माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>मला तर म्हणावस वाटत तुला शनायाला नाही नवर्‍याला सुधरावायची गरज आहे , शनाया हाकलल तरी ज्याला तुझ्यातल काहिच प्ल्स दिसत नाही तो दुसरी शनाया शोधणार नाही कशावरुन?---

अगदी बरोबर.

आणि दुधाच्या पिशव्या अशा का दाखवल्या? मैद्याच्या पिशव्यांसारख्या?
Happy

काहीही!

आणी मला ते "आनंद भावजी" फार बोअर होतात!

ती मुद्दामच खवचटपणे बोलली त्याला अंकल असं मला तरी वाटलं.

तो गॅरी परवाच्या भागात राधिकाच्या साड्या पांघरुन का झोपला होता???

नाना नानी समिधाला कित्ती बोलतात, ते पण परक्यांसमोर. एरवी भांडणारी समिधा आता एकुन घ्यायला लागलेय. गुरुच्या आई वडिलांना काहिच काम नाही सिरिअलमध्ये!

नाना नानी समिधाला कित्ती बोलतात, ते पण परक्यांसमोर.>>>> +१. नाना तर उठसुट अपमानच करतात. आणी घर त्यांचं म्हणजे सुनेला काहीच अधिकार नाही का? ती नक्की त्यांच्या सख्ख्या मुलाची बायको आहे ना?

समिधाला नक्की प्रॅक्टीकल दाखवायचय की नेगेटीव याचा निर्णय झालेला नाहिये बहुतेक दिग्दर्शकाचा Lol

गुरुच्या आई वडिलांना काहिच काम नाही सिरिअलमध्ये! >>> असं कसं असं कसं, सध्या ते नातवाला सांभाळत आहेत की, आणि त्यांची एण्ट्री महत्वाच्या वेळी होणार असेल Wink

कुठलं पात्र गंडलेलं नाहीये? >>>>> हो सस्मित, अगदीच खरं आहे.

राधिका, गुरु, शनाया, ते शेजारी, तो कंपनी ओनर, गुरुच्या ऑफिसमधले लोक, सगळे अ‍ॅबनॉर्मल वागतात. कोणी शेजारी किंवा कलीग किंवा बॉस सारखं वागत नाही. किती दुसर्‍यांच्या लाइफमधे नाक खुपसताहेत.

राधिका हे मुख्य पात्रच तर महा गंडलेलं आहे.

हो ना...किती ते त्या गुरुवर प्रेम...आणि त्याच्या घोड चुकांकडे सपशेल दुर्लक्ष! नुसता शन्यावर राग काढून काय उपयोग? ती गेली की ही राधिका जाणारे का गुरु कडे परत? असं झालं तर खूपच वाईट संदेश जाईल. कुठल्याही परिस्थितीत तिने गुरु कडे शेवटी परत जायला नको.

शन्या म्हणते तशी ती राधाक्का मलाही, जे काही बालिश चाळे करतेय ते पाहता, खरंच गावठी, वेडी, सायको आणि इरीटेटींग वाटतेय. काही ठोस/ सिरीयस का नाही करते ती. हे दाराची बेल वाजवुन पळणे, तिला बाहेर बोलावुन दार लॉक झाल्यावर हसणे इइ पेक्षा. आता तर काय बॉसला जेउ खाउ घालायची शर्यत होणारे. प्लीजच ह्यासाठीच बायको असते का?

आणि फोन करायला पैसे नाहीत म्हणुन शन्याचं अंध भिकार्‍याच्या डब्यातले पैसे चोरणं महान होतं.

राधिका इज गुड फॉर नथिंग! शन्या निदान स्वतःला कॅरी तरी मस्त करत्येय. गुरु महा बावळ्ट दिसतो. नो एक्स्प्रेशन्स! शिव चा रोल याला द्यायला हवा होता शिव ला याचा...म्हणजे एकच सिरेल गंडली असती टोटल मधे!

प्लीजच ह्यासाठीच बायको असते का?>>>> +++११११ राधिका म्हणते कशी, तुम्हा नोकरी करणार्या बायकान्चे आयुष्य सोपे असते (?), पण आम्हा गृहिणीनीन्चे तसे नसते ना. ज्यान्ना घरची कामे येत नाही, ते बावळट असता त, तेच घरात नोकर ठेवतात म्हणे, ( राधिकाचे जनरल knowledge).

खरंच , ह्या आणी कादिप मालिकांतुन चुकीचे संदेश जात आहेत.
खुकखु जरा तरी बरी आहे. मोनिकाशी अग बाई कित्ती छान वागते. आणी मोनेही सासरे म्हणुन मस्तं.

अग्ग बाई माझ्या डोक्यात जाते. मला अशी सासु कधीच आवडली नसती. प्रत्येक गोष्ट अभुतपुर्व असल्याप्रमाणे रीअ‍ॅक्ट होते ती.

नाही माबोवर नाहीत त्या. त्यांनी झीला वाहुन घेतलंय. आणि मी माबोला. >> +१. माझ्या साबा पण कायम झी मराठीच बघत असतात.

Pages