Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इट्स जस्ट बोलीभाषा.
इट्स जस्ट बोलीभाषा. प्रत्येकाची वेगळी <<
असे नाहीये.
मांडचोळणा म्हणजे सलवार का? <<
नाही. मांडचोळणा हे पुरूषांचे वस्त्र होते. मराठा आणि पेशवाई कालखंडात मावळ्यांचे लढाईवर जाताना विशेषतः वापरायचे हे वस्त्र. सलवारीसारखेच परंतु गुडघ्याच्या किंचितसेच खालीपर्यंत एवढी लांबी. गुडघ्याखाली नाडीने पायालगत घट्ट केले जाई.
म्हणजे त्यावेळची थ्री फोर्थ
म्हणजे त्यावेळची थ्री फोर्थ का?
थ्री फोर्थ आणि हाफच्या मधे.
थ्री फोर्थ आणि हाफच्या मधे. गुडघ्याच्या खाली, पोटरीचा गोलावा चालू व्हायच्या आधी जो भाग असतो तिथे नाडीने घट्ट करायचा.
काचलेलं धनगरी धोतर जसं असतं तसा प्रकार दिसतो.
आलं लक्षात!. नीधप धन्यवाद.
आलं लक्षात!. नीधप धन्यवाद.
sigh ....घालणे नेसणे ह्या
sigh ....घालणे नेसणे ह्या गोष्टींवर फारच चर्चा झाली बुवा....
मला नक्की काय म्ह्णायचे होते ते सर्वांना कळले म्हणजे झाले ... शेवटी interaction म्हणजे काय ?? एकमे़काची भाषा एक दुसर्याला कळणे...बहिरे मुके आंधळे असणारे देखील बोलतातच न खाणाखुणा अथवा दुसर्या माध्यमातुन .. कुणी काही मत मांड्ले की त्याला मुर्ख ठरवुन त्यावर हल्ला करुन त्या व्यक्तिला तुझे मत तुझे लिखाण etc किती वाइट ... किती निर्बुध... असे काय काय ठरवायची इथल्या काही काही व्यक्तिंना सवय आहेच .. जाउ द्या ...
<<<<<<<<<खुद्द तमिळनाडूमधेदेखील उत्तम कांजीवरम याच रेंजमधे मिळते. कांजीवरम ही प्युअर सिल्क (शुद्ध रेशीमपासून) बनलेली असल्याने महागच असते. कृत्रिम सिल्कमधे स्वस्तातल्या साड्या मिळतात पण मग ती "शान" येत नाही.>>>>>>>>>>.
हो नंदीनी मला माहित आहे हो ... काय आहे न ... खुद्द तमिळ्नाडु मधे जी कांजिवरम मिळते ते इथे मुंबई मधेय येइ अर्यन्त < one key is not working on my com so aryant disat aahe .. otherwise again new debate on this word .. so ..> ते सुद्धा नल्ली मधेय ... थोडा का होइना रेट वाढवणारच की हो ... म्हणुन मी विचरले होते की कुणी घरगुती ......
नेसणे-घालणे>>>> इट्स जस्ट
नेसणे-घालणे>>>> इट्स जस्ट बोलीभाषा. प्रत्येकाची वेगळी स्मित >>>>>>>
exactlly smit...
नीधप, मी तुझी पंखा गं
नीधप, मी तुझी पंखा गं आजपासून!
इतकं उत्तम विश्लेषण दिलंयस ना!
बापरे. यापुढे या धाग्यावर
बापरे.
यापुढे या धाग्यावर काहीही लिहिण्यात अर्थ नाही एवढेच कळले.
चालू द्या.
(भानुप्रिया, तुझ्या पोस्टसाठी हे नव्हते )
मी गौरी, बोलीभाषा असली तरी
मी गौरी, बोलीभाषा असली तरी वाचताना ते डोळ्याला खटकतं आणि म्हणून ह चर्चेचा उहापोह (झाला असावा, असं मला वाटतं)
जरी मुख्य उद्देश समोरच्या पर्यंत आपल्याला हवी ती गोष्ट पोचवणं इतकाच असला तरीही (उत्तम भाषिक साधनं उपलब्ध असताना) तो योग्य भाषेत पोहोचवला जाण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. (हे मा वै म)
कांजीवरम (ओरिजिनल) ही साडी
कांजीवरम (ओरिजिनल) ही साडी जीओग्राफिकल इंडिकेशन लेबल आणि सिल्क मार्कच्या असतात. त्यामुळे त्यांची किंमत ही जास्त असणारच. स्वस्त म्हणजे फारतर पाचशेहजारचा फरक पडेल. त्याहून जास्त नाही चेन्नईच्या नल्लीजमधे आणि मुंबईच्या नल्लीजमधे बघूनच सांगत आहे. स्वस्त साड्या इकडे प्रचंड स्वस्त मिळतात. (रू पाचशे ते अडीच हजार दरम्यानच्या) पण महाग साड्या इकडेही महागच मिळतात पण साड्यांच्या ऑथेंटीसीटीची गॅरंटी असते. घरगुती विकणार्यांनी तुम्हाला साध्या खोट्या सिल्कच्या साड्या विकल्या तर तुम्हाला ते लक्षात येइल का? नीधपसारख्या जाणकारांना अशा साड्यांमधला फरक लगेच लक्षात येतो. आपल्यासारख्या सामान्यांच्या लक्षात येत नाही.
नंदिनी .. मी १०००/६०० च्या
नंदिनी .. मी १०००/६०० च्या फरका बद्दलच विचारत होते ...मला देखील माहित आहे की १०००० ची साडी २००० ला कुणी देणार नाही ... आणि घरगुती विकणारे सर्वच फसवणारे नसतात हो .....फरक समजण्यासाठी अनुभव देखील उअयोगात येतोच ..<<<<<<.स्वस्त म्हणजे फारतर पाचशेहजारचा फरक पडे>>>>>......
तेच तर न ... आअल्यासारख्या सामान्य माणसांना १००० रु वाचवता आले तर चांगलेच न ... असो ...
बरं, तुमचंच बरोबर आहे. समोरचा
बरं, तुमचंच बरोबर आहे. समोरचा काय म्हणतो ते ऐकून न घेणे हा तुमचा युएसपी दिसतोय.
हजार रूपये वाचवायच्या नादात १०००० ची साडी ९०००ला मी तरी घेणार नाही, ऑथंटिक लेबलशिवाय. तुम्ही घ्या कुणाकडून पण विकत, वाचवा तुमचे पैसे. फसवले गेलात तर इथे अवश्य लिहा बरं का!!!
बाकी, मुझे की फरक पैंदा? मी तर चेन्नईमधेच आहे.
हा धागा ... मला वाटत फॅशन
हा धागा ... मला वाटत फॅशन विषयी आहे .. तेच चालु द्या हो .. व्याकरण .. शुध्लेखन .. नविन धागा उघडा .. आणि जाणकारांना चालवायला सांगा बाबा .. आम्ही अजाणकार अती सामान्य माणसे येतोच शिकायला...
आता थांबाव ह्या चर्चेला .. असे मला वाटते ..
व्याकरण .. शुध्लेखन .. नविन
व्याकरण .. शुध्लेखन .. नविन धागा उघडा >> भाषा ग्रूप http://www.maayboli.com/node/2176
इथे व्याकरण, शुद्धलेखन, योग्य मराठी शब्द सांगा, शब्दोत्पत्ती असे अनेक धागे वाचावयास मिळतील.
अरे ला का रे .. आणि कुणाच्या
अरे ला का रे .. आणि कुणाच्या तरी वाक्याला री ..... कायम....
मी गौरी +१ नेसणे-घालणे>>>>
मी गौरी +१
नेसणे-घालणे>>>> इट्स जस्ट बोलीभाषा. प्रत्येकाची वेगळी स्मित >>>>>>>अनुमोदन.
शुद्धलेखनाबाबत चर्चा सुरु
शुद्धलेखनाबाबत चर्चा सुरु आहे..माझेही दोन पैसे...
मी ठाण्यात होते आणि मला ऐरोळीला पिकअप साठी गाडी येणार होती...मी एरोली असा उच्चार केला आणि ४-५ जण हसले जोरात्...माझ्या उच्चारला....मग मी विचारले, की माझे काही चुकले का? तर एकाने सांगितले, उच्चार चुकला...मग मी ऐरोळी असा बरोबर उच्चार केला.....
त्यानंतर विचार केला...जुन्या "हिंजवडी"गावाच्या (ज चा उच्चार जहाजातल्या "ज" प्रमाणे) नावाचा अत्यंत चुकीचा उच्चार खुद्द पुण्यातले मराठी लोक इतरांचे ऐकून हिंजेवाडी असा करतात. (हिंजेवाडी -इथे जे चा उच्चार "जेवण" मधल्या जे प्रमाणे) व हळूहळू त्याचा अपभ्रंश होवून मूळ उच्चारच हिंजेवाडी असा होतो तेव्हा मूळ उच्चार बरोबर करणार्यांना जे वाटते ती कळकळ साडी घालणे व नेसणे ह्यात होते..भावनाओंको समझो....
<<<मूळ उच्चार बरोबर
<<<मूळ उच्चार बरोबर करणार्यांना जे वाटते ती कळकळ साडी घालणे व नेसणे ह्यात होते..भावनाओंको समझो..>>>
अगदी निरागस question... ह्यात लगेच डीबेट नको बाबा ... Discussion forum ki Debate गोंधळ होतो माझा बिचारीचा कधी कधी ...
असो ..
मुळ उच्चार म्हण्जे नक्की काय ? कुणी अस्तित्वात आणले ?? मग सगळीकडे बोलीभाषा वेगवेगळी का ??
मग एकिकडे अमुक शब्द बरोबर .. तर तोच दुसर्या भागात वेगळा उच्चारला जातो .. मग हे बरोबर ते चुक असे कुणी ठरवले ??
बोलीभाषा इतकी गोड आहे न .. दर २४/२६ कि मी वर उच्चार बदलतात ...भाषेचा हेल बदलतो .. मग नक्कि कुठली शुध्ह आहे ?
देवाची puja ... ह्यातल्या ज चा उच्चार बरेच लोक २ prakaare करतात .. < कबूतर जा जा जा .. mpk तील गाणे.. आणि तु जा ...
नेसणे घालणे ह्यावर इतकी चर्चा
नेसणे घालणे ह्यावर इतकी चर्चा तर माझा अजुन एक question ..
इथे मी तुझी pankha आहे वगैरे असे किती तरी शब्द बोलले जातात .. आणि वाचुन वाचुन ऐकुन ऐकुन तेच बोलण्यात देखील येतात .. मग .. pankha असे बोलले म्हणजे ती व्यक्ती दुसर्या व्यक्तीला हवा देते का ??
इतके शुद्ध बोलण्याचे इथे नियम आहेत तर मग ही slang language kaa use keli jaate ??
नाही म्हणजे इथे काही लोकांच्या डोळ्यांना त्रास होतो न वाचायला अशुध म्हणुन लिहिल ... असो ..
मी गौरी, नीधपला भाषेच्या
मी गौरी, नीधपला भाषेच्या शुद्धाशुद्धतेबद्द्ल बोलायचंय असं वाटंत नाही, तर ती नेमकेपणाबद्द्ल बोलतेय. उदाहरणार्थ -- खाणे हे क्रियापद घ्या. खाणे म्हण्जे तोंडात काहीतरी टाकणे आणि ते पोटात जाणे. आपण पोहे खातो, भात खातो, पण ताक पितो, चहा पितो. बेसिक क्रिया तीच---तोंडात काहीतरी टाकणे आणि ते पोटात जाणे. मग ही वेगवेगळी क्रियापदे का? तर खाणे हे क्रियापद दातांनी चावाव्या लागणार्या गोष्टींसाठी आहे व पिणे हे क्रियापद दातांनी चावायची गरज नसणार्या गोष्टींसाठी आहे. हा आहे भाषेचा नेमकेपणा. नीधपला "नेसणे" आणि "घालणे" या क्रिया वेगळ्या आहेत(फायनल रिझल्ट एकच असला तरी) हे सांगायचं असावं. ही आहे आपल्या भाषेची समृद्धता. हे इथे मराठी भाषेच्या फोरम वर सांगायचं नाही तर कुठं सांगायचं?
तसंच इथे इतर भाषांचा वापर वगैरे मुद्दा नाहीये हे लक्षात घ्या.
कांजीवरम घातली होती म्हणू नका
कांजीवरम घातली होती म्हणू नका हो. साडी नेसतात, शिवलेला कपडा घालतात.
<<<
श्र आणि नी ला प्रचंड अनुमोदन :).
SIGH... ......
SIGH... ......
डिजे, शुगोल.... जाऊद्या..
डिजे, शुगोल....
जाऊद्या..
अरे बस करा आता ...फॅशन कडे
अरे बस करा आता ...फॅशन कडे वळा आता .... हे discussion व्याकरणाच्या धाग्यावर continue करु यात ..
त्यापेक्षा तुम्ही मान्य करून
त्यापेक्षा तुम्ही मान्य करून साडी नेसली का म्हणत नाही?
एखाद्याला आपली चुक सापडली तर आपण कबूल करावी
असो
साडी नेसण्यावरून पुढे सरकावं आता
अरे देवा, रिया मग काय करावं
अरे देवा, रिया मग काय करावं पुढे ?
चावट्ट आहेस.
साती नेसण्यावरून पुढं
साती
नेसण्यावरून पुढं सरकायचंय
तर विषय होता ... तुमची आवडती
तर विषय होता ... तुमची आवडती साडी कुठली ?? silk cotton handloom etc ....
का तिच्या एकटिच्या मागे आहात
का तिच्या एकटिच्या मागे आहात सगळे मिळुन साडि नेसण्या/घालण्यावरुन. या आधिचे याच बाफ वरिल पोस्ट वाचा सगळे. बर्याचदा साडि घालण्याचा उल्लेख सापडेल बाकिच्या आयडिनी केलेला! अजुनही बरेच पोस्ट मिळतिल मायबोलिवरच ज्यावर तुम्हाला साडि घालण्याचा उल्लेख सापडेल. आता हे इथे थांबवुन फॅशनची चर्चा सुरु करा बरे!
मला इरकल अजिब्बात आवडत नाही.
मला इरकल अजिब्बात आवडत नाही. नेसायला किंवा घालायला
Pages