मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>तुमचा मुलगा "च" से चरखा वगैरे म्हणायच्या भानगडीत न पडता "च" से "चखना" म्हणाला आहे. >>>>
माझ्या मुलीने पण "द" वरुन दारू सांगून तिला मराठी शिकवणाऱ्या आजींची झोप उडवली होती Happy

निर्झरा - अहो माझ्या पोराला तर या गोष्टीचा इतका राग आला त्याचे कपडे बायकोने तिच्या बहिणीच्या मुलाला दिले.
त्याने त्याच्या कप्प्यावर नोट चिटकवली की मला विचारल्याशिवाय माझ्या कपड्याना हात लावू नये.

त्याने त्याच्या कप्प्यावर नोट चिटकवली की मला विचारल्याशिवाय माझ्या कपड्याना हात लावू नये.
>>
मुलगा एकदम पुणेरी आहे. आतापासुनच पाट्या लावायला शिकलाय. Happy
कृपया हलके घ्यावे.

आमचे चिरंजीव ..वय वर्षे २. रेडिओ किंवा टीव्ही वर गाणी लागली की "गाणं" असं ओरडतात तेही त्यांच्या सेल्फ मेड लँग्वेज मध्ये. जे ऐकणार्‍याला अतिशय अक्षेपार्ह वाटू शकतं (शब्द इथे लिहू शकत नाही. बोलीभाषेत त्याचा अर्थ पार्श्वभाग असा आहे.)
परवा पाहुण्यांसमोर हा प्रकार करून लाजवलं चिरंजीवांनी.

>>>> माझी मुलगी 'तो' शब्द Ground ऐवजी वापरायची आणि बायको माझ्यासोबत भांडायची की मुलीला काहीही शिकवतो

कहर म्हणजे ह्या पोराच्या आईने बाहेर येवुन हे तमाम मैत्रिणिंना सांगितले.....
<<
अन आता तुम्ही अख्ख्या होल इंड्याला सांगितलेत. तोंडात तीळ भिजत नाही तो असा Rofl

"चखना" Lol

माझ्या मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा.. अगदी दिव्य आहे मुलगी तिची..
एके दिवशी सर्वांदेखत तिची मुलगी (व व ४) तिच्या वडिलांना म्हणाली , "तुम्ही फक्त आईचेच लाड करता, कधी कधी माझे पण करा ना !!!!"

माझ्या आत्त्याच्या नातीचा - सईचा किस्सा....

माझ्या आत्त्याला लहान मुलांसमोर डोळे मोठे करायची सवय आहे. ते बघून-बघून सईही तिच्या लाडक्या आजीने काही ऐकलं नाही, तर तिला डोळे मोठे करून दाखवते, आता बोला!

तिचाच आणखी एक किस्सा-

ती सध्या सिनियर केजीला आहे. ती गेल्या महिन्यात तिच्या आजीकडे कंप्लेंट घेऊन आली की वर्गातली अमूक - अमूक मुलगी तिचे चिमटे घेते. तिचा रडवेला चेहरा बघून माझ्या बिचार्या आत्याने तिला जवळ घेतलं, नि तिला सांगितलं, " बाबू, मग तूपण चिमटा घ्यायचा!"

त्या लब्बाडने तिच्या आजीचाच चिमटा घेतला होता..... ! Rofl

बायको प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर चिरंजीव प्रचंड उत्साहात होते. सारखं मला भाऊ मिळणार की बहीण असे प्रश्न सुरू झाले.

सुमारे महिन्याभरानंतर पहिल्या चेकअप् च्या वेळेला डॉक्टरने जुळं असल्याचं सांगून आम्हांला आधीच शॉक दिला होता wink.gif

मुलाला शाळेतून आणल्यावर त्याची आई,

" तन्मय, तुला माहीत आहे, तुला एक नाही , दोन लहान भाऊ किंवा बहीणी होणार आहेत !"

तन्मय अत्यंत विचारमग्नपणे -

" गेल्या महिन्यात एक होतं, या महिन्यात त्याच्या दोन झाल्या.. पुढच्या महिन्यात तीन होणार का ?"
>>>>>>>>> हा हा हा, कमाल....

काल मी मुलाची मराठी अक्षर उजळणी घेत होते.
'ढ' अक्षरपासून शब्द सांग म्हटल्यावर सिरीअसली म्हटला 'ढुंगु' Uhoh Lol

दुसरा किस्सा त्याच्याच मराठी शाळेच्या वर्गात ज्यामधे माझी मुलगी पण आहे. ती सांगत होती. टिचरने विचारले केसांना हात लावून याला काय म्हणतात मराठीत तर आमचे चिरंजीव उद्गारले 'लाईस' (केस कुठे लाईस कुठे) Lol

माझ्या मुलाला पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेतानाची गोष्ट. अर्थात अगदी लहान वय होते. शाळेच्या प्राचार्या होत्या त्यांनी आपल्या केबिन मध्ये आम्हा तिघांना (मी पत्नी मुलगा) बोलवून घेतले. म्याडमनी ह्याला आपल्या समोर टेबलवरच बसवले आणि आम्ही दोघे त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर. प्राचार्यांच्या चेहऱ्यावर पदाला शोभेलसे कडक भाव होते. आम्ही ते समजू शकत होतो. पण तीन चार वर्षाच्या मुलाला कुठले आलेय कळायला? त्यांनी याला काहीतरी लिहून दाखव म्हणून कागद नी पेन्सिल त्याच्या हातात दिली. मॅडमच्या करारी चेहऱ्याकडे बघत आमच्या चिरंजीवांनी काही कळायच्या आत हातातली पेन्सिल राप्पकन त्यांच्या तोंडावर फेकून मारली Biggrin आम्ही जाग्यावरच उडालो. पण तरीही मॅडमनी प्रवेश दिला त्याला. Proud

आमच्या चिरंजीवांनी काही कळायच्या आत हातातली पेन्सिल राप्पकन त्यांच्या तोंडावर फेकून मारली >>>>>> बाबौ! मॅडमना मानलं.

माझ्या सासरचे सगळे जण गोरे आहेत. एक दिवस घरी परिचित स्त्री आपल्या बाळाला घेऊन आली होती. बाळ चांगल्यापैकी सावळे होते.माझी पुतणी तेव्हा अडीच तीन वर्षांची असेल.. तिने यापूर्वी एवढी रंगविसंगती पाहिली नव्हती.. ती अचानकच बाळाला हात लावून म्हणाली, "रंग लावलाय का"
आम्ही एवढे ओशाळलो आणि त्या बाईंकडे पाहू लागलो.. सुदैवाने त्यांचं लक्ष नव्हते व त्यांनी हा प्रकार ऐकला नव्हता.. यानंतर पुतणीला समजावण्याचा कार्यक्रम झाला.. आजही तिला चिडवले जाते यावरून..

टाइमपास चित्रपट बघायला आम्ही गेलो होतो तेंव्हा चिरंजीव ४ वर्षांचे होते. एका दृश्यात जेव्हा संगीत शिक्षिका स्पृहा , प्राजक्ताला डोळे मिटून कोणाचा चेहरा दिसते का असे विचारते.

स्पृहा : "नीट बघ नक्की कोणीतरी असेल "

प्राजक्ता : "नाही नाही कोणी नाही आहे "

चिरंजीव : "खोटं बोलतंय ती"

चिरंजीव लहान होते, तेंव्हा मी कधी कधी त्याच्या सोबत असेच मजेत निरर्थक बडबडगीत (रँडम शब्द) गात असे. पण त्याला काय कल्पना कि हे निरर्थक आहे? त्याने त्यातले एक दोन शब्द लक्षात ठेवले. आणि एकदा कोणी पाहुणे घरी आले होते तेंव्हा अचानक याने त्यांच्या समोर येऊन मी जसे गातो तसे निरर्थक शब्दात गायला सुरवात केली. पाहुणे गोंधळून गेले,
"हे काय गातोस तू?"
त्यांनंतरचा सीन असा होता: पाहुणे त्याच्याकडे पाहत होते, मी पाहुण्यांकडे आणि बायको माझ्याकडे Lol

मटेरियल गेटला कामाची अन् करिअरची सुरुवात केल्यामुळे मकार अन् भकार आमच्या व्यावसायिक पाचवीला पुजलेले होते, कन्या त्याकाळी साडेतीन वर्षांची होती. मित्र घरी आला होता, पोरीचा आवडता काका, त्याला काही कारणाने सोसायटी गार्ड ने अडवले होते, माझ्या बोलण्यात मोबाईलवर

"असे कसे गेटवर अडवले"

असे मोघम वाक्य आले तेवढ्यात पोरगी खणखणीत आवाजात ओरडली

"माxxxx, ऐसा कैसा गाडी गेट पर रोखा, कल को लेट हो गयी डिलिव्हरी तो ?"

त्यानंतर घरी काम आणणे साफच बंद केले.

छान धागा वर काढला.
आमच्या घरीही माझ्यामुळे मुलाला साल्या बोलायची सवय लागली आहे. बाहेरही बोलतो. लाज अर्थात माझीच जाते.
समजावून फायदा होत नाही. कारण माझ्याच तोंडातला सुटत नाही.
मुलगी मोठी झालीय. तिला कळते हा बॅडवर्ड आहे तर नाही बोलत.
ती दुसरे बॅडवर्ड बोलते.

Pages