मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो वर्णाने अगदीच सावळा होता. आम्ही दोघी लक्खं गोर्या वाटू असा >>>>>>>>याने काहीच फरक पडला नसता किश्यात << तो गोरा वैगरे असता तर तुम्ही लाजला असता असं का??

माझ्या बहीनीचा किस्सा, अमेरीकेत नवीन असतांना तिची एक कॉलेजची मैत्रीण नुकतीच ईथे आल्यावर दोघींन्च्या फोन वर तासन तास गप्पा व्हायच्यात. एका कॉल मधे न बोलता दिवसात बरेचसे ५/१० मिनीटाचे कॉल्स व्हायचेत. त्यामुळे नवरा गेला की आलेला प्रतेक कॉल वर्षा (मैत्रीनीचे नाव)म्हणत सुरु व्हायचे. मुलगीला वाटले कॉल वर बोलायचे म्हणजे वर्षा म्हणत सुरुवात करतात आणी बोलतात. एकदा तिच्या बाबांचा फोन तिला दिल्यावर फोन वर बोलतांना ती बाबांना वर्षा म्हणतच अगदी आईच्या स्टाईलने डिटेल मधे बोलत होती. आधी हा काय प्रकार आहे हे बहीणीला कळलं नाही पण मग हसुन हसुन पुरेवाट झाली...

इथे आलेले काही किस्से लहान मुलांच्या निरागसपणाचे आहेत, क्यूट आहेत, पण ते एम्बॅरसिंग / लाज काढली कॅटेगरीतले नाहीयेत.

>याने काहीच फरक पडला नसता किश्यात << तो गोरा वैगरे असता तर तुम्ही लाजला असता असं का??

>>>> नाही... वर्णावरून टिप्पणी नको या अर्थाने

वर्णावरून टिप्पणी नको या अर्थाने>> मान्य आहे तसे लिहायला नको होते. संपादन करण्याची वेळ निघुन गेली.

बरीच वर्षे झाली. कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट आहे. तेंव्हा आम्ही भाऊ, शहरात एके ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत होतो. एक दुमजली बंगला. वरती आम्ही. खालती मालक व त्यांचे कुटुंबीय. कधीमधी आईवडील गावाहून भेटायला येत असंत. खाली घरमालकांकडे एक छोटी मुलगी नेहमी आपल्या आजीसोबत असायची. अणू का कायसे नाव होते तिचे. त्यांची कोणी जवळची नातलग होती. वय वर्षे सहाच्या आसपास. पण अत्यंत चुणचुणीत आणि प्रचंड बडबडी. आणि खणखणीत आवाजात बोलायची.

एक दिवस माझी आई आम्हाला भेटायला आली होती. बंगल्याच्या गेटवरून ती आत आली असेल नसेल इतक्यात ह्या चिमुरडीने तिला खणखणीत आवाजात थेट प्रश्न केला, "काय हो, पोरं कुठे आहेत तुमची?" माझी आई एकदम शॉक! Lol त्या आज्जीना सुद्धा काय बोलावे कळेना. तिला म्हणाल्या, "काय गं ए, तू काय बारसं जेवली आहेस का त्याचं?"

कदाचित, माझी आई दूरवरून येताना दिसल्यावर आजीनी हलक्या आवाजात तिथे कुणालातरी सहज विचारले असेल, "ह्या बाई आल्या. पोरं कुठं आहेत यांची? आहेत का वरती?" इत्यादी. नातीने ते ऐकले आणि आई जवळ आल्यावर थेटच विचारले "पोरं कुठे आहेत तुमची?" Lol

त्यानंतर जेंव्हा जेंव्हा अणू दिसायची तेंव्हा हा प्रसंग आठवून आम्ही खूप हसायचो.

>याने काहीच फरक पडला नसता किश्यात << तो गोरा वैगरे असता तर तुम्ही लाजला असता असं का??
>>>> नाही... वर्णावरून टिप्पणी नको या अर्थाने << आबा तुमच्या साठी नव्हते ते....

माझ मुलगा २री मध्ये होता. पेरेंट टीचर मिटींग मध्ये स्पीच अँड ड्रामाच्या सरांनी मला सांगितले की प्रत्येक मुलाला मोठेपणी कोण व्हायचय असे विचारत होते. तर माझा मुलगा म्हणाला की त्याला वॉचमन बनायचय. ते सर हे सांगुन माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले. मी स्तब्ध काही वेळ..... मग सरच म्हणाले की हे अजब उत्तर ऐकुन त्यांनी विचारले की तुला वॉचमन का बनायचय? तर हा म्हणाला की I hate sleeping .....वॉचमनला झोपायला लागत नाहि ना . Uhoh

<< I hate sleeping .....वॉचमनला झोपायला लागत नाहि ना. >>
यात लाज वाटण्यासारखं काय आहे? चांगलं उत्तर आहे की. मी तर कौतुक करीन त्याचे.

हा हा मस्त आहे हे
पण मोठा होता होता त्याला समजेलच की वॉचमनचे कामही सगळे झोपल्यावर झोपायचेच असते .. मग त्याचाही ड्रीम जॉ ब बदलेल Wink

मुलाने लाजवले असा किस्सा नाही पण त्या लेवलला जाऊ शकला असता.

त्याला हिंदी शिकवत असताना "मै मौसी के घर छुट्टीया मनाने गया था" याचे भाषांतर विचारले तर त्याने "मी मेड (कामवाली) च्या घरी सुट्टी साठी गेलो होतो" असे सांगितले. मी डोक्यावर हात मारून घेतला. अर्थात त्याचीही चुक नाही कारण त्याला मावशी नाही. घरी कामवाली येते तिला आम्ही मावशी म्हणतो हेच माहित. नशीब हा प्रसंग कोणासमोर नाही झाला.

नंतर काही दिवसांनी माझ्या मावशीच्या घरी जात होतो त्यावेळी त्याला मावशी हे नाते काय ते परत परत सांगितले. नाहीतर शहाणा माझ्या मावशीला विचारायचा की आज भांडी घासायला गेली नाही का कुठे? माझ्या मावशीने जर असे काही ऐकले असते तर मला सोलून काढले असते.

लाज,अपमान,गर्व ह्या सर्व प्रौढ लोकांच्या स्वप्नातील कल्पना आहे त्या खऱ्या पण नाहीत.
मुलांशी ह्या कल्पनेतील विश्वाशी काही संबंध नाही.
मुल नाही पालक च बकास प्रतिष्ठा आणि इज्जत ह्याची ची कल्पना करून स्वतः लाज वाटून घेतात.

लाज,अपमान,गर्व ह्या सर्व प्रौढ लोकांच्या स्वप्नातील कल्पना आहे त्या खऱ्या पण नाहीत.
मुलांशी ह्या कल्पनेतील विश्वाशी काही संबंध नाही.
मुल नाही पालक च बकास प्रतिष्ठा आणि इज्जत ह्याची ची कल्पना करून स्वतः लाज वाटून घेतात. >>>>> त्यात वावगं काय आहे? सिगमंड फ्रॉइडनी त्याच्या प्रसिद्ध सिद्धांतात आधीच सांगून ठेवलयं.

प्रत्येक मुलाला मोठेपणी कोण व्हायचय असे विचारत होते. तर माझा मुलगा म्हणाला की त्याला वॉचमन बनायचय.>>>>. माझ्या मुलाने तर मी मोठा होऊन भिकारी होणार सांगितलेले. भिकेचे डोहाळे लागणे हा वाक्यप्रचार सार्थ केला बेट्याने. आता वयाच्या चार वर्षांत त्याचा आयडॉल भिकारी का होता हे काही समजले नाही Lol

माझ्या मुलीला 3 वर्षांची असताना मिस वर्ल्ड व्हायचं होतं. आणि JCB चालवणारी बनायचं होतं. ते नाही जमलं तर डॉक्टर

>>>>>>म्हणजे मुलाने अभ्यास नाही केला तर मोठे होऊन असे भीक मागावे लागेल सांगायचीही सोय नाही Lol
हाहाहा त्याला ते उत्तेजनार्थ वाटायचे.

भिकारी Lol
माझ्या मुलाला अंतराळवीर व्हायचे होते. पण रोज पोस्टमन, डिलिव्हरी मॅन, आठवड्याला येणारा गार्बेज/रिसायकल ट्रकवाला बघून घरातच त्याच्या गाडीवर पत्र ठेऊन फिरत असतो. घरातले कॅन, बॅाक्स माझ्याकडून घेऊन रिसायकल बीनला पोचवत असतो. मधेच ट्रिंग ट्रिंग बोलला कि आपण हॅलो म्हणायचे. मग तो काही कॅन, बॅाक्स असेल तर मला कॅाल करा असे सांगतो. मजा येते Happy

भिकारी , वॉचमन :))
माझ्या मुलीला मॅक्डोन्ल्ड ला जॉब करायचा होता. आणि हे तिला पैश्याचा कॉन्से प्ट समजायला लागल्या नंतर ची गोष्ट.. तिथले एम्पॉईज घरी जातांना सगळे पैसे घरी घेउन जातात असा तिचा समज होता

मला स्वतःला लहानपणी काही दिवस ice कँडी विकणारी व्हायचं होतं, आमच्याकडे तेव्हा ice कॅण्डी वाला छोटीशी गाडी घेऊन दारोदार विकायला यायचा,मी पण tea table उलट करून तशीच प्रॅक्टिस करायचे आणि ओरडत बसायचे
त्या वेळी बऱ्याच लोकांना मी मोठेपणी कोण होणार याचं उत्तर ice कॅण्डी वाली असच दिलं होतं

माझी गेल्या आठवड्यातील फेसबूक पोस्टच ईथे कॉपी पेस्ट करतो

------

तीच आपली रात्रीची वेळ. परीला बरे नव्हते म्हणून ती झोपली होती. मी आणि रुनू बाहेर खेळत होतो. म्हणजे खेळत तो एकटाच होता. मी चहा पित होतो. आणि तो खेळता खेळता वेफर खात होता.

तर खेळता खेळता त्याने क्ले पासून जमिनीवर एक सर्कल तयार केले. आणि त्याच्या आतल्या बाजूने स्केचपेन फिरवून जमिनीवर देखील एक सर्कल उमटवले. ते मला दाखवून म्हणाला, पप्पा हे बघ मी झिरो बनवला.

मला ते क्ले चा वापर स्टेन्ससिल सारखा केलेला बघून फार क्रिएटीव्ह वगैरे वाटले. कारण मला त्याच्याकडून फार काही आऊट ऑफ द बॉक्स थिंकींगच्या अपेक्षा नसतात. कौतुकाने मी म्हटले, अरे अजून कर काही. तसे त्याने पुन्हा एक सर्कल केले.

मी वैतागून म्हणालो, काहीतरी नवीन कर रे.. पुन्हा काय झिरो केलास..

तसे तो म्हणाला, "अरे येड्याss, हा ओ आहे" Proud

(हे येड्या मीच त्याला बोलायचो. माझेच संस्कार आहेत. आता पे बॅक टाईम सुरू झालाय. हल्ली तो मला येड्यात काढून रिटर्न करतोय Proud )

हा धाग्याला अनुसरून लाज काढणे किस्सा झाला. पण किस्सा ईथेच संपत नाही...
अ‍ॅक्चुअली माझा पोपट झाला होता. पण पोरगा तर आपलाच आहे. म्हणून मी खुश होत त्याला अजून काहीतरी वेगळे करायला सांगितले.

तसे त्याने पुन्हा एकदा सर्कलच केले. मी पुन्हा वैतागून म्हटले, अरे तुला आणखी काही येत नाही का?

तसे त्याने शांतपणे आपल्याकडच्या चार पाच केळा वेफर त्या क्ले च्या रिंगणात टाकल्या आणि म्हणाला, ही प्लेट आहे Happy

हे नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स होते. त्याचा एक फोटो तेवढा काढायचा राहिला. पण पोराबद्दलची ईज्जत वगैरे अचानक वाढली.

मग त्याला आणखी काही तरी करायला सांगितले. आणि त्यानेही पुन्हा एकदा सर्कलच बनवले.

आता मला ऊत्सुकता लागली, हा पुढे काय करतोय.

तसे त्याने खेळण्यातल्या तीन गाड्या आणल्या. त्या खालीलप्रमाणे जोडून त्याचा "वन" तयार केला. आणि मी काही विचारायच्या आधीच मला म्हणाला, पप्पा हा मी "टेन" केलाय Happy

IMG_20220820_035917.jpg

आता मात्र मी अगदी रडकुंडीलाच आलेले. "हे धरणीमय मला पोटात घे" असा मनातल्या मनात सीतामाई प्रमाणे धावा सुरूच होता.
त्याच झालं अस होत, माझ्या मुलाची शाळा (वय वर्ष ५) नेहेमी दुपारी बाराला असायची पण दहावी बारावी च्या परीक्षा असल्या कि २०-२५ दिवसांसाठी शाळा सकाळी नऊला भरायची. त्याला थोडा दमा असल्यामुळे रात्री / पहाटे खोकला वगैरे यायचा , मग थोडी झोपमोड, गरम पाणी, मध पाणी घेऊन परत झोपायच. एकदा झोपमोड झाली की सकाळी उठायला उशीर, ज्याचा एरवी काही फरक नाही पडायचा पण आता सकाळची शाळा असली कि भलतीच घाई व्हायची. मग हमखास स्कुल व्हॅन निघून जायची . मग दुसरी रिक्षा पकडून शाळेत जायचं, उशीर झालाच म्हणून समजा. त्या आठवड्यात नेमका २ वेळेला उशीर झाला होता. झालं! आज बुलावा आया है! बाईंचा निरोप "शाळेमध्ये येऊन भेटा "
शाळा संपून (माझी स्वतः ची )इतकी वर्ष झाली तरी (कुठल्याही ) बाईंशी बोलायचे म्हणजे माझ्या पोटात भयंकर मोठा गोळा येतो. आता तर खात्री होती, नक्की काहीतरी गडबड आहे. पण करणार काय ? सगळा धीर एकटवुन गेले शाळेत. तर चक्क मुख्याध्यापिकांकडेच पाठवले. स्वागताला त्याच्या क्लास टीचर आणि मुख्याध्यापिका !
"बसा " "शाळेत उशीरा येतो "
"हो जरा एक दोन दिवस झाला उशीर. "
"हे फक्त आताच नाही ये , गेले काही दिवस मी बघत्ये "
आता ओठांना कोरड पडायला लागलेली. "अं अं हो जरा काही दिवस शाळेचं वेळापत्रक बदललाय ना, त्यात त्याला जरा रात्रीचा, पहाटेचा खोकला येतो, झोपमोड झाली त्याची कि मग सकाळी थोडी गडबड होते ..." इकडे माझी सारवा सारवी सुरु झाली. तसं बाईंनी एकमेकींकडे बघितलं. आता पोटातला गोळा थोडा थोडा मोठा होऊ लागला.
"तो तर म्हणाला, आईला उठायला उशीर होतो म्हणून त्याला शाळेत यायला उशीर होतो."
मी अवाक होऊन बघतच राहिले. रात्रीची (कधी मधी होणारी) जागरणं, सकाळचे वाफारे, औषध, दूध , आवराआवरी ह्यासाठी होणारी धावपळ, मारामारी सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण ह्यावर उत्तर काय द्यावे हे काही सुधरेना.
इकडे दोघींच्या डोळ्यात "काय आई आहे, स्वतः ला उठायला उशीर होतो तर खुशाल मुलाच्या आजारपणाची कारणं पुढे करते. किती तो बेजबाबदारपणा .. वगैरे वगैरे " मला काही त्यांच्याकडे बघवेना
"अहो इतका छोटा मुलगा, तो काय स्वतःच्या मनचं सांगणारे का?" बाई पुढे बोलायला लागल्या. आणि तेव्हा मात्र वर सांगितल्याप्रमाणे धरणी मातेलाच साकडं घालायला लागले. कारण खरं सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाही आणि शिवाय आपल्या पिल्लाला कसं खोटं पाडणार. गुपचूप त्यांनी केलेली कानउघडणी मूग गिळून ऐकली आणि घरी आले.
"अरे तू टीचर ना असं का सांगितलंस कि आईला उठायला उशीर होतो म्हणून तुला शाळेत यायला उशीर होतो ?" घरी आल्या आल्या माझी सरबत्ती
" उशीर झाला आणि टीचर ओरडू नये म्हणून मग मी आई उशिरा उठते सांगितलं, मला काय माहित टीचर तुला शाळेत बोलावेल आणि विचारेल.?"
गाल फुगवून त्याचं उत्तर . मी फक्त कपाळावर हात मारून घेतला.
****
त्यांची शाळा प्ले वे पद्धती प्रमाणे चाले, तर मुलांना स्नायू बळकटीसाठी छोटी छोटी कामे देत. जसं छोट्या शिशूत रुमालाच्या घड्या घालणे वगैरे.
मोठ्या शिशूत एक दिवस घरी आला " आज टीचर ने त्यांच्या नवऱ्याचे कपडे शाळेत आणले होते आणि आम्हाला घड्या घालायला सांगितल्या."
मला हसू आवरेना " अरे ते काही त्यांच्या नवऱ्याचे कपडे नव्हते . गेल्या वर्षी तुम्ही छोटे होतात म्हणून छोट्या कपड्यांच्या घड्या घालायला दिल्या , म्हणजे रुमाल वगैरे, आठवतं ना! आता तुम्ही मोठे झालात ना म्हणून मोठे कपडे दिले. "
" नाही! त्यांच्या नवऱ्याचा शर्ट वगैरे आणलेले त्यांनी, त्यांचेच कपडे होते " तो त्याचा (लॉजिकल) पॉईंट काही सोडेना.
माझा नवरा गमतीने म्हणतो कसा "आता बाईंना जाऊन हि गोष्ट सांग, आणि विचार एवढा छोटा मुलगा काय स्वतःच्या मनाचं बोलणारे ?"
आणि आम्ही दोंघही हसत हसत (आजकालची) "इनोसंट मुले " ह्या विषयावर गप्पा मारू लागलो

Pages