फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पँट नेसणे या क्रियापदाला कारण आहे.
पारंपरीक भारतीय वेशभूषेत कमरेच्या इथली वस्त्रे नेसण्याची असत. नाडी बांधणे हे पण नेसण्यात मोजले जाई. त्यामुळे इंग्रजांच्या काळात कपडा बदलला पण क्रियापद बदलले नाही.>>>>>>>>>>>>>>>

नि मि पनवेलला रहाते, या भागात साडि नेसणे ला साडि लावणे असे बोलतात

साडी लावणे हे क्रियापद ठराविक प्रकारची नेसण असलेल्यां जातीजमातींमधेच म्हणले जाताना ऐकलेय. ज्या जातीजमातींमधे नऊवारी साडी ही गाठ बांधून आणि निर्‍या न घालता नेसली जाते ती प्रॅक्टिकली लिंपल्यासारखी किंवा अंगाला पाने लावल्यासारखी नेसली जाते. म्हणून ते साडी लावणे हे क्रियापद आले असणार.
माझी कातकरी मैत्रिण म्हणते असं. पण गंमत म्हणजे ती आता सहावारी साडी नेसते आणि नेसली असेच म्हणते आणि कातकर्‍यांची साडी लावली म्हणते. Happy

अंघोळीनंतर साडी व्यवस्थित न नेसता नुसती लपेटून बाहेर येणे याला साडी उभी लावणे असेही म्हणताना ऐकले असेलच. फंडा तोच आहे. कमरेवर गाठ बांधून, निर्‍या करून ते नेसणे, नुसतेच गुंडाळणे ते लावणे.

अंघोळीनंतर साडी व्यवस्थित न नेसता नुसती लपेटून बाहेर येणे याला साडी उभी लावणे

याच्यावरुन आठवले. आईने एकदा सांगितलेले की एक अख्खी नऊवार एका मुलीला देणे परवडत नसल्याने एका नऊवारीचे दोन तुकडे करुन ती आणि तिच्या बहिणी वापरायच्या. त्या प्रकाराला साडी उभी लावणे असे म्हणत. अर्थात आईच्या गावी ५० वर्षांपुर्वी हा शब्द प्रचलित होता, सगळीकडे तोच अर्थ असेल असे नाही....

तीच पद्धत साधना. अंघोळीनंतर उभे लावून बाहेर येण्यासाठी जुनी साडी अर्धी कापून वापरली जाई.

ओक्के.

मी तेव्हा आईला विचारलेले अर्धे म्हणजे काय पण आमच्या तेव्हाच्या चर्चेचा रोख साडी कशी नेसणे यावर नसुन काही वेगळा व्यक्तीगत होता, त्यामुळे आईने अर्धे म्हणजे काय, कसे नेसतात हे विचारुनही ते सांगायचे टाळलेले.

तीच पद्धत साधना. अंघोळीनंतर उभे लावून बाहेर येण्यासाठी जुनी साडी अर्धी कापून वापरली जाई.>>>

माझी आजी हा शब्द वापरायची.. "उभे लावणे" हा श्ब्द खुपच प्रचलित आहे आणि वरील अर्थच अभिप्रेत आहे...

अंघोळीनंतर साडी व्यवस्थित न नेसता नुसती लपेटून बाहेर येणे याला साडी उभी लावणे >>> हे माहीतीच नव्हते. Happy

@ अल्पना
हा पदर. ब्लाउजपिस रनिंगमध्येच आहे. लांब /थ्री फोर्थ बाह्यांचा, कॉलरवाला वैगरे ब्लाउज शिवावा का अश्या विचारात आहे.

खूप सुंदर साडी
मी तर ह्या साडी वर आतल्या माणसांच्या कपड्याचे रंग आहेत ना त्यातला कोणताही आवडेल तो रंग विथ black नाडी पायपिन लावून शिवला असता. स्लीवलेस सुद्धा मस्त दिसेल
रनिंग मधला नको शिवूस. overall look dull होईल. अर्थातच तू जे आवडेल तसा घे

चनस......सिंथेटिक परकर पण असतात फिश टेल शेप चे...त्यात साड्या मस्त फिटिंग मधे नेसल्यसारख्या दिसतात....
पण साडी जड / सुळसुळीत असेल तर सिंथेटिक परकर बघुनच घे.
खूप वेळ साडी नेसणार असशील तर गरम पण होते.

पु.ना.गाडगीळ आता ठाण्यात. राम मारुती वर जुन्या आय सी आय सी आय च्या जागी मार्च मध्ये सुरु होईल.

काल गोखले रोड वर मस्त साड्या पाहिल्या. एकदा धाड घातलीच पाहिजे. हस्तकला व पुढील तीन चार दुकाने.

निर्मल लाइफ स्टाइल मध्ये शॉपराइट च्या पायाशी उजव्या बाजूला हाँग कॉंग लेन सारखी दोन तीन दुकाने आहेत. तिथे टेराकॉटा व तत्सम ज्वेलरी उपलब्ध आहे. नॉट हाय फंडा पण एखाद्या ड्रेस / साडीवर मस्त जमून जाईल असे पीसेस आहेत. तिथले पीसेस आणि गोखले रोडावरची नवी साडी असे एक स्वप्न रंजन सुरू झालेच आहे.

नेसणे, लावणे असाच कसणे हा शब्दही वापरला जातो ना? कसणे म्हणजे घट्ट करणे. त्यामुळे कमरेशी घट्ट गाठ बांधून जे वस्त्र नेसायचं ते कसायचं. उदा धोतर कसणे.

नि मि पनवेलला रहाते, या भागात साडि नेसणे ला साडि लावणे असे बोलतात>>>>>>>>>>> हो अलिबाग ला ही काही ठिकाणी असं बोलतात मी ऐकलेय......

images1.jpg

सेम ईमेज बघुन मी कालच हे बनवलं....ब्लॅक साडी स्लीवलेस ब्लाउज वर मस्त स्टायलिश दिसतं.......फक्त बो खुप लहान बनवला.....

images2.jpg

हा प्रयत्न झाला पण फिनिशिंग चांगली आली नाही....मॉल मधे असले नेकलेस १५० पसुन मिळतात मी फक्त ३५ रु मधे बनवला.......अर्थात डिझाईन नेट वरुन घेउन....

images5.jpg

images7.jpg

वॉव अनिश्का.. आर्टिस्टिक झालेत नेकलेसेस.. ब्युटीफुल.. Happy
तो पहिला माझ्याकडेही आहे वेगळ्या रंगात.. स्वतः क्रिएट करायला मज्जा आली असेल नं..
जर्रा स्टेप बाय स्टेप दाखवशील??अर्थात तुझं ते ट्रेड सीक्रेट असल्यास नको देऊस.. इकडेही खूप प्रकारचे बीड्स मिळतात.. ट्राय करून पाहीन..

अग ते नेट वरचे डिझाइन आहेत..... तो निळा करायचा प्रयत्न केला आणि तो फसला.....पहिला काळा आहे तो बनवलाय अजुन हिरवा विथ क्रिस्टल बॉल्स बनवलाय ...आता तो बदामी बनवायचा आहे.....

बीड्स कुठल्याही नोवेल्टी मधे मिळतात... जिथे वुल, मणी, रंगीबेरंगी दोरे, रुखवताचे साहित्य मिळते अशा दुकानांमधे हे बीड्स मिळतात...

म्रुणाल २ च केलेत........अजुन काही डिझाएन बनवायच्या आहेत... पण सोप्प आहे...१० मिनिटात बनतात......स्वस्त आणि मस्त.....स्टायलिश Happy

जर्रा स्टेप बाय स्टेप दाखवशील??अर्थात तुझं ते ट्रेड सीक्रेट असल्यास नको देऊस>>>> वेडे सिक्रेट कसलं........मी फोटो काधले नाहि आहेत पण तुला नेट वरचे दाखवते...मी पण तिथुनच कॉपी केलय Wink

Pages