Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४००-५०० वर्षापूर्वी गोर्या
४००-५०० वर्षापूर्वी गोर्या लोकांनी चूक केली म्हणून आज त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही ह्यात एक अध्याहृत वर्णद्वेष आहे. म्हणजे तेव्हा चुकीचे वागलेले लोक गोरे आणि आज कोरोनाबद्दल तक्रार करणारेही गोरे म्हणून दोघे सारखेच हे म्हणणे तर्कदुष्ट आहे.
४००-५०० वर्षापूर्वी हजारो मैल प्रवास करणे जिकिरीचे होते. सामान्य माणूस इतका प्रवास करतच नसे. उलट आज परिस्थिती पार वेगळी आहे. विमानप्रवास प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे रोग पसरणे कितीतरी सोपे झाले आहे. त्यामुळे भीतीही वाढली आहे. शिवाय माहितीही एका क्षणात जगाच्या एका कोपर्यापासून दुसरीकडे प्रसारित होते. त्यामुळेही ह्यात भर पडते. चिनी लोकांच्या बेजबाबदारपणामुळे सगळे जग वेठीस धरले जात आहे. ह्याचा मलाही राग आहे. मी काही कुणी गोरा नाही. अतिरेकी पोलिटिकल करे़क्टनेसच्या हव्यासापोटी वस्तुस्थिती दुर्लक्षित केली पाहिजे असे मला वाटत नाही.
प्रत्येक गोष्टीला वर्णद्वेष्टा रंग देणे सोपे आहे पण ते समयोचित असेलच असे नाही.
>>
>>
कसं आहे शेंडे, कदाचित तुमच्या आप्तांवर किंवा मुलांवर अजून असलं काही शेकलेलं नाही म्हणून तुम्हाला खुर्चीत बसून हे ट्रिवियलाईज करायला काही जात नाही.
<<
आज राजेरोस गोर्यांचा श्वेतवर्णीय भेदभाव जगात कुठेही चालू शकत नाही. व्यासपीठावरून कुणी तशी भूमिका मांडून निवडणूक जिंकू शकत नाही. दक्षिण अफ्रिका हे शेवटचे स्थान होते जिथे असा द्वेष राजेरोस चालत असे. आता ते संपले आहे. अमेरिकेत पुरेसे लोक आहेत जे अशा प्रकारे वर्णद्वेषाला विरोध करतील. ट्रंप हा छुपा व्हाईट सुप्रिमसिस्ट हा फेक न्यूज वाल्या मंडळींनी चालवलेला अपप्रचार आहे. त्याने इतके काळे, लॅटिनो, भारतीय आपल्या मंत्रीमंडळात नेमले होते वगैरे सोयिस्कररित्या दुर्लक्षित केले जाते. ते काय निव्वळ नावापुरते अल्पसंख्य अशीही पुस्ती जोडली जाते. म्हणजे खरे अल्पसंख्य कोण हे ठरवण्याचा ठेका घेतलेली ट्रंपद्वेष्टी ठेकेदार मंडळी ही!
तर उगीचच साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. वर्णद्वेषाचा कांगावा करणे आजकाल इतके सोपे झाले आहे की कुणीही तसे करतो/ते.
ट्रंपने काहीही काम केले नाही हा एक आणखी मोठा खोटारडेपणा. त्याने पुरेसे बदल घडवलेले आहेत. त्याच्या परीने त्याने बेकायदा इमिग्रेशन थांबवायचे पुरेसे प्रयत्न केले आहेत. चीनला प्रतिशह द्यायचा प्रयत्न केला आहे.
तो येताच स्टॉक मार्केट पार गाळात जाणार वगैरे भविष्ये पार खोटी ठरली. आता करोनाप्रकरणामुळे जे अध:पतन चालू आहे ते पुन्हा पूर्ववत होईल असा मला विश्वास वाटतो. आणि त्याला ट्रंप नसून चीन जबाबदार आहे.
मुसलमान टेररिस्टने तुमच्या
मुसलमान टेररिस्टने तुमच्या घरासमोर बाँब फोडला तरी त्याला "रॅडिकल इस्लाम" म्हणायला यांची तंतरते, यांना ट्रंपचं प्रेसिडेंशियल डिमिनर अवाक करणारंच...>>>>>> अन हा भौ नुसत्या बड्या बड्या बाता करुन काय घरासमोर बाँब फोडायचे बाकी राहणार आहेत का टेरिस्ट? टेररिस्ट लोकांनी आत येऊन काही करु नये ह्याची काळजे घेणे आणि ह्या असल्या बाता मारायचा काहीही संबंध नाहीये. ओबामा असले बिन्डोक विधानं करत नव्हते तेव्हा काय टेररिजम कडे डोळेझाक करत होते का? नुसतं डिमिनर नाही तर त्याच्या कृती मधला षंढपणा अवाक करणारा आहे. निवडून आला तेव्हा वाटलं होतं की प्रेसिडन्सी त्याला एलेवेट व्हायला कारणीभुत ठरेल कदाचित. तसलं आजिबात काहीही झालं नाही.
खरं तर प्रेसिडंट झालं की अनलिमिटेड पावर येत नाही (हे ट्रंपला हळू हळू लक्षात आलं मागच्या ४ वर्षात) आणि देशाच्या पसार्यातील बर्याच गोष्टी त्यांच्या त्यांच्या अविरत सुरु असतात. त्यातल्या हाय प्रायॉरिटी, बर्निंग इश्युज घेऊन काही बायपार्टिजन पद्धतीने चांगलं करणे हा मुख्य उद्देश पाहिजे. आणि इथेच माणूस म्हणून तुम्ही कोण आहात ह्याचं फार महत्व आहे. ट्रंपला पैसे आणि पावर ह्या शिवाय कशाशीही घेणं नाही हे त्याच्या आता पर्यंतच्या वागणुकीमधून आणि बिझनेस प्रॅकटिसेस मधून स्पष्ट दिसून येतं. इथेही तो तेवढच बघतो फक्त. सगळे (सपोजेड) डील्स ह्या नेहमी दिल्खेचक म्हणजे चांगलं टिवी/भाषण मट्रेल असतात. जे काम केलं त्यापेक्षा अव्वाच्या सव्वा सांगणं, वाट्टेल ते जनरलायजेशन करणे हे सगळं बोनस.
आता लगेच पुढे मग बाकी प्रेसिडंट काय हे करत नाही असं वाटलं की काय तुम्हाला वैदुबुवा असा शंभर नंब्री सवाल कोणी शेंडेबुडखे विरहित लोकं करतीलच. तर मग मी असं म्हनतो कि हो, ते करत असतील आणि त्यांनी ही हे केलं असेल. पण म्हणूनच मी हा जे काय करतो त्या करता त्याला डोक्यावर घेऊन नाचणार नाही येवढच. उगा आपलं आपले ४०१के फुगून राहिलेत म्हणून बळच कोणाला पण कशाला हिरो बनवायचं?
आणि उलट्या वर्णद्वेषाचे काय?
आणि उलट्या वर्णद्वेषाचे काय? केट स्टाईन्ली नामक स्त्रीला (श्वेतवर्णी) सॅन फ्रॅन्सिस्कोत बे च्या किनार्यावर एका पार्कसदृश जागेत एका बेकायदा घुसखोराने पिस्तुलाने गोळी झाडून मारले. हे पिस्तुलही त्याने चोरलेले होते. हा बेकायदा घुसखोर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. अनेकदा गुन्ह्यात सापडूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. कारण सॅन फ्रॅन्सिस्कोचे कमालीचे "उदार" धोरण. बेकायदा घुसखोरांना अभय देण्याचे अनाकलनीय धोरण. आणि आता न्यायालयाने ह्या इसमाची पूर्ण मुक्तता केली. पूर्णपणे निर्दोष! म्हणजे त्या निष्पाप महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? कुणीही नाही. बेकायदा घुसखोरांच्या खुशामतीकरता अशा प्रकारे एका कायदेशीर नागरिकाचा निष्कारण बळी हे काय आहे? रिव्हर्स रेसिस्ज्म? मेलेली बाई काळी वा तपकिरी त्वचेची असती तर इतका बेदरकारपणा कदाचित दिसला नसता.
ही एकमेव घटना नव्हे. अशा घटना घडतच असतात. तथाकथित पुरोगामी शहरांत हे नेहमीचे आहे.
>>
>>
ओबामा असले बिन्डोक विधानं करत नव्हते तेव्हा काय टेररिजम कडे डोळेझाक करत होते का? नुसतं डिमिनर नाही तर त्याच्या कृती मधला षंढपणा अवाक करणारा आहे. निवडून आला तेव्हा वाटलं होतं की प्रेसिडन्सी त्याला एलेवेट व्हायला कारणीभुत ठरेल कदाचित. तसलं आजिबात काहीही झालं नाही.
<<
ओबामाच्या निष्काळजीपणामुळे बेनगाझीचे हत्याकांड घडले. लिबियामधे नको त्या लोकांना पैसे आणि शस्त्रे पुरवली. त्यांनी गदाफीला क्रूरपणे मारले आणि देशाला कायमच्या यादवीत लोटले. नंतर बेनगाझीमधील वकिलातीवर अशाच लोकांनी हल्ला केला आणि अमेरिकन राजदूत आणि बाकी अनेक अमेरिकन्स्ना मारले.
सॅन बर्नार्डिनो इथे २०१५ साली अतिरेकी हल्ला केला गेला आणि त्यात १५ निष्पाप मारले गेले. ओबामाच्या धोरणामुळे हे घडवून आणणारी महिला राजेरोस व्हिसा मिळवू शकली. तिच्या सोशल नेटवर्कवर तिच्या जहाल अतिरेकी वृत्तीचे पुरावे होते. पण ओबामाच्या बोटचेपेपणामुळे बॅकग्राऊंड चेक करताना सोशल नेटवर्किंगची तपासणी केली गेली नाही.
२००९ साली फोर्ट हूड इथे निदाल हसन नामक हरामखोर सैनिकाने अनेक लोकांना अतिरेकी हल्ल्यात ठार केले. ह्या इसमाचे अतिरेक्यांशी असलेले संबंध अनेकदा उघडकीस आले होते. अन्वर अव्लाकी सारख्या अतिरेक्याची जाहीर स्तुती करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले ते ओबामाच्याच अधिपत्याखाली.
तेव्हा होय. ओबामा टेररिजम कडे अनेकदा डोळेझाक करत होता. एक बिन लादेन मारला म्हणून सगळे माफ होत नाही.
जेव्हा करोना चीनपूरता
जेव्हा करोना चीनपूरता मर्यादित होता तेव्हाही अमेरिकेला सप्लाय चेन साठी झळ पोचणार हे तर उघड होते. अशावेळी करोनाबद्दल तात्यांनी माहिती करून घेणे- हाताशी असलेले गुप्तचर, सायंटिस्ट व एक्सपर्ट लोकांचे जाळे वापरणे व त्यानुसार प्लॅन करणे अपेक्षित होते. एकतर तात्यांना कळलं नसावं किंवा मुद्दाम लोकांची दिशाभूल केली असावी. चिनी लोकांना कशाला दोष द्यायचा- ते बोलून चालून क्षुद्र अश्वेत. त्यांनी विचार केला असणार की तात्या स्वतःच म्हणतायत एप्रिलमध्ये जादू होईल, साध्य फ्लू इतकाही करोना धोकादायक नाही, आय लाईक धिस स्टफ, मला एक्सस्पर्ट्स पण विचारतात की तुम्हाला कसं माहिती इतकं? माझे काका डॉक्टर होते Etc.
बेजबाबदार कोण मग? आणि आता 500 वर्षांपूर्वी जगभर इलिगल घुसलेल्या, देश बळकावलेल्यांचे वंशज म्हणतात तात्यांचा काही दोष नाही. चिनीच बेजबाबदार? चीनने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, मेक्सिकोने भिंत बांधून दिली तशीच - हेही सुरू आहे.तुमच्या पूर्वजांनी इतके लोक रोग पसरवून मारले त्याची नुकसान भरपाई केली होती का?
https://youtu.be/ch7_t2Ri2Zg
https://youtu.be/ch7_t2Ri2Zg
Trump’s coronavirus calendar
https://youtu.be/ch7_t2Ri2Zg
https://youtu.be/ch7_t2Ri2Zg
Trump’s coronavirus calendar >> खरंच
कुठल्याही (पक्षाचा) राजकारणी तो कसा ही असला तरी वाट्टेल त्या पातळी वर जाऊन
defend/justify करण्याची गरज कोणत्याही सामान्य नागरिकाला का वाटते हे मला
कधीच कळलेले नाही.
>>
>>
बेजबाबदार कोण मग? आणि आता 500 वर्षांपूर्वी जगभर इलिगल घुसलेल्या, देश बळकावलेल्यांचे वंशज म्हणतात तात्यांचा काही दोष नाही. चिनीच बेजबाबदार? चीनने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, मेक्सिकोने भिंत बांधून दिली तशीच - हेही सुरू आहे.तुमच्या पूर्वजांनी इतके लोक रोग पसरवून मारले त्याची नुकसान भरपाई केली होती का?
<<
खापरपणजोबांच्या वा त्याच्याही मागच्या पूर्वजाने केलेल्या कृष्णकृत्याची शिक्षा वंशजाला देणार? मग दोष निर्धारण नक्की कसे करणार? मुळात समस्त अपत्ये, त्यांची अपत्ये मग त्यांनी कुणाशी लग्न केले, लग्न केले का, ते कुठल्या वंशाचे होते. त्यांनी किती रोग पसरवले? हे सगळे कसे ठरवणार म्हणे? त्यावेळेस जे नियम, संकेत, संस्कृती होती ती आज नाही. त्यामुळे तेव्हा ते चूक होते म्हणून आजच्या वंशजाला शिक्षा असे कायदा करत नाही. तसे करणे मूर्खपणा आहे. घड्याळाचे काटे उलट फिरवता येत नाहीत. नुसते रिकामे डायलॉग मारणे सोपे आहे पण ५०० वर्षापूर्वीचे हिशेब आता न्याय्य पद्धतीने चुकवणे सोपे काम नाही उलट अशक्य आहे.
चीनने रोगाचा प्रसार आज केला आहे. काही महिने झाले. ५०० वर्षे आणि काही महिने ह्यातला फरक कळत नसेल तर धन्य आहात!
वेळ काय, आपण बोलतोय काय?https
वेळ काय, आपण बोलतोय काय?
https://www.yahoo.com/news/top-coronavirus-doctor-puts-head-174500946.html
तर मित्रानू! ह्याला म्हणतात खम्केपणा! Amazing leadership! जस्सं आहे तस्सं बोलणं!
हे एक महापुरुष आणि त्यांच्या सगळ्या अॅक्शन्स जस्टीफाय करत त्याचे कैवार घेणारे लोकं, दोन्ही धन्य!
>>
>>
कुठल्याही (पक्षाचा) राजकारणी तो कसा ही असला तरी वाट्टेल त्या पातळी वर जाऊन
defend/justify करण्याची गरज कोणत्याही सामान्य नागरिकाला का वाटते हे मला
कधीच कळलेले नाही.
<<
एखादी व्यक्ती आपल्याला वाईट्ट वाईट्ट वाटत असेल तर कुण्णी कुण्णी त्याचे समर्थन करु नये असे वाटते. उलट कुणी चुकून समर्थन केले तर ते वाट्टेल त्या थराला जाऊन समर्थन करत आहेत असे वाटत असावे असे मला वाटते!
समर्थन करायच्या लायकीचं काही
समर्थन करायच्या लायकीचं काही सापडलं तर तेही करुच. फक्त बळच आपलं विरुद्ध बाजू मांडायची म्हणून बाष्कळ मुद्द्यांना ग्लोरिफाय करणे अत्यंत हास्यास्पद आहे.
बायडन नॉमिनी होईल ते बरं आहे. Now there’s at least a fighting chance.
>>
>>
फक्त बळच आपलं विरुद्ध बाजू मांडायची म्हणून बाष्कळ मुद्द्यांना ग्लोरिफाय करणे अत्यंत हास्यास्पद आहे.
<<
आपल्याला पटत नाहीत म्हणून विरोधी बाजूच्या मुद्द्यांना बाष्कळ मानणे जास्त हास्यास्पद आहे.
{{{ आता लगेच पुढे मग बाकी
{{{ आता लगेच पुढे मग बाकी प्रेसिडंट काय हे करत नाही असं वाटलं की काय तुम्हाला वैदुबुवा असा शंभर नंब्री सवाल कोणी शेंडेबुडखे विरहित लोकं करतीलच. }}}
एखाद्या आयडीच्या आडनावावरुन फालतू कोटी करणार्यांना ट्रंपवर टीका करायचा जरातरी नैतिक अधिकार आहे काय? तसंही तुम्ही इथे कितीही आपटा (कळफलकावर बोटं हो) येणार तर ट्रंपच. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक अध्यक्ष डेमो असो की रिपब्लिकन; मतदार त्याला दोन टर्म देतातच.
>>मतदार त्याला दोन टर्म
>>मतदार त्याला दोन टर्म देतातच.<<
आणि विरोधी पक्षाने चंग बांधला तर देतातंच. तशी जोरदार तयारी सुरु आहे हे तुमच्या वाचनांत आलं असेलंच...
आज राजेरोस गोर्यांचा
आज राजेरोस गोर्यांचा श्वेतवर्णीय भेदभाव जगात कुठेही चालू शकत नाही. व्यासपीठावरून कुणी तशी भूमिका मांडून निवडणूक जिंकू शकत नाही. ///
ऑ?? मग व्यासपीठावरून आणि ट्विटर वरून चायनीज व्हायरस, फोरीन व्हायरस असं म्हणत तात्या नेमकं काय करत आहेत?
अर्थात निवडणुकीपूर्वी व्हायरस प्रकरण निपटलं तर तात्या व्यासपीठावरून जाहीर अपमान करण्याचा फोकस चायनीज लोकांवरून भारतीय, मेक्सिकन, आफ्रिकन अमेरिकन्स, मुस्लिम यांच्यावर नेतील. आणि मग चायनिजना धडा शिकवणार म्हणून इंडियन्स, एच वन बी इंडियन्सना हाकलून देणार म्हणून चायनीज, मेक्सिकनना वठणीवर आणणार म्हणून आफ्रिकन अमेरिकन, मुस्लिमाना बंदी घालणार म्हणून मेक्सिकन असे सगळेजण एकमेकांविरुद्ध तात्यानाच मतदान करतील.
असो मला अजुन व्होटर्स कार्ड
असो मला अजुन व्होटर्स कार्ड मिळालेले नाहीये. मला मत देता येत नाहीये. ते बहुतेक विशिष्ठ मुदतीतच मिळत होतं वाटतं.
तात्याचे एच १ बी चे धोरण अमेरीकेला धोकादायक आहे. हा इमिग्रंटस्ने उभा केलेला, चालवलेला देश आहे. तेव्हा त्या धोरणाचा निषेधच आहे.
पण त्यांचे बेकायदेशीर लोकांविरुद्धचे धोरण आवडते , पाकिस्तानला भीक न घालण्याचे धोरण आवडते. कॅपिटॅलिझम आवडते.
बाकी स्त्रियांविरुद्धची गरळ, इन्सेस्ट बद्दलची मते - दुर्लक्षणीय!!
Donald J. Trump
Donald J. Trump
@realDonaldTrump
Feb 25
The Coronavirus is very much under control in the USA. We are in contact with everyone and all relevant countries. CDC & World Health have been working hard and very smart. Stock Market starting to look very good to me!
हे वरचं ट्विट २५ फेबचं आहे. जानेवारी-फेब्रुवारी दोन्ही महिने इंटेलिजन्स सोर्सेसकडून करोनाच्या धोक्याबद्दल रिपोर्ट्स मिळत होते पण ते तात्यांनी सिरियसली घेतलं नाही. २५ फेब्रुवारीला सगळं कंट्रोलमध्ये असल्याची थाप मारली. काही दिवसातच एकेक राज्य लॉकडाऊन व्हायला आणि माणसं मरायला सुरुवात झाली. स्टॉक मार्केटमध्ये तात्या आणि इनसायडर ट्रेडिंगवाले रिपब्लिकन्स सोडून इतर कोणालाही काहीही look good दिसत नाहीये. रिसेशन ऑलरेडी सुरु झालंय.
परत ४ दिवसांपूर्वी ट्र्म्पनी 'I've always known, this is a real -- this is a real -- this is a pandemic. I felt it was a pandemic long before it was called a pandemic.' असंही म्हटलंय. थापा किती माराव्या याची काही गणनाच नाही. एकूण हा पध्दतशीर दिशाभूल करुन घडवून आणल्यासारखा प्रकार वाटतोय.
त्याला ह्या वायरस वरुन
त्याला ह्या वायरस वरुन मार्केट, इकॉनॉमी खाली जाऊन त्याच्या रिईलेक्शन ला बाधा यायला नको ह्याचं पडलेलं आहे फक्त.
आता रिलिफ एफर्ट्स नी जोर धरलाय मात्र, स्टेट वालेच बर्याच अॅक्शन्स घेत आहेत त्यामुळे आता आशा वाटत आहे की हे आटोक्यात येइल.
प्रायमरीज वरचा फोकसच गेला पार.
https://twitter.com
https://twitter.com/realDonaldTrump/status/1220818115354923009
Donald J. Trump
@realDonaldTrump
China has been working very hard to contain the Coronavirus. The United States greatly appreciates their efforts and transparency. It will all work out well. In particular, on behalf of the American People, I want to thank President Xi!
https://twitter.com/dvillella
https://twitter.com/dvillella/status/1220826933417709568/photo/1
ईस्टरपर्यंत सग्गळं ठीक होणार
ईस्टरपर्यंत सग्गळं ठीक होणार आहे लोकहो! कसं ते विचारू नका. ईस्टर इज व्हेरी इम्पॉर्टन्ट टु मी अॅन्ड धिस कन्ट्री वॉज नॉट बिल्ट टु शटडाऊन!
व्यासपीठावरून कुणी तशी भूमिका
व्यासपीठावरून कुणी तशी भूमिका मांडून निवडणूक जिंकू शकत नाही.
<<
https://www.cnn.com/2020/03
https://www.cnn.com/2020/03/25/politics/donald-trump-gallup-approval-pol...
>>>>>The average person seems to broadly believe that Trump is doing the best that he can in a very difficult circumstance. And that what he says on a daily basis matters less than the fact he is out there saying it, and assuring the country that this will all be over soon. (Nota bene: There's very little medical evidence to suggest Trump's optimism is rooted in established facts.)>>>>
.
तोच मुळूमुळू बोलला 'आहे रे - नाही रे' तर देशाने कोणाकडे पहायचे? जी वस्तुस्थिती आहे ती आहे पण नेत्यांना ब्रेव्ह फसाड ठेवावाच लागतो. शिवाय आणिबाणीच्या काळात, स्टिम्युलस पॅकेजची बोलणी आहेच की चालू. कृतीशुन्य वाचाळपणा नाहीच्चे. (https://www.wsj.com/articles/trump-administration-senate-democrats-said-...) .
>>
>>
ईस्टरपर्यंत सग्गळं ठीक होणार आहे लोकहो! कसं ते विचारू नका. ईस्टर इज व्हेरी इम्पॉर्टन्ट टु मी अॅन्ड धिस कन्ट्री वॉज नॉट बिल्ट टु शटडाऊन!
<<
समजा ट्रंप म्हणाला असता की आता तीन चार महिने तरी भीषण असतील. असेच लोक मरत रहाणार. तरी लोकांनी शिव्याच दिल्या असत्या.
कसं आहे न? की एखादी नावडती असेल तर तिचे मीठही अळणी लागते.
ट्रंपने आशा व्यक्त केली आहे. खात्री किंवा आश्वासन दिलेले नाही. हवेतील तपमानाची वाढ, चीनच्या आणि अन्य देशांच्या अनुभवातून शिकायला मिळालेले शहाणपण ह्यामुळे कदाचित ही साथ शमायला अमेरिकेत थोडा कमी वेळ असे मानायला जागा आहे.
अर्थात हे पालथ्या घड्यावर पाणी असेल ह्याची जाणीव आहे. पण रहावत नाही!
>>> समजा ट्रंप म्हणाला असता
>>> समजा ट्रंप म्हणाला असता की आता तीन चार महिने तरी भीषण असतील. असेच लोक मरत रहाणार. तरी लोकांनी शिव्याच दिल्या असत्या.
पण कोणीच त्याला कसले अंदाज विचारलेलेच नाहीयेत! कशाला नाही कळत त्यावर मतप्रदर्शन?! तज्ज्ञांच्या सल्ल्याने कारवाई कर, काय कारवाई सुरू आहे ते सांग. कशाला बाकीची बडबड?! आकडे काय लपलेत का लोकांपासून?!
समजा ट्रंप म्हणाला असता की
समजा ट्रंप म्हणाला असता की आता तीन चार महिने तरी भीषण असतील. असेच लोक मरत रहाणार. तरी लोकांनी शिव्याच दिल्या असत्या.///
त्याच्या समर्थकांनी नक्कीच शिव्या दिल्या नसत्या. ट्रम्पची कशातच काहीच चूक नाही हे त्यांचं फिक्स आहे.
आणि समर्थक नसलेले लोक आता त्याचं कोणतंही बोलणं गंभीरपणे घेत नाहीत.
>>
>>
पण कोणीच त्याला कसले अंदाज विचारलेलेच नाहीयेत! कशाला नाही कळत त्यावर मतप्रदर्शन?! तज्ज्ञांच्या सल्ल्याने कारवाई कर, काय कारवाई सुरू आहे ते सांग. कशाला बाकीची बडबड?! आकडे काय लपलेत का लोकांपासून?!
<<
तथाकथित तज्ञ देखील ह्याविषयी अचूक काही सांगू शकलेले नाहीत. हा व्हायरस हवेतून पसरतो का द्रवातून का संपर्कातून हेही बदलताना दिसते आहे.
एखाद्याने, विशेषतः नेत्याने "मला आशा वाटते की ही साथ अमुक काळापर्यंत आटोक्यात येईल " असे म्हटले तर त्यात आकांडतांडव करण्याचे प्रयोजन कळत नाही. त्याला काहीतरी चांगले घडावे असे वाटत आहे इतके तरी म्हणायला काय हरकत आहे?
>>
त्याच्या समर्थकांनी नक्कीच शिव्या दिल्या नसत्या. ट्रम्पची कशातच काहीच चूक नाही हे त्यांचं फिक्स आहे.
<<
नाही. हा विरोधकांचा एक गोओओओओड गैरसमज आहे. निदान मी तरी म्हणतो की ट्रंपने अनेक चुका केलेल्या आहेत. प्रशासनात अनेक ओबामाच्या काळातले अधिकारी न हाकलून अस्तनीचे साप पाळले जे संधी साधून त्याच्यावर उलटले. भिंत बांधण्याबद्दल पुरेसा आक्रमक नव्हता. काही वेळा नको त्या गोष्टी ट्वीट करतो. इ.
माझ्यामते कुणीही १००% आदर्श कधीच नसतो. मग राष्ट्रपती असो वा सिनेटर वा अन्य लोकप्रतिनिधी. प्राप्त परिस्थितीत त्यातल्या त्यात बरा कोण हे निवडावे लागते. आणि त्यात ट्रंप नक्कीच वरचढ वाटतो.
>>कसं ते विचारू नका.<<
>>कसं ते विचारू नका.<<
जरुर विचारा, आणि त्याचबरोबर संपुर्ण बातमीकडे डोळेझाक सुद्धा करु नका. कालच्याच व्हाहा ब्रिफिंगमधे डॉ. फॉची यांनी पुढच्या स्टेप्स काय असतील याचा आढावा घेतलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्राय-स्टेट एरियातल्या मुलांना यावर्षी एग हंटला बाहेर पडता येणार नाहि, परंतु वायोमिंग, डाकोटाज इ. सारखे लोली अॅफेक्टेड स्टेट्समधले रेस्ट्रिक्शन्स कदाचित शिथील करतील, मिळालेल्या डेटाच्या आधारावर...
त्याच्या समर्थकांनी नक्कीच
त्याच्या समर्थकांनी नक्कीच शिव्या दिल्या नसत्या. ट्रम्पची कशातच काहीच चूक नाही हे त्यांचं फिक्स आहे.
<<
नाही. हा विरोधकांचा एक गोओओओओड गैरसमज आहे. निदान मी तरी म्हणतो की ट्रंपने अनेक चुका केलेल्या आहेत.
प्रशासनात अनेक ओबामाच्या काळातले अधिकारी न हाकलून अस्तनीचे साप पाळले जे संधी साधून त्याच्यावर उलटले. भिंत बांधण्याबद्दल पुरेसा आक्रमक नव्हता. काही वेळा नको त्या गोष्टी ट्वीट करतो. इ.//
मला स्पेसिफिकली करोना रिस्पॉन्सबद्दल म्हणायचं होतं की त्यात त्याचं काही चुकलंय असं समर्थकांना वाटत नाही.
बाकी इतर बाबतीत तो पुरेसा आक्रमक, पुरेसा रेसिस्ट वागत नसेल तर समर्थक चिडतात हे ट्विटरवर पाहिलं आहे.
Pages