडून येणे भारताच्या हिताचे आहे, डेमोक्रॅट्सचे धोरण भारतविरोधी आहे.
<<
पूर्ण सहमत.
परंतु मी काही पुरोगामी अमेरिकास्थित भारतीयांना असे म्हणताना पाहिले आहे की अमेरिकेत राहून भारताच्या हिताकडे बघण्याऐवजी तुम्ही भारतात जा. अमेरिकेत अमेरिकेचे हित पहा.
कदाचित ह्या बाबतीत आपली बाजू लंगडी आहे हे लक्षात आल्यामुळे केलेले लंगडे समर्थन असावे.
इव्हिल फोर अर्थात चांडाळचौकडी ह्या नावाने प्रसिद्ध अलेक्झांड्रा ओकेशियो कोर्टेझ, रशिदा तलैब, इल्हन ओमार आणि आयाना प्रेस्ली ह्या चार महिला तुमचा मुद्दा स्पष्ट करायला पुरेशा आहेत. ह्यातील निदान दोघींना अमेरिकेत शरिया आणायचा आहे. चारी जणी कश्मीरी लोकांबद्दल (अर्थात फक्त मुस्लिम) खूप चिंतित आहेत. ३७० कलम, सी ए ए कायदा ह्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
तसेही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बायडन ह्याच्यात किती विचारशक्ती शिल्लक असेल ह्याबद्दल अनेकांना शंका आहे. त्यामुळे ही चांडाळचौकडी डेमॉक्रॅट पक्षाची वैचारिक केंद्र बनलेली आहे. त्यामुळे हा पक्ष निवडून आला तर अमेरिका भारत संबंध कसे असतील ह्याबद्दल अनेक साशंक आहेत.
ट्रम्प भारताचं हित बित काही
ट्रम्प भारताचं हित बित काही बघत नाही. तो फक्त आपलं हित बघतो. अमेरिकेच्या हिताचं काय झालं ते गेले 6 महिने दिसतंच आहे.
मोदींचं म्हणाल तर ते पटवतात सगळ्यांना.
बायडन जिंकायची वेळ येणार नाही पण आलीच तर 'डोलांडच्या अधिपासूनचा माझा जुना मित्र बराकभाऊ याचे काका आदरणीय बायडनभाई यांच्याशी माझी जुनी वळख हाय' वगैरे मोदी पटवतील बरोबर. आणि कमलाबेनला सांगतील की जावयबापूना घेऊन माहेरपणाला ये हो दिल्लीला.
ट्रम्प निळ्या राज्यातील
ट्रम्प निळ्या राज्यातील लोकांचं हीत बघत नाही, ते लोकच नाहीत त्याच्या लेखी. भारताचे हीत बघतोय. वाट बघा!
अमेरिकन. निवडणुक. ही स्विंग
अमेरिकन. निवडणुक. ही स्विंग स्टेट वर अवलंबुन आहे. ओहायो याबद्दल उत्तम उदाहरण आहे.
१> १९६० पासुन ज्या पार्टीने ओहायो ज्या पार्टीने जिंकली. त्या. पार्टीचा राष्ट्राध्यक्ष होत आहे.
२> डेमोक्रेटिक पक्ष जन्माला आल्यापासुन (१५० पेक्षा जास्त वर्ष झाली), तेव्हा पासुन रिपब्लिकन पक्षाने ओहायो जिंकली तेव्हा प्रत्येक वेळी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष झाला आहे.
३> डेमोक्रेटिक पक्ष मात्र फक्त ३ वेळा ओहायो जिंकुन पण राष्ट्राध्यक्ष देउ शकले न्हवते.
ओहायो मध्ये पण ग्रामिण भाग रिपब्लिकन तर क्लिवलॅड, कोलंबस आणि सिनसिनाटी शहर डेमोक्रेटिक आहेत. ह्या तीन शहरातिल. बाहेरिल भाग स्विंग होतो आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ठरवतात. हे १९६० पासुन होत आहे. त्या आधी पण बर्याच वेळा हेच लोक राष्ट्राध्यक्ष ठरवत होते.
ओहायो, ईडियाना , पेन्सल्व्हेनिया या भागात प्रचार जो प्रभावी पणे करेल तो निवडणुक जिंकेल. मागच्या. निवडणुकेच्या वेळी ट्रंप ने ह्या भागात फारच प्रभावीपणे पणे प्रचार केला होता. स्वताचे वजन वापरुन काही कंपन्याचे उत्पादन मॅक्सिको मधुन ह्या भागात आणले होते.
इथे पहा - अमेरिकेतले भारतीय
इथे पहा - अमेरिकेतले भारतीय कोणाच्या बाजूने आहेत -
https://drive.google.com/file/d/1kmsAk9NINrUIlUSN9YNLPYQgGDHPZhPg/view
पण सध्याचे डेमोक्रॅट जरा जास्तच डावे आहेत.
मुळात ते म्हणतात ते सगळे करायला पैसे कुठून आणणार तेहि कळत नाही.
<<<ट्रम्प निवडून येणे
<<<ट्रम्प निवडून येणे भारताच्या हिताचे आहे, डेमोक्रॅट्सचे धोरण भारतविरोधी आहे.>>>
भारताच्या हिताशी अमेरिकेतल्या राजकारण्यांना काहिही देणे घेणे नाही.
भारत आता जगातील एक आर्थिक शक्ति असल्याने अमेरिका भारताचे काहिही वाकडे करू शकत नाही. आशा आहे की गोर्या कातडीचे वेड जरा कमी झाले असावे. त्यामुळे अमेरिकेबाबत "धड रहायचे असेल तर रहा, नाहीतर गेलात तेल लावत" असे नम्रपणे सभ्य भाषेत स्वाभिमानपूर्वक सांगता यायला पाहिजे.
फक्त दोन गोष्टी -
संगणक क्षेत्रातील उद्योगांना भारतातील स्वस्त लोक पाहिजे आहेत.
जंक फूड उत्पादकांना त्यांचा माल खपवायला भारतातील लोक पाहिजे आहेत.
या दोन्ही गोष्टी कुठलाहि राजकारणी आला तरी चालू रहातील.
२९ तारखेला ट्रम्प
२९ तारखेला ट्रम्प म्हातारबांची कशी धुलाई करतो पहायला मज्जा येणारे!
प्रेक्षकांचा अभाव ही गोष्ट
प्रेक्षकांचा अभाव ही गोष्ट ट्रंपकरता वाईट आहे. त्याचे हुकमी संवाद आणि त्याला मिळणार्या टाळ्या ही २०१६ सालच्या डिबेटचे ठळक लक्षात रहाणारी वैशिष्ट्ये आहेत. उद्याच्या डिबेटमधे हे शक्य नाही.
आधीच सर्व माध्यमांनी जबरदस्त मोर्चेबांधणी करून ट्रंपला खोटे पाडायचा चंग बांधला आहे त्यामुळे बहुधा एकतर्फी किंवा कंटाळवाणी डिबेट होणार असा अंदाज आहे. नंतर बायडन ने "उखाड दिया" स्टाईलच्या हेडलाईन झळकतील अशी खात्री आहे.
>>आधीच सर्व माध्यमांनी
>>आधीच सर्व माध्यमांनी जबरदस्त मोर्चेबांधणी करून ट्रंपला खोटे पाडायचा चंग बांधला आहे >> हो. अगदी बरोबर. फॅक्ट चेक प्रकार ताबडतोब बंद केला पाहिजे. फॅक्ट चेकर्स ही ट्रंप करता दुसरी वाईट गोष्ट आहे.
बायडनला फॅक्ट चेक च्या
बायडनला फॅक्ट चेक च्या बंधनातून मुक्त ठेवले आहे. ह्याचे काय कारण? फक्त ट्रंपवरच ही कृपा का? बायडन काय हरिश्चंद्राचा अवतार आहे की काय?
मुक्त कसलं!!! होतो की त्याचा
मुक्त कसलं!!! होतो की त्याचा ही फॅक्ट चेक. पण त्यातुन काही फारसं सापडत नाही. पण कुठे टाचणी जरी गवसली की फॉक्सवर एकदम 'कुणी गोविंद घ्या' करुन एकमेकांचं तोंड गोड करतात की!
पण तुमचं बरोबर आहे. फक्त ट्रंपच्याच फॅक्ट चेक मधून सातत्याने खोटं बाहेर जाहिर करणं काही बरोबर नाही. ट्रंपचं एक खोटं बाहेर काढलं की बायडनचं एक खोटं जोपर्यंत मिळे नाही तोपर्यंत ट्रंपचं दुसरं खोटं बाहेर काढण्याला बंदीच केली पाहिजे. ही अशी बंदी सध्या नसणे ही तिसरी वाईट गोष्ट म्हणू शकतो ट्रंपसाठी.
>>In 2018 there were around 2
>>In 2018 there were around 2.15 million Black or African-American veterans in the U.S., representing around 12% of
the total veteran population.
• Projected number of veterans living in the U.S. in 2020 is 18.82 million.
• In 2045 about 12 million veterans will be living in the U.S.
इतर माहितीसाठी भेटा किंवा लिहा.................:णम्स्कार्स
(No subject)
सा. - मस्त. वादळा पुर्विची
सा. - मस्त. वादळा पुर्विची शांतता...
उद्या, हंटर बाय्डन हॉट टॉपिक असणार आहे, बहुतेक. नॉर्मली, मुलाला बापाच्या कर्माचा फटका बसतो, इथे उलटं होइल का? ट्रंपने ठासली आहे मिडियाची - "नथिंगबर्गर?"
आय फिल सॉरी फॉर हॅरिस...
हॅरिस वि ट्रम्प असेच डिबेट
हॅरिस वि ट्रम्प असेच डिबेट असायला हवे. बघायला मजा येइल. बायडेन वि पेन्स स्लीपफेस्ट असेल. आपली, आणि कदाचित त्यांचीही
- डेम्स वाल्या शहरांमधे मोकळे सुटलेले दंगेखोर हा मुद्दा ट्रम्प उचलून धरेल बहुधा. त्याला बायडेन काय उत्तर देतो बघू. सबर्बन व्हाइट्स ना उद्देशून सेफ नेबरहूड्स हा एक मेसेज ट्रम्प कॅम्पेन ने बनवला आहे (मलाही येतो मी फॉक्स व नॅशनल रिव्यू वाचत असल्याने असेल ) Cookies can give you away
- ट्रम्प चे टॅक्स रिटर्न्स आहेत त्यात अजून मला तरी ट्रम्पला नक्की कसे कात्रीत पकडणार हे समजले नाही. आहे ती सिस्टीम वापरून तो जर क्रेडिट्स घेत असेल तर अमेरिकन टॅक्स सिस्टीम्स बद्दल घोर ई. निराशाजनक अवस्था आहे पण यात नक्की ट्रम्पने काय केले ते समजले नाही अजून. जोपर्यंत काही टॅक्स फ्रॉड दिसत नाही तोपर्यंत तो असे वेगळे काय करतोय जे इतर अतीश्रीमंत लोक करत नाहीत हा प्रश्न आहे. (पण त्याचबरोबर इतके दिवस हा का लपवत होता मग हा ही)
- चीन बद्दल दोघे काय म्हणतात उद्या याची उत्सुकता आहे. मला दोघांकडून हॉकिश मेसेज ची अपेक्षा आहे. ट्रम्प असेलच पण बायडेन ने नाही दिला तर मोठी चूक होईल.
- कोव्हिड बद्दल तसेच. बघू नक्की काय म्हणतात ते.
पुढची टाऊनहॉल डीबेट ठीक आहे
पुढची टाऊनहॉल डीबेट ठीक आहे पण तिसरीसाठी मॉडरेटर म्हणून अर्णब गोस्वामीलाच आणायला हवे... त्याच्या़शिवाय कोणाला डीबेट मॉडरेट करणे शक्य होणार नाही असे दिसते.
मते येऊद्या डीबेटबद्दल
हायझेनबर्ग +१
हायझेनबर्ग +१
बघितली नाही पूर्ण डिबेट.
बघितली नाही पूर्ण डिबेट. बायडनने ऐकवलं म्हणे ट्रम्पला बरंच काही. ट्रम्पला आणि त्याच्या समर्थकांना काही फरक पडणार नाही म्हणा.
नंतर सीएनएनवर बघितलं तर कुठलेतरी ओहयोतले undecided voters गोळा करून आणले होते आणि त्यांना गोळे मास्तरांसारखं कंटाळवाण्या सुरात 'तू सांग' 'तू सांग' करून प्रश्न विचारत होते. आता या पॉईंटला इतकं सगळं झाल्यावरही कोणी undecided म्हणत असेल तर तो अजून closet मधून बाहेर न आलेला ट्रम्प समर्थक आहे हे धरून चालायला पाहिजे.
Who won the 1st presidential
Who won the 1st presidential debate? ABC
https://www.youtube.com/watch?v=dtQa6rrDBpg
How Americans responded to the first presidential debate of 2020 CBS
https://www.youtube.com/watch?v=8R3baiCq9Vo
डिबेट? याला डिबेट म्हणायच?
डिबेट? याला डिबेट म्हणायच? वॉव.. डिसगस्टींग अँड शेमफुल...अमेरिकेची अध्यक्षिय निवडणुक व एकुणच राजकिय परिस्थिती किती खालच्या स्तराला गेली आहे याचे उदाहरण आपल्याला आज पहायला मिळाले.
आक्रस्ताळपणा.. दुसर्याला बोलु न देण.. दुसरा बोलत असताना मधे मधे बोलत राहण.. बिचारा मॉडरेटर ख्रिस वॉलेस.. त्याला कुत्र सुद्धा विचारत नव्हत.. तो असला/ नसला असता तरी काही फरक पडला नसता. पुढच्या डिबेटच्या( पुढचे डिबेट जर असेच होणार असतील तर ते झाले नाहीत तरी चालतील) मॉडरेटरला खुप खुप शुभेच्छा!
आम्ही आज सकाळी डिबेट बघायचा
आम्ही आज सकाळी डिबेट बघायचा प्रयत्न केला. पण काही सुधरेना. रेडिट वर वाचेन प्रतिक्रिया.
डिस्गस्टिंग आणि पथेटिक बट नॉट
डिस्गस्टिंग आणि पथेटिक बट नॉट सरप्रायझिंग! किळस आली.
डिबेट पाहीली. ट्रंप फार मधे
डिबेट पाहीली. ट्रंप फार मधे मधे त्याची पाळी नसतानाही बोलत होता. बायडेन यांनी शांती राखली अज्जिबात उचकले नाहीत की मधे मधे इन्टरप्ट केले नाही. पहील्यांदा वाटले की बायडन यांच्या कडे सगळ्या वादांकरता एकच अक्सीर इलाज आहे तो म्हणजे म्हणणे की "ट्रंप हॅज नो प्लॅन्स" मग ते इकॉनॉमी असो, कोव्हिड असो की ओबामाकेअर ऐवजी अन्य इन्श्युरन्स सुविधा. पण पुढे पुढे मजा येत गेली.
यावेळेला ट्रंप म्हणाले - मी बायडन यांच्या ऐवजी ख्रिस वॉलेसबरोबर वाद घालतो आहे. I am not surprised. अर्थात म्हणजे बायडेन यांच्याकडे काहि मुद्दे नाहीत.
ट्रंपने यावेळेला फार नावे ठेवली नाहीत बायडेननेच उलट क्लाउन, पूटिन्स पपी अशा शेलक्या शब्दांद ट्रंपचा पाणउतारा केला.
साध्या झूम किंवा वेबएक्स
साध्या झूम किंवा वेबएक्स कॉल्स मधे सुद्धा एखाद्याला म्यूट करायची सोय असते. यापुढे या डिबेट्स मधे ती वापरायला हवी. तुमची दोन मिनीटे सुरू नसतील तर फक्त तुमचे तोंड हलताना दिसेल.
आणि डिबेट वगैरे सुरू नव्हते.
आणि डिबेट वगैरे सुरू नव्हते. दोघेही ख्रिसशी किंवा आपापल्या मतदारांशी बोलत होते. एकूणच आविर्भाव असा होता की मी माझ्या मतदारांपर्यंत पोहोचायची संधी यातून घेतोय. प्रश्न काय विचारलाय, उत्तर काय देतोय कशाचा कशाशी संबंध नाही.
अवघड प्रश्नाला पॉलिटिकली करेक्ट किंवा घोळवून घोळवून नॉन-अन्सर उत्तर देण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. पण इथे वेगळेच चालले होते.
फारेंड, अमितव.. तुम्हा
फारएंड, अमितव.. तुम्हा दोघांच्या पोस्टशी १००% सहमत!
“साध्या झूम किंवा वेबएक्स कॉल्स मधे सुद्धा एखाद्याला म्यूट करायची सोय असते. यापुढे या डिबेट्स मधे ती वापरायला हवी. तुमची दोन मिनीटे सुरू नसतील तर फक्त तुमचे तोंड हलताना दिसेल.”... फारएंड....
मंडळी, प्रत्येक प्रेसिडेंशियल
मंडळी, प्रत्येक प्रेसिडेंशियल डिबेटला थोडी एंटर्टेनमेंट वॅल्यु असते, काल ओवरडोस होता. इतकंच...
बाय्डनच्या टीमने नीट होमवर्क केला आहे कि नाहि याइतपत त्यांची क्मकुवत बाजु दिसत होती. सुप्रिम कोर्टाच्या नॉमिनेशनच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्यात कुचराई, लॉ एन्फोर्स्मेंटच्या सपोर्टच्य मुद्द्यावर प्रतिक्रिया नाहि, आणि ओरगन्/पोर्टलंड्च्या लिडरशिपला एक सेनेटर, डेम्स लिडरच्या भुमिकेतुन जाब विचारण्याबाबतची उदासिनता हे ठळक मोमेंट्स. हंटर बाय्डनचा विषय काढल्यावर, हि जस्ट रॅटल्ड, अँड ऑल्मोस्ट मेल्टेड डाउन. तर ते असो.
ट्रंपचा डिमिनर वाज लाइक हि वाज हॅविंग ए फिल्ड डे. बाय्डनला एक सुवर्ण्संधी होती, जेंव्हा ट्रंप म्हणाला -"आय हॅव अॅकंप्लिश्ड मोर इन ४७ मंथ्स दॅन यु इन ४७ इयर्स". यावर बाय्डनची चुप्पी खूप बोलकी होती...
Pages