मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोपिका, किती गोड Happy

प्राची Lol मुलं एकही संधी सोडत नाहीत ना गोरंमोरं करण्याची! Biggrin पण तिने ’ते’ नाव न घेता किती अचूक क्ल्यूज दिले, हुशार आहेच लेक Happy

आई गं Happy प्राची, कित्ती कित्ती प्रयत्न केले बघ तिनी तुझी सूचना पाळायचे Happy भारीच!
कौतुक केलंस की नाही तिचं? आजीनं पण केलं असेल ना?

आज पूर्ण धागा परत वाचून काढला,
स्मार्टफोन च्या युगातील स्मार्ट मुले
हसुन हसुन दमछाक झाली

मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून >>> हाहा
माझा चुलत भाउ ३.५ वर्शाचा असताना त्याने होटेलात पहिल्यान्दा तळलेले पापलेट पाहिले. त्याने विचारले ही कोण्ती भाजी आहे? घरी कळू द्यायचे नव्ह्ते की फीश खाल्ले. म्हणून आम्ही सान्गीतले की ही झिन्ग्याची भाजी आहे. त्याला ती भा़जी खूप आवड्ली. घरी आजे मन्ड्ळीनी विचारले काय खाल्लेस तर हा एवधच सान्गायचा की 'झिन्ग्याची भाजी'.
खर कुणालाच कळल नाही नक्की कसली भाजी ते.

काल पाडव्याची श्रीखंड पुरी अंगावर आल्यामुळे वामकुक्षी घेऊन उठलो होतो, तर टीव्हीवर काल तमाम वाहिनीचा भावोजी जानव्ही आही श्री च्या घरी गेला होता, त्यांच्या इतर गप्पागोष्टी चालू असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघून एकूणच आम्ही हसत होतो त्यात शेवटच्या प्रतिक्रिया श्री I LOVE YOU, LOVE YOU श्री हे चालू होट शेजारीच बसलेल्या कन्येला मी म्हणालो I LOVE YOU बेबी, लेकीची प्रतिक्रिया "मला कांय बोलताय हिला (ममाला)बोला, नाहीतर मी बोलणारच नाही जा" सौ आणि मी Rofl

"मला कांय बोलताय हिला (ममाला)बोला, नाहीतर मी बोलणारच नाही जा" सौ आणि मी हसून हसून गडबडा लोळण>>> Wink Proud Lol Biggrin

माझी भाची- वय वर्षे ४.
परवा आपल्या आजीला विचारत होती.
"आजी, तू आबांना प का गं देत नाहीस?"
आजी क्लीन बोल्ड...
"देत जा ना आबा सकाळी देवळात जायला निघतात तेव्हा"....
आजींनी कशी वेळ मारून नेली परमेश्वर जाणे.

टेलरिंगचे काम करणार्या ओळखीच्या एक बाई त्यांच्या सव्वा वर्षाच्या नातीचा किस्सा सांगत होत्या : रोज सायंकाळी नातीला तिची आई त्यांच्या दुकानात घेऊन येते. तिथे ती चिमुरडी कापडी चिंध्यांशी खेळणे, माप घ्यायच्या जुन्या टेपशी खेळ अशा उद्योगांत रमलेली असते. आजीची नक्कल करत खोटे खोटे माप घेणे चालू असते. गेल्या आठवड्यात असेच एक कस्टमर आले असताना आजींचा मदतनीस त्या कस्टमरच्या छातीचे माप घेत होता. अचानक कस्टमरला पार्श्वभागाला काहीतरी स्पर्श जाणवला. त्याने वळून पाहिले तर ही सव्वा वर्षाची चिमुरडी त्याच्या पार्श्वभागाचे खोटेखोटे माप घेत होती!!
आजींना एकाच वेळी खूप हसू येत होते आणि लाजेने कुठे बघू असे झाले होते.
कोणी कस्टमर आले आणि आजीचे नातीकडचे लक्ष जरा हटले की ती तुरूतुरू जाते आणि (बर्याचदा कस्टमरच्या पार्श्वभागाचे) माप घेऊ लागते. तिची उंची लहान असली तरी इतरांची नक्कल करताना ते पिल्लू असे अनेक महान विनोद करत असते.

मुल खूपच स्मार्ट असतात...आपल्याला कल्पना नसते एवढेच.

केदार,चैतन्य अणी अकु, तुमचे किस्से तर भारिच Rofl

नवरा, बायको, सासूबाई, मुलगी डायनिंग टेबलवर बसून कौटूंबिक गप्पा चालल्या होत्या. मुलगी गृहपाठ करत होती. मुलगी सातवीत.

बाबा बसल्या बसल्या पिना मारत होता. (आवडता उद्योग)

मुलीचे निबंध लिहिण्याचे काम चालले होते. बाबाने विचारले, कोणता निबंध लिहितेस?
माझी आई - मुलगी
बाबा - अरे वा..काय लिहिलेस?
मुलगी- माय मदर कुक्स डिलीशस फुड
बाबा - कंसात "वन्स इन अ व्हाईल लिहायला नको विसरुस बरे?" (बाबाच्या व आज्जीच्या चेहर्यावर विजयी हास्य)
मुलगी- नाही लिहिणार् तसले काही...
बाबा - का बरे?
मुलगी - कारण्...निबंध "माझ्या" आईवर आहे. तुझ्या नाही. Happy
आज्जी - बरं बरं...चल आवर आता...शाळेला जायचंय ना वेळेत? Wink

सुमेधावी,
मग तुमच्या चेहर्‍यावर विजयी हास्य ना?

बाकी, मुलीने एक घाव दोन तुकडॅ.

Happy

sahi Lol

sahi Lol

Pages