माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसिका सुनील धबडगावकर -शनाया
अनिता दाते - राधिका

स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
धाग्यातील हे मुख्य कलाकार बदलणार का?

एलदुगो मधली घनाची आइ >>> हो. मला पण आठवली होती.

सचिन, मला माझी सासु आवडते कारण माझी सासु खुप चांगली चांगली गोड गोड वागणारी, सोशिक, येता जाता अश्रु ढाळणारी, मी जरा काही वेगळं केलं की 'अग्ग बाई आत्ता?' करुन तोंडाला पदर लावणारी नाहीये. बरीच स्ट्राँग आणि खमकी Wink आहे. वेळेस दोन शब्द सुनावते पण आणि माझे दोन शब्द ऐकुन पण घेते. Happy स्वतःची स्पेस, काय ते व्यक्तीस्वातंत्र का काय ते, जपताना सुनेलाही काही स्पेस असावी/असणारच ह्याची जाणीव असते. बस और क्या चाहिये लाइफ मे. एकुणात ज्या बाईचा मुलगा मी माझा केलाय ती ह्याहुन चांगले म्हणजे किती वागणार ना. Wink Happy

एकुणात ज्या बाईचा मुलगा मी माझा केलाय ती ह्याहुन चांगले म्हणजे किती वागणार ना
>>>
स्मिता Rofl

पुडाच्या वड्यांच काय झाल म्हणे?

मी याचे काही भाग पाहिले Uhoh
एक प्रसंग होता त्यात शन्या काहीतरी नवी खरेदी करते कपडे आणि ती शेजारीण इशा तिला भेटते. अगदी नविन ओळख असूनही दोघी जन्मजन्मांतरीच्या मैत्रिणी असल्यासारखं मिठ्या काय मारतात आणि शेल्फी पण काढतात. Uhoh
आजकालची मैत्री अशीच सुपरफिशियल वाटते म्हणा मला. फेबु वर तर असे फोटो सर्रास दिसतात. न जाणो त्या मैत्रीची खोली किती असते Sad

आजकालची मैत्री अशीच सुपरफिशियल वाटते म्हणा मला. फेबु वर तर असे फोटो सर्रास दिसतात. न जाणो त्या मैत्रीची खोली किती असते >>>>>>> +१

असूनही दोघी जन्मजन्मांतरीच्या मैत्रिणी असल्यासारखं मिठ्या काय मारतात आणि शेल्फी पण काढतात >>> शनाया ला तशीही सारखी सेल्फी काढायची सवय असते.

नवीन सिरियल्समध्ये एकतरी सेल्फी काढणारं पात्र दाखवतात, ट्रेंड आहे बहुतेक अर्थात तसं आहेच म्हणा सध्या.

झी युवा फ्रेशर्समध्ये एक आहे तशी आणि लव लग्न लोचा मध्ये पण सतत सेल्फी काढणारी.

त्या माईंनी कधी डबा बदलला म्हणे>> गॅरीला ते सोसायटीचे सेक्रेटरी गाडीतून उतरून समोर उभं राहून बोलायला बोलावतात तेव्हा. गॅरी गाडीच दार न लावताच त्यांच्याशी बोलायला येतो. Happy

आणि ती राधिका ऑफिस मध्ये वड्या घेऊन ? धन्य आहे >> ती या आधीही ऑफिसमध्ये सगळ्यांसाठी खायला घेऊन जाताना दाखवलीय. आणि त्या लोकांना ते आवडतंही.

ऑफीसमधल्या निदान ५-६ माणसांना इतक्याचं वड्या >> हो ना! पाचच वड्या होत्या. मी मोजल्या की. Wink

पाचच वड्या होत्या>>>>>>>>>> नैतर काय. काय तो एवढासा डबा नेते ऑफिसात एवढं खपुन. आणि सरळ मिटींग रूम मधे.

आणि कपूर साहेब म्हणत होते , मेरे लिये फेअरवेल प्लॅन किया है !
हे ,पाच लोकाना घेउन , फेअरवेल ??

तो राधिका , शनायाला घराबाहेर अडकवते तो एपिसोड पाहिला .
त्यानंतर नानीजी आणि राधिका यांच बोलण म्हणजे केवळ बाषकळपणा होता .
नानीजींकडून ही अपेक्शा नव्हती .

शनायासुद्दा शेजारणी कडून डबा घ्यायला लागली (ईशाने पाठवलेला डबा) आता गुरु तिलाही ओरडणार, चाळीतल्यान्सारखे वागते म्हणून. Lol

ती राधिका आपण नवर्याचा अपंमान केला म्हणून रडत बसलीये. त्याने तिचा एवढा मोठा अपमान केलाय तिचा श नायाला ठेवून त्याचे काय? तो श्रेयस पण तसलाच. जरा म्हणून दोघान्ना स्वाभिमान नाही.

गॅरीला ते सोसायटीचे सेक्रेटरी गाडीतून उतरून समोर उभं राहून बोलायला बोलावतात तेव्हा. >>> ते सेक्रेटरी शनायाबद्दल चीप हावभाव करुन, तिच्याबद्दल चीप बोलतात गुरुशी ते मात्र खटकल.

अच्छा, ते रशियन सॅलड होतं का? मला नूडल्स वाटलेले....कारण ती आली तेव्हा मी आत होते ...
आणी ती ईशा शन्या ला चांगलं लुटणार आता...फआईव्ह स्टारपात्र्लर मधे नेऊन वगैरे...
बाय द वे, कपूर साहेबांचा अभिनय एकदम मस्त होता...कुणी कदाचित नोटीस नसेल केलं पण ते एकदम नॅचरल कपूर साब शोभत होते!

कालचा माझा आणि सौ चा सन्वाद...

मी : ती शनया कसली मस्त दिसते ना...!!! आणि राधिका एकदम काकु वाटते..
सौ : हो का...बर..शनया ला २ मुल होउ दे आणि घरातील सगळी काम/ मुल /स्वयपाक करु दे ...मग बघ कशी दिसते... Happy
मी : ते कही असो मला शनया आवडते..!! Lol

शनाया कुठं मस्त दिसते! बंडल दिसते एकदम. चपटी.
आणि तो अथर्व असं काय बोलतो.....एकदम वेगळ्याच टोन मधे...असं कुणीच लहान मूल बोलताना मी नाही पाहीलेलं.

ती शनाया आहे.. जे काय आठवलं ते प्ले केलं. Happy

मला पण शनाया नेहमीच दिसायला आवडत नाही.. कधीतरी छान दिसते. पण तिचं बोलणं जाम इरिटेट करतं. किरकिर करत असते सतत. कजाग वाटते बोलायला लागली की. Wink

आणि हिला टॉवेल ला लावलेलं काजळ दिसलं नाही...? काहीही!
काही च्या काहीच डोकं चालतं बुआ लेखकांचं झी च्या!

आणि राधिका ला काय गरज घरात जाऊन साफ सफाई करायची..? घर म्हणजे सोफा, गॅस, भांडीकूंडी, टीव्ही...की नवर्‍याचं मन? जे आपलं नाही...!!

आंबट गोड >> अगदी अगदी

मराठी लोक भुताला पळवायला रामरक्षा म्हणतील. हनुमान चालिसा कुठुन आली अ ओ, आता काय करायचं >>> कोण जाणे भुत ऊत्तरभारतीय असेल तर कदाचीत रामरक्षा नाही समजली तर

अरे धन्य चाललंय सर्व Lol . हे वाचून मी अजूनही बघायचं डेरिंग करत नाहीये. मला राधिका काय खेळी खेळतेय ते बघायचंय. पण मागे दार बंद झालं तो बालिशपणा बघून पुढे डेरिंग नाही होत. काही ट्रिकी बघायला मिळेल का? याची शाश्वती नाही.

काही ट्रिकी नाही. काल राधाक्का घरी जाउन साफसफाई करौन / झाडांना पाणी वैगेरे घालुन आल्या. सोबतीला रेवती. आणि मग निघताना पुन्हा एक बालिशपणा केला.

Pages