माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुनाथ उर्फ गॅरोबाला अभिनय जमतच नाहीये. बायको समोर आली की एकतर मख्खासारखा चेहेरा करतो, नाहीतर त्रासिक उद्धट भाव चेहेर्‍यावर आणतो. याच्यापेक्षा तो गुप्तेचे काम करणारा बरे भाव दाखवतो. दातेबाई कच्चा खाणार याला अभिनयात. ते शनाया पण काय ध्यान आहे, जेव्हा पहावे तेव्हा छोट्या चड्ड्या घालुन फिरत असते. कुणीतरी कपडे पुरवा तिला.

मेरील स्ट्रीप मिस्ट्रेस असते व
रोझान बार बायको. दिसायला साधी जाडी वगैरे. मग ती नवर्‍याचा सूड घेते.>>> अस कथानक आपल्याकडे का येत नाही? इथे तर नवर्याला पतीपरमेश्वरच दाखवतात. Angry

पुरुषाला (स्त्री सुद्धा पण इथे मोजो आहे म्हणून पुरुष) आपण अजुनही कोणाला आकर्षक वाटतो का हे आजमावतो. असे काही वाटले की खूष होतो. तारुण्य टिकवण्याची धडपड करतो.

मोजो मुळात स्त्री लंपट नाही. कुटुंब वत्सल आहे. बायको-मुलींवर त्याचे प्रेम आहे. म्हणूनच नीना त्याला एवढ होऊनही समजुन घेते. >>> पण हेच जर स्त्रीने केले तर तिचा नवरा तिला समजून घेईल का? नाही.

पण हेच जर स्त्रीने केले तर तिचा नवरा तिला समजून घेईल का? नाही.>>> सुलु तो सिनेमा आहे. खर्या आयुष्यात बायको त्याच्या बरोबर राहिली तर ती बहुदा समाजाला / किंवा इतर अनेकांना घाबरुन राहिल. समजुतदार पणे त्याला माफ करुन नाही.

खर्या आयुष्यात बायको त्याच्या बरोबर राहिली तर ती बहुदा समाजाला / किंवा इतर अनेकांना घाबरुन राहिल. समजुतदार पणे त्याला माफ करुन नाही.>>> सहमत

Shanaya ya agodar Poster Girl Madhe disli >>> कोण आहे त्यात ?

ती कधी कधी छान दिसते सिरियल मध्ये पण . परवा भक्ती बरोबर शॉपिन्गला जाताना मस्त वाटत होती.

मला त्या शनाया मधे त्या पिंजरा सिरियलमधल्या हिरविणीचा भास होतो, हसताना किंवा नाक उडवताना.

शनाया नेहमीच म्हणते ना की,"कुणाचेही कुणावर प्रेम नसत. माणूस फक्त स्वतःवर प्रेम करतो. इथे फक्त आपला फायदाच बघायचा असतो." तर तीच शनाया जेव्हा गुरु सर्वान्समोर सान्गतो की, माझे कुठल्याही मुलीशी सम्बध नाही, तेव्हा चिडून निघून जाते. हे तितकस पटत नाही. तिला वाईट वाटून काही घ्यायची गरज नव्हती. उलट तो ह्या रिलेशनबद्दल कुणाला काही कळू देत नाही हे पाहून तिला दिलासा वाटायला हवा. शनाया स्वतःच हे रिलेशन लपवायचा प्रयत्न करते ना? परवा ती कार्यक्रमातून अशी निघून गेली जस काय तीच खरच गुरुवर प्रेम आहे.

तीच शनाया जेव्हा गुरु सर्वान्समोर सान्गतो की, माझे कुठल्याही मुलीशी सम्बध नाही, तेव्हा चिडून निघून जाते. हे तितकस पटत नाही. >> एवढा विचार करणारी , समजुतदार अशी ती नाहिच आहे, तिला अतिशय मटेरियलीस्टिक दाखवलय, अगदी साध्या गोष्टीत सुधा तिला तिचा फायदा कसा होइल तिला कस पॅपर केल जाइल हे बघते.

अगदी साध्या गोष्टीत सुधा तिला तिचा फायदा कसा होइल तिला कस पॅपर केल जाइल हे बघते.>>> तेच तर म्हणतेय मी, जर तिला तिचा फायदा हवा आहे तर त्याच कोणावर प्रेम आहे की नाही हयाची कशाला काळजी करत बसली ती? तिला त्याच credit card मिळतय ना तेच पुरेस आहे की तिच्यासाठी. काल तर अशी वागत होती कि जशी की ती त्याच्यावर खोट प्रेम करता करता खरच त्याच्या प्रेमात पडलीये. अस कस बोलु शकते की, मी तुला तुझ प्रेम तुझ्या बायकोबरोबर वाटून घेऊ शकत नाही. तिच तरी कुठे प्रेम आहे गुरुवर?

काल जी विवाहबाहय सम्बधावर सिरियलमध्ये जी चर्चा चालू होती, त्याच्यात फक्त पुरुषच अश्या सम्बन्धान्त कसे गुन्तले आहेत हे दाखवले आहे. का? विवाहीत स्त्रिया असे रिलेशनशिप्स ठेवू शकत नाही का? हे सिरियल्स तयार करणारे newspapers वाचत नाहीत वाटत.

रच्याकने, रेवती इतकी बावळट कशी? तिने त्या दोघान्चा video फोनवर record करून राधिकाला दाखवायला ह वा होता.

सुलू....इतकं सिरीयसली नाही घ्यायचं त्या शनाया की फनाया कोणे तिला.... Happy
इतका विचार बहुधा लेखकही करत नसेल (नसेलच ! ) , म्हणूनच अशी विसंगती दाखवतात ना!!

मी तर भरपूर प्रेम करेन पण क्रेडिट कार्ड देणार नाही. म्हणजे नाही. गुरू मूर्ख आहे. शनाया उथळ आहे.

झी मराठी ला लोणावळा फेव्हरेट वाटते. गॅरी आणि शनाया जाणार आता. विक्रांत आणि मानसी जाऊन आलेत. का रे दुरावा आणि माझे पती सौभाग्यवती मध्ये ही लोणावळ्यालाच गेले होते.

सुलू....इतकं सिरीयसली नाही घ्यायचं त्या शनाया की फनाया कोणे तिला..>>> हल्ली शनायाच हे रिलेशन सिरीयसली घ्यायला लागलीये अस वाटायला लागलय मला.

इतका विचार बहुधा लेखकही करत नसेल (नसेलच ! ) , म्हणूनच अशी विसंगती दाखवतात ना!!>>> सहमत

अमा Lol

>> तिने त्या दोघान्चा video फोनवर record करून राधिकाला दाखवायला हवा होता.

मी सिरियल्स नाही पाहत पण हे वाचून उस्तुकता जाम चाळवली.

ही सिरियल मी येता जाता बघते. मध्येच काही हुकले तर साबांना विचारते.
तर परवाचा भाग मी बर्‍यापैकी बघितला हाॅल आणि किचनमधल्या दारात उभं राहून हे बहुतेक साबांना माहित नव्हतं. खुप वेळाने मी बाहेर जाऊन हाॅलमध्ये बसले तर साबांनी नेहमीप्रमाणे स्टोरी सांगायला सुरुवात केली, अगं त्या गुरुला सोसायटीने नोटीस पाठवली, गुरु तिला बच्चा, सोना, बेबी म्हणतो ना तसं म्हणायला बंदी केलीय त्याला. Uhoh मी पुढंच ऐकायला थांबलेच नाही तिथे किचनमध्ये जाऊन पोटभर हसून घेतलं. Biggrin

चार वर्षे प्रेम आणि मग लग्न .......पटत नाही. बर एकवेळ मानलं लव्हम्यारेज तर ह्या बुलीला कोणी सांगेल का कि बायका आपल्या नवर्याबद्दल लोक एव्हडं सांगत आहेत तर स्वतःला नाही पटले तरी मनात थोडातरी विचार करतील ना.इथे तसे काहीच दाखवत नाही.

शनाया म्हणजे रसिका चांगली गाते (गाणं गायलं तिने च ह ये द्या मध्ये), तबला पण वाजवते असं कळले तिच्या मुलाखतीतून.

Pages