फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेकीसाठी - ८ वर्षे - स्काय ब्लु कलरची जिन्सची ३/४ घेतलीये. त्यावर कुठल्या रंगाचा कुठल्या प्रकारचा टॉप चांगला दिसेल?

सस्मित लहान मुलींना खरं तर कोणतेही रंग चांगले दिसतात पण त्यातल्या त्यात ऑरेंज, पांढरा, गुलाबी (ऑल टाईम गर्ल फेवरिट) ट्राय कर. जर ३/४ टाईट फीट असेल तर थोडे जास्त लांब टी-शर्ट चांगले दिसतात.
डेनिम जॅकेटही मस्त दिसते.

स्काय ब्लु कलरची जिन्सची
>>>
यावर मला तरी दार्क कलर चे टॉप्स च आवडतात
पिंक Uhoh
आय काण्ट इव्हन इमॅजिन

स्काय ब्लु कलर मधे पण खुप व्हेरिएशन असतात....पिंक जाउ शकेल...पण काळा , लाल , अ‍ॅप्पल ग्रीन , कोबाल्ट ब्लु , डार्क पिंक हे कलर सुट करतात....इन थिंग आहेत हे कलर सद्या.....

धन्यवाद अंजली, अनिश्का, रीया.
अंजली, गुलाबी (ऑल टाईम गर्ल फेवरिट)>>> अगदीच. लहाणपणापासुन गुलाबीच गुलाबी कपडे असायचे. आताही ३-४ आहेत म्हणुन गुलाबी नकोय. Happy ऑरेंज बघते.
रीया डोळे का फिरवलेस?? स्काय ब्लु मी तरी नाही घेणार जिन्स पण लेकीला घेतलीये Happy

अग माझ्याकडे एक गुलाबी टॉप आणी एक स्काय ब्लु जिन्स आहे
त्यांच्या काँबी मध्ये मी किती विचित्र दिसेन ते इमॅजिन करून डोळे अपोआप फिरले Proud

पण काळा , लाल , अ‍ॅप्पल ग्रीन , कोबाल्ट ब्लु , डार्क पिंक हे कलर सुट करतात....इन थिंग आहेत हे कलर सद्या.....
>>
+११११११११११११११११११११११११११११
डार्क पिंक बद्दल साशंक अजुनही!

गुलाबी टॉप आणी एक स्काय ब्लु जिन्स <<<< ८ वर्षाच्या लहान मुलीला छानच दिसेल हे कॉम्बी.
रीया, ती लहान मुलीला सुट होईल का अस विचारते आहे, Happy

सस्मित.. स्काय ब्लू करता पांढरे स्पॉट्स असलेली पिवळी टी, लाईट जांभळी टी, पांढर्‍या टी वर मल्टी कलर स्ट्राईप् प्रिंट काहीही छान दिसेल..
टी च्या मॅचिंग हेअर बँड, अँकल लेंग्थ चे सॉक्स, स्पोर्ट शूज.. मस्त लुक येईल..

पांढरे स्पॉट्स असलेली पिवळी टी>>>>>>>>>> वर्षुताई मस्त आय्डीया. Happy
टी च्या मॅचिंग हेअर बँड, अँकल लेंग्थ चे सॉक्स, स्पोर्ट शूज.. मस्त लुक येईल..>>>>>>>> हे तर हव्वच Happy

लहान मुलांना कुठलेही रंग छान दिसतात....त्यामुळे त्यात चॉइसेस खुप असतात.....
डार्क पिंक बद्दल साशंक अजुनही!>>>>>>>> डार्क पिंक म्हणजे राणी कलर नाही ( भैया गुलाबी म्हणते आहे मी) थोडा धाडसी रंग आहे पण लहान मुलांना चांगला दिसेल...रंग गोरा असेल तर प्रश्नच नाही Happy

इन्द्रधनु अगं मा़झ्या सेल वरुन पिक्स अपलोड व्हायला त्रास होतोय.....स्टेप बाय स्टेप नाहि निदान पिक्स पण टाकता येत नाहियेत Sad

रिससीटेशन!!!
कुठे आहात सगळ्याजणी?
द जर्नी, ठाणे येथे बॅग्सचा सेल लागलाय. मस्त ट्रेंडी कलेक्शन आहे. मोबाईल कव्हर्स, क्लचेस, पर्स, वॉलेटस, ट्रॅव्हल बॅग्स.......

नवीन झीनत स्टाईल कुर्ते चुडिदार आलेत........काही विशेष वाटले नाहीत मला.... कोणाकडे काही नवीन पिक्स आहेत का त्याचे????

>>लांबच्या विमानप्रवासात काय घालावे कुणी सुचवेल का? जीन्स तर अजिबातच कंफर्टेबल नाही वाटत.>><<
कम्फर्ट हा रीलेटीव आहे. तुम्हाला ज्यात छान वाटेल ते छान.
Happy

कम्फर्ट हा रीलेटीव आहे. तुम्हाला ज्यात छान वाटेल ते छान.>> अगदी
छान सलवार कुर्ता/चुरीदार/थ्री फोर्थ किंवा ट्राऊझर वापरू शकता...

लांबच्या विमानप्रवासात काय घालावे कुणी सुचवेल का? जीन्स तर अजिबातच कंफर्टेबल नाही वाटत.>><<
मला तर लेगिन, कुर्ता & भरपूर खिसे असलेले jacket मस्त वाटते. सतत लागणाऱ्या वस्तू त्यात ठेवता येतात.

Pages