Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>एच-१ बी वाले का कच्चे खाउ
>>>>एच-१ बी वाले का कच्चे खाउ शकतात? असे काय वेगळे कौशल्य आहे त्यांच्याकडे?>>>> माझ्या मते असुरक्षितता.
ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग
ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग प्रॉब्लेम आहे ना?
गेल्या वेळी अमेरिकेत आणि भारतात एकाच वेळी धमाके झाले होते >>> जिज्ञासा, माझा एक मित्र त्या दिवशी संध्याकाळी १५ तासाच्या मुंबई फ्लाइट मधे बसला रात्री ८ वाजता. तोपर्यंत इथले निकाल जस्ट येउ लागले होते. तो भारतात पोहोचला तेव्हा इथे ट्रम्प आला होता व तिकडे नोटाबंदी झाली होती
आय्ला ३० नविन प्रतिसाद! एकदम
आय्ला ३० नविन प्रतिसाद! एकदम निवडणुकिचा माहौल जणु, पण तीच अडकलेली टेप. असो. तर मंडळी, जे कोणि या बसमधे आत्ताच चढले आहेत त्यांनी कृपया सेकंड अमेंडमेंट, व्हाइट सुप्रमसी, प्रो लाइफ, इमिग्रेशन, हेल्थकेअर, चायना/रश्या/नॉर्थ कोरिया इ. विषयांवर ऑलरेडि झालेली याच धाग्यावरची चर्चा वाचावी. मत बदलणार नाहि, पण नविन माहिती कदाचित मिळेल...
बस मध्ये कवाच चढलो होतो ओ
बस मध्ये कवाच चढलो होतो ओ फक्त बस घेऊन ईथे येता नाही आलं.
>>>>ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग
>>>>ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग प्रॉब्लेम आहे ना? Happy>>> करेक्ट आणि मी मान्य करते त्या मतामध्ये, भर घालणारी, माझी काविळ-पीत दृष्टीही असेल. पण आपले पर्सेप्शन्स आपल्या अनुभवांतून व नीरीक्षणांतून बनत असतात. ओपन माईंड ठेवावे वगैरेही काही जण म्हणतील परंतु इतकेही ओपन असू नये की मेंदूच बाहेर पडेल.
रश्या फार महत्वाचा मुद्दा आहे
रश्या फार महत्वाचा मुद्दा आहे.
कढीपत्ता हा अविभाज्य घटक आहे की नाही?
माझा नवस ट्रम्प तात्यांसाठी. तात्या आले तर कॅनडाचे टेक ईंडस्ट्रीला थेट फायदा होणार असे गेल्या २ वर्षातले आकडे बोलतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
>>तात्या आले तर कॅनडाचे टेक
>>तात्या आले तर कॅनडाचे टेक ईंडस्ट्रीला थेट फायदा होणार <<
हो पण एक लक्षात घ्या. अमेरिकेच्या रश्यात कॅनडाचा रोल कडिपत्याचा आहे. वापर झाला कि फेकुन द्या...
>>>यावरून मला वाटतं की
>>>यावरून मला वाटतं की पाकिस्तान नाही तर एचवन बॅन, इमिग्रेशन हे मुद्दे त्यांना आकर्षक वाटले असावेत.>>> नाही सनव, एच १ बॅन हा मुद्दा आकर्षक वाटला नाही कारण माझाही लहान भाचा आहे, भाचरं आहेत, त्यांना या देशाची दारे उघडी रहावीच की. पण 'अमेरीका फर्स्ट' व आमचं पोट भरलं की मग अन्य लोकांना संधी - हा मुद्दा आवडला.
>>> तुम्ही अमेरीकन नागरीक
>>> तुम्ही अमेरीकन नागरीक आहात. अमेरीकेत रहात आहात. अमेरीकन हेल्थ सिस्टीमचे फायदे तुम्हाला मिळत आहेत. नोकरीही इथेच करता. इथे टॅक्स भरता. इथल्या बाकी सोयी सुविधांचा तुम्हाला फायदा मिळतो. तुमच्या पुढच्या पिढ्याही इथेच रहाणार आहेत. अमेरीकन सरकारी धोरणांचा त्यांच्या भविष्यावर बरा वाईट परीणाम होणार आहे. असं असताना इथे मतदान करताना उमेदवाराची 'भारताबाबतची धोरणं' तुमचं मत ठरवण्याबाबत कशी काय महत्वाची ठरू शकतात? गन कंट्रोल, राईट टू चूज, शिक्षण, हेल्थकेअर इत्यादी 'लोकल' विषय तुमच्यासाठी महत्वाचे नाहीत का?
<<
अगदी अमेरिकेच्या नागरिकाला अमेरिकेचे अमुक एका देशाशी संबंध चांगले असावेत असे मानण्याचा हक्क आहे. अमेरिका भारत संबंध हा मुद्दा किती महत्त्वाचा असावा हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. त्याकरता कुठलाही युनिवर्सल मापदंड नाही. डेमोक्रॅटिक पक्षात आज विचारवंत समजले जाणारे कोण आहेत? तर चांडाळ चौकडी. AOC, इल्हान ओमार, रशिदा तालिब आणि प्रेस्ली. जेव्हा एका इस्लामिक सत्तेचा बिगर इस्लामिक सत्तेशी मतभेद, संघर्ष होईल तेव्हा ही चांडाळ चौकडी इस्लामी लोकांच्या बाजूनेच उभी रहाणार असे संकेत दिसले आहेत, दिसत आहेत. फ्रान्स आणि अन्य युरोपिय देशात गेल्या काही दिवसात धर्मांध इस्लामी लोकांनी मोठ्या प्रमाणात, नृशंस हिंसा केली. पण डेमोक्रॅटिक मंडळींनी निषेध केल्याचे वाचले नाही. निदान ओबामा तरी नेहमीप्रमाणे "This has nothing to do with Islam" असे काही इस्लामी अपोलोजिस्ट ला शोभणारे काहीतरी म्हणेल असे वाटले होते. पण नाही. त्यामुळे बायडन जिंकला तर निव्वळ भारतासाठीच नाही तर जगासाठी ते वाईट ठरेल. जिहादी, इस्लामी लोकांची बाजू घेतल्याने काय उत्पात होतात ते अमेरिकेने ९/११ च्या निमित्ताने पाहिले आहे. पण डेमोक्रॅट ह्यातून काही शिकू इच्छित नाहीत.
>>>>ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग
>>>>ओके. मग तो सेल्फ-फिक्सिंग प्रॉब्लेम आहे ना? Happy>>> करेक्ट >>> त्यात तुम्हाला उद्देशून काही जजमेण्टल नव्हते सेल्फ फिक्सिंग म्हणजे इन्सिक्युरिटीमुळे जर एच-१ वाले जास्त काम करत असतील, तर त्यातून बाकीच्यांना इन्सिक्युरिटी निर्माण होउन ते ही जास्त करतील
जे लेनो चा एक कोट आहे - कॅडेव्हर्स मिळत नसल्याने डॉक्टरांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग कमी मिळते - व त्यातून कमी कौशल्याचे डॉक्टर्स तयार होतात अशी बातमी होती - त्यावर तो ही हेच म्हंटला होता, की हा सेल्फ-फिक्सिंग प्रॉब्लेम आहे
अशीच मुक्ताफळे आणि लेट नाईट
अशीच मुक्ताफळे आणि लेट नाईट कॉमेडीच्या भल्यासाठी ट्रंप यावा अशा मताचा मी आहे.
फा, डॉक्टरांसाठी सेल्फ फिक्सिंग महाडेंजर की पण!
गॉट इट फारेन्ड. मला कळले होते
गॉट इट फारेन्ड. मला कळले होते ते
शेण्डे, डेम्स च्या बोटचेपेपणा
शेण्डे, डेम्स च्या बोटचेपेपणा बद्दल मते असू शकतात. त्यात अनेक "वोक" लोक भरले आहेत यात शंकाच नाही. पण
अमेरिकेने ९/११ च्या निमित्ताने पाहिले आहे. पण डेमोक्रॅट ह्यातून काही शिकू इच्छित नाहीत. >>> यात तुम्हाला पहिले डेम्स आठवतात हे रोचक आहे. ज्या काड्यांमुळे तालिबान वगैरेंकडे इतकी शस्त्रे व ज्ञान आले त्या काड्या रेगन च्या काळातील, हल्ला बुश च्यकाळातील, आणि शिकायचे पहिले डेम्स नी?
एच-१ बी वाले का कच्चे खाउ
एच-१ बी वाले का कच्चे खाउ शकतात? असे काय वेगळे कौशल्य आहे त्यांच्याकडे? >>> त्यांच्याकडे व्हिसा बालाजी, झालंच तर ग्रीनकार्ड गणपती वगैरे देवतांचं पाठबळ आहे. ते एकदा मिळाले, की ते पाठबळ निघून जातं.
ग्रीनकार्ड गणपती
ग्रीनकार्ड गणपती
>>>
हा कोण नवीन?
विसा उर्फ चिलकूट बालाजी माहिती आहे
आपण बुवा बायडणला मत देऊन आलो.
आपण बुवा बायडणला मत देऊन आलो. कारण तो कॅन्सर क्युअर करणार , आणि इकॉनॉमी शट डाऊन न करता कोव्हिड शटडाऊन करणार म्हणतोय. आणखी काय हवं?
हा कोण नवीन? >>
हा कोण नवीन? >>
पुण्यात आहे असं ऐकून आहे. खखोदेजा. नसेल तर आपण सुरू करू. गावाला जागा बघ चांगलीशी. टूरिझम सुरू करायची संधी आहे.
माझ्या माहितीप्रमाणे फारसे
माझ्या माहितीप्रमाणे फारसे धार्मिक नसलेले दोन लोक देऊळ बांधायला निघाले आहेत. तात्या व मोदींचे यापेक्षा चांगले यश काय असणार?
मला शेंडेनक्षत्रांच्या
मला शेंडेनक्षत्रांच्या पोस्ट्स भयंकर आवडतात. म्हणजे त्यांची लिहिण्याची स्टाईल. आताही ते वर चांडाळ चौकडी वाचून हसायला आलं.
ते म्हैस मध्ये 'अहो, एस टी चालू असताना. जर म्हैस आडवी आली.' म्हणणारे मास्तर असतात तसा भास होतो.
(Compliment म्हणूनच लिहिलंय- गैरसमज नको. )
>>
>>
अमेरिकेने ९/११ च्या निमित्ताने पाहिले आहे. पण डेमोक्रॅट ह्यातून काही शिकू इच्छित नाहीत. >>> यात तुम्हाला पहिले डेम्स आठवतात हे रोचक आहे. ज्या काड्यांमुळे तालिबान वगैरेंकडे इतकी शस्त्रे व ज्ञान आले त्या काड्या रेगन च्या काळातील, हल्ला बुश च्यकाळातील, आणि शिकायचे पहिले डेम्स नी? Happy
<<
रेगन आज जिवंत नाही. त्याचा एक कुणी पुत्र आहे रॉन रेगन नामक, तो २०१६ च्या आधीपासून तारस्वरात ट्रंप विरोध व्यक्त करत आहे. तमाम बुश खानदान आज बायडनच्या कळपात सामील झाले आहे. बायडन, हिलरी, मॅकेन (जिवंत असतान आणि त्याचे तमाम वंशज, बायकापोरे इ.) हे सगळे युद्धखोर लोक आज ट्रंपचे कट्टर विरोधी आहेत. तेव्हा ट्रंप हा रिपब्लिकन असला तरी युद्धखोर नाही हे त्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. गेल्या चार वर्षात एकही नवे युद्ध नाही. त्यामुळे युद्धप्रेम आणि पक्ष ह्यांची समीकरणे आज पूर्ण वेगळी आहेत. अमुक एक पक्षाचा म्हणून आंतरराष्ट्रीय ढवळाढवळ करणारा असे बघणे फार ढोबळ आणि चुकीचे आहे. प्रत्यक्ष त्या व्यक्तीने अधिकारपद असताना कसे मतदान केले, काय निर्णय घेतले हे बघणे जास्त सयुक्तिक आहे.
पण याच लॉजिक ने तुम्ही हा पाठ
पण याच लॉजिक ने तुम्ही हा पाठ रिपब्लिकन्सनाच जास्त द्यायला हवा ना? डेम्स नी अशी काय युद्धे लादली आहेत गेल्या काही वर्षांत? ओबामाने तरी कोठे नवीन युद्ध केले आठ वर्षांत?
इथे युद्ध म्हणजे इराक वॉर-१, इराक वॉर-२, अफगाणिस्तान वगैरे. फुल स्केल इन्वेजन. बाकी मिलिटरी इन्व्हॉल्व्हमेण्ट च्या काड्या सदोदित सुरू असतात. त्या ट्रम्पकाळातही आहेतच. तात्यानेही काही जगातील सर्व अमेरिकन सैन्य परत बोलावलेले नाही.
रेगन डेमोक्रॅटिक, बुश
रेगन डेमोक्रॅटिक, बुश डेमोक्रॅटिक, मेकेन डेमोक्रॅटिक ... या स्पीडने आज रात्री पर्यंत ग्रॅहम पण डेमोक्रॅटिक होईल. शेंडे तुम्ही लिहित राहिलं पाहिजे.
रेगन डेमोक्रॅटिक, बुश
रेगन डेमोक्रॅटिक, बुश डेमोक्रॅटिक, मेकेन डेमोक्रॅटिक ... या स्पीडने आज रात्री पर्यंत ग्रॅहम पण डेमोक्रॅटिक होईल. शेंडे तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. >> हो आणि सगळे डेमोक्रॅट्स युद्धखोर म्हणून रिपब्लिकन्स होतील.
चार वर्षात अमेरिकेबाहेर वॉर झाले नाही म्हणून की काय, मागच्या काही दिवसात अमेरिकेतच सिविल का फिविल म्हणून कुठल्या तरी वॉर च्या बातम्या ऐकू येतायेत बुवा. त्याचे क्रेडिट कोणाला द्यायचे हे आताच ठरवून घ्या. पुन्हा मग ते झाल्यावर गोंधळ नको.
प्रॉपर जिंकले बायडन कि बाकी
प्रॉपर जिंकले बायडन कि बाकी बायडन सपोर्टरांना म्हणा घराच्या बाहेरच निघू नका. बाकी यड्यांना काय करायचाय तो नाच करा म्हणा. उगाच रस्त्यावर येउन कोणी जल्लोष वगैरे करायला लागलं तर राडा होणार. ३ दिवसात सगळं विसरून ट्रंप घुसून बसेल मारा लागोत, हे सगळे दीड्शाणे जातील परत नेह्मीचे धंदे करायला. नॉन दांडगे रिप्बलिकन शांतपणे स्विकारतील निर्णय.
नवर्याला काळ्या लोकांचा
नवर्याला काळ्या लोकांचा मुद्दा महत्वाचा वाटला त्याने बायडनला मत दिले.
नवर्याला काळ्या लोकांचा
.
"अहो, एस टी चालू असताना. जर
"अहो, एस टी चालू असताना. जर म्हैस आडवी आली.'"
एकदम लोल्स.
सामो तुम्ही प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत राहता का? मला थोडा वेळ मी सामोलाच मत देणार असं वाटलं :दिवे:
मग चहा घेतला आणि लक्षात आलं बाहेर तर पाऊस आहे आणि मतदान केव्हाच आटपलं आहे (नॉन स्विंग स्टेटमध्ये) आपण आपलं काम करत बसावं. फॉल मध्ये जमा झालेला (खरा) कचरा साफ करणे ई.
:चहा ह वा चः
वैद्यबुवा? अरे वा : ). ...
वैद्यबुवा? अरे वा
हायझेनबर्ग...
राज... अरे जॉन डेलीने सुद्धा ट्रंपला सपोर्ट दाखवला आहे. पण तुझे जॉर्जिया इज इन प्ले फॉर बायडन? आणी जॉर्जियाचे दोन्ही रिपब्लिकन सेनेटर्स आर इन टॉस अप कॅटॅगरी? तुझे कँपेनींग कमी पडत आहे तिथे...
शेंडेनक्षत्र... तुमच्याइतके कट्टर ट्रंप समर्थक बहुतेक डाउन बॅलट व्होटींग करत नसावेत....कारण तुम्हाला ट्रॅडिशनल रिपब्लिकन प्लॅटफॉर्म आवडत नाही असे तुमच्या वरच्या काही पोस्टींग्समधुन दिसुन येते. पुर्वीच्या सगळ्या निवडणुकीत तुम्ही बहुतेक रेगन, दोन्ही बुश ,मॅकेन व रॉमनीला मत दिले नसावे असा अंदाज तुमच्या वरच्या काही पोस्टींगमधुन मी काढला आहे. तुम्ही वॉरमाँगर विचारसरणीचे नाहीत हे तुमच्या वरच्या काही पोस्टींगवरुन दिसुन येते.
बिनडोक असल्यासारखे.. आपले डोके न वापरता .. अतिशय थिल्लर कारणांसाठी..डाउन बॅलेट व्होटींग करणे मलाही आवडत नाही.पण असे डाउन बॅलेट व्होटींग न करणारे मतदार फारसे नसतात पण जे असतात त्यामुळेच बहुतेक वेळा अमेरिकन गव्हर्मेंट डिव्हायडेड असते. कारण एकाच पक्षाकडे सगळी सुत्र आली तर त्या पक्षावर कोणाचाच अंकुश राहणार नाही असा सारासार विचार खुपसे मॉडरेट्स.. (दोन्ही पक्षातले) करतात. मी तर बॅलेटवरचे सगळे जजेस कोण आहेत त्याचाही बारकाइने अभ्यास करतो.. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघतो .. मगच मतदानाला जातो.
पाच वाजले आहेत... अजुन सगळीकडे स्मशान शांतता आहे.. ही वादळापुर्वीची शांतता आहे की अमेरिका इज गोइंग टु डॉज द बुलेट? पण सगळ्या मेजर सिटीमधे .. सगळी दुकाने बोर्डेड होउन दंगली, लुटालुटीला सामोरी जायला तयार आहेत.
>>सगळी दुकाने बोर्डेड होउन
>>सगळी दुकाने बोर्डेड होउन दंगली, लुटालुटीला सामोरी जायला तयार आहेत.<<
असं काहि होणार नाहि रे बाबा, म्हणजे तुरळक, फुटकळ इंसिडंस होतील पण ते हल्ली शांतीच्या मोर्च्यात हि होतात.
जॉर्ज्या मधे शर्यत टाइट आहे, एखाद-दुसरी सेनेटची सीट कदाचित डेम्सकडे जाईल पण ओवरॉल इट वुड स्टे रेड...
>>तुझे कँपेनींग कमी पडत आहे तिथे<<
अरे मी, ट्रंप/पेन्सची यार्ड साइन लावली होती. वँडलाय्ज केली गेली. लोकल पुलिसला मी कॅमेराचं फुटेज दिलं आहे, बघुया पुढे काय होतं. आता मी ऑफिशियली डेम्सच्या रेडारवर आहे...
आय अग्री. मला नाही वाटत यादवी
आय अग्री. मला नाही वाटत यादवी वगैरे माजेल. ट्रंप आला निवडून तर थोडी शक्यता आहे कारण दुसर्या बाजूची लोकं तापतील. It’s all about confrontation. With police killings there’s a reason to come to the streets and protest. Trump supporters are not going to stage a protest because he lost.
Pages