फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण इरकल नाही आवड्त !
चौकटीची प्रिंट वाल्या पारंपारीक साड्याही नाही आवडत!
पैठणी खूप आवडते पारंपारीक मधे , पण बादला वर्क केलेली पैठणी नाही आवडत!
नारायण पेठ साड्या पण नाही आवडत.
समहाउ नारायण पेठ , इरकल या साड्या आज्जी लोकांनी नेसायच्या साड्या आहेत असा लहानपणापासून झालेला गैरसमज अजुन कायम आहे!
कॉटन च्या कडक साड्या दुसर्यांनी नेसलेल्या आवडतात.
साड्या नेसायच्या पध्दतीत मला स्वतःला नौवारी आणि गुजराथी स्टाइल नाही आवडत.
साधी सहावारी आणि बंगाली स्टाइल आवडते.

चौकटीची प्रिंट वाल्या पारंपारीक साड्याही नाही आवडत!
समहाउ नारायण पेठ , इरकल या साड्या आज्जी लोकांनी नेसायच्या साड्या आहेत असा लहानपणापासून झालेला गैरसमज अजुन कायम आहे!>>>सेम पिंच डीज्जे.

नारायण पेठ मात्र लग्नानंतर ठीक वाटायला लागली. माझे सासरे नारायणपेट चे आहेत त्यामुळे तिथे जाउन पण आलेली आहे. माझ्या कडे एक काळ्याला ऑरेंज काठ वाली मस्त नारायणपेठ आहे.

हो खरय तशी अगदीच प्लेन असते बॉर्डर ती. माझ्या त्या साडीचा फोटो असता तर बरं झालं असतं. काहीतरी वेगळं आहे असं वाटतय.
डीज्जे तुला शिवांगी बहिरट आठवते का? तिच्या लग्नात मी ती साडी नेसले होते त्यानंतर कधी नाही Happy

डीजे, तुझ्या पूर्ण पोस्टला १०० अनुमोदक Happy , मागे दागिन्यांबद्दल लिहिले होतेस, ठुशी इ. , त्याला सुद्धा जबरदस्त अनुमोदन Happy मला सोन्याचे दागिने प्रचंड आवडतात, पण पारंपारिकमधले कोणतेच स्वतः घालायला आवडत नाहीत. ज्यांना सूट होतात, त्यांना त्यात बघायला छान वाटते :). गाडगीळांचे काही नवीन पॅटर्न्स खूप आवडलेत. हिरे मात्र नेहमीच आवडत आलेत, माझं कलेक्शन फारच कमी आहे अजून Proud

इरकल मला काकू/आजी टाईप बायांनी नेसायच्या साड्या वाटतात हे माझे प्रा. म. आ. Proud
पैठणी ओवरहाईप साडी आहे.

कलकत्ताच्या कितीतरी साड्यांचे सुंदर प्रकार आहेत. ढाकाइ, जम्दानी वगैरे खूप छान वाटतात बंगली पद्ध्तीने'च' नेसले की.

हि साडी व ब्लॉउज दोन्ही मला खूप आवडले,
http://selfstylist.files.wordpress.com/2011/09/bipashabasu1.jpg

हो शूंपे, शिवांगी आणि तिचा नवरा पण माहितेय .
संपदा :).
वरची बिप्स ने नेसलेली साडी आणि तिचा लुक चांगला दिसतोय.

नारायण पेठ साड्या पण नाही आवडत.
समहाउ नारायण पेठ , इरकल या साड्या आज्जी लोकांनी नेसायच्या साड्या आहेत असा लहानपणापासून झालेला गैरसमज अजुन कायम आहे.
>>>>>>>>>> खूप अनुमोदन !
मला स्वताला ह्या साड्या बोर वाटतात.

३,४ वर्षांपूर्वी माबो ची मेंबर बनले आणी पहले पहले नी ला भेटले ..तिने ऑन लाईन नऊवार कशी नेसायची याचे सविस्तर धडे दिले होते मेहनतीने आणी तिने कळकळीने तेंव्हा 'नेसणे' आणी घालणे यातला फरक समजावून दिला होता,तो डोक्यात पक्का बसला गेलाय ..आता चुकीचा शब्द कुणी वापरला तर कानाला भयंकर त्रासदायक होतं.. असो... समझ अपनी अपनी.. !!!

अब आगे बढो..
आत्ताच्या ट्रिप मधे पाहिलेल्या टीवी सिरिअल्स मधल्या चकमक टिकल्या लावलेल्या,भयाण जरीच्या नायलॉनिश साड्या अजिबात आवडल्या नाहीत..

मला पर्सनली.. पैठणी,चंदेरी, क्रेप सिल्क,प्युअर शिफॉन ,बंगाल कॉटन फार आवडतात..

वर्षु, दे टाळी....मला पण अजूनही पैठणी, नारयण पेठी, इरकल (सिरिअलवाल्यांनी अतोनात वापरुन बोअर केल्यात ते जौद्या), कलकत्ता, ढाका कॉटन फार आवडतात. आणि हो..इंदुरी साडी...चौकटी चौकटीचे सेल्फ प्रिंट व १ इन्चाची सोनेरी बॉर्डर् ह्या अजूनही आवडतात्..थोडक्यात्..कॉटन व सिल्क झिंदाबाद्...बाकी झगरमगर बघायलाही नाही आवडत्...वय झाले म्हणावे Wink तर मुलीलाही त्या नाही आवडत...:)

माझ्या सामान्यज्ञानात अजून एक भर म्हणजे त्या झगरमगर साड्यांच्या किमती पाच हजार वगैरे असतात..... साडी डे च्या दिवशी त्या साड्यांचे एवढे पिक असते की दिवसभर गॉगल घालून बसावेसे वाटते. Happy

मलापण पारंपरिक साड्या आवडतात. नारायणपेठ, इरकल, पैठणी.. माझ्याकडे पाचवारी एक आणि नऊवारी दोन पैठण्या आहेत. मध्ये माझ्याकडे अगदी जुन्या काळी जसा अंजिरी रंग असायचा त्या रंगाची माझ्या आजीची साडी होती. बुट्टे असलेली. ती ठेवलेली पेटी उघडली की, तो एक खास अत्तराचा मंद वास दरवळायचा.

आणि दुसर्‍या आवडत्या म्हणजे फॅबइंडिया वा त्या धाटणीच्या दुकानांतल्या साड्या. त्यांचे सौम्य रंग, सुखावणारे पोत.. अहाहा!

बाकी टिकल्या, चमचमणारे खडे, इत्यादी लावलेल्या जरदोझी वगैरे साड्यांना दुरूनच रामराम! आधी एकदा एक जरदोझी साडी घेतली होती. नंतर एवढे ब्लिंग आपल्याला आवडत नाहीये, हे कळले. तेव्हापासून ती साडी कपाटातच पडून आहे.

सध्या लोकांची झगमगआवड फारच वाढल्याचे जाणवले. सँडलांना खडे, बुटांना खडे, बेल्टला खडे, ड्रेसला खडे, साडीला खडे, पुरुषांच्या शेरवानी, कोटाला खडे.. सगळीकडे नुसतं चमचमचमचम! त्यातलाच एक खडा मी कानाला लावला नि निमूट फॅबइंडियात वगैरे गेले. रस्त्याने जातानादेखील चमचमत्या काठाअंगाच्या सिरीयलटाईप साड्या नेसलेल्या खूपच बायका दिसल्या.

माझ्यासाठी पण सेम आहे म्हणजे डि़झायनर साड्या आवड्तात पण, चम्चम्,झगमगाट अजिबातच नाही आवडत..कापडाचा पोत माझ्यामसाठी महत्वाचा वाटतो..बाकी ट्रे.न्ड मी फॉलो करु शकत नाही कारण २-५ वर्शातुन जावुन त्यावेळेचे आणलेले इन फॅशन कपडे इथे क्वचित घातले जातात मग ते वारेमाप टिकतात परत जावु तेव्हा आम्ही ऑउट ओफ फॅशन ..
अशावेळी मग मला टिपिकल साड्या बर्‍या वाटतात काय्मच इन फॅशन... मला ईरकल्,नारायण्पेठ अजिबात आवडत नाही ..पण रेशम-सिल्क्, पैठणी, प्युअर-सिल्क हे मला आवडतात..

त्यातलाच एक खडा मी कानाला लावला नि निमूट फॅबइंडियात वगैरे गेले.>>> टिप्पीकल श्र Lol

मला पण पैठणी, कांजीवरम खूप आवडतात, नविन पैकी शिफॉन, नेटवाल्या खूप आवडतात पण अतिरेक वर्क असलेल्या आणि खडे लावलेल्या अजिब्बात नाहि आवडत, एकतर टोचतात, दुसरं म्हणजे खडे पडतात Sad आणि दिसायला पण जरा बटबटीत वाटतात.

करीनाबाईने रावन मध्ये छम्मकछल्लो गाण्यात नेसलेली लाल साडी जाम आवडली ...पण तेवढं, पोट झाकून Wink आपण पामर ही ट्राय करू शकतो कि, पण असं वाटतं की त्यात तिनी परकरच घातला नाहिये..

आणि दुसर्‍या आवडत्या म्हणजे फॅबइंडिया वा त्या धाटणीच्या दुकानांतल्या साड्या. त्यांचे सौम्य रंग, सुखावणारे पोत.. अहाहा!
<<+ १०००
फील तर आहेच शिवाय मला या प्रकारच्या साड्यां मधला पारंपारीक 'शबाना आझमी - शोभ डे' लुक पण आवडतो !

आजकाल तर चांगल्या पारंपारिक साड्यांना पण नवीन लुक देण्याच्या नादात टिकल्या & वर्क करून वाटोळं करून ठेवतात .
सुंदर पैठणी वर टिकल्या !!!!! श्या.
पार मातेर करून ठेवतात

Jute silk , Bamboo silk तर माझ्या all time favorite आहेत
मग मला टिपिकल साड्या बर्‍या वाटतात काय्मच इन फॅशन... मला ईरकल्,नारायण्पेठ अजिबात आवडत नाही ..पण रेशम-सिल्क्, पैठणी, प्युअर-सिल्क हे मला आवडतात.. +१११

वल्कलंम् , म्हैसूर सिल्क , क्रेप सिल्क , चंदेरी काय्मच इन फॅशन

.

हाय लोक्स... बापरे केवढं रामायण झालय इथे.....

मला वैयक्तिक वापरा साठी प्रिंटेड सिल्क, तसर, बालुचेरी, सिल्क वर रेशीम बॉर्डर, मोत्यांचे काम हे फार आवडतं... जरीमरी, खडे, जरदोसी, पोटं दाखवणार्‍या पातळ साड्या अजिबात आवडत नाहीत... कांजिवरम बघायला आवडतात पण साडी जड असेल तर नेसायला आवडत नाही. सारख्या टोचत रहातात... माझं वजन आणि साडीचं वजन, त्या मुळे चेहेरा बघण्या सारखा होतो. त्या पेक्षा आपल्या नाजुक साड्या बर्‍या.... शिफॉन मधे जपानचं शिफॉन , आणि इटालियन क्रेप.... माझ्या कडे एक इटालियन क्रेप ची जांभळी साडी आहे ज्यावर मोत्याची बारीक बॉर्डर आहे... खुपच मस्त दिसते... त्या साडी साठी मला खुप काँप्लीमेंट्स मिळाले आहेत. फक्त ती नेसताना कॉटन च्याच परकरावर नेसावी लागते नाहीतर सुळ्सुळ मुंगळा.....

नऊ वारी साडी उत्तम नेसता येते ( कॉलेजला असताना खुप नृत्य स्पर्धां मधे आम्ही भाग घ्यायचो, त्या मुळे भराभर कपडे / साड्या/ नऊवार्‍या बदलणे हे आंगवळणी पडले आहे). लग्नात पण नऊवारी अगदी चापुन चोपुन सोगा काढुन नेसली होती. अजुनही ओळखीत कुठेही नऊवारी नेसायची वेळ आली की नेसवायला मला बोलावतात.. ( कॉलर टाइट बाहुली)

नउ वारी साडी नेसण्याचे वेगवेगळे prakaar आहेत न ... माहित असल्यास सांगा न ...
राजमाता जिजामाता असा काहिसा prakaar दुकांनांमधेय असतो... ह्या नक्की कुठल्या असाव्यात ?

कृपया रामायणाचे खापर माझ्यावर फोडू नये.
अनेकवेळेला चुकीचा शब्द वापरलेला दिसला म्हणून योग्य त्या माहितीसकट बरोबर-चूक काय ते दोनच पोस्टसमधे मी लिहिले होते. जर त्या पोस्टस वाचल्या तर त्यामधे एकही चुकीचा शब्द लिहिलेला नाही.
पण त्याला प्रतिक्रिया म्हणून वाकडे शब्द, तणतण, टोमणे यांनी भरलेल्या अनेक पोस्टी आल्या. आणि परत या पोस्टकर्तीलाच बिचारी म्हणून मानले जातेय.

हे सगळे दिसले म्हणून हे पोस्ट अन्यथा या धाग्यावर परत काहीही लिहायची इच्छा नाही.

मी नीरजा ला अनुमोदन देण्यासाठीच येथे आले होते. जे शब्द बरोबर आहेत ते आहेत, जे तज्ञ लोक सांगत आहेत ते ऐकावे. साडी घालणे, निर्जिव वस्तु "भेटणे" (मुंबईमधेच!), हे अत्याचार आहेत..... नी, मस्त विश्लेषण.

निर्जिव वस्तु "भेटणे" (मुंबईमधेच!), >>>>

ह्या पैकी मुंबईमध्येच सोडुन बाकि सगळ्याला अनुमोदन्...मुंबई बाहेर च्या व्यक्तींना पण बर्‍याच गोष्टी भेटत असतात...

नी... तुझ्या वर कोणी खापर फोडलय ग !!! एकंदरीत म्हणते आहे

जाने दो घुस्सा थुक दो !!!!!

Pages