माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्च्युली फक्त नाना-नानीच प्रेम उठुन दिसावं म्हणून त्या समिधाला ग्रे बनवलयं . सगळ्यात ती रेवतीच मस्त - तोड्फोड एक्दम ! आणि मला तो राधिकाचा भाउ पण आवडतो. रविन्द्र महाजनीसारखा दिसतो::)

अहो पण ही मालिका सुरु जहलीये अन घरोघरीच्या राधीका गुरुवर आगपाखड करण्याच्या निमित्ताने आपापल्या नवर्‍यांच्या नावे बोटे मोडून घेत अस्तात हो..... Sad

मला तो राधिकाचा भाउ पण आवडतो. >> किरण माने नाव त्याचं. छान काम करतो.

काल पळता पळता शनाया उडी मारुन रिक्षात बसते आणि म्हणते भैय्या जल्दी चलो... भैय्या पण काय पण न विचारता दुसर्‍या क्षणाला रिक्षा चालू करुन निघतो. Wink
राधिकाचा धक्का लागून बिचार्‍या दुधवाल्याचं दुध सांडलं सगळं. त्याचं कोणालाच काय नाही का? Happy

राधिकाचा धक्का लागून बिचार्‍या दुधवाल्याचं दुध सांडलं सगळं. त्याचं कोणालाच काय नाही का?>>> तो दुधवाला पण राधिकाचीच काळजी करत होता, चक्कर आली असं. आधी तो बडबडला पण त्याला कळलं की तिची चूक नाही. मला मात्र हळहळ वाटली, त्याचं नुकसान झालं.

आज कुणा पोलिस बाईच्या घरात दिसली ती राधिका तिला काय शन्याला मारल्याबद्दल अटक केली की कॉय???>>> ती बकुळाची मुलगी प्रज्ञा आहे. राधिका रस्त्यावर पडली, तिच औषधपाणी करण्यासाठी तिला आपल्या घरी घेऊन गेली. आता ती तिथेच राहणार आहे.

ती प्रज्ञा पण इतकी मवाळ का बोलते पोलिस असूनही? "जाऊ दया राधिकाताई, काळ हाच यावर उपाय आहे. एक दिवस गुरुनाथना त्यान्ची चुक कळेल आणि ते तुमच्याकडे नक्कीच परत येतील." खर तर तिने कडक शब्दात म्हणायला हवे होत," अस कस कोणी तुम्हाला त्या घरातून हाकलू शकत? कायदयाप्रमाणे, नवर्याच्या घरावर त्याच्या बायकोचाही तेवढाच हक्क असतो. तिला तिच्या घरातून हाकलणे हा गुन्हा आहे. मी बघते ताई, कोण तुला तुझा हक्क मिळवून नाही देत ते."

खर तर राधिकानेच प्रज्ञाची मदत घेऊन त्या घरात घुसायला हव होत.

हो समिधा त्याला येउन म्हणते ,माझा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणून >>> समिधाच वागण मात्र कहर. कुठली सेन्सिबल बाई एखादया पुरुषाच्या एक्स्ट्रा मेरिटल अफेअर ला प्रोत्साहन देईल? आणि हि म्हणे practical विचारान्ची आहे.

मला ती राधीकाला watchman बोलते तेही आवडल नाही. जरी आपल्याला कुणी माणूस आवडत नसला तरीही त्याचा आपण हिणकस शब्दात अपमान मुळीच करत नाही. आणि ते त्याच्या तोन्डावर तर अजिबातच नाही.

ती प्रज्ञा पण इतकी मवाळ का बोलते पोलिस असूनही? "जाऊ दया राधिकाताई, काळ हाच यावर उपाय आहे. एक दिवस गुरुनाथना त्यान्ची चुक कळेल आणि ते तुमच्याकडे नक्कीच परत येतील." >>>> अरे बापरे ! कठिण आहे एकंदरीतच .

ती राधिका परवा विचार करत होती , मी घरी कशी जाउ ? यांनी जी लक्षमण रेषा आखून दिली आहे आहे ती मी ओलांडू शकत नाही. काही झाल तरी ते माझे पति आहेत. नवर्याचा शब्द मोडणं बाईला नाही शोभतं .

उठाले रे बाबा उठाले !!!!

मला बर्याचदा ही सिरियल बघताना वाटत..राधिकाला हकलुन देण्याआधी जेव्हा हे एकत्र राहात होते तेव्हा
त्यांच्यात काही फिजिकल रिलेशन होतं की नाही? मुलगा तर आहे.. पण तो अभिजीत असच तिच्याशी नीट बोलत नव्हता मग जवळ जाणे तर लांबच मग राधिकाला ते पण जाणवलं नाही का कधी..>>> तेच ना. सुरुवातीला मला ती दाग पिक्चरची स्टोरी वाटली. म्हणजे त्यात कस, राजेश खन्ना राखीशी लग्न करतो, ती मुलगी प्रेम चोप्राची असते. तस. पण तस तर काहीच नाही, मग गुरु आपल्याच मुलाला इग्नोर का करतोय?:अओ:

तो कधीही राधिकाकडे प्रेमाने बघत नाही. तिच्याशी प्रेमाने बोलत नाही, कधी रोमान्टीक होऊन तिला जवळ घेत नाही (तस नाटक सुद्दा कधी करत नाही) हे तिला सुद्धा जाणवत नाही ह्या गोष्टीच आश्चर्य वाटत. फक्त टायटल song मध्येच तो तिच्याकडे प्रेमळ gesture टाकतो. त्यान्च्या लवस्टोरीचा flashback सुद्दा दाखवला नाही. राधिकाच त्याच्यावर एकतर्फी प्रेम आहे अस वाटत सतत. गुरु आपल्याला गिफ्ट्स देतो म्हणजे त्याच खुप प्रेम आहे आपल्यावर अस राधिकाला का वाटत?

गुप्ते आणि रेवतीची जोडी जुळवणार ना? समिधा काही च्या काही कॅरेक्टर आहे. तिचा क्रश आहे का गुरुवर? बाईने ह्याव करावं, संसार म्हणजे त्याव असले डायलॉग्ज एकवत नाहीत.

आणि मला तो राधिकाचा भाउ पण आवडतो. रविन्द्र महाजनीसारखा दिसतो:स्मित >>> नो वे रविन्द्र महाजनी खुपच हॅन्ड्सम होता हा मलातरी त्याच्या जवळपास सुद्धा वाटत नाही.

हो पण अ‍ॅक्टींग चांगली करतो

चेहेरा रविंद्र महाजनींचा जास्त देखणा आहे, पर्सनॅलिटी गश्मीरची जास्त चांगली आहे. अभिनय, नाच यामधे बाबांपेक्षा भारी आहे तो. मला दोघंही आवडतात.

गश्मिर हँडसम आहे. अभिनय पण व्यवस्थित आहे (देऊळ बंद ) नाचतो पण चांगला ( वन वे तिकीट ) पण पिक्चर चालत नाहीत त्याचे. नशीब नशीब Sad

रविन्द्र महाजनी :डोळ्यात बदाम:
गश्मिर सुद्धा छान दिसतो तसा.>>> मला सुद्दा दोन्ही आवडतात >>> + १०००००००

पण त्या राधिकेच काय झालं ??

राधिका गृहउद्योग केंद्रात सुपरवायजर म्हणून कामाला लागली. तिला प्रज्ञाने तिच्यावरच्या अन्यायाची जाणीव करुन दिली.

अन्जूताई, मी पण त्याच मार्गाची वाट बघतेय. त्यासाठीच अधूनमधून बघतेय. नंतर कदाचित रेग्यूलर बघेन.

मला वाटतय राधिका आता मोठी उद्योजिका वगेरे बनेल. तिकडे गुरु शनायाच्या मागे फिरत नोकरी वगेरे गमाऊन बसेल. शनाया गुरुला टाटा करेल. मग ती सतीसावित्री राधिका गुरुला माफ करेल आणि शनायाला धडा शिकवेल.

अथर्व मला पण जाम आवडतो. क्यूट बडी.>> +१.

नताशा, असं नाही होणार कदाचित. राधिकाला तिच्या हक्काची जाणीव वगैरे होऊन ती घरी राहायला येईल आणि शनायाला सळो की पळो करेल असं दाखवतील, असं मला तरी वाटतंय.
अर्थात तू म्हणतेस तसंही दाखवू शकतातच पण मग ती टोटली चोथा झालेली स्टोरी आहे मला बघायला अज्जिबातच आवडणार नाही.

ती समिधा आहे तिचा नवरा पण दुसरीला आणेल किंवा आणल्याचे नाटक करेल असं पण दाखवतील नेहेमीचं चोथा झालेलं मग ती सुधारेल आणि राधिकाचं मन कळेल तिला वगैरे.

पण समहाऊ मला वाटतंय ह्या लोकांनी लक्ष दिलं तर एक चांगलं कथानक बघायला मिळेल, ती राधिका मस्त डावपेच टाकून दोघांना चितपट करेल. लेखक आणि दिग्दर्शक यांना खूप वाव आहे, त्यांनी तो करून दाखवावा. मग बघायला मजा येईल.

कालचा फोनवर बोलतानाचा सीन पाहिला. अनिता दाते काय भारी काम करते! गदगदून येणारा आवाज, त्यातून निर्धार दाखवायचा प्रयत्न... चेहर्‍यावरच्या बारीकसारीक छटा... तिनं नाटकांमधे काम करायला हवं असं वाटलं.

कालचा फोनवर बोलतानाचा सीन पाहिला. अनिता दाते काय भारी काम करते! गदगदून येणारा आवाज, त्यातून निर्धार दाखवायचा प्रयत्न... चेहर्‍यावरच्या बारीकसारीक छटा... तिनं नाटकांमधे काम करायला हवं असं वाटलं. + १११

Pages