Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुझी पोस्ट वाचुन मोनॉपोली
तुझी पोस्ट वाचुन मोनॉपोली खेळतोय असे वाटले >>> भायखळा, फ्लोरा फाउण्टन वगैरे
ट्रम्प आला तर ट्रम्प आला. तोपर्यंत काथ्याकूट करायला काय हरकत आहे
(No subject)
(No subject)
.
तुझी पोस्ट वाचुन मोनॉपोली
तुझी पोस्ट वाचुन मोनॉपोली खेळतोय असे वाटले >>> Happy भायखळा, फ्लोरा फाउण्टन वगैरे
>>> हे पुन्हा वाचताना लक्षात आले की मुकुंद ने मोनोपॉली लिहीले असले (आणि गेल्या काही वर्षांत मी अनेकदा मोनोपॉली खेळलो असलो ) तरी माझ्या डोक्यात अजून "नवा व्यापारी"च आहे
राम राम! ऑफिस लॅपटॉप वर
राम राम! ऑफिस लॅपटॉप वर मायबोली अल्लौड नाही त्यामुळे चर्चेत आजिबातच भाग घेता आला नाही. फोन वरुन मोठ्ट्।आले मेसेज टाकता येत नाही, फार त्रास होतो. ह्या वेळी खरं इलेक्शन खुप क्लोजली फॉलो केलं. मागच्या वेळी सार्खं फक्त जनरल न्युज नाही बघित्ल्या. राईट पासून लेफ्ट सगळ्या बातम्या, ओपिनियन्स जमेल तशा वाचल्या.
हा माझा फायनल टेक. इंग्रजी करता माफी द्या.
My final take, Biden will win comfortably. Last time trump was trailing Clinton with small margins and since her voters were over estimated (remember college grads?), large number didn’t show up and finally independents broke for Trump. All these factors carried Trump in battleground states by thin margins. The huge shock came because no one was expecting the above drawbacks for Clinton and more importantly, no one thought People would take Trump seriously and vote for him. Turns out whoever took him seriously ended up slightly pushing him over the edge to snag electoral colleges.
Not seriously too actually, they just said let’s try this guy out. A lot of independent voters said this. Now they have seen him govern.
Trump won four states by 1.2% or less: Florida (29 EVs), Pennsylvania (20 EVs), Wisconsin (10 EVs) and Michigan (16 EVs).
Now Biden has leads in these except Florida. Applying the same principle, people are so scared of what happened in 2016 no one is willing to bet (or even thinking about) that Biden will expand his lead and win comfortably. Why he will expand his lead? Biggest factor is voting. Voting has reached crazy high which means people who did not vote last time are coming in droves to vote.
It’s hard to imagine that in 4 years Trump has amassed so much support that he will blow through these Biden leads and land a victory. In fact, his own lack of experience, handling of the pandemic, non stop bickering has turned people off.
I very much feel that the silent majority that he keeps referring to was not a majority at all. It was those measly, handful of voters who got him over the line last time. Maybe he may have expanded that support a little bit more आणि काही येड क्ष्क्ष्क्ष जास्त loud jhaalet. Hou dya... He will find out tonite.
आता दोन्ही बाजूंनी निदान
आता दोन्ही बाजूंनी निदान शंभर तरी खटले दाखल होतील नि ते सगळे सुप्रिम कोर्टात!
बसा वाट बघत.
यावेळेसही 'तुल्यबळ' लढत आहे.
यावेळेसही 'तुल्यबळ' लढत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाहीये असे वाटते.
I feel like I am waiting for
I feel like I am waiting for this drama to be over ! कळू द्या एकदाच कोण आले टाइप.....
आचारसंहिता वगैरे नाही का इथे....
बाकी नन्द्या ४३ काकांच्या लबाड श्रीमंत पोस्टसारखे विचार माझ्याही मनात आले होते.
मला तर कोणाचबद्दल खास ममत्व
मला तर कोणाचबद्दल खास ममत्व नाही. शेवटच्या क्षणीही हात थरथरत होता - हा पक्ष की तो/ हा की तो? पण तेच आहे ना - दोन्हीकडचे समर्थक/विरोधक इतके प्रखरतेने आपापल्या पक्षाची बाजू घेतायत.
आज नवरा करणारे व्होटिंग. तो म्हणतोय तू ट्रंपला दिलस म्हणुन मी बायडेनला देतो म्हणजे न्युट्रल राहील कारण दोघंही शेवटच्या क्षणापर्यंत न्युट्रल होतो. ठरतच नाही भेंडी!! मी हिय्या करुन ट्रंपला मत दिले. माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला. मुलगी कट्टर डेमोक्रॅट आहे. ती चर्चा करताना, आम्ही ऐकल नाही की तावातवाने निघून जाते. ओबामाकेअरची कट्टर समर्थक आहे, आम्हाला माणुसकी नाही म्हणते. रिझनेबल कॉस्ट इन्श्युरन्स प्रत्येकाचा हक्क आहे म्हणते
आमचे तर कनेडियन /इंडियन
आमचे तर कनेडियन /इंडियन background /H1B/ Oil pipeline /India-China /India-Pak / Economy , या सगळ्यात आम्हाला ही ट्रंप थोडा फायदेशीर वाटतो. Let's wait and watch.. तोही करेपर्यंत खरे नाही काही. जस्टीन ट्रुडोमुळे दिल्ली ते देवगिरी झाले आहे , पुन्हा शक्ती/इच्छा नाही.
अजब आहे. I have no idea how
अजब आहे. I have no idea how you have reached that conclusion. Talking about h1b, have you not seen the news? He’s done the most damage so far. If a court doesn’t throw out the current changes they made to wages via an injunction, 90-95% percent of people in the US currently won’t be eligible for their next renewals.
Conclusion नाही बुवा , काही
Conclusion नाही बुवा , काही कळत नाही..... दगडाखाली हात अवस्था. आम्ही मतदार नाही. भरवसा कुणावरच नाही ....
मला राजकारणातलं काही कळतं नाही. जर मत दिले असते तर सामो सारखं झालं असतं.
If a court doesn’t throw out
If a court doesn’t throw out the current changes they made to wages via an injunction, 90-95% percent of people in the US currently won’t be eligible for their next renewals. >> बुवा, पण हे सगळे अमेरिकन मतदार थोडीच आहेत? भारतीय वंशाचे अमेरिकन मतदार H1B वाल्यांचा विचार थोडीच करणार आहेत?
बाकी, गेल्या वेळी अमेरिकेत आणि भारतात एकाच वेळी धमाके झाले होते हे तर २०२० आहे. यंदा कशाचाच भरवसा नाही वाटत!
अनेक Indian लोकांना रिपब्लिकन
अनेक Indian लोकांना रिपब्लिकन पॉलिसी बर्याचशा पटतात, विशेषतः अमेरिकेत अनेक वर्षे निवास करून असलेले. पण व्यक्ती म्हणून ट्रंपला मत देणे जिवावर येते. समजा ट्रंपऐवजी दुसरा कुणी उमेदवार असता GOP तर्फे तर तो नक्की विजयी झाला असता. Democrats कडे कोणी लोकांना खेचून घेणारा उमेदवार नाही आणि बायडेन हा ट्रंपपेक्षा decent म्हणून त्याला मतं मिळतात. ती बायडेन हवा म्हणून नाही तर ट्रंप नको म्हणून जास्त आहेत
लोल जिज्ञासा. भारतीय वंशाचे
लोल जिज्ञासा. भारतीय वंशाचे मतदार कितपत करतात विचार माहित नाही. बघण्यात आलेले बरेच स्वतःचे ग्रीन कार्ड आले कि एच १ वाल्यांना पाण्यात बघणारेच होते. I am not counting on them. It’s about any leader who listens to the experts in any matter. Biden may not be the best (if there is such a thing) but he will listen for sure.
>>>>बरेच स्वतःचे ग्रीन कार्ड
>>>>बरेच स्वतःचे ग्रीन कार्ड आले कि एच १ वाल्यांना पाण्यात बघणारेच होते. >>>> याचे कारण आहे स्वतः एच-१ च्या भयानक टांगत्या तलवारीखालून गेल्यानंतर, असुरक्षितता माणसाला किती 'कट थ्रोट्/स्पर्धक' बनवु शकते ते लक्षात आलेले असते. एच-१ बी लोकांबरोबर, पर्सनली काही हेवेदावे नसतात पण ते आपल्याला कच्चे खाउ शकतात हे माहीत असते. वी आर व्हेरी कॉपिटिटिव्ह, सर्व्हायवल-ओरिएंटेड पीपल.
बुवा, तुमच्या तोंडात
बुवा, तुमच्या तोंडात (डिसायसिव्हली) साखर पडो. तुम्ही लिहिलेलं घडेल असं वाटत असलं तरी मेंदू हे असं काहीही घडणार नाहिये फार आशा ठेवू नको हाच सिग्नल सारखा देतो आहे.
सामो, भारत आणि अमेरिका मनमोहन सिंग - बुश, मोदी - ओबामा या सगळ्या सरकारात जवळच आली आहेत आणि तेच यापुढेही होत रहाणार आहे. कारण चीन. पाकिस्तानला आज अमेरिकेत कोणीही आले तरी फारसा भाव मिळणार नाही. तुमच्या एकुण प्रतिसादांवरुन तुमचं मत ठरलेलं होतं आणि तुम्ही फक्त सपोर्टिंग कारणं शोधत होतात. ते तुम्हाला मिळालं. असो.
>>>>तुमच्या एकुण
>>>>तुमच्या एकुण प्रतिसादांवरुन तुमचं मत ठरलेलं होतं आणि तुम्ही फक्त सपोर्टिंग कारणं शोधत होतात. >>> नाही हे खरे नाही. खरोखर मी न्युट्रल होते
पण अमेरिकन सिटिझनशिप मिळुन २ एक वर्षेच झाल्याने, अजुनही स्वप्नात असल्यासारखे वाटते, मोठ्ठे ओझे/भार गेल्यासारखे हलके वाटते. यामध्ये मला अमेरीकेत मला मिळणारी वैद्यकिय मदत हा फार मोठा फॅक्टर आहे.
वयही वाढत चालल्याने, आपला जॉब कसा टिकेल, स्पर्धा कशी टाळता येइल हे विचार सतत पार्श्वभूमीवरती रेंगाळत असतात. त्यामुळे अमेरीकेकरता कोण प्रॉमिसिंग आहे याची तुलना करायची हे नक्की होते.
'अमेरिका फर्स्ट' असा मेसेज देण्यात ट्रंप यशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड झाले.
माझ्याकरता - बायडेन - कमलाचे
माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला. >>
'अमेरिका फर्स्ट' असा मेसेज देण्यात ट्रंप यशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड झाले. >> ह्म्म!
संध्याकाळी सीएनएन आणि फॉक्स
संध्याकाळी सीएनएन आणि फॉक्स अनुक्रमे बायडेन आणि ट्रंप जिंकले असे घोषित करतील
मग ऑफिशिअल ऑथोरिटीजचे स्टेटमेंट आणि व्हाईट हाऊस स्टेटमेंट असेच अजून भलतेच परस्परविरोधी काहीतरी सांगतील.
मग बायडेन व्हाईट हाऊसवर हक्क सांगण्यासाठी जातील आणि ट्रंप दाराला भले मोठे कुलुप लाऊन ठेवेल.
मग कोर्टात गेले की अटॉर्नी जनरला ला सिनेट समोर बोलावून सगळे आपली भडास काढतील.
आणि मग तीनेक महिन्यांनी शेवटी ट्रंप पुन्हा ४ वर्षांसाठी प्रेसिडेंट म्हणून ऑफिशिअल स्टेटमेंट येईल.
मग वर्षाभराने म्युलर नावाचे एक सदगृहस्थ येतील ते दोनेक वर्षे वोटिंग फ्रॉड चिवडत बसतील ज्यातून काहीही निष्पण्ण होणार नाही.... तोवर बुटाजज वि. ईवांका ट्रंप २०२४ चे वारे सुद्धा वाहू लागतील....आहात कुठं.
अस्मिता, मला ते दिल्ली
अस्मिता, मला ते दिल्ली देवगिरी काय लिहिलं तुम्ही ते कळलंच नाही.
बाकी shy trump voters बद्दल 538 च्या पॉडकास्टमध्येही बुवांनी लिहिलं तसं थोडं फार उल्लेख झाला की काही वोटर्स इतके शाय आहेत की ट्रम्प समर्थक असले तरी पोलमध्ये बायडन सांगतात. आणि काही शाय ट्रम्प वोटर्ससाठी इमिग्रेशन हाच एकमेव decisive मुद्दा आहे. पण बोलायला लाजतात आणि मग उगाचच इकॉनॉमी, टॅक्स, पाकिस्तान अशी थातुरमातुर कारणं देत बसतात. सामो तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडला.
मी हिय्या करुन ट्रंपला मत
मी हिय्या करुन ट्रंपला मत दिले. माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला. >> रियली ? गेली पन्नास एक वर्षे प्रेसिडेंटचे भारत किंवा पाकिस्तान धोरण कसेही असले तरी त्याचा भारताच्या राजकारणावर काय पडला. अमेरिकेबरोबरचे बिझनेस डील्स चालूच आहेत. भारतातून इमिग्रेशन देखील चालूच आहे.
तुम्ही इथल्या सिटीझन आहात, इथेच रहाल पुढची २० - २० वर्षे तरी असं धरलं तर तुम्ही त्या अनुषंगाने विचार नाही केला ?
व्हाइट सुप्रीमसिस्ट / रेसिस्ट लोकांना सपोर्ट, सुप्रीम कोर्टात कॉन्झर्वेटिव मेजॉरिटी भरणे, अफोर्डेबल हेल्थ केअरला विरोध, अबॉर्शन राइट्स ना विरोध हे सर्व सोडून ते प्रो-पाकिस्तान आहेत यावर तुमचं मत ? बायडेन - हॅरिस जिंकून आले की पाकिस्तानचे कल्याण हाच एक कलमी कार्यक्रम राबवणार आहेत जणू :फेसपामः
सनव आम्ही आधी अमेरिकेत होतो
प्रकाटाआ
होय मला माहीत होते तुम्हा या
>>>>>>>माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला. >>
'अमेरिका फर्स्ट' असा मेसेज देण्यात ट्रंप यशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड झाले. >> ह्म्म!>>>>>
होय मला माहीत होते तुम्हा या संदर्भात प्रश्न विचारलात ते
जर ट्रंप पाकिस्तान - प्रो + 'अमेरीका फर्स्ट' असता ........................... तरी ट्रंपलाच मत गेले असते. भारताबद्दल ममत्व आहे पण इतकेही नाही. छोड आये हम वोह गलियां
जर पाकिस्तान हा देशच अस्तित्वात नाही असे धरले असते - तर बायडेन-ट्रंप पारडे समसमा झाले असते. पेच पडला असता. खरोखर छापा-काटा करावा लागला असता. आणि कदाचित ....... बायडेनलाही मत गेले असते. तरुण मुलगी असल्याने, 'प्रो-चॉइस' मुद्दा महत्वाचा अहे- खोटे कशाला बोला! 'अमेरिका फर्स्ट व 'प्रो चॉइस' दोन्ही मुद्दे या वयात माझ्याकरता तुल्यबळ आहेत.
पण अनायसे तसे करावे लागले नाही.
व्यामिश्र व मिक्सड विचारप्रक्रिया आहे खरी.
मेधा +११११११ माझापण फेसपाम
मेधा +११११११
माझापण फेसपाम
मेधा +१
मेधा +१
'अमेरिका फर्स्ट' असा मेसेज देण्यात ट्रंप यशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड झाले.
मी हिय्या करुन ट्रंपला मत दिले. माझ्याकरता - बायडेन - कमलाचे प्रो-पाकिस्तान धोरण टिपिंग पॉइन्ट ठरला.>>>>
>>> तुम्ही अमेरीकन नागरीक आहात. अमेरीकेत रहात आहात. अमेरीकन हेल्थ सिस्टीमचे फायदे तुम्हाला मिळत आहेत. नोकरीही इथेच करता. इथे टॅक्स भरता. इथल्या बाकी सोयी सुविधांचा तुम्हाला फायदा मिळतो. तुमच्या पुढच्या पिढ्याही इथेच रहाणार आहेत. अमेरीकन सरकारी धोरणांचा त्यांच्या भविष्यावर बरा वाईट परीणाम होणार आहे. असं असताना इथे मतदान करताना उमेदवाराची 'भारताबाबतची धोरणं' तुमचं मत ठरवण्याबाबत कशी काय महत्वाची ठरू शकतात? गन कंट्रोल, राईट टू चूज, शिक्षण, हेल्थकेअर इत्यादी 'लोकल' विषय तुमच्यासाठी महत्वाचे नाहीत का?
प्रेसिडेंट कुठलाही (कुठल्याही पक्षाचा) आला तरी 'अमेरीका फर्स्ट' च असते. बोलून दाखवले नाही तरी. आत्तापर्यंत अमेरीकेला फायदेशीर असणारी धोरणंच अमंलात आणली गेली आहेत. काही वेळा बाकी देशांचं हित (स्वार्थीपणे) बाजूला ठेवून. त्यामुळे अमेरीकन धोरणांप्रमाणे 'तुम्हाला' धार्जिणा असलेला उमेदवार निवडावा.
>>>>व्हाइट सुप्रीमसिस्ट /
>>>>व्हाइट सुप्रीमसिस्ट / रेसिस्ट लोकांना सपोर्ट - ट्रंपने डायरेक्ट सपोर्ट दर्शवलेला नाही. मिडीया उगाच आळ घेत बसतात हे माझे मत. व्हाईट सुप्रामिस्ट ग्रुप नंगा नाच घालतायत ते त्यांच्या स्वतःच्या अकलेने. ट्रंपने सपोर्ट केला म्हणुन नाही.
>>>>>सुप्रीम कोर्टात कॉन्झर्वेटिव मेजॉरिटी भरणे, - ट्रंपला अधिकार होता तो त्याने वापरला असे वाचनात आले. या विषयावर वाचलेले नाही.
>>>>>>अफोर्डेबल हेल्थ केअरला विरोध, - करेक्ट आमच्या पैशातून चॅरीटी करु नका.
>>>>अॅबॉर्शन राइट्स ना विरोध>>>> होय हा मुद्दा मान्य आहे. हा मुद्दा आवडत नाही. भयानक आहे.
सामो यांनी लिहिलंय की -
सामो यांनी लिहिलंय की -
1. एच-१ बी लोकांबरोबर, पर्सनली काही हेवेदावे नसतात पण ते आपल्याला कच्चे खाउ शकतात हे माहीत असते.
2.
जर ट्रंप पाकिस्तान - प्रो + 'अमेरीका फर्स्ट' असता ........................... तरी ट्रंपलाच मत गेले असते. भारताबद्दल ममत्व आहे पण इतकेही नाही.
यावरून मला वाटतं की पाकिस्तान नाही तर एचवन बॅन, इमिग्रेशन हे मुद्दे त्यांना आकर्षक वाटले असावेत.
ट्रंपने डायरेक्ट सपोर्ट
ट्रंपने डायरेक्ट सपोर्ट दर्शवलेला नाही. मिडीया उगाच आळ घेत बसतात हे माझे मत. व्हाईट सुप्रामिस्ट ग्रुप नंगा नाच घालतायत ते त्यांच्या स्वतःच्या अकलेने. ट्रंपने सपोर्ट केला म्हणुन नाही.>> आं ! बॅननला अॅडव्हायझर नेमला होता ते कसे काय मग ? व्हेरी फाइन पीपल ऑन बोथ साइड म्हणाला ते सपोर्टिव्ह नव्हतं होय ?
एच-१ बी वाले का कच्चे खाउ
एच-१ बी वाले का कच्चे खाउ शकतात? असे काय वेगळे कौशल्य आहे त्यांच्याकडे?
Pages