Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किबुहना हे ट्रान्झिशन इतक
किबुहना हे ट्रान्झिशन इतक झटक्यात दाखवलय की ते अजुनच खोट वाटत. >>> ट्रान्झिशन नाहीच दाखवले. शिरेल सुरु झाली तेव्हापासुनच गुरु शनायाच्या प्रेमात आहे.
मला तर त्या शनाया अन गॅरी
मला तर त्या शनाया अन गॅरी बाबा पेक्षा राधिकाचा च जास्त राग येतो..... कशाला च एवढा अपमान सहन करायचा? दोन दोन दोघां च्या थोबाडित द्यायच्या फ्लॅट मध्ये मस्त मुलाला घेउन राहायचे तर मला नको फ्लबावःबावळट.... आणि त्या नाना ,नानि कडे राह्ते .... आपली त्या समिधा का कोण तिचे टोमणे खात... मस्त दुसरि कडे रहयचे काहितरी मोठी बिझनेस वुमन होउन त्या गॅरि च्या नाकावर टिच्चुन मस्त राहयचे तर बसते रडत...:रागः
अरे कोणीतरी आवरा रे यांना,
अरे कोणीतरी आवरा रे यांना, प्रेक्षक म्हणजे अगदीच मुर्ख प्राणी वाटतात का यांना
शनाया त्या काकांना दारू
शनाया त्या काकांना दारू प्यायल्यावर " ए मिशी- ए मिशी " करत होती आणि ते पण बरे गप्प बसले मस्त एक ठेऊन द्यायची नाहीतरी ती दारू प्यायलेलीच होती ना
ते पण बरे गप्प बसले मस्त एक
ते पण बरे गप्प बसले मस्त एक ठेऊन द्यायची नाहीतरी ती दारू प्यायलेलीच होती ना>>> राधिकाने मारली तिच्या थोबाडीत.
राधिकाने तिला मारली कारण
राधिकाने तिला मारली कारण म्हणाली "तू आणि तुझा मुलगा भिक माग " म्हणून
यांनी मारायला पाहिजे त्यांना मिशी म्हणते म्हणून एकावर एक डबल धमाका
ही मूर्ख सिरेल आहे ते
ही मूर्ख सिरेल आहे ते सोडा...पण असं पब्लिकली स्त्रीच्या थोबाडीत (एखाद्या पुरुषाने!) मारणे गुन्हा आहे!
"ए मिशी" नाही कै.... ती "ए
"ए मिशी" नाही कै.... ती "ए व्हाईट मिशी" म्हणते त्यांना. त्यांची मिशी पांढरी आहे म्हणून.
प्रज्ञा शनाया आणि गॅरी दोघांना अटक करुन घेऊन जात असते ना, मग सोडवत कोण त्यांना??
प्रज्ञा शनाया आणि गॅरी
प्रज्ञा शनाया आणि गॅरी दोघांना अटक करुन घेऊन जात असते ना, मग सोडवत कोण त्यांना??______राधिका
ही मूर्ख सिरेल आहे ते
ही मूर्ख सिरेल आहे ते सोडा...पण असं पब्लिकली स्त्रीच्या थोबाडीत (एखाद्या पुरुषाने!) मारणे गुन्हा आहे!>>> सहमत, पण चूक शनायाचीपण आहे ना? ति त्याला 'ए व्हाइट मिशी' म्हणते त्याच काय?
एरवी राधिकावर गुर गुर करणारा
एरवी राधिकावर गुर गुर करणारा गुरु, शनायामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी तिला काही बोलत नाही अगदी बच्चा असल्यासारखं वागतो.
>>>ही मूर्ख सिरेल आहे ते
>>>ही मूर्ख सिरेल आहे ते सोडा...पण असं पब्लिकली स्त्रीच्या थोबाडीत (एखाद्या पुरुषाने!) मारणे गुन्हा आहे!---
पब्लिकलीच नाही , एरवीही.
स्त्रीने स्त्रीच्या थोबाडीत
स्त्रीने स्त्रीच्या थोबाडीत दिली तर गुन्हा नाही ? स्त्रीने पुरुषाच्या थोबाडीत दिली तर गुन्हा नाही ? पुरुषाने आणि त्यातल्या सुद्धा एखाद्या सिनियर सिटीझन चा वयाने लहान असलेल्या स्त्री कडून अपमान झाला आणि त्यांनी थोबाडीत दिली तर गुन्हा ? माहित नव्हतं
>>>एरवी राधिकावर गुर गुर
>>>एरवी राधिकावर गुर गुर करणारा गुरु, शनायामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी तिला काही बोलत नाही अगदी बच्चा असल्यासारखं वागतो.----
शनाया बच्चाच आहे ना. कपटी, कारस्थानी पेक्षा बिनडोकच वाटते ती. शेवटी तिला पण सॉफ्ट कॉर्नर मिळनार प्रेक्षकांकडुन आणी ती त्या हापिसातल्या मजनुबरोबर सुखाने नांदणार.
अथर्व च्या शाळेतला प्रोमो
अथर्व च्या शाळेतला प्रोमो दाखवला, त्यात राधिका चक्क रन्जना ची नक्कल/स्टाइल मारत आहे असं वाटल, अगदीच सुमार कॉपी...
निर्माते दिग्दर्शक, काही
निर्माते दिग्दर्शक, काही चांगलं दाखवायला नसेल सुचत तर ही सिरेल प्लीज बंद करा. काय्च्या काय बालिशपणा चालवलाय. सध्या ही अत्यंत फालतु सिरेल आहे झीची.
निर्माते दिग्दर्शक, काही
निर्माते दिग्दर्शक, काही चांगलं दाखवायला नसेल सुचत तर ही सिरेल प्लीज बंद करा. काय्च्या काय बालिशपणा चालवलाय. सध्या ही अत्यंत फालतु सिरेल आहे झीची. >>>>> नाही.... सध्या झीच्या सगळ्याच शीरेल अत्यंत फालतु आहे.. अगदी राणाची सुद्धा त्या डायरी आणी वहिनीमुळे
आता काय तर घरात भूत आहे म्हणे
आता काय तर घरात भूत आहे म्हणे .
त्या नील ची विम्मी मावशी आलेली घर बघायला
समिधाच्या जागी मी असते तर माझाही असाच त्रागा झाला असता .
स्वताचे घर आहे, भावाचे घर आहे , रेवतीचे घर आहे असे असताना का म्हणून मी राधीकाचे माझ्या घरी रहाणे पसंद करावे .
का म्हणून मी अशा बिन्डोक बाईला माझ्या घरी आणायच आणि तीचे गुणगान ऐकायचे , की ती माझ्यापेक्शा जास्त गोड आहे. :रागः
गुरु त्या मुलीबरोबर घरी "राहतोय" त्याचं कोणालाच काही वाटत नाही का ?
सगळे राधिकाला का समजावतायेत की सगळ ठीक होईल .
निदान रेवतीने तरी तिला खंबीर व्हायला शिकवलं पाहिजे .
अय्या...ती विम्मी मावशी होती
अय्या...ती विम्मी मावशी होती का? तरीच.......! मी म्हटलं कुठे पाहिलं हिला....!!
हो ना...गुरु शनाया सोबत राजरोसपणे राहतोय...त्याचं कुणालाच कसं काही वाटत नाही ? शनाया बाकी दिसते गोड...काम पण छान करत्ये. म्हणजे शोभते आहे या रोल ला..........
लोक्स, ती समिधा आधी कुठल्या
लोक्स, ती समिधा आधी कुठल्या मालिकेत होती?
गिरीजा ओक आणि लोकेश गुप्ते असलेल्या मालिकेत होती का?
स्वतःच्या मुलाला घेऊन
स्वतःच्या मुलाला घेऊन राधिकाने सरळ स्वताच्या घरी राहायला जाव, कोणत्या आधारावर गुरुनाथ तिला घराबाहेर काढू शकतो (भावनिक ब्लॅकमेल सोडून) तिने खंबीरपणे सांगावे की मी तुमची बायको आहे , आपला डिवोर्स अजुन झाला नाही त्यामुळे या घरावर माझाही तितकाच हक्क आहे.
तुम्हाला त्या मुलीबरोबर राहायचे असेल तर खुषाल रहा, घर सोडून जा काहीही पण मी इथेच राहणार. आणि अथर्व ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे त्यामुळे त्याची काय ती सोय लावा अन्यथा मला महिला आणि बाल हक्क कायद्याचा आधार घ्यावा लागेल.
त्या घरात राहुन तिने स्वत:चे जे काय उद्योग आहेत ते सुरु करावेत सरळ.
काहीही हं शुकु
काहीही हं शुकु
शुभांगी. >>> तीने असे काही
शुभांगी. >>> तीने असे काही केले तर अख्खी शिरेलच संपुन जाईल, यांच्याकडे काही मालमसालाच शिल्लक राहणार नाही
अस किती दिवस शेजारी राहणार?
अस किती दिवस शेजारी राहणार? बर ते नाना नाही काही म्हणत नसले तरी खर्च असतोच की. त्या गुरुचे आईवडील देखिल काहीच बोलत नाहीत त्या गुरुला.
मालिकेत जितक साध दिसतय तितकी ती परिस्थिती साधी नसते. एखाद पाहुणा चार दोन आठवडे ठीक वाटतो पण नंतर त्याचाही त्रास व्हायला लागतोच. बर तिला काहिहि मोटीव नाहिये. जो नवरा तिला बायको मानतच नाही किंवा पुन्हा स्विकारायला तयारच नाहिये त्याला मिळवण्याची किती ती बालिश, हास्यास्पद आणि केविलवाणी धडपड?
बर कायदे महिलांच्या बाजूने आहेत हे देखिल तिला माहिती आहे. तिची काहीही चूक नसताना फक्त गावंढळ आहे, मोडर्न (पेहराव्/वागणे) नाही म्हणुन जर तिचा नवरा तिला हाकलून देतोय तर तिने का त्याच ऐकाव. प्रत्येकाने स्वतःला पटेल अस राहाव आणि तो त्याचा अधिकार आहे. उलट नवर्याला डिवोर्स द्यायला तिच्याकडे भलमोठ्ठ कारण आहे लग्नाची बायको असताना हा माणूस दुसर्या मुलीबरोबर जबाबदार्या झटकुन राहतोय वरती हिचा मानसिक छळ करतोय.
डिवोर्स होईतो स्वत:चा व्यवसाय(काहीतरी गूहोउद्योग) करावा, स्वतःला सक्षम बनवावे व मुलाला सांभाळावे. कुणी तिच्या मताचा आदर करणारा तिला आहे तशी स्विकारणारा मिळाला तर पुन्हा डाव मांडावा. गुरुनाथ सारख्या माणसाची वाट पहाणे आणि त्याला मिळवण्याची धडपड करणे तद्दन फालतू आहे.
आणि जर का येन केन प्रकारे तो परत आला तर सरळ त्याला झटकुन रिकामे व्हावे.
असो. झाल ओकुन. आता झी वाले काय दाखवायच ते दाखवोत बापडे.
मला खरतर या 'मेरा पती सिर्फ
मला खरतर या 'मेरा पती सिर्फ मेरा है' टाईप्स सिरेलींचा आणि त्याला प्रमोट करणार्या चॅनेल्स चा कंटाळा आलाय. कधी सापडलेच एका रांगेत असे निर्माते तर एकेकाच्या घरात चार चार सिरेलींच्या नायिका सोडून देइन मी महिनाभरासाठी.
अनिता दातेला अशी अर्थहीन
अनिता दातेला अशी अर्थहीन भूमिका करताना काय वाटत असेल? भूमिका स्विकारताना ती पुढे कुठे कशी प्रवास करणार आहे हे लेखकांनासुद्धा माहिती नसणार आणि नंतर अशी हास्यास्पद, मूर्ख भुमिका ताणत रहायचं. केवढी अॅडजस्टमेंट! अशा प्रॉमिसिंग कलाकारांना ते नक्की जाणवत असेल. एक पैसे वगळता काहीच समाधान नाही. पैसे महत्त्वाचे असले तरी तिच्या करीयर ग्राफवर परिणाम होऊ शकतो. जर बघणा-यांना इतका त्रास होतोय, तर करणा-यांना किती होत असेल! एकमेकांना धीर देत कसे तरी शूटिंग उरकत असतील बहुतेक.
गिरीजा ओक आणि लोकेश गुप्ते
गिरीजा ओक आणि लोकेश गुप्ते असलेल्या मालिकेत होती का? >> ही मालिका अण्धुक आठवत्ये, नीना कुलकर्णी होती ती ही मालिका का ? लोकेश गिरिजा ला फसवतो ? गिरिजा गावातली असते ?
फालतुगिरी बंद करुन नेमकच
फालतुगिरी बंद करुन नेमकच दाखवाव ते दाखवतांना हवं तर चांगले प्रसंग दाखवावेत अन थोडक्यातच सिरियल बंद करावी म्हणजे मालिका हि हिट अन त्यातील कलाकार हि... उगाच दळण कश्याला दळीत बसायचं..
नीना कुलकर्णी होती ती ही
नीना कुलकर्णी होती ती ही मालिका का ? लोकेश गिरिजा ला फसवतो ? गिरिजा गावातली असते ? >>> हो तीच मालिका.
फालतुगिरी बंद करुन नेमकच दाखवाव >>> मालिकेच्या लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा परीकथांवर दृढ विश्वास असतो. पात्रे नेहमी टोकाचीच असतात.
समिधा 'लज्जा' मधे होती. पियुष
समिधा 'लज्जा' मधे होती. पियुष रानडे हिरो होता त्यात. वरती सगळ्यांनी उल्लेख केलेली मालिका. ती समिधा, साम वर कलाकारांच्या मुलाखती आणि कुकींगचा प्रोग्रॅम होता, त्याचीपण anchor होती. नाव प्राजक्ता गणपुले बहुतेक.
Pages