Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी अजूनही बालिशपणाच चालू
बाकी अजूनही बालिशपणाच चालू आहे असं दिसतंय.
काय तो नवरा घर सोडून जात होता शनायाबरोबर तर जाऊ द्यायचं ना, मुलाला घेऊन राहायचं आपल्याच घरी. त्या गुरुला अजूनही किंमत नाही बायकोची काडीची. हिला काय एवढं. आज तिला इंग्लिश येत नाही म्हणून बोलणार बहुतेक parents meeting मध्ये.
ते मिटींगचा प्रोमो दाखवतायत..
ते मिटींगचा प्रोमो दाखवतायत.. तिला इंग्लिश येत नाहि अस.. पण गेल्या वेळी एका प्रसंगात दाखवल होतं ना ती शनाया एका दुकानात खरेदि करताना शनायाला इंग्लिश मध्ये बोललेली ते??
विसरली असेल.
विसरली असेल.
पण त्या अथर्वची भक्ती टीचर तर
पण त्या अथर्वची भक्ती टीचर तर मराठीतच बोलत असते की नेहमी. शाळा बदलली काय पोराची??
ती राधिका इतकी आक्रस्ताळेपणा
ती राधिका इतकी आक्रस्ताळेपणा करत बोलत असते सतत माय घर माया सन्सार , अरे ज्यात तुझा नवराच तुझ्या बाजुने नाही तिथे कसला सन्सार आणी कस्ल काय?
शुभान्गी तुझ्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन!
ए काय बोअर आहे ती राधिका .
ए काय बोअर आहे ती राधिका . काय यार , ३१ डिसेम्बरच्या पार्टीला कोणी श्रीखंड पुरीचा बेत करतं काय ??
तेही आयता वेळी विकतचा चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड . सिरियसली !!
(वरची वाक्य ईच्छुकानी शनायाच्या टोनमध्ये बोलून पहावीत )
कालची पीटीए मिटींग तर
कालची पीटीए मिटींग तर भन्नाटच होती. माझ्या दोन्ही लेकींच्या शाळेत गेली १० वर्ष जातेय पण एकदाही अशी मिटींग पाहिली नव्हती.
असो पण सिरियसली इंग्रजीचा न्युनगंड असलेले पालक असतात. येशाच्या वर्गात एक मुलगा होता अक्रम नावाचा त्याची आई नेहमी बुरखा घालुन यायची पीटीए ला आणि बिचारी एक शब्दही बोलायची नाही कारण इंग्रजी येत नव्हते. पण अक्रम इतका हुशार होता की प्रत्येक वेळी, माय मम्मी सेज आय डु वेल, आय डू माय होमवर्क इन टाईम अँड सो ऑन. त्याला एकदा तीनही डिव्हिजन मधुन पहिला आला म्हणुन बक्षिस मिळाले होते गॅदरिंगला तर प्रिन्सिपलने वर्गात अक्रमला सांगितले होते टुडे आय डोन्ट वाँट टु हियर व्हाट युवर मम्मी सेज, लेट युवर मम्मी से.
आणि प्रेमाने त्या बाईंना म्हणाल्या, आपको जिस भाषा मे कंफर्टेबल हो उसी भाषा में बात किजिये, आप किस भाषा में बात करती हो उसका आपके बेटे की होशियारी पर कोई असर नही होगा. तर ताई चक्क मराठीत बोलल्या होत्या. असो पण असे फार कमी ठिकाणी बघायला मिळते.
Gubbe....majhya frnd la
Gubbe....majhya frnd la fluent English yet nahi Mhanun tichya muline sangitla mummy tu school madhe yeu nako.... me tichya jagi aste tar kanfatavli asti porila
Gubbe....majhya frnd la
Gubbe....majhya frnd la fluent English yet nahi Mhanun tichya muline sangitla mummy tu school madhe yeu nako.... me tichya jagi aste tar kanfatavli asti porila
इंग्लिश विंग्लिश मधे पण असच
इंग्लिश विंग्लिश मधे पण असच दाखवलय ना?
अरे पण तिला कुणी सांगितलेलं
अरे पण तिला कुणी सांगितलेलं येत नसताना विंग्लिश बोलायला. शाळेत मिटींगमधे इंग्लिशमधेच बोलणं कम्प्लसरी नसतं. आमच्या कॉन्व्हेंट मधे तरी नाहीचे. कितीतरी आया इंग्लिश न येणार्या असतात. अगदी सहज हिंदीत बोलतात टीचरशी. हिंदीत कारण बर्याच टीचर कॅथलिक/ साउथ इंडियन आहेत. मागच्या वर्षी लेकीची क्लासटीचर मराठी होती. आम्ही इंग्लिश / हिंदी बाजुला ठेउन तिच्याशी मराठीतुनच बोलायचो. आणि तिचीही काहीच हरकत नव्हती. ती पण मराठीतुनच बोलायची.
आणि शाळेने कधीही पालकांना तुम्ही घरीही मुलींशी इंग्रजीतुनच बोला असं सांगितलं नाही.
पण मुलींना शाळेत इंग्लिशमधेच बोलायचं कंपल्शन आहे. टीचरशी, इतर मुलींशी वैगेरे. आणि ते मला योग्यच वाटतं.
शाळेने कधीही पालकांना तुम्ही
शाळेने कधीही पालकांना तुम्ही घरीही मुलींशी इंग्रजीतुनच बोला असं सांगितलं नाही.
पण मुलींना शाळेत इंग्लिशमधेच बोलायचं कंपल्शन आहे. टीचरशी, इतर मुलींशी वैगेरे. आणि ते मला योग्यच वाटतं.
>>>> अगदीच ग.
आणि आपण चुकिच बोलतोय हे जाणवत
आणि आपण चुकिच बोलतोय हे जाणवत आपल्याला. बोबडं वगैरे ती मराठीत बोलली असती तरी चाललं असतच कारण प्रिन्सिपल आणि बाकीच्या टीचर मराठीतच बोलत होत्या की नंतर.
बरं शाळेने पण आग्रही असणं चुक आहे. जस्ट टु इम्प्रुव्ह देअर चाइल्ड'स इन्ग्लिश दे कॅन सजेस्ट बट नॉट कंपेल पॅरेंट्स
आणि आमच्या तरी शाळेत असे
आणि आमच्या तरी शाळेत असे तुमचा मुलगा नीट बोलत नाही, किंवा नीट हेल्दी खात नाही अस सगळ्यांदेखत नाही सांगत. मुल, मुलाचे आई-बाप आणि क्लास टीचर इतकेच असतात अश्यावेळी. बाकी कॉमन विषय एकत्रित रित्या बोलले जातात जे सगळ्यांनाच संबोधुन असतात आणि हाच पीटीए चा पॅटर्न असतो/असावा.
बाकी ती कुठल्या खंडोजीराव
बाकी ती कुठल्या खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल स्कुलची पीटीए मीटिंग होती कुणास ठाऊस? असल्या पर्सनल कमेंटस पॅरेंट्स करत होते नंतर.
आणि आमच्या तरी शाळेत असे
आणि आमच्या तरी शाळेत असे तुमचा मुलगा नीट बोलत नाही, किंवा नीट हेल्दी खात नाही अस सगळ्यांदेखत नाही सांगत. मुल, मुलाचे आई-बाप आणि क्लास टीचर इतकेच असतात अश्यावेळी. बाकी कॉमन विषय एकत्रित रित्या बोलले जातात जे सगळ्यांनाच संबोधुन असतात आणि हाच पीटीए चा पॅटर्न असतो/असावा.>>>> +१
खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल स्कुल>>>
सगळंच अतिरंजित.....वास्तवाशी
सगळंच अतिरंजित.....वास्तवाशी फारकत...एखादी गोष्ट सादर करण्यापुर्वी किमान तर्क-सुसंगत असावी ही अपेक्षा फोल
ह्या सगळ्यात मला एकच बरं वाटलं की गुरु ला ही घर विकावसं वाटत नाही, नाहीतर शनाया म्हणते म्हणून हो ला हो नाही मिळवली...
बाकी ती कुठल्या खंडोजीराव
बाकी ती कुठल्या खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल स्कुलची पीटीए मीटिंग होती कुणास ठाऊस? असल्या पर्सनल कमेंटस पॅरेंट्स करत होते नंतर.>>> अगदी असच वाटल.
खरतर शाळेतले शिक्षक, पालक कोणीच फार चांगले इंग्लिश बोलत नव्हते. आणि एकुण वातवरणही काही इंग्रजाळलेल नव्हत. बिंधास्त मराठे बोलायच की. त्यात लाजायच काय
अवांतर - गुरू स्वतःला फार हायफाय समजतो पण लेकाची शाळा अगचीच सोसो वाटते. म्हणजे सो कॉल्ड हायसो लोक्स त्या शाळेत आपली मुले घालत असतील असे वाटत नाही.
हाय फाय शाळा दाखवायला आपला
हाय फाय शाळा दाखवायला आपला करण जोहरच हवा गो बाय
हाय फाय शाळा दाखवायला आपला
हाय फाय शाळा दाखवायला आपला करण जोहरच हवा गो बाय >>>>
कालची मीटींग म्हणजे पीटीएम
कालची मीटींग म्हणजे पीटीएम (पॅरेंटस टीचर मीटिंग) किंवा फारफार तर ओपन डे म्हणुयात. कारण पीटीए म्हणजे पॅरेंटस टीचर असोसिएशन ज्यात प्रत्येक वर्गातल्या सगळ्या पालकांपैकी एक पालक रिप्रेझेंटेटीव म्हणुन निवडतात. त्यांची एक कमीटी असते. त्या मिटींग्ज मधे शाळेचे रिप्रेझेंटेटीव आणि हे पॅरेंट्स रिप्रेझेंटेटीव चर्चा करुन समस्यांवर तोडगा काढतात मग त्या शिक्षणाविषयक असुदेत किंवा सार्वजनिक वावर शाळेतला, हॉस्टेल, जेवण, मुलांच्या अडचणी, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीविटीज, स्पोर्ट्स, अगदी शिक्षकांविषयीच्या तक्रारी सुद्धा असतात अश्या मिटींग्ज्स मधे.
श्या मी आज फारच पर्सनल होतेय इथे सॉरी.
हाय फाय शाळा दाखवायला आपला
हाय फाय शाळा दाखवायला आपला करण जोहरच हवा गो बाय >>>> मी हे गे बॉय वाचले
मानिनी
मानिनी
हाय फाय शाळा दाखवायला आपला
हाय फाय शाळा दाखवायला आपला करण जोहरच हवा गो बाय >>> अगदी SOTY मधली शाळा नको पण जरा बर्यापैकी तरी असावी ना शाळा.
मानिनी
असो पण सिरियसली इंग्रजीचा
असो पण सिरियसली इंग्रजीचा न्युनगंड असलेले पालक असतात. येशाच्या वर्गात एक मुलगा होता अक्रम नावाचा त्याची आई नेहमी बुरखा घालुन यायची पीटीए ला आणि बिचारी एक शब्दही बोलायची नाही कारण इंग्रजी येत नव्हते. पण अक्रम इतका हुशार होता की प्रत्येक वेळी, माय मम्मी सेज आय डु वेल, आय डू माय होमवर्क इन टाईम अँड सो ऑन. त्याला एकदा तीनही डिव्हिजन मधुन पहिला आला म्हणुन बक्षिस मिळाले होते गॅदरिंगला तर प्रिन्सिपलने वर्गात अक्रमला सांगितले होते टुडे आय डोन्ट वाँट टु हियर व्हाट युवर मम्मी सेज, लेट युवर मम्मी से.
आणि प्रेमाने त्या बाईंना म्हणाल्या, आपको जिस भाषा मे कंफर्टेबल हो उसी भाषा में बात किजिये, आप किस भाषा में बात करती हो उसका आपके बेटे की होशियारी पर कोई असर नही होगा. तर ताई चक्क मराठीत बोलल्या होत्या. असो पण असे फार कमी ठिकाणी बघायला मिळते>>>>>>>>>>>> वाह!!!
खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल
खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल स्कुल>>> हाहा हहपुवा
खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल
खंडोजीराव भेलकांडे इन्टरनॅशनल स्कुल >>
आणि ती टीचर होती अथर्वची ??? ऑफिस स्टाफ वाटत होती .
भक्ती मॅडम चांगली आहे मग.
आणि राधिका रडत असताना , फळ्यावर मराठीतूनच लिहल होत की
मराठीत लिहिलेलं चालत असेल
मराठीत लिहिलेलं चालत असेल बोललेलं चालत नसेल
आणि राधिका रडत असताना ,
आणि राधिका रडत असताना , फळ्यावर मराठीतूनच लिहल होत की>>> काय, राधिका रडत आहे हे फळयावर लिहिल होत?
पण सम्जा धरुन चाला की
पण सम्जा धरुन चाला की विन्ग्लिश मधे बोलण कपलसरी आहे तरी होता की गुरुनाथ मग मधेच काय गरज आहे बोलायची अशावेळेस गप्प राहावे , तो आलाच नसता तर ठिक आहे, सगळ्या फाइटी ,ताण घेवुन रडायच कशाला?
ती राधिका केवढ तोड वेडवाकड करुन बोलत असते.
नो ऑफेन्स पण कितीतरी वेळा स्वतःच्या भाषेचा लेहजा फक्त घरात ठेवुन सार्वजनिक ठिकाणी नॉर्मल मराठीत बोलणारे बरेच लोक आहेत., माझ्या शाळा,कॉलेज मधल्या कितितरी मुली घरी अहिराणी किवा अहिराणी मिक्स मराठी बोलायच्या पण त्या आणी त्याच्या आया सुधा एरवी सगळिकडे व्यवस्थित साधस मराठी बोलतात.
त्या नागपुरी टोन मुळे राधिका भान्ड्कुदळ वाटते सारखी.
Pages