अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेव्हा ती मते व्हॅलिड असणे महत्वाचे आहे असे जर ट्रंप म्हणत असेल तर त्यात चूकीचे काय?

>>

तो म्हणाला की फ्रॉड होतोय, वोटिंग थांबवा. ती मते व्हॅलिड आहेत की नाही असे काही तो म्हणत नाहिये, ती व्हॅलिड नाहीच्च आहेत असे तो म्हणतोय.

ते जाउदे, तुम्ही युरेनसचा परिणाम बघा, तो चंद्राच्या जवळ आलाय.

@सामो - ही बातमी पहा गेल्या महिन्यातली -
https://www.nbcphiladelphia.com/news/politics/decision-2020/mail-in-voti...

With 15 days until the Nov. 3 presidential election, Republican lawmakers in the battleground state of Pennsylvania appeared unwilling Monday to authorize counties to process mail-in ballots before Election Day, seen as crucial to producing a prompt election result.

A spokesperson for the House Republican majority said in a statement that they have no plans to consider changes to election laws that will affect the Nov. 3 election.

County officials are still pushing for the change and say it could ensure the vast majority of ballots are counted within hours of polls closing.

मिक्स गवर्नमेंट , केअर टेकर प्रेसिडेंट ज्याच्या हाती सिनेट नाही अशी स्टॉक मार्केटला एकदम स्वीट डिशच मिळाली आज. टेक कंपन्यांनी तर दिवाळी आधीच दिवाळी साजरी करायला घेतल्यासारखे वातावरण आहे.
आता डोंबल दोनेक वर्ष काही होत नाही अमेरिकेत... नवीन कायदे पास होणं नाही की पॅकेजं नाहीत अपॉईंटेमेंट्स नाहीत नुसती भांडणंच भांडणं...मज्जाच मज्जा.
तेवढं १ ट्रिलिअन नाही तर ५०० बिलिअनचं तरी पेकेज पास करावं मास्तरांनी...२०२२ च्या सिनेटसाठी पुण्याई जमा होईल.
चायनाची मात्र हवा टाईट झाली असणार.

निकालात दम राहीलाय का अजुन? निकाल लागल्यात जमा आहे.
म्हातारबाबांचा राज्याभिषेक होतोयसं दिसतय ब्वॉ Wink

नाही नाही, अजून दादागिरी, धमक्या, अ‍ॅटर्नी जनरल, सुप्रिम कोर्ट वगैरे सगळे मिळून एकच हलकल्लोळ करतील नि बायडेनला ४०० इलेक्टोरल मते मिळाली तरी शेवटी ट्रंपच जिंकला असे जाहीर करतील!!
कारण एक जरी चूक आढळली तरी कॅलिफोर्निया, न्यू जर्सी इ. मधली मते मोजूच नये असे ठरेल.
आशा ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन हवा.
म्हणून तर ट्रंप ने म्हंटले होते की कोव्हिड--१९ वगैरे मामुली आहे, तुम्ही आपले नेहेमीचे व्यवहार चालूच ठेवा. मास्क घातलाच पाहिजे वगैरे काही नाही.
याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन!
अर्धे यश तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनावर अवलंबून असते.

अत्तपर्यंत आयुष्यात अनेक बर्‍या वाईट गोष्टी घडल्या, बरेच प्रेसिडेंट पाहिले, अजून निभावून नेतो आहे. आता पण जमेल कुणिहि आला तरी. जरा जपून राह्यला हवे एव्हढेच.

मायबोली वर मी कायमच केवळ करमुणिकीसाठी येतो, ताज्या बातम्यांसाठी, किंवा अभ्यासपूर्ण चर्चेसाठी नाही. कुणी काही लिहिले तरी माझी मते काही आता बदलणार नाहीत.

अमेरिका सारख्या प्रगत देशात मत मोजणीला इतका वेळ ? इतकी रडारड ?
आमच्या गरीब भारतात बूथ कॅपचर , ईव्हीएम टेम्परिंग , अतिदुर्गम भाग , टेक्नॉलॉजी अभाव अश्या अनेक अडचणी असूनही संध्याकाळपर्यत चित्र स्पष्ट झालेले असते. हरलेले पक्ष पण फार रडारड न करता निकाल मान्य करून मोकळे होतात. याबाबतीत गर्व से कहते हय हम भारतीय है Lol
Light 1

>>मिशिगन व विस्कॉन्सिन.. ठरवेल कोण जिंकेल.<<
अरे मुकुंद, इकडे आपण उगाच मिशिगन, विस्काँसिनला भाव देतोय आणि तिकडे नवाडा ब्लाइंड (पत्ते) खेळतोय. च्यायला कोणाच्या ध्यानीमनीहि नसेल कि नवाडाचा भाव इतका वधारेल. दुसरी गोष्ट म्हणजे, नेब्रास्का मधे बाय्डनला एक वोट मिळालं - तेहि २७०वं. कॅन यु बिलिव इट?..

एनीवे, मला वाट्तं तु म्हणालास तसं २०००, फ्लोरिडा रिकाउंटचा मुवी परत पहायला मिळणार. फक्त यावेळेला मल्टिपल स्टेट्स आहेत. कुठेतरी ट्रंपला मटका लागेल... Proud

भारतात निवडणू़क आयोगाच्या संकेतस्थळावर मतमोजणीचे आकडे दिसतात , तसं इथे काही नाही का?

२०१२ ते २०१६ अणि आता कोणकोणत्या राज्यांचे कल बदलले ते कुठे पाहता येईल?

नकाशा पाहिला तर लाल रंगाने व्यापलेला भाग खूपच जास्त वाटतो. या राज्यांत लोकसंख्येची घनता कमी आहे का?

भारतात जातनिहाय मतदानाचे पक्के ठोकताळे आहेत असं म्हटलं जातं . तसं अमेरिकेत शहरी , ग्रामीण, वंश, आर्थिक स्थर यांच्यावर आधारित ठोकताळे दिसतात. हे मतदान कोणाला करायचं याबरोबरच कसं केलं जातं यालाही लागू पडतात.

भारतात मतदार म्हणून नाव नोंदवण्याची आणि मतदानाची प्रक्रिया खूप सुलभ आहे. इथे काही गटांसाठी ती अवघड आणि अन्याय्य असू शकते असं वाचलं.

trump2.jpg

-------
शेंडे नक्षत्र यांच्या पोस्टी वाचताना "मला भाजप आवडत नाही, पण मोदी आवडतात शिवाय आय हेट काँग्रेस" असं समूहगान बॅकग्राउंडला वाजत असतं.

ट्रंप मोदी पॅरलल म्हटल्यावर नाकाला मिरच्या झोंबत असतील तर झोंबोत. ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर आणि सी ए ए - एन आर सी विरोधी आंदोलनांच्या हाताळणीतून आणि त्याला हवे ते वळण देण्यातून समांतरपणा अधिक गडद झाला.

फक्त भारतात सगळी कामं आउटसोर्स करता येता. ट्रंपतात्यांना स्वतःचं तोंड झिजवावं लागतं हा बारीकसा फरक.

जाई.. तुझ बरोबर आहे.. एवढा वेळ घेण अक्षम्य आहे.

या अक्षम्य डिलेमुळे होतय काय की आधीच सगळे जग त्यांच्याविरुद्ध आहे असा ठाम समज असलेल्या ट्रंप समर्थकांना डाउट घ्यायला वाव आहे की नेव्हाडासारख्या अल्पसंख्या असलेल्या राज्यातल्या मतमोजणीला इतका वेळ कसा लागु शकतो? २४ तास झाले तरी अजुन ७५ टक्केच मत मोजली गेली आहेत नेव्हाडात? काय चाललय काय नक्की तिथे?

राज.. तुझ्या स्वतःच्या .. अ‍ॅटलांटाच्या... फलटन काउंटीलाही इतका वेळ लागत आहे मतमोजणीला? २४ तास होउन गेल तरी फलटन काउंटीचा रिझल्ट माहीत नाही? तु काय प्रकाश टाकु शकतोस का की तुझ्या नेक ऑफ द वुड्समधे काय गौडबंगाल चाललय?

राज.. मी आज एन पी आर वर कॉन्स्ट्युट्युशनल स्कॉलरचे मत ऐकत होतो.. त्याच्या म्हणण्याप्रमाणे... विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हॅनिया व मिशिगनमधे जर ट्रंप कोर्टात गेला तर सुप्रिम कोर्टाने २००० मधे जसे फ्लोरिडामधे मतमोजणी थांबवली होती व बुशला ५०० मतांनी सुप्रिम कोर्टाने विजयी केले होते तसेच आतासुद्धा सुप्रिम कोर्ट मतमोजणी थांबवु शकते. ट्रंपने एक्झॅक्टली याच कारणासाठी एमी कोनी बॅरेटला घाइघाइत.. ८ दिवसात सुप्रिम कोर्टात पाठवले आहे..

मतमोजणी जर ३ तारखेच्या ८ वाजता जो नंबर होता त्यावर सुप्रिम कोर्टाने थांबवली तर ती ३ ही राज्ये ट्रंपला मिळतील व ट्रंप प्रेसिडेंसी जिंकु शकतो.

आणी बायडनने जर कोर्टात चॅलेंज केले तर कॉन्स्ट्युट्युशननुसार त्या राज्यातले लेजिस्लेटर्स .. त्या राज्यातली सगळी मते गारबेज मधे टाकुन..त्यांच्या आवडीप्रमाणे इलेक्टरोल रेप्रेझेंटेटिव्ह नेमु शकतात.. ती तिनही राज्ये रिपब्लिकन्स कंट्रोल्ड आहेत.. त्यामुळे ते त्या राज्याची सगळी एलेक्टरोल मते ट्रंपला देउ शकतात.

इदर वे.. ट्रंपच प्रेसिडेंट म्हणुन पुढची ४ वर्षे राहणार. तशी तजविज मिच मॅकॉनल, लिंडसे ग्रॅहॅम व ट्रंपने.. एमी कोनी बॅरॅटच्या नेमणुकीने गेल्या आठवड्यातच करुन ठेवली आहे.

पण कोर्टकचेरी वगैरे भानगडी जर झाल्या नाहीत .. तर ज्या प्रमाणात आउट्स्टँडींग मेल इन व्होट्स बायडनला जात आहेत.. ते बघुन अस दिसतय की बहुतेक अगदी नॅरो मार्जिनने का होइना... पण पेनसिल्व्हॅनिया, जॉर्जिया व नॉर्थ कॅरोलायना... ही तिनही राज्ये बायडनच जिंकायच्या मार्गावर आहे.. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम!

नकाशा पाहिला तर लाल रंगाने व्यापलेला भाग खूपच जास्त वाटतो. या राज्यांत लोकसंख्येची घनता कमी आहे का? >>> हो. अगदी आत्ताचे उदाहरण घेतले तर फक्त कॅलिफोर्नियामधे ट्रम्प ला मिळालेली मते - जेथे तो बायडेन पेक्षा प्रचंड पिछाडीवर आहे- त्या मधल्या ८-९ राज्यांमधे - जेथे तो आघाडीवर आहे- त्याला मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त आहेत.
आयडाहो, वायोमिंग, युटाह, मॉण्टॅना, नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा, नेब्रास्का, कॅन्सास आणि ओक्लाहोमा यांची बेरीज साधारण ४ मिलीयन येते. ही सगळी राज्ये तो जिंकला आहे. एकट्या कॅलिफोर्नियामधे त्याला ४ व बायडेन ला ८ मिलीयन मते मिळाली आहेत.

पण विजेता उमेदवार ठरवताना या राज्यांमधली "इलेक्टोरल वोट्स" धरली जातात. ती या राज्यांची मिळून ४० आहेत. तर फक्त एकट्या कॅलिफोर्नियाची ५५.

डेमोक्रॅट्स च्या बाजूला जसे कॅलिफोर्निया (५५) आहे व दुसरे न्यू यॉर्क (२९), तसे रिपब्लिकन्स च्या बाजूला टेक्सास (३८) आणि फ्लोरिडा (२९) आहेत.

हे सगळं आता 'तिकडे त्या सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोरदेखील झालं असेल' मोडमध्ये गेलं आहे.

पण समजा.. बायडन जरी प्रेसिडेंट झाला.. तर डेमोक्रॅट्सनी अगदी हुरळुन जायला नको. कारण सेनेट चेंबर रिपब्लिकन्सच्या हाती आहे व ओबामाच्या शेवटच्या २ वर्षात... जो डेमोक्रॅट्ससाठी नाइट्मेअरीश काळ होता.. जेव्हा मॅकॉनलने संपुर्ण ग्रिडलॉक करुन ...डेमॉक्रॅट्सवर व ओबामावर पाचर मारुन ठेवली होती.. त्याचीच पुनरावृत्ती.. बायडन प्रेसिडेंट झाला तर बघायला मिळेल. मेकॉनल हार्ड बॉल खेळुन बायडनला एकही फेडरल जज नेमु देणार नाही. बायडन फक्त फारतर एक्झ्युक्युटिव्ह ऑर्डर्स काढु शकतो ज्याला काडीचीही किंमत नसते किंवा त्याद्वारे तो कुठलेही महत्वाचे लेजिस्लेशन करु शकत नाही.

म्हणजे एक ठोकळा प्रेसिडेंट म्हणुन तो पुढची ४ वर्षे राहु शकतो. त्या चार वर्षात मॅकॉनलच वॉशिंग्टनमधली सगळी सुत्र हलवु शकतो. व ६-३ कंझरव्हेटिव्ह सुप्रिम कोर्ट मेजॉरीटी असल्यामुळे ...रो विरुद्ध वेड व ओबामा केअर .. या दोन्ही गोष्टींचा निकाल लागु शकतो व त्याविरुद्ध.. डेमॉक्रॅटिक पार्टी.. त्यांचा प्रेसिडेंट असुनही.. काहीही करु शकणार नाही.

म्हणजे बायडनला नुसती नावाकरता प्रेसिडेंसी मिळणार आहे.

जॉर्जियातले कल इथे उत्तम प्रकारे, आलेखांत मांडले आहेत. (असंच विस्कॉन्सिन, टेक्सस, नॉर्थ कॅरोलायना आणि फ्लॉरिडाबाबतही):
https://www.nytimes.com/interactive/2020/11/04/us/elections/georgia-elec...

एकंदरीत एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असणार्‍या सुशिक्षित, बहुसंख्य श्वेतवर्णीय उपनगरी काऊंटीजनी ट्रम्पतात्यांकडे पाठ फिरवण्याचा २०१६ सालच्या निवडणुकीत दिसलेला आणि २०१८ साली अधोरेखित झालेला कल (काही अपवाद वगळता), यावर्षीही अधिक दृग्गोचर झालेला दिसतो आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/harris-and-joe-biden-wont-go-e...>>>>>> ट्रंप कसे आहेत, कसे वागतात या पेक्षा त्यांची भूमिका भारताला जवळची होती. अर्थात अमेरीकन्स सांगु शकतील याबाबत, कारण त्यांचा अनूभव प्रत्यक्ष. पण एक भारतीय म्हणून मला बायडेन यांची प्रो पाक भूमिका चिंताजनक वाटते.

>> हे सगळं आता 'तिकडे त्या सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोरदेखील झालं असेल' मोडमध्ये गेलं आहे.
अरेच्च्या :हाह::

लोकसत्तेतली बातमी वाचली. आता भारतीयांपैकी ज्यांनी ज्यांनी (दुर्दैवाने) अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले नसेल त्यांनी निषेधार्थ सरळ उठून भारतात परत जावे! पैशाच्या मागे न लागता देशासाठी स्वाभिमान दर्शवावा. आणि जे भारतात आहेत त्यांनीहि निषेधार्थ चांगला चार वर्षे काम बंद हरताळ पाळावा. कारण भारतीयांना स्वतःच्या देशापेक्षा जगाची काळजी अधिक. वास्तविक अमेरिकेत कोण निवडून येते याबद्दल भारत काय करणार आहे? काहीहि नाही. तसे तर भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी तरी काय करतात म्हण! पण काळजी विश्वाची!

>> तु काय प्रकाश टाकु शकतोस का की तुझ्या नेक ऑफ द वुड्समधे काय गौडबंगाल चाललय?<<
तोच इशु, जो बाकिच्या बॅटल्ग्राउंड स्टेट्सम्धे आहे. अ‍ॅब्सेंटी/मेलइन बॅलटस काउंटिंग. तीन्हि मेजर काउंटीज (फुल्टन, डिकॅब, ग्विनेट) मधे साधारण ५० हजार बॅलट्स आउटस्टँडिंग आहेत. आता त्यातुन पारडं बाय्डनकडे झुकलं कि आम्हि पण रिकाउंटच्या लाइनीत उभे... Wink

<<हे सगळं आता 'तिकडे त्या सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोरदेखील झालं असेल' मोडमध्ये गेलं आहे.>>
:हह:
आणि ट्रंप जिंकला नाही तर त्या पोराची मुंज होइस्तवर वाट बघावी लागेल.
<<अमेरिका सारख्या प्रगत देशात मत मोजणीला इतका वेळ ? इतकी रडारड ?>>
ही रडारड नव्हे, भांडा भांडी. वेळ लागतो तो त्याचे कारण अमेरिकन फुट्बॉल मधे जसे इंच इंच लढवू करतात तसे इथे मत मत चारदा तपासून पाहू, आपल्या विरुद्ध पक्षाला मत असेल तर थांबा, आम्हाला हे प्रकरण नेऊ द्या कोर्टात असे करत चालते.

अमेरिकेत कोव्हिड केसेस जास्त का दिसतात? टेस्टिंग जास्त होतं म्हणून! स्लो द टेस्टिंग!
बायडन जिंकण्याच्या मार्गावर का दिसतो? काउंटिंग जास्त होतं म्हणून! स्टॉप काउंटिंग!

Proud

२०१२ ते २०१६ अणि आता कोणकोणत्या राज्यांचे कल बदलले ते कुठे पाहता येईल? >> भरत ही साईट बघा. राज्यांचे कल कसे बदलत गेले ते लक्षात येईल. डेमोफ्राफिक्स बदलले तसे राज्यांच्या एलेक्टोरल सीट्सची संख्या बदलत गेली.

https://www.270towin.com/historical-presidential-elections/timeline/

आता दोन चार स्टेट्स पार्टीबदल घडवतात, पूर्वी म्हणजे ६० ते ८० च्या काळात पूर्ण देशच पार्टीबदल करत असे. रुझवेल्ट , जॉन्सन, निक्सन, रेगन ह्यांच्या काळातले रिझ्ल्ट्स बघितले तर... तुम्हाला भारतातले भारतातले २०१९ आठवेल Wink

Pages