Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता शब्दांचा इतका उहापोह
आता शब्दांचा इतका उहापोह चाललाच आहे आणी गाडी शहरावर घसरली तर मला पुण्यात आल्यावर काहींचे शब्द एकून चक्कर यायची.. (आमच्या इंदोर मध्ये तरी नेमके शब्द वापरून मराठी बोलतात).
एक फोन टाक... एक फोन मार पोचलीस की... (फोन कर असे म्हणायला काय जड जाते का?)
वही भेटली... (ती कशी काय? हाक मारली की काय?)
तसेच ते धन्स,धन्यु वगैरे डोक्यात जाणारे आहे.
(बरं, वरच्या पोस्ट मधले शहराची नावं इतकी मनावर घेवू नका.... मी जे पाहिले ते लिहिले.
तसे बघायला गेलो तर नेमके शब्द न वापरून बोलणारी व्यक्ती कुठेही भेटते.)
बरे गाडी फॅशन वर सरकवा.. आता (तरी)
मोकिमी, विपु बघ.
मोकिमी, विपु बघ.
मोकिमी मेल चेक.
मोकिमी मेल चेक.
झंपे तु मला संपर्कातून ईमेल
झंपे तु मला संपर्कातून ईमेल करू शकशील काय? तुझी विपु आणि संपर्क दोन्ही बंद आहे.
झंपी, इंदोरमध्ये कुठे
झंपी, इंदोरमध्ये कुठे रहाते/रहायचीस? विपु बंद असल्याने इथे विचारतेय.
इकडे कोणाला "हटके" ओढण्या
इकडे कोणाला "हटके" ओढण्या घ्यायला आवडतात? मला खुप आवडतात.... मी बर्याचदा वेगवेगळ्या ओढण्यांचे मिक्स & मॅच करते....
मोकिमी मला पण खूप आवडतात
मोकिमी मला पण खूप आवडतात वेगवेगळ्या ओढण्या.. आणि एकदम लांब लांब.
पण इथे कायच्या कायच किंमती
पण इथे कायच्या कायच किंमती असतात. एका ड्रेसच्या किंमतीत एक ओढणी.
मी घेतल्या भारतवारीत वेस्टिन
मी घेतल्या भारतवारीत वेस्टिन च्या ' सोसायटी ' एग्झिबिशन मधून २५०० च्या पुढे प्राइस असलेल्या ओढण्या.
सब्यासाची साड्यां सारख्या आहेत , शिफॉन वर ब्रोकेड बॉर्डर , राजस्थानी मिनिएचर बॉर्डर, भरतकाम वगैरे केलेल्या.
अर्थात अशा ओढण्या टिकतातही
अर्थात अशा ओढण्या टिकतातही खूप...
टिकणे म्हणजे पार्टी वेअर
टिकणे म्हणजे पार्टी वेअर सारख्या वापरल्यावर रहातात नीट !
पोदडल्या तर लागेल वाट !
नताशा/दक्षे, विपू उघडली आहे.
नताशा/दक्षे, विपू उघडली आहे.
मी इंदोरला लहानपणी जायचे कारण आजोळ. आजी -आजोबा गेल्यावर तिकडचा जामाजुमा विकला आईने(ती एकटीच मुलगी असल्याने).. पत्ता नीट आठवत नाही पण विचारून सांगते.(पुढील गप्पा विपूत करुया).
अर्थात अशा ओढण्या टिकतातही
अर्थात अशा ओढण्या टिकतातही खूप...>>> +१
मी मग नाला साठी घोडा म्हणुन मग त्या भारी भारी ओढण्यांवर ड्रेस शिवते.... किंवा शोधात असते...
मला स्वतः ला नाजूक इंदूरी
मला स्वतः ला नाजूक इंदूरी किंवा इक्कत च्या ओढण्या फार म्हणजे फारच आवडतात...
कोणाला चांगल्या इंदुरी साड्या/ ओढण्या मिळण्याचं मुंबईतलं ठीकाण माहित आहे? पुण्यातही चालेल....
मी मग नाला साठी घोडा म्हणुन
मी मग नाला साठी घोडा म्हणुन मग त्या भारी भारी ओढण्यांवर ड्रेस शिवते.... किंवा शोधात असते...>>
माझं उलट झालय.. मी सिल्क कुर्तीज घेतल्या आहेत पण मला तयार सिल्क चुणीदार मिळ्त नाहीय.. शिवुन घेण्यासाठी मॅचिंग सिल्क कुठे मिळेल पुण्यात?
मोकीमी, मप्र
मोकीमी, मप्र हँडलुम/हँडीक्राफ्ट साठी मृगनयनी स्टोअर असतं. तिकडे मिळेल बघ.
ही लिंकः http://www.mrignayani.com/index.aspx
पुण्यात इशान्या मॉलमध्ये त्याम्चं एक आउटलेट आहे.ते बरेचदा बंदच असतं पण..
वा! साड्यांची मस्त माहीती
वा! साड्यांची मस्त माहीती मिळतेय. लग्नानंतर मी एक हि साडी विकत घेतली नाही , पेक्षा विकत घ्यावी लागली नाही. कोणत्या ना कोणत्या समारंभात वैगरे खूप साड्या मिळाल्या/मिळतात. आता तर मी सगळ्यांना सान्गून ठेवलय की आईंनाच साडी द्या पण मला नको . त्यामुळे मला साड्यांचे प्रकार वैगरे ओळखता येत नाहीत . दिलेल्या साड्या पण जवळच्या लोकांनी दिल्यामुळे चांगल्या आहेत. प्रकार कोणता (बनाना सिल्क , सेमी पैठणी इ.) हे मला साबांकडूनच कळते.
नवर्याचे आजोळ कोल्हापूर असल्यामुळे लहान सहान प्रसंगाना साड्या (आता ड्रेस) दिल्या जातात.
तिथेच मी लुगडं हा प्रकार बघितला. खूप छान वाटते निसल्यावर. तिकडे मामी हिरवे लुगड निसतात ते काय मस्त वाटतं. पुढ्च्या कोल्हापूर भेटीत घ्यायचे ठरवले आहे.
त्याच प्रकारे मला गढवाल साड्या आवड्तात.
सध्या इतकेच.
मी मग नाला साठी घोडा म्हणुन
मी मग नाला साठी घोडा म्हणुन मग त्या भारी भारी ओढण्यांवर ड्रेस शिवते.... किंवा शोधात असते...>>
माझं उलट झालय.. मी सिल्क कुर्तीज घेतल्या आहेत पण मला तयार सिल्क चुणीदार मिळ्त नाहीय.. शिवुन घेण्यासाठी मॅचिंग सिल्क कुठे मिळेल पुण्यात?
सिल्क चुणीदार generally शिवत नाहीत कारण ते शिवणीत लवकर फाटतात.
हवेच असतील तर cotton सिल्क चे शिवा.
cotton silk / pure silk लक्ष्मी रोड वर matching Blouse piece मिळतात तिथे मिळेल.
Hy Fashion मध्ये सिल्क चे तागे असतात. खालच्या & वरच्या दोन्ही दुकानात चेक करा.
नाहीतर campमध्ये clover center मध्ये सिल्क नाहीतर तत्सम काहीतरी मिळण्याची शक्यता आहे.
धन्यवाद मृणाल१.. बघ्ते तिथेच
धन्यवाद मृणाल१.. बघ्ते तिथेच
इकडे कोणाला "हटके" ओढण्या
इकडे कोणाला "हटके" ओढण्या घ्यायला आवडतात? >> मलाही!!! प्लेन कुर्ता पायजमा असेल तर त्यावर अशी भरजरी ओढणी मस्त वाटते.
मोकीमी कुठे घेतेस "हटके" ओढण्या ??
@dreamgirl पुण्यात असलीस
@dreamgirl
पुण्यात असलीस तरcamp clover center ला जा. छान छान ओढण्या आहेत.
matching नाही मिळाली तर मटेरियल पण मिळते . बोर्डर, लेस ,पण तिथेच मिळतात, लावून पण लगेच देतात. सकाळी दिली तर संध्याकाळी हातात. हव असेल तर dying पण करून देतात Dying मात्र १-२ दिवस घेतात. Shade card वरून हवा तो रंग सांगू शकतेस
ठाण्याला स्म्रुति' ज क्रियेशन
ठाण्याला स्म्रुति' ज क्रियेशन पाच पाखाडी किंवा मालविका पाच्पाखाडी, पवई मधे सीमाज कलेक्शन ( खुप सुरेख)
अच्छा धन्यवाद मृणाल आणि मीरा!
अच्छा धन्यवाद मृणाल आणि मीरा!
ठाण्यात Binny silk साडी कुठे
ठाण्यात Binny silk साडी कुठे मिळेल्?मला खुप आवडते ही साडी , पण फक्त Plain पान असलेली मिळतच नाहिए,ह्या आधी परेळला महाराणी मधे मिळाली होती.ठाण्यात दुकानदारांनी हा सिल्कचा प्रकारच नाही फक्त मिलचे नाव आहे आणि ती मिल बंद पडली आहे असे सांगितले.
ती मिल बंद पडली आहे असे
ती मिल बंद पडली आहे असे सांगितले>>>
हे मात्र खरं आहे... कारण ह्या संदर्भात मी काही काम केलेले आहे.. त्या मुळे मील बंद पडली हे नक्की... आता तो ब्रँड त्यांनी कोणाला विकला असेल तर कल्पना नाही... असं होवु शकतं... साधारण बंद पडलेल्या कंपन्यांचे ब्रँड खुप कमी गुडवील मधे विकत मिळु शकतात. त्या मुळे साउथ मधे कुठे हा ब्रँड विकला जायची शक्यता आहे...
हिंदमाता ला पाहिलं पाहिजे. महाराणी किंवा आसोपालव मधे... त्यांच्याकडे दुनियेतल्या सगळ्या ब्रँड च्या साड्या मिळतात... नाही तर दादर टी.टी. ला सिल्क म्युझियम कडे....
कारण ह्या संदर्भात मी काही
कारण ह्या संदर्भात मी काही काम केलेले आहे.. त्या मुळे मील बंद पडली हे नक्की
ओह्ह्ह्.....माझ्याकडे जी जुनी
ओह्ह्ह्.....माझ्याकडे जी जुनी आहे ती छान मंद आकाशी रंगाला पांढर्या रंगाच्या सिल्कचीच अर्ध्या ईंचाची बॉर्डर असलेली आहे,Dry Clean वाल्याने पुर्ण खराब करुन दिली आणि आता तशी साडीच मिळत नाहीए.Anyways मी परत महाराणी/आसोपालव चेक करेन.
साधना... हुश्शारहो आमची
साधना...
हुश्शारहो आमची लेक...
छान शब्दात पकडलेस हो मला.... मी काम केले म्हणुन नाही बंद पडली बीन्नी.....( गुड वन ).. हा हा हा
मीराधा मी महाराणीत विचारुन
मीराधा मी महाराणीत विचारुन सांगते तुला.
गेल्या रविवारी प्रगती मैदानात
गेल्या रविवारी प्रगती मैदानात गेले होते. तिथून परतताना तिथे सुरु असलेल्या हँडलूम साडी प्रदर्शनाला भेट दिली. बंगाल आणि झारखंडचे खूप स्टॉल्स होते. एका पेक्षा एक सुरेख साड्या, ओढण्या आणि स्टोल्स. ज्युट सिल्क, कॉटन सिल्क मध्ये अतिशय सुंदर प्रकार होते तिथे. कांथा मध्ये पण नविन प्रकार दिसला. कांथा वर्क विथ हँड पेंटेड डिझाइन्स. आणि मधुबनी पेंटींग असतात तश्या टसर सिल्कमधल्या साड्या अगदी अहाहा होत्या. ७०००+ किमतीच्या होत्या त्या मधुबनी साड्या. पुढेमागे एखादी तशी साडी घ्यावीच.
मी बंगालच्या स्टॉलवरुन ३ साड्या घेतल्यात. (एक माझ्यासाठी, एक आईसाठी आणि एक जावेसाठी) जमलं तर इथे फोटो टाकेनच.
Pages