Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जागतिक महासतेच्या,
जागतिक महासत्तेच्या, नवराष्ट्रपतींचे हार्दिक अभिनंदन!!!
वे टु गो प्रेसिडेंट बायडेन!!
CNN वरचं घोषणेनंतरचं कव्हरेज
CNN वरचं घोषणेनंतरचं कव्हरेज खूपच इमोशनल आहे.
अभिनंदन अमेरिकेच्या नवीन
अभिनंदन अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे! आता लवकरात लवकर अमेरिकेने पॅरीस करार पुन्हा स्विकारावा आणि पर्यावरण संरक्षणाला मदत करावी हीच अपेक्षा! His plan is not awesome but at least he has a plan!
ज्यो बायडन आणि सर्व अमेरिकन
ज्यो बायडन आणि सर्व अमेरिकन लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
(सुन टु बी) प्रेसिडेन्ट
(सुन टु बी) प्रेसिडेन्ट बायडेन ऑन ट्वीटर -
America, I’m honored that you have chosen me to lead our great country.
The work ahead of us will be hard, but I promise you this: I will be a President for all Americans — whether you voted for me or not.
I will keep the faith that you have placed in me.
भारताला त्यांचा फायदा होणार
भारताला त्यांचा फायदा होणार असेल तर त्यांचे अभिनंदन नसेल तर काही गरज नाही.
As a feminist I am sooooo
As a feminist I am sooooo happy to see first woman vice president!!!!
Vice President Kamala Harris!
First woman vice president.
First Person-of-color VP.
First Indian origin VP.
Also remembering RBG today...Wish she had been around to see this historic moment for women...
बायडेन आणि डेम्स सत्तेत
बायडेन आणि डेम्स सत्तेत निवडून येण्यापेक्षा एक 'माणुसकीवर धब्बा' असलेल्या व्यक्तीला सामान्य लोकांनी सर्वोच्य पदावरून पायऊतार केले हे महत्वाचे वाटते.
"बायडेन आणि डेम्स सत्तेत
"बायडेन आणि डेम्स सत्तेत निवडून येण्यापेक्षा एक 'माणुसकीवर धब्बा' असलेल्या व्यक्तीला सामान्य लोकांनी सर्वोच्य पदावरून पायऊतार केले हे महत्वाचे वाटते."
+1
बायडन यांचे अभिनंदन.
बायडन यांचे अभिनंदन.
शेवटी 'जो जीता वोही सिकंदर'. निवडणुकी दरम्यानचा टोकाचा विखार मागे टाकून आता दोन्ही बाजूच्या लोकांनी 'अमेरिकन' म्हणून एकत्र यावे ही प्रार्थना!
निवडणुकी दरम्यानचा टोकाचा
निवडणुकी दरम्यानचा टोकाचा विखार मागे टाकून आता दोन्ही बाजूच्या लोकांनी 'अमेरिकन' म्हणून एकत्र यावे ही प्रार्थना!>>> ही प्रार्थना ट्रंपला करा! त्याचं परवा रात्रीचं भाषण ऐकून हा मनुष्य प्रेसिंडेटपदा किती ना-लायक आहे हे पुन्हा सिद्ध झालं. यात कुठल्याही पक्षाचा संबंध नाही.
>>> ट्रंप व्यवस्थित अभ्यास
>>> ट्रंप व्यवस्थित अभ्यास करुन आल्याने त्याला....
--- अगागागा, ट्रम्पतात्यांचं अज्ञान डिबेट्स आणि मुलाखतींमध्ये वारंवार उघडं पडत असताना हा दावा हास्यास्पद आहे!
>>> आता मुद्दा राहिला रेसिझम्चा. तु ट्रंपचा एक व्यक्ती म्हणुन अभ्यास केलास, प्रेसिडेंट होण्यापुर्वि/होण्यानंतर, तर तो बाय्डन, क्लिंटन जितके रेसिस्ट आहेत तितकाच, कदाचित कमी रेसिस्ट वाटेल.
--- अहो, चक्क निक्सनच्या राजवटीत त्याच्यावर अँटि-ब्लॅक बायसचा ठपका ठेवण्यात आला होता. बाकी सेंट्रल पार्क फायची रेसिस्ट जाहिरात; अॅलिशिया मचाडोला 'मिस हाऊसकीपिंग' म्हणणं; मेक्सिकन पालकांच्या पोटी जन्माला आलेल्या अमेरिकन न्यायाधीशावर पक्षपाताचा आरोप करणं - ज्याला अगदी पॉल रायननेही 'टेक्स्टबुक डेफिनेशन ऑफ रेसिझम' म्हटलं आणि आधी ओबामा, आणि मग हॅरिस हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत; असं म्हणणं - हे सगळं काय आहे?
अजून दाखले इथे आहेत - https://www.vox.com/2016/7/25/12270880/donald-trump-racist-racism-histor...
तात्या म्हणतात 'आय अॅम द लीस्ट रेसिस्ट पर्सन इन द रूम' हा त्याचा माज आहे - स्पष्टवक्तेपणा नव्हे!
>>> त्याचा एक अवगुण (किंवा गुण) म्हणजे त्याचा स्पष्टवक्तेपणा. जो त्याच्यात अजुनहि आहे कारण तो करियर पोलिटिशियन नाहि, बिझनेस्मन आहे.
--- ही टेप आता जुनी झाली. नवीन काहीतरी शोधा. तात्यांचा खोटारडेपणा वेल-डॉक्युमेंटेड आहे. त्याला स्पष्टवक्तेपणाचं शर्करावगुंठन २०१६ मध्ये देता येत होतं - आता चार वर्षांच्या कारकीर्दीतली बेधडक खोटी विधानं, झोपेचं सोंग न घेतलेल्यांना जागं करायला पुरेशी आहेत.
कोव्हिडच्या अगदी सुरुवातींच्या दिवसांत '‘I didn’t do it,’ Trump says of disbanding pandemics office. I don't know anything about it. Administrations do it. We are doing a great job!" हा स्पष्टवक्तेपणा??? अमेरिकेसारख्या देशात मेडिकल प्रॅक्टिशनर्सना पीपीईचा तुटवडा पडावा हेच का बिझनेसमनचं प्लॅनिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचं स्किल? वडिलोपार्जित बिझनेसच्या जिवावर उड्या मारल्या की असं होतं म्हणे!
>>> नॉट बाय रिड्रॉइंग बाउंड्रीज, बट स्टफिंग इल्लिगल इमिग्रंट्स अँड गिविंग देम ए पाथ टु सिटिझनशिप...
--- सहमत आहे. फ्लॉरिडात हेच तर केलंय रिपब्लिकनांनी!
वरच्या प्रतिसादात ह्या
वरच्या प्रतिसादात ह्या व्हिडिओची लिंक द्यायची राहिली.
आमचे हे स्पष्टवक्ते बिझनेसमन पहा:
https://www.pbs.org/newshour/politics/watch-i-didnt-do-it-trump-says-of-...
आणि हे 'अभ्यासू' तात्या:
https://en.wikipedia.org/wiki/Hurricane_Dorian%E2%80%93Alabama_controver...
डेम्स आणि बायडेन पेक्षा आज
डेम्स आणि बायडेन पेक्षा आज जास्त आनंद पेन्सला झाला असेल, चार वर्षांच्या फुलटाईम आणि थँकलेस भाटगिरीच्या जॉब मधून सुटका झाल्याने.
नंदन, तुम्ही फारच स्पष्ट
नंदन, तुम्ही फारच स्पष्ट बोलता हो!
वैद्यबुवांच्या शब्दात सांगायचं तर 'त्यांच्या धोतरालाच हात घातला की वो' (त्यांच्या म्हणजे ट्रंपच्या). उगाच गैरसमज नकोत!
>>> चार वर्षांच्या फुलटाईम
>>> चार वर्षांच्या फुलटाईम आणि थँकलेस भाटगिरीच्या जॉब मधून सुटका झाल्याने.
--- हाहाहा, खरंय!
इतरही रिपब्लिकनांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. पण बाकी ब्रेनवॉश झालेले लोक बख्खळ आहेत ट्रम्पकल्टात!
एकेकाळी ह्या तथाकथित फॅमिली व्हॅल्युज, फिस्कली कन्झर्व्हेटिव्ह, पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी इत्यादींचे गोडवे गाणार्या रिपब्लिकनांनी ह्या वासनापीडित लिंगपिसाट कामांधाची; आपल्या रिइलेक्शनसाठी सरकारी तिजोरी मोकळ्या सोडणार्या आणि मार-आ-लागोची करदात्यांच्या पैशांतून भर करणार्या फ्री-स्पेंडरची आणि कुठल्याही बाबतीत जबाबदारी नाकारणार्या कांगावखोराची गेली चार वर्षं जी तळी उचलून धरली होती - ते पाहणं रोचक होतं.
'Far From Over': Trump
'Far From Over': Trump Refuses To Concede As AP, Others Call Election For Biden
नंदन, सहमत.
नंदन, सहमत.
कम्युनिस्ट कम्युनिस्ट बू !!!
म्हणलं तर आपलं भलं-वाईट विचार सोडून रिपब्लिकन कुठेपण पळत जातील, तो ट्रम्प क्या चीझ है.
>>>>> नॉट बाय रिड्रॉइंग
>>>>> नॉट बाय रिड्रॉइंग बाउंड्रीज, बट स्टफिंग इल्लिगल इमिग्रंट्स अँड गिविंग देम ए पाथ टु सिटिझनशिप...
--- सहमत आहे. फ्लॉरिडात हेच तर केलंय रिपब्लिकनांनी!<<
हाहा. सँक्च्युअरी सिटिज/स्टेट्स्मधे फ्लोरिडा आणलंत, यावरुन क्ल्पना आली तुमच्या अगाध झापड लावलेल्या दृष्टिची. असो. बाकि इतर मुद्द्यांबाबत तुमचा उफाळलेला उद्वेग समजु शकतो. चार वर्षं दाबुन ठेवलेलं फ्रस्ट्रेशन, मुखवटे, उन्माद बाहेर पडणार याचीहि क्ल्पना आहे. सुरुवात तर झालेलीच आहे, लिंगपिसाट/कामांध, धोतरात हात इ.च्या भाषेवरुन...
बाकि, तुम्हाला हे माहित असण्याची शक्यता नसल्याने इथे लिहितो. अमेरिकन प्रेसिडेंट इलेक्ट मिडिया डिक्लेर करत नाहि. ती एक प्रोसेस आहे ज्यातुन शेवटि काँग्रेस प्रेसिडेंट जाहिर करते. सद्य्परिस्थितीत बरेच इफ्स अँड बट्स असल्याने पुढचे आठवडे गंमतीचे असणार आहेत. शेवटि प्रक्रियेतुन जो प्रेसिडेंट इलेक्ट होइल तो माझाहि प्रेसिडेंट असेल. मतभेद असले तरीहि त्याला नाकारण्याचा कोतेपणा माझ्यात नाहि...
अभिनंदन जो बायडन आणि कमला
अभिनंदन जो बायडन आणि कमला हॅरिस !
चार वर्षे वाट पाहायला लावली पण आता ट्रम्पला फायनली अमेरिकन जनतेने म्हटले "You are fired "
"बायडेन आणि डेम्स सत्तेत
"बायडेन आणि डेम्स सत्तेत निवडून येण्यापेक्षा एक 'माणुसकीवर धब्बा' असलेल्या व्यक्तीला सामान्य लोकांनी सर्वोच्य पदावरून पायऊतार केले हे महत्वाचे वाटते."
अगदी अगदी +१११११
नेमकी उदाहरणं दिली की
नेमकी उदाहरणं दिली की ट्रम्पसमर्थकांची गोची होतेच. त्यामुळे गोलपोस्ट्स बदलण्याची निकड समजू शकतो :). चालू द्या. वेळ मिळाला की फ्लॉरिडात येणारे निर्वासित आणि अन्यत्र येणारे निर्वासित यांच्यासंबंधीच्या धोरणातल्या फरकाचा अभ्यास करा - म्हणजे जेरीमँडरिंग, ड्रीमर्स आणि अन्य इल्लिगल इमिग्रंट्स यांच्याबद्दल लिहिताना अशी गडबड होणार नाही.
>>> बाकि, तुम्हाला हे माहित असण्याची शक्यता नसल्याने इथे लिहितो.
--- धन्यवाद सर, फार मोलाची माहिती दिलीत! :). पण तिकडे तर तुमचे मर्यादापुरुषोत्तम आणि राजा हरिश्चंद्राचे आधुनिक अवतार "I WON THIS ELECTION, BY A LOT!" असं बोंबलून राह्यलेत. ह्याबद्दल काय सांगाल?
मतभेद असले तरीहि त्याला
मतभेद असले तरीहि त्याला नाकारण्याचा कोतेपणा माझ्यात नाहि... >>> असता तरी कोणाला काही फरक पडला नसता कारण तुम्ही नाकारून काही होत नाही. तुम्हाला माहिती असण्याची शक्यता नाही म्हणून लिहितो.
नंदन
नंदन
खरच सुटल्या सार्खं वाटतय. तो आणि त्याचे अत्यंत incompetent flunkies नी मिळून अक्षरशः वात आणला होता. He made a mockery of the power he was given. Thank goodness this democracy is very mature and he couldn’t really do whatever the heck he wanted. He almost thought he became king when he became president if you remember in the beginning how openly he would just ask people to do something just because he asked them to. He never really rose up to this phenomenal opportunity he was given. At the end, I was just praying he doesn’t stop blabbering because that’s exactly what drove his presidency to the end. His antics and plain disregard for equality and compassion is what got him the first election and the same exact thing took it away.
बायडेन, हॅरिस व येथील सर्व
बायडेन, हॅरिस व येथील सर्व समर्थकांचे अभिनंदन! मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी बायडेन मागे दिसला तेव्हा २०१६ चीच आवृत्ती होतेय का काय असे वाटले होते. पण बुधवार सकाळपासून विस्कॉन्सिन आणि मिशिगन फिरले आणि पुढचे तीन दिवस एकाच वेळेस एकदम ग्रिपिंग कव्हरेज होते पण त्याच बरोबर "आटपा आता" असेही फीलिंग यायचे
ट्रम्प स्वतः, त्याचे जवळचे भाट व इनेब्लर्स, त्याला मूकपणाने सपोर्ट करणारे, व रॉमनी सारखे त्याच्या विरूद्ध बोलणारे रिपब्लिकन्स. या सर्वांचे राजकीय भवितव्य इथून पुढे कसे आहे ते इण्टरेस्टिंग असेल.
बाकी कॉमेडी शो बरेच दिवस
बाकी कॉमेडी शो बरेच दिवस चालेल. रूडीबाबा म्हणतो नेटवर्क्स ठरवत नाहीत कोण प्रेसिडेण्ट होणार, कोर्ट ठरवते! हा लॉयर आहे ना? एका वाक्यात "टू मेनी जोक्स" सिच्युएशन आहे. एकतर कोर्ट्स ठरवत नाहीत, आवर्जून कोणी कोर्टात गेल्याशिवाय. दुसरे म्हणजे खुद तात्या २-३ दिवसांपूर्वी स्वतःच जिंकल्याचे घोषित करून मोकळा झाला होता त्याचे काय?
हळू हळू अमेरिकेचा भारत
हळू हळू अमेरिकेचा भारत,पाकिस्तान, बांगला देश होत आहे.
असे वाटत निवडणूक आणि त्याचे निकाल ह्या मध्ये सावळा गोंधळ चालु आहे हे बघून.
काही होणार नाही. ट्विटरवरचा
काही होणार नाही. ट्विटरवरचा सगळा आरडाओरडा आणि लॉ सुटच्या सगळ्या धमक्या पोकळ आहेत हे त्यात्याला सुद्धा माहिती आहे. त्याच्या कॅपेनला पैसा कमी पडतोय व लॉ सुटचा खर्च त्याला त्याच्या मुर्ख चाहत्यांकडून काढून घ्यायचाय. महणून फंड रेजींग करण्यासाठी हा सगळा कांगावा...
मला ग्रॅहॅम ह्या माण्साचा
मला ग्रॅहॅम ह्या माण्साचा नक्की काय गेम आहे ते उलगडलेलं नाही. तो म्हणतो The president stood by me and now I am going to stand by him. ट्रंपनी इतकं काही कँपेनिंग पण नाही केलं खास त्याच्याकरता. शेवटी तर असं वाचण्यात आलं की तो ट्रंप ला liability वाटायला लागला होता. त्यात ग्रॅहम चा स्वतःचा कन्जर्वेटिव बेस त्याच्यावर नाराज आहे. इतका कसा हा माणूस ट्रंप भक्त बनला मकेन गेल्यावर?
>>वेळ मिळाला की फ्लॉरिडात
>>वेळ मिळाला की फ्लॉरिडात येणारे निर्वासित आणि अन्यत्र येणारे निर्वासित यांच्यासंबंधीच्या धोरणातल्या फरकाचा अभ्यास करा - म्हणजे जेरीमँडरिंग, ड्रीमर्स आणि अन्य इल्लिगल इमिग्रंट्स यांच्याबद्दल लिहिताना अशी गडबड होणार नाही.<<
अरेच्च्या, फ्लोरिडात सँक्च्युअरी सिटिज (सेफ हेवन फॉर इल्लिगल इमिग्रंट्स, डाका) बॅन आहेत. डेम्सचं प्राबल्य असणार्या राज्यांत नाहि. ते का नाहि याचं कारण मी लिहिलंय वर. यावर तुमचा अभ्यास काय सांगतो हे लिहा; मग बोलु...
>>ह्याबद्दल काय सांगाल?<<
काय सांगणार, कप्पाळ? मी ट्रंपला लिटरली (बर्याचदा फिगरेटिवली सुद्धा) घेत नाहि. तुम्ही मात्र सिरियस्ली घेतांय, हे तुमच्या सगळ्या कामेंट्स वरुन दिसतंय...
>>असता तरी कोणाला काही फरक पडला नसता <<
अर्थात, फरक या आधिहि कधी पडला नाहि. पण मुद्दा तो नाहि, विवेक आणि सारासार बुद्धीचा आहे. तुम्हाला तो समजला नाहि यात काहिच आश्चर्य नाहि. ऑब्वियस्ली, यु हॅव लाँग वे अप टु ग्रो...
तर मंडळी, वरकरणी जरी बॅटल्ग्राउंड स्टेट्समधे मेलइन फ्रॉड झालेला आहे असा दावा ट्रंप कँपेनचा असला तरी ठोस पुराव्या सहित ते कोर्टात सिद्ध करणं आवश्यक आहे. दोन्हि कँपेनकडुन उलट-सुलट बातम्या येत आहेत, कंस्पिरसी थेअरीजचं पेव फुटतंय, लॉ सुट्स ऑलरेडि पाइपलाइन मधे आहेत. सो व्हॉट नेक्स्ट? ऑनेस्टली, आय डोंट नो. बट आय नो वन थिंग फॉर श्योर - इट एंट ओवर अंटिल द फॅट लेडी (५३८) सिंग्स...
Pages