Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/83674
(No subject)
असाच एक किस्सा. पाच एक
असाच एक किस्सा. पाच एक वर्षांपूर्वीचा
माझ्या मुलाची एक स्पर्धा होती, ग्रुप स्पर्धा. तर त्यांची ग्रुप मॅनेजर एक पालकच होती. तिला पण मुलांबरोबर आत जावे लागणार होते. त्यामुळे तिने मला सांगितले , तिच्या छोट्या चार वर्षाच्या मुलीकडे बघायला.
बाहेर ग्राउंड वर, ती तशी आधीच धीट होती, ती गप्पा मारायला लागली, खेळता खेळता. तेव्हढ्यात अजून एक पालक आले. त्यामुळे आम्ही दोघे काही बोलू लागलो. तर ही मध्येच आली, आणि आम्हाला म्हणाली, " ही माझी आई, खूप जोराने ओरडत असते, बाबा सारखा laptop वर काम करत असतो... वगैरे वगैरे.. बरच काही"
आम्ही दोघं एकदम awkward झालो. माझ्या लगेच मनात आले, " तरी मी म्हटलं, ही जॉब, दोन मुलं येवढं सगळं सांभाळून , शिवाय ह्या प्रोजेक्ट साठी येवढा टाईम कसा काढते.. "
तेव्हढ्यात ते दुसरे पालक हसून मला म्हणतात, " मुलं कधी कुठे काय पचकतील भरवसा नाही, म्हणून मी माझ्या मुलांना दुसऱ्या कुणाकडे ए ए एकट सोडतच नाही. "
साहजिकच आम्ही सुज्ञपणे तिचे लक्ष दुसरी कडे वळवले, आणि थोडक्यात तिच्या आईला तिच्या तडाख्यातून वाचवले ..
काही वेळाने ती पालक बाहेर आली, आणि हसून विचारले, " काही त्रास नाही ना दिला? राहिली ना? "
मी पण ताकास तूर लागू दिला नाही.
आईच उशिरा उठते, मस्तं
आईच उशिरा उठते,
मस्तं आयडिया आहे.
एका नवीन शहरात राहायला गेलो
एका नवीन शहरात राहायला गेलो होतो. तिथे नवीन ओळख झालेल्या एका कुटुंबाला आम्ही घरी बोलावलं होतं. पहिल्यांदा आल्यावर आपण घर दाखवतो ना, तो सोपस्कार झाला. भाड्याचं आणि तसं जुनं घर होतं ते. त्या मित्राचा मुलगा सगळं शांतपणे बघून झाल्यावर मला म्हणाला - तुमचा पगार किती आहे?
इथे त्याच्या बापापेक्षा मलाच लाजायला झालं. त्याच्या बापाला हे प्रश्न काहीच नाहीत, असले प्रश्न विचारून त्याला आधीच इतर ठिकाणी विचारून लाजवून झालं असल्याने आता बाप संतपदाला पोहोचला आहे. तो त्याला शांतपणे समजावत होता की अरे असं नसतं विचारायचं, आणि मग मला समजावत होता की अरे असं लाजायचं नाही, ही पोरं काहीपण विचारतात.
(No subject)
(No subject)
“ अरे असं लाजायचं नाही, ही
“ अरे असं लाजायचं नाही, ही पोरं काहीपण विचारतात.” -
(No subject)
(No subject)
:lol:
(No subject)
(No subject)
Pages