मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा काही वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आहे. परिचयातील एका मराठी स्त्रीने साऊथ इंडियन माणसाशी लग्न केले व दोघांनी आखाती देशात आपला संसार थाटला. त्यांची घरात, एकमेकांशी व आपल्या एकुलत्या एक मुलाशी बोलायची भाषा म्हणजे इंग्रजी, हिंदी व क्वचित बोलली जाणारी मराठी! त्यामुळे मुलाचे मराठी तसे तोडकेमोडकेच!
तर ह्या बाई एकदा पुण्याला आपल्या माहेरी आल्या होत्या. सोबत त्यांचा लेकही होता. तो नुकताच सायकल चालवायला शिकला होता. पुण्यात आजोळी त्याच्या बरोबरचे कोणी नसल्यामुळे बोअर झाला होता. एकदा तो घरी बसून आई व आजीच्या डोक्याशी 'बोअर होतंय' ची भुणभुण करत बसला होता. शेवटी त्याची आई त्याला म्हणाली, 'इथे जवळच भाड्याच्या सायकली मिळतात, त्या कोपर्यावरच्या दुकानात.... जा, आणि तुला हवी ती सायकल घेऊन शेजारच्या ग्राऊंडमध्ये फिरव सायकल.'
मुलगा सायकलचे दुकान शोधत फिरला. ते सापडले पण गल्ल्यावर कोणी नव्हते. मुलाने जोरात हाक मारली, 'भाड्याकाका, ओ भाड्याकाका.... '
दुकानाचा मालक तिरीमिरीत दुकानाच्या मागील भागातून पुढे आला आणि त्या मुलाला शिव्या घालत त्याने त्याला दुकानाबाहेर हाकलले.
मुलगा एवढुस्सा चेहरा करून घरी आला आणि त्याने आईला सांगितले, 'त्या काकांनी मला सायकल दिलीच नाही. ते खूप चिडले होते. मला हाकलून दिले त्यांनी!'
आईने काळजीने त्या दुकानात फोन लावला. दुकानदार त्यांच्या कुटुंबाला ओळखणारा होता. आपल्याकडे आलेला मुलगा त्यांचा लेक आहे हे कळल्यावर त्याने वैतागलेल्या स्वरात तक्रार केली... 'अहो ताई, तुमचा मुलगा मला भाड्याकाका म्हणून हाक मारत होता!'
बाईंना आपल्या मुलाच्या मराठीच्या अर्धवट आकलनाने झालेला घोळ लक्षात आला. त्यांनी दुकानदाराची समजूत काढली आणि आपल्या मुलाला आता त्याने काय घोळ घातला हे कसे समजावावे ह्या विवंचनेत पडल्या. सुदैवाने ते काका आपल्याला सायकल देतील व त्यांचे नाव भाड्याकाका नाही, आणि तो शब्द 'इम्पोलाईट' आहे एवढ्या स्पष्टीकरणावर काम भागले. पण तो प्रसंग व किस्सा त्यांच्या घरी अजरामर झाला!!

'भाड्याकाका, ओ भाड्याकाका.... ' Rofl

ह्या वरुन आठवले.....काही वर्षांपूर्वी कांदेपोहे चे एक गीत सुनिधी ने म्हण्ट्ले होते..त्या मधे वाक्य होते भूत-कालच्या धुवून अक्षता तांदूळ केले ज्यांनी...आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यानी ते भाड्याच्या भांड्यानी सुनीधी ने असेच जोर् लावुन म्हण्ट्ले आहे.....उगाच हसायला येते ते ऐकल्यावर Biggrin

नुकताच घडलेला किस्सा घरी आमचे जावई व परिवार दोन दिवसासाठी आले होते, त्यातच सौ. किरकोळ आजारी पडली दवाखान्यातून सौ. ला मी माहेरी पाठवले आराम करायला, लेक (३ वर्षे )सुद्धा तिच्या सोबतच. दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती म्हणून लेकीला मोदक आवडतात म्हणून घरी घेऊन आलो, आणि सौ ला घरी गेल्यावर नाही म्हणालं तरी कामे करावी लागतील म्हणून मी तिला सांगीतल तु राहा माहेरीच.

सर्वजण जेवत होते तेवढ्यात लेक आमच्या जावयांना मोठ्यानी हाक मारून म्हणाली "काका ममाला काम करावी लागतील म्हणून ती आज आली नाही" मला तोंड कुठे लपवू झालं Rofl

आज सकाळी घडलेला किस्सा … आमचा (माझा आणि लेकाचा, वयवर्ष ३) दररोज सकाळचा संवाद, मग काल परीराणी कुठे कुठे घेऊन गेलेली तुला? मग आमचे चिरंजीव एक एक जागा सांगत कधी युरोप (बाबा वरचे वर टूरला जातो म्हणून युरोप जास्त) , कधी गिरगाव (आजोळी) कधी मॉल मध्ये तर कधी मून वर पोहोचतात… मधेच देवघराकडे बघून त्याचा प्रश्न… "आई आपल्याकडे भरपूर बाप्पा आहेत न?" हो न खूप आहेत… सांग बर कोण कोण आहे देवघरात? (साईबाबा आणि गणपती विशेष लाडके) … साईबाबा … अ अ अ गणपती बाप्पा … आणि…. त्याचा मिकी माउस, मिकी माउसचा फ्रेंड डोनाल्ड डक आणि डेझी, मिनी सगळे बाप्पा आहेत आपल्या देवघरात… साबा आणि मी खो खो….

कालचाच किस्सा (मुलाचे वय १.५ आजुन निट बोलता सुद्धा येत नाही)

आईचा उपवास होता म्हणुन घराजवळाच्या स्विट मार्ट मधे उपवासाचा बटाट्याचा चिवडा घेतला.
तिथे बारक्याला जिलेबी दिसली, मग बोट दाखवून मागणी केल्याने दुकानवाल्याकडून जिलेबी घेतली.

दुकानवाल्याला पैसे देवून परत निघालो, तर बारक्याने चिकट हात मझ्या मानेला लावला. पाहिले तर त्याच्या हातात जिलेबी होती.

नंतर लक्षात आले माझ्या मागे दोन जण जिलेबी खात होते त्यांच्या पैकी कोणाच्यातरी प्लेट मधली याने उचलून घेतली होती.

यात हसावे की रागवावे काहीच कळेना.

जिलेबी Lol

एका लग्नाला गेलेलो तेव्हा आम्ही जेवताना पुतण्या (वय वर्षे २-५) टेबलसमोर इकडुन तिकडे हुंदडत होता. आमच्या शेजारी बसलेल्या काकुंनी त्याला जिलेबी दिली. छोटी जिलेबी असल्याने त्याने अख्खी कोंबली तोंडात. आवडली असावी त्याला, कारण त्यानंतर त्याने माझ्या, आजीच्या अन आईच्या ताटातल्या जिलेब्या उचलुन तोंडात कोंबायचा सपाटाच लावला. आमच्या ताटातल्या संपल्यावर शेजारच्या काही ताटातल्या जिलेब्या पण लंपास केल्या. खुपच कॉमेडी वाटत होतं त्याचं त्यावेळचं पटकन ताटातली जिलेबी उचलुन कोणाला काही कळायच्या आत तोंडात कोंबणं

आमच्या येथे जम्बो सर्कस आली आहे १ जानेवारीला ऑफिसला सुट्टी म्हणून मुलीना सर्कस बघण्यासाठी घेवून गेले. तिकिटांसाठी थोडी गर्दी होती आम्ही सुद्धा रांगेत उभे राहिलो मझ्या पुढे एक कपल आणि मागे कोलेज कुमार/कुमारी. ,मग मी त्या दोघींना सांगू लागले "हल्ली पहिल्यासारखी वाघ हत्ती वैगरे नसतात आमच्या लहानपणी सर्कशीत असायचे प्राणी" यावर माझी छोटी (वय ४ वर्षे ) मला म्हणाली मम्मा मी बहितले हत्ती आणि वाघ सर्कशीमध्ये, मी विचारले केव्हा? तर उत्तर "तू लहान असताना मी तुझ्या पोटात होते ना तेव्हा"..........पुढच कपल आणि मागचे कुमार/ कुमार्या फिदी फिदी हसायला लागले, आणि मी तिकीट न काढताच आपण उद्या बघू हा असे सांगून परत आले. Lol Lol

हौसे हौसे मीही माझ्या मुलाला हत्ती दाखवायचा म्हणुन सर्कशीला नेलेलं. हत्ती काही लवकर येत नव्हते, पण पोराने स्किन कलर कपडे घालुन खेळ करणार्या मुलींना पाहुन "शी, त्या मुलींनी कपडे नाही घातले, शेम शेम... कस्ले नंगेपुंगे अलेत" असं जोर जोरात ओरडुन "धरणी माते, आम्हाला पोटात घे" म्हणन्याची पाळी आणलेली आमच्यावर. Proud

हत्ती आला तो कपडे घालुन, तोही शेवटचे पाच मिनीट उरलेले तेव्हा. "हत्तीला कपदे दिलेत, त्या मुलींना का नाही दिले?" - इती आमचं कार्टं.

त्या नंतर पुन्हा कधीही मी सर्कशीचं नाव काढलं नाही, जेव्हा जेव्हा सर्कस येते, "अरे ते अजुन चालु झालं नाते, तंबु ठोकत आहेत, पुर्ण झालं की येउ आपण " म्हणत, पुढचा महीना भर वेगळा रुट वापरत वेळ मारुन नेतो.

मल्लीनाथा,
आता झू मध्ये नेलं आणि हत्तीने कपडे घातलेले नसले की मुलगा नक्की म्ह्णणार - नंगूपंगू हत्ती!

नंगूपंगू सर्कस ... पण हत्तीने कपडे घातलेत.. Lol

पीकेचा पोस्टर बघून काही विशेष टिप्पणी नाही का केली त्याने Happy

माझं पावणे दोन वर्षांचं पिल्लू... अजुन बोलता ही येत नाही धड... बेडरूम मधे काही कारणास्तव दरवाजा बंद केला किंवा झाला तर दाराच्या खाली फट असते तिथून वाकुन आत काय चाल्लय बघायच्या प्रयत्नात असतात आमचे वीर....

आमचे चिरंजीव ..वय वर्षे २. रेडिओ किंवा टीव्ही वर गाणी लागली की "गाणं" असं ओरडतात तेही त्यांच्या सेल्फ मेड लँग्वेज मध्ये. जे ऐकणार्‍याला अतिशय अक्षेपार्ह वाटू शकतं (शब्द इथे लिहू शकत नाही. बोलीभाषेत त्याचा अर्थ पार्श्वभाग असा आहे.)
परवा पाहुण्यांसमोर हा प्रकार करून लाजवलं चिरंजीवांनी.

डिओ किंवा टीव्ही वर गाणी लागली की "गाणं" असं ओरडतात तेही त्यांच्या सेल्फ मेड लँग्वेज मध्ये. जे ऐकणार्‍याला अतिशय अक्षेपार्ह वाटू शकतं >>>> Lol

माझ्या बहिणीला लहानपणी 'पिशवी' म्हणता यायचं नहि. ती ** म्हणायची . आणि आम्हा भावंडांना सांभाळायला ठेवलेली बी तिला सारखा तोच शब्द म्हणायला लावायची Angry

Pages