Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काहीही होवो. अर्थच्या वळणाने
काहीही होवो. अर्थच्या वळणाने काही जायची नाही.
एकवेळ मुंचाफौ च्या वळणावर
एकवेळ मुंचाफौ च्या वळणावर असेल तर चांगलं आहे. पण समाला आजिबात झेपणार नाही मला. कारण समाला मधल्या नवर्याचं कॅरेक्टर वेगळं होतं आणि हे गुरवाच कॅरेक्टर वेगळंच आहे. पण बहुतेक तसंच असेल.
कारण...
लावुनी शक्कल लढवुनी अक्कल शिकवीन तुला धडा आणि रडवीन घळाघळा
असल्या नवर्याला मिठी आणि शन्याला एलेक्ट्रिक शॉ़क
समाला मध्ये वर्षाचं कॅरेक्टर
समाला मध्ये वर्षाचं कॅरेक्टर पण वेगळं होतं.
शनायाचं डोक्यात जाणारं आहे. ती त्याला सरळसरळ पैशासाठी जवळ करतेय. प्रेम, मरुंदे आकर्षण पण नाहीये.
दोघांना धडा शिकवून, नव्-याला
दोघांना धडा शिकवून, नव्-याला पण सोडायला हवं, तो पक्का चॅप्टर दिसतोय, त्याला माफ वगैरे करुच नये.
सस्मित, निधी, अन्जू...
सस्मित, निधी, अन्जू... अनुमोदन.
समाला मधिल कॅरेक्टर्स...मॅच्युअर दाखविलेले आहेत.
धडा शिकवावा हेच घडावे.
धडा शिकवावा हेच घडावे >>> धडा
धडा शिकवावा हेच घडावे >>> धडा गुरवाला शिकवायला पाहिजे. शनायाचा खरतर काही संबंध बाही.
पण ती शन्यालाच धडा शिकवायची
पण ती शन्यालाच धडा शिकवायची भाषा करते ना टायटल सॉन्गात
काहीही होवो. अर्थच्या वळणाने
काहीही होवो. अर्थच्या वळणाने काही जायची नाही. >>> दुर दुर पर्यंत शक्यताच नाही. किती इल्लॉजिकल अन मुर्ख कथा आहे या मालिकेची. एकही कॅरेक्टर पटण्यासारखं लिहिलं नाही.
धडा गुरवाला शिकवायला पाहिजे.
धडा गुरवाला शिकवायला पाहिजे. शनायाचा खरतर काही संबंध बाही.>>>>+११११ सहमत
जर नवर्याने बाईला दुसर्या बाईसाठी सोडल, तर बायकोची चूक कारण तिला आपला नवरा साम्भाळता आला नाही,आणि ती दुसरी बाई सुद्दा दोषी, कारण तिने त्या नवर्याला आपल्या नादी लावलेल असत.
म्हणजे दोन्ही बाजूने समाज बाईलाच दोष देणार. का? त्या नवर्याचे काहीच contribution नसत का अश्या रिलेशनशिपमध्ये? तो भोळा साम्ब असतो का अश्या प्रकरणात? त्याला कोणीच कसे दोष देत नाही?
"देर आये दुरुस्त आये "
"देर आये दुरुस्त आये " प्रमाणे आत्ता तिने मुलाला नवर्याकडे पाठवून द्यावे. माझेच राहायचे वांधे तिथे मुलाला कुठून सांभाळणार ? असं कारण द्यायचं . तुम्ही सांभाळा तुमच्या मुलाला म्हणायचं . मगच त्या गुरुची आणि शनायाची दोघांचीही जिरेल . गुरूचा मुलगासाज घरी आला राहायला तर शनाया कशी येऊ शकणार ?
रेवती, गुप्ते, भक्ती,
रेवती, गुप्ते, भक्ती, नानानानी, भाउ, वहिनी, सासु सासरे या सर्वांना अॅक्टिंगचा भरपुर स्कोप देवुन, सगळ्यांनी राधिकाला सल्ले दिल्यावर मगच राधिका अॅक्शन घेणार. हा आठवडा सिरिअल नाही बघितली तरी चालेल.
गुरुच्या आईचे फोनवरचे संवाद
गुरुच्या आईचे फोनवरचे संवाद मुळिच आवडले नाहीत (गुरुला समजावयाला फोन करते ते)-
शनाया यांव करणार आहे, का त्याव करणार आहे का? हे काय निकष आहेत का? राधिका मोलकरीणगिरी करते म्हणुन ती चांगली. शनाया चुलीपाशी रांधणार नाही म्हणुन ती वाईट. काय समजावयाला दुसरे मुद्दे नाहीत का?
हो ना चांगली सिरीयल म्हणता
हो ना चांगली सिरीयल म्हणता कुठेहि कशीहि फिरवायला लागलेत... किती त्या शनायाचे उगाचचे लाड दाखवताहेत.. हि राधिका बया तर आजुन १९ व्या काळातच फिरतेय... पति परमेश्वर..
पण तुम्ही सगळे एक सिनेमा
पण तुम्ही सगळे एक सिनेमा विसरताय करिष्मा कपूर चा Biwi No. 1
शनाया यांव करणार आहे, का
शनाया यांव करणार आहे, का त्याव करणार आहे का? हे काय निकष आहेत का? राधिका मोलकरीणगिरी करते म्हणुन ती चांगली. शनाया चुलीपाशी रांधणार नाही म्हणुन ती वाईट. काय समजावयाला दुसरे मुद्दे नाहीत का? >>>> + १००००००००.
शनिवारी चुकून एक एपिसोड
शनिवारी चुकून एक एपिसोड पाहिला. त्यात ही राधिका अजुनी नवऱ्याचीच काळजी करत होती.
काल एक प्रोमो बघितला ती
काल एक प्रोमो बघितला ती राधिका शनायाला मारतेय भर रस्त्यात, ती पळतेय असा काहीतरी. नवरा का नादी लागला तिच्या आणि तुला बोलतो वाटेल तसं, त्याचा दोष नाहीच का मग त्याला पण शिकव ना धडा भर रस्त्यात.
मालिकेत सगळ्यानी , राधिकाला
मालिकेत सगळ्यानी , राधिकाला सोडून , गुरु , नटव्या शनायाच्या मागे लागला आणि राधिकाला घराबाहेर काढले , असा सुर लावला आहे. म्हणजे राधिकासारख्या कोणाच्या मागे गेला असता तर चालला असता का ?
नवरा का नादी लागला तिच्या आणि
नवरा का नादी लागला तिच्या आणि तुला बोलतो वाटेल तसं, त्याचा दोष नाहीच का मग त्याला पण शिकव ना धडा भर रस्त्यात.>> अन्जू ताई, हो ना. मी पण तेच म्हणते. त्यालाच धडा शिकवायचा की मग शनायाच्याच कशाला कोणाच्याच नादी लागायचा नाही तो.
तो गुरू इतका उद्धट, बेपर्वा
तो गुरू इतका उद्धट, बेपर्वा (मुलाची ही फिकीर न करणारा) आणि हरामखोर दाखवला आहे तरी त्यांचा संसार टिकावा अशी प्रत्येकाची का इच्छा राधिकाला स्वतःच्या पायावर उभी रहायला मदत करा म्हणाव.
बाकी ते कपुर सर घरी येण्याचा प्रसंग फारच सॉरी होता. कुठला बॉस असा रेसिपी विचारायला बायकोला घेऊन कलीगच्या घरी अचानक टपकतो
<<म्हणजे राधिकासारख्या
<<म्हणजे राधिकासारख्या कोणाच्या मागे गेला असता तर चालला असता का ?>> नसत चाललं. एकदा लग्न झालं कि नवऱ्याने किव्वा बायकोने दुसऱ्या कोणाच्याही नादी लागण चुकीचंच
तो गुरू इतका उद्धट, बेपर्वा
तो गुरू इतका उद्धट, बेपर्वा (मुलाची ही फिकीर न करणारा) आणि हरामखोर दाखवला आहे तरी त्यांचा संसार टिकावा अशी प्रत्येकाची का इच्छा राधिकाला स्वतःच्या पायावर उभी रहायला मदत करा म्हणाव. >>> खरं आहे. ती राधिका तसं पण लोणची, मसाले वगैरे करते ना म्हणजे उद्योगी आहे.
एकदा लग्न झालं कि नवऱ्याने किव्वा बायकोने दुसऱ्या कोणाच्याही नादी लागण चुकीचंच>>> करेक्ट.
करेलही कदाचित...प्रोमो मध्ये
करेलही कदाचित...प्रोमो मध्ये उखळात मसाला कुटताना दाखवली आहे ना !!
पण अजून राधिकाच्या हातात
पण अजून राधिकाच्या हातात सूत्र जाऊन ती दोघांना धडा शिकवायची सुरुवात करते, हा track सुरु झाला नाहीयेना? हा आठवडा पण असाच जाणार की काय. तो सुरु झाला की अधून मधून बघेन ठरवतेय, काय लेखक दिग्दर्शक हुशारी दाखवतायेत असं.
पण अजून राधिकाच्या हातात
पण अजून राधिकाच्या हातात सूत्र जाऊन ती दोघांना धडा शिकवायची सुरुवात करते, हा track सुरु झाला नाहीयेना? >>>
नाही ना. सगळे येउन त्या राधिकाची समजूत घालतायेत . आणि ती मारी मोठी - गुरुची चिन्ता करत बसलीय . त्याने काही खाल्ल असेल की नाही , त्यांना सकाळी चहा लागतो वगैरे . ते कसे रहात असेल.
मी तिच्यासमोर असते तर एक लगावली असती आणि तिला तसचं सोडून दिलं असतं.
हम्म्म अतीच करतेय राधिका पण
हम्म्म अतीच करतेय राधिका पण आपल्या देशात बऱ्याच बायकांचा कल असा आहे, नवऱ्याने कितीही कसाही त्रास दिला तरी आपण त्याच्याशी चांगलं वागायचं. त्यामुळे त्या वृत्तीचं प्रतिनिधीत्व करते राधिका असं वाटतं अर्थात टीव्ही हे माध्यम असं आहे की त्याचा अशा प्रवृत्तीविरुद्ध चांगला वापर करून घेणं आणि स्त्रीने जास्त सक्षम होणं. तेच अपेक्षित आहे मालीकेकडून (पचका करतील की काय माझा, अपेक्षाभंग वगैरे काय माहिती).
आत्ताच अभिजित खांडकेकरने टीव्हीवर एक किस्सा सांगितला, काल अनिता दाते लायनीत उभी होती नोटा काढायला बराच वेळ आणि पेपर वगैरे वाचले मग तिच्या लक्षात आले बराच वेळ लागणार आहे मग तिने जवळच्या चहावाल्याला लायनितल्या सर्वांसाठी चहा बिस्किटं द्यायला सांगितली तिच्याकडून.
सहज आत्ता इथेच लिहित होते आणि नेमके टीव्हीवर ह्याच मालिकेतला किस्सा ऐकला म्हणून लिहिला.
अर्थात बरेचदा आपण असंही बघतो
अर्थात बरेचदा आपण असंही बघतो एखादा नवरा बायकोला नीट वागवत नाही पण मुलांचं छान करतो, प्रेम असतं, लक्ष देतो. इथे गुरु मुलाशी पण नीट वागत नाहीना, इथे वाचलं त्यावरुन वाटतं.
राधिका डोक्यात जाते. ऑफिसखाली
राधिका डोक्यात जाते. ऑफिसखाली गुरु तिला वाट्टेल तसं बोलतो. तर हीचं तेच पंचावन्न. पाढे. आणि मग शन्याच्या मागे धावुन तिला मारताना दाखवलीये.
च्यामारी जो नवरा अत्यंत तुसडेपणाने सांगतोय मला तुझी गरज नाही त्याची गचांडी धरायची सोडुन ही त्या शन्याला मारणार? आणि शन्या का म्हणुन हिचा मार खाणार? आता खरं शन्या-गुरु पेक्षा राधिकाचाच राग येउ लागलाय.
च्यामारी जो नवरा अत्यंत
च्यामारी जो नवरा अत्यंत तुसडेपणाने सांगतोय मला तुझी गरज नाही त्याची गचांडी धरायची सोडुन ही त्या शन्याला मारणार?>> +१.
शन्या नाही गं ती शनाया. राधिका तिला शन्या म्हणते.
मला वाटतं शनायाला पण चोपलंच पाहिजे की ती गुरुला भडकावत असतेच की सतत. पण पहिल्यांदा गुरुला सरळ केलं पाहिजे तिने.
मी जाहिरात पाहताना खुश
मी जाहिरात पाहताना खुश झाले,,की व्वा.. ही नुसती रडत बसली नाही तर त्या शनायला मारायाचा प्रयत्न तरी करते आहे.एपिसोड पाहिल्यावर पुर्ण हिरमोड झाला कैच्यकै... हा गाडी तिच्या अंगावरुन घालतो,तिच्याकडे दुर्लक्ष करतो.तिने केलेला डबा नाकारतो.वर शनायाला सांगतो,,की तु जस सांगितल तसच मी तिला ओरडलो.आनि ही बया त्याच्यासाठी अजुनही सगळ करते.
खरं आधी तिने गुरुला चोपायला हवा.मग शनायाला.
Pages