Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अमि
मी अमि
खालील किस्सा २००३ साली
खालील किस्सा २००३ साली रीडर्स डायजेस्टला पाठविलेला होता. तो आला की नाही कळले नाही परंतु त्यांनी १ वर्षाचे फ्री सब्स्क्रिप्शन दिले होते.
मुलगी ३ वर्षाची होती त्यामुळे मी तिला नेहमी रंग शिकव कुठे प्राणी पक्षी शिकव असे करत असे. उदा - हा चेंडू बघ कसा हिरवागार आहे पोपटचह जणू. तुझा फ्रॉक कसा गुलाबी गुलाबी आहे, गुलाबाचे फूलच जणू.
एकदा बाहेर जाताना मी काळ्या रंगाचा ड्रेस घातला व तिला विचारले मी कशी दिसते बाबु? ही ढमी म्हणते - काळीभोर अगदी वटवाघूळच जणू. अर्थात इंग्रजी शब्द बॅट वापरलेला पण त्यामुळे काही माझ्या न्यूनगंडाची तीव्रता कमी झाली नाही
मला नाही वाटत त्या दिवशी मी तो ड्रेस घालू शकले 
(No subject)
सामो
सामो
(No subject)
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने
या बॅट वरून आठवले. मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग
सामो, ऋन्मेष
सामो, ऋन्मेष
ऋ, तुला मी सांगितलेलं ना
ऋ, तुला मी सांगितलेलं ना मुलांमधे आपलेच गुणदोष आलेले असतात. पण आपण ते मान्य करत नाही
सामो
सामो

मी अमि
“लेकीची त्यावर नजर पडताच तिने
“लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग ” - My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे.
‘boӘ γM bɒႧ γM‘
‘boӘ γM bɒႧ γM‘
काय अभ्यास, काय अभ्यास
अटेंशन सिकींग साठी मुलांच्या
अटेंशन सिकींग साठी मुलांच्या नावाने काहीही खपवणाऱ्यांचा निषेध.
‘boӘ γM bɒႧ γM‘
‘boӘ γM bɒႧ γM‘
काय अभ्यास, काय अभ्यास
>> खरं तर मलाही बरेच दिवस हा डाऊट मनात होता. यांनी "दूध का दूध..." करून दाखवून दिलं.
फेफ
फेफ
सगळेच नवीन प्रतिसाद एक्से एक आहेत.
फेरफटका: सही पकडे हैं
फेरफटका: सही पकडे हैं
महामहीम सरांवर वहीम? राम रहीम
महामहीम सरांवर वहीम? राम रहीम राम रहीम
हे पाप फेडायला कुठे जायला लागेल माहिती आहे? किहीम
सगळेच प्रतिसाद
सगळेच प्रतिसाद
सामो, लेकीचा प्रतिसाद - काळीभोर वटवाघूळ च जणू --- आई आणि लेक संभाषण इमॅजिन करून जाम हसले .
व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या
व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे>>>>
सही पकडे है
My Dad My God ची मिरर इमेज
My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>
कमाल आहे, लोकं स्वतःच माझ्या पोस्टचा किस पाडतात. आणि म्हणतात ऋन्मेष धागा भरकटवतो

बाई दवे, याचे स्पष्टीकरण द्यायला आता मी यावर वेगळा धागाच काढतो
चला सरांना जे करायचं होतं
चला सरांना जे करायचं होतं अखेरीस ते त्यांनी केलंच
सगळीकडे हेच तर करता सर तुम्ही
ईथे धागा काढला आहे
ईथे धागा काढला आहे
वरील माय डॅड माय डॉगची चर्चा तिथे करू शकतात.
https://www.maayboli.com/node/82027
हा धागा पुढे नेऊया
“ याचे स्पष्टीकरण द्यायला आता
“ याचे स्पष्टीकरण द्यायला आता मी यावर वेगळा धागाच काढतो” - मैं अंडे बेचूंगा और वह खाने के लिए ब्रेड भी मैं ही बनाऊंगा ह्या तेजा लॉजिकने, सरांनी स्वतःच्या आणखी एका धाग्याची सोय ह्यात पाहिली
तर ते कॅपिटल लेटरचं स्पष्टीकरण येणार ह्याची कल्पना होतीच. त्याची मिरर इमेज अशी होते:
MY DAD MY GOD
ႧOӘ YM ႧAႧ YM
फेरफटका त्या धाग्यावर या की..
फेरफटका त्या धाग्यावर या की...

अजूनही बरेच काही आहे तिथे.. हा एकच मुद्दा नाही..
की ऋन्मेषबद्दल बोलायचे आहे पण त्याच्या स्वतंत्र धाग्यावर नाही.. भले ईतर धागे का भरकटेना
जोक्स द अपार्ट, प्लीज असे न का करू. एण्ड ऑफ द डे धागा भरकटायचे बिल माझ्याच नावा वर फुटते..
तुमच्या सोयीसाठी पुन्हा लिंक घ्या - https://www.maayboli.com/node/82027
भारी आहेत एक एक किस्से.
भारी आहेत एक एक किस्से.
माझा भाचा ४-५ वर्षांचा होता . आम्ही सगळे मिळून गणपतीपुळ्याला फिरायला गेलो होतो. तिथे पोहोचल्यावर सगळे गाडीतून उतरत होते. माझ्या आत्याचे मिस्टर पुढच्या सीट वरून उतरले आणि त्यांनी दरवाजा जरा जास्तच जोरात ढकलून लावला. मोठा आवाज झाला. त्यावर एका क्षणाचाही विलंब न करता माझा भाचा त्यांना म्हणाला, "हळू लावा. काय संडासचा दरवाजा लावताय? "
आम्ही हसून हसून अगदी फुटलोच.
आई ग्ग... काय संडासचा दरवाजा
आई ग्ग... काय संडासचा दरवाजा लावताय
हहपुवा
हहपुवा
निशा, प्रतिसाद का बदलालात?
निशा, प्रतिसाद का बदलालात?
याचं धाग्यावर एक पोस्ट होती, ज्यात मुलाला आजीशी लग्न करायचं होत.
तू माझ्या मम्मिशी लग्न केलस तर मी तुझ्या मम्मीशी करणार हे लॉजिक
बरं सर, वर ते जाणून बुजून
बरं सर, वर ते जाणून बुजून "जोक्स द अपार्ट" लिहिलेलं आहे ते वाचताना भात खाताना कचकन दगड दाताखाली आल्या सारखं वाटतं त्याची तक्रार याच धाग्यावर करायची की वेगळा धागा काढताय त्यासाठी?
तळटीप: बाई दवेंसाठी अजून एक वेगळा धागा काढा, हाकानाका. आम्ही आहोत प्रतिसाद द्यायला.
आमची कार्टी लैच बिलंदर
आमची कार्टी लैच बिलंदर जन्माला आली आहे, परवा भोकाड पसरलेनी
ममा तू बिकिनी घे म्हणून !
ऐन मॉलात! बायको आमची सैरभैर, मला म्हणाली तू शिकवलं आहेस का ?
मी म्हणलं इथं कपाळ मला माझं आवरेना झालं आहे काम,
नंतर कळले की युट्यूब वर बेबी जॉन का कायतरी पाहते, त्यात एक typical happy American family wiz. Mumma Dad Elder brother and Baby's daily life is depicted,
आता त्या व्हिडिओत एका एपिसोडमध्ये म्हणे ती फॅमिली मियामी, फ्लोरिडाला जाते, तिथे बीच वर बिकिनी असेल कदाचित नॉर्मल, तेच नॉर्मल आमच्या पोरीला भारतात लागू करायचे होते, अन् मॉलच्या अगोदर जिवतीचा फोटो शोधत आम्हाला अर्धी मुंबई हिंडवणारी अर्धांगिनी मात्र अर्धमेली झाली लाजेनं.
(No subject)
Pages