Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती राधिका मी यव करीन ,तव
ती राधिका मी यव करीन ,तव करीन. मी माझा नवरा परत मिळवीन, स्वतःच्या पायावर उभी राहीन वै वै बोलत राहते, पण करत मात्र काही नाही. फक्त रडत बसलीये.
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी एकाच टोनमध्ये बोलतो..
त्याचे शनायावर खरच प्रेम आहे
त्याचे शनायावर खरच प्रेम आहे असे वाटते (छान अभिनय). शनाया दुष्ट वाटण्यापेक्षा बेअक्कल आणी लॉस्ट वाटते. राधिका हल्ली खरच बावळट वाटते. काय ते बालिश उपाय करते. धन्य!
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी एकाच टोनमध्ये बोलतो.. >>>
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी एकाच टोनमध्ये बोलतो.. >>> कारण दोघेही बच्चा आहेत
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी एकाच टोनमध्ये बोलतो.. >>> तिहि बच्चा आहे न मोठा
राधिका खरच बावळट वाटते. आणि
राधिका खरच बावळट वाटते. आणि बिन्डोक सुद्धा. मुलगा हरवण्याचा भाग थोडा पाहिला. तिचा अभिनय सुद्धा नाही आवडला.
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी
गुरुनाथ शनाया आणि अथर्वशी एकाच टोनमध्ये बोलतो..>> कारण ती खरंच बच्चा च आहे. अजिबात म्यॅच्युअर्ड नाहीये . राधिका पण काय तरी उपद्व्याप करत असते. दार काय लावणे आणि काय काय. येडे पण नुसता. ती आत्ता या सगळ्यातून सावरून नोकरीकरिता प्रयत्न करतेय असं दाखवलं पाहिजे . त्याकरता ती स्मार्ट राहायला शिकते ( कारण गुरुनाथाला ती काकू बाई आवडत नाही ना म्हणून ) असं काहीतरी दाखवायला पाहिजे
आणि राधिका माई आणि नानांच्या घरी का राहत असते ? तो भाग पहिलाच नाही .
तिचा भाऊ बायकोच्या सांगण्यावरून राधिकाला त्याच्या स्वतःच्या घरी ठेऊन घेत नाही का ?
तो अथर्व नागपूरच्या आजी- आजोबांकडे असतो असं कधीतरी डायलॉग मधून ऐकलंय.
तो पण थोडे दिवसांकरताच आजी आजोबांकडे होता का ?
आणि राधिका माई आणि नानांच्या
आणि राधिका माई आणि नानांच्या घरी का राहत असते ? तो भाग पहिलाच नाही .>>> हां , मलाही हाच प्रश्न पडलाय कधीपासून .
केवळ गुरु आणि शन्या वर नजर ठेवायला का?
नाना-नानीकडे राहून समिधाची बोलणी ऐकण्यापेक्शा रेवतीकडे का जातं नाही ?
रेवती एकटीच रहाते ना , लेकीला घेउन ?
राधिका भावाकडून स्वतःच निघून
राधिका भावाकडून स्वतःच निघून जाते बहुतेक वहिनीचे टोमणे असह्य होऊन. गॅरीला ऑफिसात डबा घेऊन जाते.. गॅरी तिला ओफिसच्या खाली भेटून वाट्टेल तसं बोलतो.. मग तिथेच तिला शनाया भेटते.. मग तिचा सनसनाटी पाठलाग करते.. शनाया पळून जाते.. राधिका चक्कर येऊन पडते.. तिथे प्रज्ञा भेटते.. ती राधिकाला घरी घेऊन येते.. मग त्या एका गृहउद्योग केंद्राच्या संचालिकेला भेटतात.. तिथे राधिकाला सुपरवायजरची नोकरी मिळते.. (आता ती नोकरीवर जाते का?? ) मग ती बकुळामावशीकडेच राहायचं ठरवते.. तेवढयात शनाया गॅरीकडे राहायला आल्याचं सगळ्यांना कळतं.. मग तिला घराबाहेर काढायला राधिका तिकडे जाते.. शनायाला घराबाहेर काढायच असेल तर बकुळाकडे राहून चालणार नाही त्यांच्या जवळच राहायला पाहिजे असं सर्वांच एकमत होतं.. रेवती तिला आपल्याकडे घेऊन जात असते.. पण नाना तिला स्वतःकडे ठेऊन घेतात.. समिधा आणि नानांच भांडण होतं.. पण घर नानांच असल्याने समिधाला गप्प बसावं लागतं. त्यांच्यात भांडण नको म्हणून राधिका दुसरीकडे जात असते पण नेमकं नानांच्या छातीत दुखु लागल्याने ती तिथेच राहायचा पर्याय स्वीकारते.
नवर्याने दुसरी बाई घरात आणुन
नवर्याने दुसरी बाई घरात आणुन ठेवलीये. तिच्याच बेडरुमात हा त्या दुसर्या बाई बरोबर झोपतो आणि ही सती पतिव्रता त्या घरी जाउन साफसफाई करते? का? त्या दोघांना जरा छान फिल यावा म्हणुन का? माझा संसार माझा संसार रडत बसते? अकलेचे दिवाळे.
ती राधिका मी यव करीन ,तव
ती राधिका मी यव करीन ,तव करीन. मी माझा नवरा परत मिळवीन, स्वतःच्या पायावर उभी राहीन वै वै बोलत राहते, पण करत मात्र काही नाही. फक्त रडत बसलीये.>>>
नक्की काय यंव तंव करावे ते लेखक आणि दिग्दर्शक ह्या दोघाना आकळत नसावे तोवर असे बालीश प्रकार आणि रडणे सुरु ठेवतील तशीही मालिका संपवायची घाई कुठेय? अजुनी ५-२५ भाग तरी ह्या प्रकारात घालवायला हवेत ना!
तुम्हाला ह्यावर टिका टिपण्या करण्याला कंटाळा नाही येत तेंव्हा ते लांबविणारच ना!
तुम्हाला ह्यावर टिका टिपण्या
तुम्हाला ह्यावर टिका टिपण्या करण्याला कंटाळा नाही येत तेंव्हा ते लांबविणारच ना! >> हो ना
सगळ्या साळकाया माळकायांचा विरंगुळा आहे मालिका म्हणजे . सगळं फ्रस्ट्रेशन काढायला
एकदा दिवसभरात या मालिकांच्या धाग्यावर येऊन टिप्पणी केली कि हा सुटले .
आता कस वाटत. गार गार वाटत
>>>नवर्याने दुसरी बाई घरात
>>>नवर्याने दुसरी बाई घरात आणुन ठेवलीये. तिच्याच बेडरुमात हा त्या दुसर्या बाई बरोबर झोपतो आणि ही सती पतिव्रता त्या घरी जाउन साफसफाई करते? का? त्या दोघांना जरा छान फिल यावा म्हणुन का? माझा संसार माझा संसार रडत बसते? अकलेचे दिवाळे.----------
अगदी सहमत.
सस्मित +1. तेव्हापासून मी
सस्मित +1. तेव्हापासून मी बघायचीच सोडली.
याचा लेखकु कोण आहे??????
कृष्णा, एकतर ज्येना बघतात म्हणून या मालिका आम्हाला पण बघाव्या लागतात. त्यात इतका बिनडोकपणा दाखवतात की तो शांतपणे सहन करणे म्हणजे तुम्ही स्वतः बिनडोक असण्याचा पुरावा मानला पाहिजे. कैच्याकै दाखवतात.
नवर्याने दुसरी बाई घरात आणुन
नवर्याने दुसरी बाई घरात आणुन ठेवलीये. तिच्याच बेडरुमात हा त्या दुसर्या बाई बरोबर झोपतो आणि ही सती पतिव्रता त्या घरी जाउन साफसफाई करते? का? त्या दोघांना जरा छान फिल यावा म्हणुन का? माझा संसार माझा संसार रडत बसते? अकलेचे दिवाळे
>>>तुने मेरे उंगलियोंकि बात छिन ली.
बाकी मला नेहमी एका गोष्टीची गम्मत वाटते की संसार काय एकट्या बायकोचा असतोय का? सारख आपलं माझा संसार. त्या गॅरीने तर त्याच घरात दुसर्या बाई बरोबर संसार थाटलाय. ही बया त्याच्या ढुं वर लाथ मारुन त्याला घरातुन हाकलुन द्यायच सोडुन स्वतः बाहेर पडलिये आणि तिथेही कुणी कृष्ण हिला भेटेल याची वाट बघत बसलिये.
आर या पार का नाही करत हे लोक्स. कुणी कितीही प्रेमात असल तरी स्वाभिमान नावाची कै गोष्ट असतिये का नाही?? सारख काय लोचटासारख मागे मागे करतेय त्याच्या.
सारख काय लोचटासारख मागे मागे
सारख काय लोचटासारख मागे मागे करतेय त्याच्या>>>पण बायका असे करतात, मी पाहिलेय. त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेले असते की नवरा हेच सर्वस्व
कुणी कितीही प्रेमात असल तरी
कुणी कितीही प्रेमात असल तरी स्वाभिमान नावाची कै गोष्ट असतिये का नाही?? सारख काय लोचटासारख मागे मागे करतेय त्याच्या.
>> यस्स्स शुभांगी. मेरे मनकी बात.
बादवे, गुरु डिव्होर्स साठी
बादवे, गुरु डिव्होर्स साठी काहिच हातपाय हलवताना दिसत नाहि. शनायाही मागे लागत नाही का? सगळेच टेंपररी फेज असल्यासारखे निर्धास्त आहेत. लेखकाला काही सुचत नाही वाटते लिहायला , पाचक़ळ बालिश प्रसंग सोडुन.
आता कदाचित डिवोर्स फेज ओपन
आता कदाचित डिवोर्स फेज ओपन होईल. पन राधिकाच्या बाजूने. प्रोमोमधे शाळा राधिकाला रु. ५०००० अथर्वच्या फीचे मागते. तेव्हा नानाजी, गुप्ते वगैरे नक्कीच सल्ला देणार. तिला नको आहे , पण पैसे मिळवण्याचा तोच कायदेशीर मार्ग आहे.
बादवे, गुरु डिव्होर्स साठी
बादवे, गुरु डिव्होर्स साठी काहिच हातपाय हलवताना दिसत नाहि. शनायाही मागे लागत नाही का?
>>ती शनायाच मागे नाही का म्हणाली की माझे खर्च निघताहेत, मजा करता येते फुकटात, तिची सो कॉल्ड हाय स्टँडर्ड लाईफ स्टाईल मेंटेन होतेय गॅरीकडुन तोपर्यंत ती त्याच्याबरोबर राहणार नंतर त्याला डिच करुन दुसरा कुणीतरी पकडणार.
मागे एकदा कुठेतरी इंतरव्ह्युला गेलेली तिथे त्या बॉसच्या अंगचटीला आल्याने त्याने हाकलुन दिले होते तिला.
असो पण शनाया चे कॅरॅक्टर फारच बालिश दाखवताहेत. तिला नक्की व्हिलन, दोघात तिसरी की बावळट्ट दाखवावे ह्या प्रश्नाचे उत्तर त्या लेखकाला मिळाले नाहिये किंवा कदाचित त्याला तो प्रश्नच पडलेला नाहिये अजुन
बाकी शनायाच नाही तर सगळेच गंडलेत. कालचा दारात जाऊन वास घेण्याचा प्रसंग तर बकवास वाटला मला.
बाकी शनायाच नाही तर सगळेच
बाकी शनायाच नाही तर सगळेच गंडलेत. कालचा दारात जाऊन वास घेण्याचा प्रसंग तर बकवास वाटला मला. >> +१०००००००००००.
सगळेचं पाट्या टाकत आहेत.
अथर्व येणार म्हणून सगळे खाली उभे असतात तेव्हा, नॉर्मली ज्या दिशेने कोणी येणार आहे - तो पण हरवलेला मुलगा - त्या दिशेला न बघता, राधिका विरूद्ध दिशेला बघत होती. त्याची हाक ऐकून नाट्यमय रित्या मान वळवून बघायला
आता मुलगा जिथे आहे तिथे जायचं का सोसायटीत अगदी आत पर्यंत येउन उभं रहायचं ? कोणीही मुलगा जिथे आहे तिथेचं गेलं असतं खरतरं.
आता मुलगा जिथे आहे तिथे जायचं
आता मुलगा जिथे आहे तिथे जायचं का सोसायटीत अगदी आत पर्यंत येउन उभं रहायचं ? कोणीही मुलगा जिथे आहे तिथेचं गेलं असतं खरतरं.>>> अगदी अगदी नॉर्मल माणसाची रिअॅक्शन अशीच असते की एकदा कळल की हरवलेली व्यक्ती/वस्तू कुठे सापडलिये तर आधी तो तिथे धावत जाईल. अस तुम्हीच त्याला घेऊन इकडे या अस म्हणणार नाही असो भावनाशुन्यता दुसर काय
अवो पण ती नॉर्मल माणसाची
अवो पण ती नॉर्मल माणसाची रिअॅक्शन असती असं तुम्हीच म्हणताय ना तै
राधिकाच डोक्यात जातेय आता.
राधिकाच डोक्यात जातेय आता.
सस्मित >>
सस्मित >>
राधिकाच डोक्यात जातेय आता.
राधिकाच डोक्यात जातेय आता. >>> अगदी अगदी.
गुरुच मूळात चुकला आहे हे कोणीतरी तिच्या डोक्यात भरवणे गरजेचे आहे. एका शन्याला हाकलून लावले तर हा दुसरीच्या मागे लागेल हे ती लक्षातच घेत नाहीये.
गुरुच मूळात चुकला आहे हे
गुरुच मूळात चुकला आहे हे कोणीतरी तिच्या डोक्यात भरवणे गरजेचे आहे. एका शन्याला हाकलून लावले तर हा दुसरीच्या मागे लागेल हे ती लक्षातच घेत नाहीये.>>>
प्रॉब्लेम सगळा त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा आणि लेखकाचा आहे बिचार्या राधिकाचा काय दोष? दिग्दर्शक म्हणाला तू आई असलीस तरी हरवलेला मुलगा सापडला आहे तिथे आणायला जाऊ नकोस कारण कथेत तसे लिहलेले नाही!
बिच्चारा गुरु बिच्चारी राधिका आणि बिच्चारी शनाया किती शिव्याशाप खातात मायबाप मायबोलीकर प्रेक्षकांचे!
राधिकाच डोक्यात जातेय आता.
राधिकाच डोक्यात जातेय आता. >>> हो ते मुख्य कॅरॅक्टरच फार चुकीचं लिहिलं आहे. अगदी डोक्यात जातं. बर्याच प्रसंगांमधे वाटतं कि ही अशी आहे म्हणुनच गुरु दुसर्या मुलीमधे अडकला असणार.
शनाया बावळट आणि स्वार्थी आणि गुरु पण डोक्याने मंद, शेजारी अति भोचक आणि दुसर्याच्या पर्सनल मामल्यांमधे फार नाक खुपसणारे, ते सासु सासरे एकदा रडारड करुन गायब, एकुण काय सगळीच कॅरॅक्टर्स गंडली आहेत.
नवरा-बायको, गलफ्रेंड आणि तिचा प्रेमी, शेजारी, नोकर ( सिक्युरिटी, मेड, प्युन), गुरुचे कलिग्ज, त्याचे शेजारी... कोणीही नॉर्मल आयुष्यात वागतील तसे वागत नाहीत. सगळे जण जाम दुसर्याच्या आयुष्यात इंटरेस्ट असणारे आणि अजुन ढ्वळाढवळ करणारे आहेत. या मालिकेचा लेखक जाम भंजाळला आहे.
राधिकाला दोनच साड्या, रेवतीला
राधिकाला दोनच साड्या, रेवतीला दोनच ड्रेस्, गुप्तेंना दोनच शर्ट, नानांना एकच स्ट्राईप्सचा टीशर्ट. स्वयंपाक करत असो, बाहेर जायचे असो, झोपायचे असो, एकच कपडयांचा जोड दिवसभर - झी कडे एवढे पैसे असताना हा कंजुसपणा कशाला? पात्रांना त्यांच्या घरुन कपडे आणायला का नाही सांगत?
शनायाला भारंभार कपडे आहेत (बहुतेक ती स्वतःचे आणत असावी).
Pages