अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Silver lining म्हणतात तसं- गेली 3-4 वर्ष ट्रम्प चायनाला gaslight करतो आहे. ट्रेड युद्धाच्या नावाखाली रोज उठून अपमानित करत सुटलेला. जगातील कुठलाही राष्ट्र प्रमुख दुसऱ्या देशाबद्दल असं बोलत नसेल. बिझनेस निड्स बदलतात तसं सोर्सिंग बदलतं, ट्रेडच्या टर्म रिवाईज करायला लागतात हे मान्य. But there is a civilized way to renegotiate any business deals.
त्या जिनपिंगने 3 वर्ष ऐकून घेतलं. आता या व्हायरसमुळे तात्यांना गप बसावं लागलं हेच काय ते सिल्वर लायनींग.
दोन दिवस चायनीज व्हायरस चायनीज व्हायरस म्हणून बडबड केली पण तेही बंद करावं लागलं कारण चिनी अमेरिकन्सनी नोव्हेंबरला एकगठ्ठा मतदान केलं तर अडचण होईल.

अमेरीका माल-उत्पादनात, स्वावलंबी होणे गरजेचे आहेच. कोणा राष्ट्रपतीने त्याकरता साम-दाम-दंड-भेद वापरला तर 'गॅसलायटिंग' वगैरे एवढा आक्रस्ताळेपणा कशाला? जर चायना, खरोखर इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी चोरत असेल तर, खीळ घातलीच पाहीजे की. का चायनाच्या हातानेच खात रहायचं?

https://www.scmp.com/comment/opinion/article/3046129/us-targeting-china-...
CNBC reports that “1 in 5 corporations say China has stolen their IP within the last year.”
US President Donald Trump has imposed tariffs on US$550 billion worth of US imports from China, at least in part to punish it for this supposed crime.

ट्रम्पच्या निषेधात मी त्याचे स्टिम्युलस चेक्स बाणेदारपणे परत करायचा निर्णय घेतला आहे.
सर्व ट्रम्पविरोधकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनीही आपापले चेक्स परत करण्यासाठी माझ्याकडे पाठवून द्यावेत.
लोकहो क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

स्टिम्युलस पॅकेज वर लिमीट आहे. आपण जर त्याच्या बाहेर असू तर , चेक येणार नाहीये.
____________
How do I know if I will get the full amount?

(१) Single adults with Social Security numbers who are United States residents and have an adjusted gross income of $75,000 or less would get the full amount.
(२) Married couples with no children earning $150,000 or less would receive a total of $2,400.
(३) And someone filing as head of household would get the full payment if they earn $112,500 or less.

Above those income figures, the payment decreases until it stops altogether for single people earning $99,000 or married people earning $198,000.

सा., 'त्याचे' चेक्स म्हणजे? 'त्या'च्या खिशातून देणार आहे की काय तुम्हाला? तसं असेल तर नक्की परत करा, हम तुम्हारे साथ हैं! Proud

>>ट्रेड युद्धाच्या नावाखाली रोज उठून अपमानित करत सुटलेला. जगातील कुठलाही राष्ट्र प्रमुख दुसऱ्या देशाबद्दल असं बोलत नसेल.

उगाच काहीच्या काही का बोलत आहात? पाकिस्तानचा प्रमुख भारताच्या प्रमुखाबद्दल अनेकदा वाईटसाईट बोललेला आहे. अनेक मुस्लिम देश इस्रायलबद्दल गलिच्छ पातळीवर जाऊन बोलतात. इराणचा प्रमुख तर असे म्हणाला होता की इस्रायल हा देश नकाशावरुन खोडून टाकणे हे त्याचे ध्येय आहे. ट्रंप चीनबद्दल जे बोलला आहे त्याची ह्याच्याशी तुलना करुन पहा.
खुद्द चीन तैवानबद्दल काय बोलतो? त्याचे प्रमुख अनेकदा असे म्हणतात की तैवान हा देश चीनमधे सामील करुन घेतला जाईल. तसे व्हायलाच पाहिजे. म्हणजे दुसर्‍या सार्वभौम देशाचे अस्तित्त्व संपवण्याची भाषा!

I am a little upset with China - Trump

Every country is - this guy has guts to say that....

डेमॉक्रॅटिक काँग्रेस सदस्य हे कोरोना आणि त्याच्या बळींकरता किती किती जागरुक आहेत पहा!
हाउसमधे कोरोनाला तोंड द्यायला जो ठराव मांडला होता त्याला उत्तर म्हणून जो ठराव पेलोसी आणि अन्य खलनायकांनी मांडला त्यातील काही मुद्दे असे आहेत
१. केनेडी आर्ट सेंटरची दुरुस्ती
२. विमानतळांकरता जास्तीचे लो एमिशन स्टेंडर्ड
३. लैन्गिक अत्याचाराच्या बळींकरता मदत
४. हिंसक अत्याचारांना बळी पडलेल्या बायकांना मदत

आता इतका पराकोटीचा बिकट प्रसंग असताना असल्या गोष्टी मूऴ बिलात घुसडून आपला राजकीय स्वार्थ साधणार्या लोकांना काय म्हणायचे? मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नीच लोक!
आणि तरी ट्रंप वाईट्ट.
इथे ते बिल पाहू शकता
https://www.npr.org/2020/03/23/820155258/read-house-democrats-release-3r...

उगाच काहीच्या काही का बोलत आहात? पाकिस्तानचा प्रमुख भारताच्या प्रमुखाबद्दल अनेकदा वाईटसाईट बोललेला आहे. अनेक मुस्लिम देश इस्रायलबद्दल गलिच्छ पातळीवर जाऊन बोलतात. इराणचा प्रमुख तर असे म्हणाला होता की इस्रायल हा देश नकाशावरुन खोडून टाकणे हे त्याचे ध्येय आहे. ट्रंप चीनबद्दल जे बोलला आहे त्याची ह्याच्याशी तुलना करुन पहा.
खुद्द चीन तैवानबद्दल काय बोलतो? त्याचे प्रमुख अनेकदा असे म्हणतात की तैवान हा देश चीनमधे सामील करुन घेतला जाईल. तसे व्हायलाच पाहिजे. म्हणजे दुसर्‍या सार्वभौम देशाचे अस्तित्त्व संपवण्याची भाषा! >>

हो हो खरंच आहे. ट्रम्प आणि पाकिस्तान्,इराण च्या राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूणातच वैचारिक साम्य खूपच आहे. एकाच माळेचे मणी.

आणि तैवानला सार्वभौम देश म्हणून अमेरिकाच recognize करत नाही मुळात!

>>
हो हो खरंच आहे. ट्रम्प आणि पाकिस्तान्,इराण च्या राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूणातच वैचारिक साम्य खूपच आहे. एकाच माळेचे मणी.
>>
आपला मूळ दावा असा होता "जगातील कुठलाही राष्ट्र प्रमुख दुसऱ्या देशाबद्दल असं बोलत नसेल." तो मी वरील पुरावे देऊन पूर्णपणे खोडून काढला आहे. त्यामुळे आपण आपला मुद्दा बदलून एकाच माळेचे मणी वगैरेवर उतरलात. ठीक आहे.
आता इराण ज्या पातळीवर जाऊन इस्रायलविषयी बोलतो आहे त्यापेक्षा ट्रंपचे विधान कितीतरी सभ्य आणि शिष्टाचाराला धरून आहे. त्यामुळे हे एका माळेचे मणी कसे होतात ते आपणच समजावा.
चीनच्या दादागिरीमुळे अधिकृतरित्या तैवानला मान्यता नसली तरी तैवान ह्या देशात स्वतंत्र सरकार आहे. निवडणूका होतात. चीनला तो देश गिळायची लाख इच्छा आहे. पण अमेरिका आणि बाकी देश असे घडू देताना दिसत नाहीत. तेव्हा अनौपचारिक स्तरावर तैवान हा देश म्हणून मान्यताप्राप्त आहेच. असो.

हळूहळू का होईना हे पटायला लागले आहे की, ट्रंपची धोरणं अमेरिका फर्ष्ट ह्या तत्व आला धरून असतात.

>>तुम्हाला काय वाटतं, बाय्डन विल पिक हर अप डिस्पाइट द फॅक्ट दॅट शी ग्रिल्ड हिम ऑन द बसिंग इशु?..<<
"आयॅम कमिंग फॉर यु, किडो..."

ह्म्म, साउंडस लाइक ए डन डील?.. Wink

बरनी काका निवृत्त झाले. आता फक्त बायडन.
असा एक विनोद वाचला की दोन आठवडे सोशलिजम चा अनुभव घेतल्यावर बर्णी काकांनी आपली अध्यक्ष बनण्याची इच्छा रद्द केली!
कोरोना प्रकरणाचा ट्रंपला तोटा होईल अशी शंका वाटते. इकॉनॉमी फार चांगल्या स्थितीत नसेल. अर्थात बायडन ह्याचा किती फायदा घेऊ शकेल ही शंकाच आहे. ह्या रोगाच्या साथीमुळे उमेदवार मंडळींना लोकांसमोर मिरवता येत नाहीये.

>>. आता फक्त बायडन.<<
बर्नीकाका इज आउट बट नॉट डन. अँड्र्यु कुमोचा मागच्या दरवाज्यातुन प्रवेश व्हावा याकरता प्रयत्न करत आहेत, असं कुठेतरी वाचलं...

https://www.washingtonpost.com/politics/2020/04/14/transcript-obama-bide...
थोर थोर महान माजी राष्ट्रपती ओबामा ह्यांनी (एकदाचे) बायडनला समर्थन दिले!
कोरोनामुळे हे समर्थन एखाद्या जंगी सभेत न होता एका व्हिडियो क्लिपने दिले गेले.
आता ट्रंपचे काही खरे नाही!
समस्त ओबामा कुटुंब पुन्हा एकदा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार काय?

डाका बद्दलच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल इतका हाइप का झाला आहे? तो निर्णय स्पेसिफिकली डाकाचे समर्थन वा विरोध काहीच करत नाहीये. निर्णय इतकाच आहे की डाका रद्द करताना वापरलेली पद्धत/प्रोसेस सर्व परिणाम विचारात घेउन वापरलेली नाही.

1619 प्रोजेक्ट, त्याला रिपब्लिकन्सचा विरोध आणि टॉम कॉटनची slavery बद्दलची वक्तव्य(necessary evil) - हे सर्व पाहिल्यावर अजूनच हतबुद्ध वाटलं.
या लोकांना स्लेव्हरी मध्ये चुकीचं काही वाटत नाहीये- जस्ट लोकांसमोर दाखवायला फक्त सारवासारव.

Black lives matter अशा घोषणा देत, सर्व वंश समान आहे अशा गर्जना करत दुकाने फोडणे, आगी लावणे, लुटालुट करणे, खून करणे, रस्ते बंद करणे, शहराचे भाग बंद करून टाकणे, पोलिसांना शत्रू मानणे, शहरातील मोक्याचे भाग बीभत्स रंगाने रंगवून, गलिच्छ लेखन करुन विद्रूप करणे हे जास्त योग्य आहे का?

कॉटन म्हणाला की स्लेव्हरी वॉज अ नेसेसरी इव्हल. हा देश ह्या नेसेसरी इव्हिलमुळे बनला. पण ज्या प्रकारे देश बनला त्यामुळे लिंकनकडून गुलामगिरीचा खातमा करणे शक्य झाले.
ह्यात गुलामगिरी योग्य होती, ती पुन्हा आणा वगैरे काहीही म्हटलेले नाही. तरीही कॉटनशी मतभेद असू शकतात. पण तरी तो असे म्हणतो आहे म्हणून बी एल एम आणि त्यांची हिंसक पिलावळ दिवसेंदिवस अनेक शहरे हायजॅक करून मोठ्या प्रमाणात विध्वंस करत आहे तो योग्य आहे असे आपण म्हणत नसाल अशी आशा.
अशा प्रकारे होणारा हिंसाचार आणि तमाम डेमॉक्रॅट अशा हिंसाचाराचे समर्थन, उदात्तीकरण करत आहेत हे अनाकलनीय आहे. नुकसान होणार्‍या लोकांत डेमॉक्रॅट मतदार नाहीत का?
ओकलँडमधे अशा प्रकारे हिंसाचार झाला आणि लाखो डॉलर्सचा चुराडा झाला. अर्थातच ते करदाते भरणार. पण ओकलंडची महापौर दु:खी आहे ती हिंसाचार झाला, सामान्य लोकांचे नुकसान झाले म्हणून नाही तर ट्रंपला आता केंद्रीय सुरक्षा बल पाठवायचे आयतेच निमित्त मिळत आहे म्हणून. धन्य धन्य आहेत बाई!

Harris it is!

वॉव! अभिनंदन कॅम्ला!
२०२४ ला ब्लॅक + फिमेल असा रेकॉर्ड होणार का! Wink Proud

जिंकणार तर तात्याच आहे पण हुशार, स्मार्ट आणि विरोधी मत ठामपणे व्यक्त करु शकणारी बाई मध्ययुगीन मानसिकतेच्या लोकांना फार rattle करते त्यामुळे व्हीपी नॉमिनेशनमुळे ते लोक चिडचिडत आहेत ते बघायला मजा येते आहे.

परंपरावादी रिपब्लिकन लोकांना (काही वेळा तमाम अमेरिकन गोऱ्या लोकांना असेही म्हणतात) उच्च पदावर स्त्री असणे सहन होत नाही असा एक गो ओ ओ ओ ओ ओड गैरसमज पुरोगामी लोक बाळगून असतात. तसे केल्याने हिलरी चा पराभव तितका झोंबत नसावा! पण हा गैरसमज आहे. विविध लाल राज्यात सर्वोच्च पदावर स्त्रिया होत्या. सारा पेलिन AK, Jan Brewer AZ, निकी हेली SC, Kristi Noem SD अशी अनेक उदाहरणे आहेत. कमलाबाई, हिलरी ताई ह्या निव्वळ स्त्रिया नाहीत. त्यांना राजकीय इतिहास आहे. त्यामुळे त्या नावडू शकतात. लगेच अशा लोकां वर प्रतिगामी म्हणून शिक्का मारणे सोपे आहे पण ते खरे असेलच असे नाही.

Pages