मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००८ सालचा हा किस्सा. माझा मुलगा तेव्हा ४ वर्षांचा होता. आमच्या घरी माझ्या मावस- सासूबाईही रहात असत. त्यांचे वय तेव्हा ७९-८० असे होते. माझ्या मुलावर त्यांचा भारी जीव आणि तो आजुबाजूला न दिसल्यास त्यांना चैन पडत नसे.
ते वर्ष IPL च्या पहिल्या season चे होते. cheer girls हे प्रकरण अगदी नवीन आणि चर्चेत असे तेव्हा.
माझा मुलगा, त्याचे बाबा, काका व इतर बाळ-गोपाळ मिळून खाली क्रिकेटची मैच खेळत असत.
असेच एकदा माझ्या मावस सासूबाई आलेल्या पाहुण्यांना सांगत होत्या की निमिषशिवाय घरी चैन पडत नाही, तो खाली क्रिकेट खेळायला गेला तरी मला घरी कंटाळा येतो , व. व.
तेव्हा निमिष पटकन त्या मंडळींसमोर बोलून गेला होता, मी आईला तुला एक लाल लाल फ्रॉक आणायला सांगतो, तु तो घालून खाली येत जा आणि आमच्या टीमची cheer girl बनून मस्त डान्स कर, म्हणजे मी सतत तुला दिसत राहीन.
सासूबाईंचा व त्या पाहुण्यांचा चेहरा अगदी पाहण्यासरखा झाला होता आणि आतमध्ये आमची ह. ह.पु.वा.

सुमेधा कस्ली चुणचुणीत मुलगी आहे हो तुझी! आईवरच गेलेय बहुदा Happy पण तुला मूठभर मांस चढलं असेल नाही?? साबांचा चेहरा आठवून हसू आले Happy

सुमेधा कस्ली चुणचुणीत मुलगी आहे हो तुझी! आईवरच गेलेय बहुदा स्मित पण तुला मूठभर मांस चढलं असेल नाही?? साबांचा चेहरा आठवून हसू आले स्मित>> + १००००

चीअरगर्ल - काय मस्त आयडिया लेकाची..

हा किस्सा माझ्या ऑफिसमधील सहकारयाच्या मुलीचा, अदिती तिचं नाव, ती ३-३.५ वर्षांची असतानाचा.
अदिती व तिचे बाबा मिळून एक खेळ खेळत असत घरी, बाबा तिला बेबी म्हणत असे व ति त्याला पापा. बाबा जे तिच्याबद्दल बोलेल ते ही त्याच्याबद्दल बोलत असे, असा हा खेळ होता. उदा.
बाबा: बेबी खाना खाएगी
अदिती: पापा खाना खाएंगे
बाबा: बेबी स्कुल गयी
अदिती: पापा स्कुल गये

अदितीला कधीही कुठेही बेबी शब्द वापरायचा असेल तर त्याऐवजी पापा बोलून पुढचे सर्व वाक्य कॉपी पेस्ट करायचे हे एव्हाना चांगले महित झले होते.

तर अदिती नर्सरीत जात होती, तिथे बरीच गणी, गोष्टी शिकवित असत. एकदा मुलांची प्रगती बघायला पालकांना शाळेत बोलावले होते आणि माझा हा सहकारी सपत्निक गेला होता.
अदितीचा नंबर आल्यावर टीचरने एक गाणे बोलून दाखवायला सांगितले ज्यात नेमका "बेबी" शब्द होता.
अदितीने म्हटलेल्या गाण्याच्या ओळी अशा होत्या:-

पापा रोये वै वै वै
टीचर बोली डार्लिंग कम टू मी

गामा पैलवान्...मुलीचे उत्तर ऐकून आजूबाजूच्यांचे पडलेले चेहेरे पाहून आईला लाज वाटणारच ना Happy

ह्याच मुलीचे अजूनही २ किस्से आहेत लाजवणारे नाहीत..मजेचे आहेत.

लहानपणी ज्ञानेश्वरांची गोष्ट ऐकायची ती. ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे संन्याशाची पोरे म्हणून हिणवली गेली. त्यांना मुंज करायला धर्मशास्त्राची परवानगी नव्हती. म्हणून त्यासाठी ते सगळे जण पैठणला गेले व तिथल्या धर्ममार्तंडांकडे परवानगी मागितली हे गोष्टीत वरचेवर यायचे. थोड्या दिवसांनी तिने विचारले, अरेच्चा एवढे सगळे कशाला करायचे पण? घरच्या घरी मुंज करून टाकायची ना ? Happy

ध्रुव बाळाची गोष्ट ऐकून झाल्यावर तीने विचारले होते की ध्रुवाला आढळपद मिळाले पण उत्तमचे काय आहे? त्याला बसायला जागा नसेल तरच मग ध्रुवाला आनंद होणार ना Happy

माझा भाचा प्रथमेश तेव्हा अडीच वर्षांचा होता नणंद सुट्टीवर आलेली तिलाही तीन महिन्याचं दुसरं छोटं बाळ होतं. मला ९ व्या महिन्याचे शेवटचे दिवस सुरु होते. एके सकाळी दवाखान्यात चेकअप ला जायला म्हणून मी आणि यजमान निघणार होतो आमचं बोलणं घरात चालूच होतं तेवढ्यात प्रथमेश त्याच्या sack मध्ये स्वतःचे कपडे भरू लागला आणि स्वतःच्या आईला म्हणाला माझी पाण्याची बॉटल भरून दे. ताई म्हणाल्या अरे कुठे निघालास तू ? तर म्हणतो मामी बेबी आणायला हॉस्पिटल ला जातेय ना मग तिकडे तिच्याजवळ कुणीतरी थांबायला नको. तू इकडे घरी थांब बिट्टू जवळ मी मामी जवळ थांबेन

त्याचे ते बोबडे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आलं आणि एका छोट्याश्या जीवाचा मोठा आधार घेऊन मी मोठ्या हिमतीने त्याच दिवशी हॉस्पिटल ला भारती झाले. १० दिवसांनी घरी आले तेव्हा प्रथमेशनेच थाळी वाजवून जोरात स्वागत केले आमचे आणि त्यानंतर खरंच ३-४ दिवस गुणी
बाळासारखा शांत अन समंजस वागला.

एकदा आमच्याकडे माझी मैत्रीण आलेली राहायला तिची मुलगी आणि माझा मुलगा दोघेही सारख्याच वयाचे तेव्हा दोघेही ३ वर्षांचे होते. ती दोघ प्रचंड भांडायची आणि मारपीट करायची आणि मग सतत एकमेकांच्या कम्प्लेंट चालू असायच्या. मग कुणी काम्प्लेंत करायला आलं कि तिने मला मारलं किंवा त्याने मला मारलं असं कि त्यांना समजवायला आम्ही म्हणायचो अरे मारलं नाही तिने न गम्मत केली. ह्याच गोष्टीचा फायदा घेत दोघेही अति शहाणे झाले …. आधी मारून घ्यायचे एकमेकांना आणि नंतर म्हणायचे मी मारलं नाही मम्मा गम्मत केली. नंतर त्याचं हे एकमेकांना मारणं आणि गम्मत केली असं सांगणं दिवसभर चालायचं. आम्ही इतके वैतागलो कि घरात नियम काढला कोणीच कोणाची गम्मत करायची नाही (म्हणजे एकमेकांना मारायचं नाही) … मग दिवसभर एकच वाक्य ऐकायला यायचं त्या दोघांच एकमेकांना उद्देशून 'ए गम्मत नाही करायची'.

एकदा आम्ही ट्रेन मधून कुठेतरी जात होतो . हि दोघेही खिडकीजवळ उभी आणि आम्ही बोलण्यात गुंग. समोरच्या सीटवर बसलेल्या एका वयस्क इसमाने सहज म्हणून या दोघांच्या डोक्यावर हळूच टपली दिली. या दोघांनीही भोन्गड पसरलं या अंकल ने मारलं म्हणून …. आम्ही त्यांना समजवायला म्हणून सहज बोलून गेलो 'अरे बाळांनो मारलं नाहीये त्यांनी गम्मत केली' या दोघांनीही रडायचं दिलं सोडून आणि त्या अंकल च्या अंगावरच गेले ओरडत 'एए ए ए ए ए ए गम्मत नाही करायची~~~~~ ' त्या माणसाला आपण काय गुन्हा केला आणि हसावं का रडावं कळेच ना … आणि आम्ही कुठे तोंड लपवू असे झालेलो…. त्यानंतर संपूर्ण प्रवासात मात्र कुणीच कुणाची गम्मत करण्याची हिम्मत केली नाही

एकदा माझ्या यजमानांचे अन माझे असेच नेहेमीचे साधेसे भांडण झालेले … मी फुगून बसले आणि यजमान निघून गेले ऑफिसला… माझा ५ वर्षांचा मुलगा माझाजवळ येउन म्हणतो मम्मा बस झाल न आता इतकं रागाऊ नकोस बाबांना कसं वाटत असेल तिकडे ऑफिसात…. मी मोठा झाल्यावर माझी बायको माझाशी असं भांडली तर मी पण असा रुसून बसेल तर आवडेल का तुला…. फ़स्स्कन हसूच फुटलं मला आणि फोन करून नवर्याला सांगितल्या शिवाय राहावलंच नाही.

आम्ही माझ्या मावशीकडे गेलेलो एकदा … मावशीची मुलगी तेव्हा जेमतेम आदिचेक वर्षांची असेल गोड आणि खट्याळ. ती बाहेर जाऊ नये आणि नजरेसमोर राहावी म्हणून मावशी तिला गुंतवून ठेवायला म्हणून किचन मधेच असे काहीतरी काम सांगत राही. आम्ही गेलो तेव्हाच मावशीने तिला हि वाटी पाण्याने धुऊन घे असं सांगितलं होतं. मी तिच्या हातात वाटी पाहून सहज म्हणाले किती गुणाची ग आमची पिल्लू कित्ती काम करते … तेवढ्यात तीने हातातली वाटी खाली टाकली आणि धावत येउन मला बिलगुन म्हणते कशी ' दिदु आई दिवसभर मला काम सांगत असते भांडे धु, कपडे धु नाहीतर कोंडून ठेवते' (कोंडून ठेवते म्हणजे भर दुपारी बाहेर जाऊ देत नाही) आम्ही प्रचंड हसलेलो पण तिची आई अगदीच ओशाळली … म्हणाली बर झालं मी सख्खीच आई आहे सावत्र आई असती तर सगळ्यांनी खरंच विश्वास ठेवून तिलाच बिचारीला बदडलं असतं...

एकदा माझ्या यजमानांचे अन माझे असेच नेहेमीचे साधेसे भांडण झालेले >>> Lol

दिदु आई दिवसभर मला काम सांगत असते भांडे धु, कपडे धु नाहीतर कोंडून ठेवते' Lol

Pages