माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पहिल्यांदाच गुरवाला त्याच्या मुलाशी खेळताना / प्रेमाने बोलताना बघितले.>>> काल त्याचा सुर्य कुठे उगवला होता? Uhoh

गुप्ते, बिवी नं वन मधल्या अनिलकपूर किंवा सवत माझी लाडकी मधल्या रमेश भाटकर चा रोल निभावणार बहुतेक.
आणि गॅरीच्या ऑफीसमधल्या मित्राचा टाका भक्ती सोबत भिडवणार>>> आणि रेवतीचे गुप्तेबरोबर जमवणार हे परवाच्या धक्का एपिसोड वरुन वाटतय

सवत माझी लाडकी मधल्या रमेश भाटकर चा रोल निभावणार बहुतेक.>>> सवत माझी लाडकी मध्ये रमेश भाटकर होता? मी तर फक्त प्रशान्त दामलेला पाहील होत सिनेमात.

सवत माझी लाडकी मध्ये रमेश भाटकर होता? मी तर फक्त प्रशान्त दामलेला पाहील होत सिनेमात.>>>> मला वाटत , नीना चा मित्र वगैरे कोणीतरी होता .

हो सुलू रमेश भाटकर आहे सवत माझी लाडकी मधे, मोजोंचा मित्र आहे जो नीना कुळकर्णी सोबत बॅडमिंटन खेळतो
मेरे को और एक शक है की मनिष बॉसचा मुलगा आहे.

मेरे को और एक शक है की मनिष बॉसचा मुलगा आहे.>>> नाही, तो म्हणतोना मी मित्रान्कडून उधार पैसे मागून हे गिफ्ट घेतल होत म्हणून.

सुलू तो सुरुवातीला काहीही सांगेल नंतरचं जुगाड आपल्याला थोडंच माहीत आहे, आणि तसंही ही माझी केवळ शंका आहे.

पण बॉस तर कपुर आणि हा श्रेयस कुलकर्णी आहे ना, रमेश भाटकर मोजोचा मित्र दाखवलाय सवत मधे, नीनाचा नाही काही.

अरे त्या राधिकाला कोणी सांगा रे प्रत्येकवेळी किंचाळत बोलायची गरज नसते, आणि परतीची तिकीटं पुण्या मुंबईकडं असतात, विदर्भात वापसीची तिकीटं असतात

रमेश भाटकर मोजोचा मित्र दाखवलाय सवत मधे >>>> तोच तो, सुप्रसिद्ध, बर्फीचा ड्वायलॉग बोलणारा ....... Happy

'सवत माझी लाडकी' रमेश भाटकर मोजोंचा मित्र आणि नीनाचा दूरचा भाऊ दाखवलाय. ते नाते ती शेवटी उघड करते.

त्यात प्रशांत दामले गरीब बिचारा दाखवलाय. त्यावरूनच श्रेयसचे पात्र बेतलय.

आपल्याकडे सिनेमात किंवा मालिकेत कोणत्याही पात्राला शेवटी एकटे राहू देणे पाप समजले जाते. त्यामुळे जोड्या ह्या जुळवाव्याच लागतात. परवा अगणितव्यांदा 'कराटे कीड' बघितला. तो आपल्याकडे बनला तर जॅकी चॅनचे पात्र आणि ड्रेची आई यांची नक्कीच जोडी जुळवली असती Happy

नीनाचा दूरचा भाऊ दाखवलाय>>> मला नाही आठवत हे Uhoh

जॅकी चॅनचे पात्र आणि ड्रेची आई यांची नक्कीच जोडी जुळवली असती>>> Lol

जॅकी चॅनचे पात्र आणि ड्रेची आई यांची नक्कीच जोडी जुळवली असती>>> Rofl . पण मलाही हा चित्रपट बघताना अनेकदा असं वाटत Happy

तो आपल्याकडे बनला तर जॅकी चॅनचे पात्र आणि ड्रेची आई यांची नक्कीच जोडी जुळवली असती स्मित<<< Lol

मागे कुणीतरी कुठल्यातरी सिरेलीच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे नगाला नग असले म्हणजे झालं. Lol

ते ग्यारी चे वडील काल फोन वर तावातावाने बोलत होते कुणाशी तरी संत्र्यांच्या ऑर्डरी , मार्केट डिलिवरी वगैरे वर अजून ५-७ लाखांचे नुकसान झाल्याचेही सांगत होते .. तसेच नागपुरात बागायतदार म्हणून त्यांचे मोठे नाव आहे व तिथले नंबर एक चे सप्लायर असल्याचेही बडबडले ......

आता जरा पूर्वपीठीका बघुयात ...सुरुवातीच्या एपिसोड मध्ये राधिका आणि ग्यारीचा संवाद असा होता की नागपुरातलं चाळीतील घर तिथले लोकं किती छान होते वगैरे तसेच ग्यारी व त्याचा तो मित्र यांच्यामध्येही असंच बोलणं दाखवलेलं की तुम्हाला मी नागपूर पासून ओळखतो तू आणि वहिनीने चाळीत किती काटकसरीत दिवस काढलेत म्हणून ...

लेखक महाशय विसराळू आहेत का पांडू सारखे आपण आधी काय दाखवलंय हे लक्षातच नाहीय त्यांच्या .
नागपुरातल्या १ नंबर बागायतदाराचा पोरगा चाळीत राहील ?काटकसरीत दिवस काढेल ?
मग स्कोर्पिओ ,फोर्चुनर या गाड्या कोणी उडवायच्या, त्यांच्या गड्यांनी ?
तेव्हा नव्हत्या असं गृहीत धरलं तर बागायती काय अशा २-४ वर्षात उभ्या राहतात आणि डायरेक्ट १ नंबर ....
बर सासरेबुवांच सुनेवरच उतू चाललेलं प्रेम बघता ही पण शक्यता नाहीये की पोराला त्याने प्रेमविवाह केला म्हणून घराबाहेर काढलं होतं .. आधीपासूनच सूनबाई लाडक्या आहेत त्यांच्या ....

अवघ्या महिन्या भरात लेखकाला स्मृती भ्रंश झालाय .

राहुल एम, ..:-)
याच धाग्यावर पहिल्या काही पानांवर असं म्हटलय की गुरुनाथ गरीबीतून वर आलेला, चाळीत राहून वगैरे...याचा अर्थ आधी तसंच दाखविलेलं......

@ आंबट गोड............

हो ना तसच दाखवलंय आधी
थोडक्यात काय सिरीलीचे लेखक महाशय कन्फुज्ड झालेत अगदी .....

अवघ्या महिन्या भरात लेखकाला स्मृती भ्रंश झालाय .>>>>>>>>>चालायचेच इथे मोठं मोठे घोटाळे पब्लिक महिनाभरात, काही दिवसात विसरतात तर लेखकाला प्रेक्षकांना उल्लू बनवायला कितीसा वेळ किंवा एपिसोड लिहावा लागतोय. हा हा हा हा

स्वस्ति | 21 September, 2016 - 19:01
बाई इथे करते काय काहीच कळत नाही. त्यादिवशी तीला ऑडिट करायला दिले होते तर तो दाढीवाला मनीष मदत करतो.. त्याला येते ऑडिट करता इतके सोपे असते ऑडिट करणे ?????????? >> ज्या दिवशी काम दिलं , त्यादिवशी ती जेनीकडे मदत मागायला गेली होती. रिसेप्शनिस्ट पण करू शकते , त्याच्या हापिसात. स्मित
>>>>>>>>>>>>हेच तर, या सिरीयल रायटर लोकांना एखादा प्रोफेशन हिरोला किंवा हिरवीणीला द्यायचा असेल तर त्यांनी त्या प्रोफेशन बद्दल निदान माहिती काढावी अगदी खोलवर जमत नसेल तर जुजबी. एखाद्या ऍक्टर चा चेहरा अरेंडेल प्यायल्या सारखा म्हणून तो डॉक्टर कसा काय असू शकतो, एखादी मोठ्या तोंडाची वेड वाकड तोंड करून बोलणारी सासू किंवा वाहिनी, काळा, धिप्पाड देहयष्टी म्हणजे पोलीस (भले त्या कॅरेक्टरला ऍक्टिंग येवो किंवा न येवो) काही हि दाखवतात . कोणत्याही प्रोफेशनचा असा अपमान करणे कितपत योग्य ?

नागपुरातल्या १ नंबर बागायतदाराचा पोरगा चाळीत राहील ?काटकसरीत दिवस काढेल ?>>> maybe, असे असेल की गुरु राधिकाबरोबर मुम्बईत स्ट्रगल करायला आला असेल, तो मुम्बईच्या चाळीत राहत असेल आधी (मुम्बईच्या चाळीचा उल्लेख होता सिरीयली मध्ये )

जॅकी चॅनचे पात्र आणि ड्रेची आई यांची नक्कीच जोडी जुळवली असती>>>> Lol जावई विकत घेणे मात्र अपवाद होती. रायाचा काका ( कादिप चा नचिकेत) शेवटपर्यन्त एकटाच दाखवलाय त्यात.

तुम्ही जेनीच्या काउन्टरसमोरच्या भिन्तीवरची painting नोटीस केली का? राजस्थानी मोनालिसा!:अओ:

मन्या गण्या ऐकलं होतं पण शन्या ? Rofl

काल गुरुची आई छान बोलत होती.

शन्या presentation करणार? Uhoh मग तर आनन्दच आहे!

Pages