मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवारी पोरासोबत (वय साडेचार) वाशी स्टेशनला फिरायला गेलो होतो. कारण त्याला ट्रेन बघायला आवडतात.

तो दाखवायचा कार्यक्रम उरकल्यावर स्टेशनबाहेरच्या टपऱ्यांवर काही खाऊया म्हटले. एका हातात समोसापाव आणि दुसऱ्या हातात चहा घेऊन कट्ट्यावर बसलो. त्यालाही चॉकलेट चिप्स वगैरे देऊन शेजारीच बसवले. ट्रेन खूप बघितल्यास आता बस बघ म्हटले.

समोसापाव व्यवस्थित दोन हातांनी पकडून खावे म्हणून मी चहाचा ग्लास बाजूला ठेवला. तसे पोरगा लगेच म्हणाला, ठेवलास का? पी..

माझ्या तोंडात समोसापावचा घास होता. म्हणून मी नुसते हम्म हमम केले.
तसे त्याने दुसरी वॉर्निंग दिली.. अरे चहा पी..

पोरंच ती. काहीही बोलतात. सगळेच कुठे मनावर घ्यायचे. म्हणून मी पुन्हा लाईटली घेत म्हटले, ह्ममम पितो जरा थांब.. आणि समोसापाव खाण्यावर कॉन्संट्रेट करू लागलो.

तसे तो तिरमिरीत उठला. माझ्या समोर येऊन ऊभा राहिला. आणि एका हाताने माझा गळाच धरला.. मोठ्याने मला दरडाऊन म्हणाला, चहा पी Proud

आई ग्ग.. आजूबाजूचे लोकंही हडबडून त्याच्याकडे आदराने बघू लागले. जणू लहानपणीचा विजय दिनानाथ चौहान च.. पण माझा मात्र उगाच मास्टर दिनानाथ चौहान झाला Proud

मग आणखी लाज निघण्यापेक्षा मी गपचूप चहाचा एक घोट घेतला.

Cute cute

ॠ हा सर्व प्रसंग ऑडिओ बनवून इन्स्टा ग्राम रील केले तर फार भारी होईल. मला तर वाचूनच हसु आवरेना. तुम्हाला गप्प माझे ऐक म्ह णणारा बारक्या कसा दिसत असेल ते इमेजिन केले . काल माझे लंच पण समोसा पावच होते त्यामुळे फारच रिलेट झाले.

फोन वरून वाचले होते असे अजून किस्से येउ द्या.

मी काही त्याचा गळा बिळा धरत नाही. दूध पी म्हणून तर बिलकुल नाही. जे मला स्वत:ला आवडत नाही तो अत्याचार पोरांवर कश्याला..

हा युट्यूब विडिओजचा परीणाम असावा. त्याला त्यात जे दिसते त्याची मिमिक्री/अ‍ॅक्टींग करायची भारी सवय आहे.

कालचाच किस्सा घ्या, नशीब घरातच झाल्याने बाहेर लाज निघाली नाही.

तो युट्यूब टीव्हीवर लाऊन गाणी बघत होता. गो गो गो गोविंदा (ओह माय गॉड) हे एक त्याचे आवडीचे गाणे चालू होते. अधूनमधून त्यातली एखादी स्टेप कॉपी टू कॉपी करने चालू होते. मी त्याच्या शेजारीच माझा लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसलो होतो.

गाण्यातील खालील प्रसंग आला, बघून घ्या लिंकवर..
https://www.youtube.com/watch?v=H9ySOP8PYEI&t=205s

तसे तो माझ्या जवळ आला आणि सेम तशीच अ‍ॅक्टींग करू लागला.
आधी हातांची पाचही बोटे माझ्या चेहर्‍याभोवती फिरवून मग स्वतःच्या ओठांवर ठेवून मला एक फ्लाईंग चुम्मी दिली.
मी सुद्धा ते बघून लाडानेच त्याच्याजवळ आणखी झुकलो..
तसे त्याने पुढची स्टेप्स केली... ए मटकी तोड रे म्हणत काही समजायच्या आतच माझी मटकी फोडली. खाडकन माझ्या कानाखाली पडली. अ‍ॅक्चुअली कानावर पडली. आतवर झिणझिण्या आल्या. कान सुन्न झाले. क्षणभर ऐकायचे बंद झाले Proud

दोन मिनिटाने दुखायचे थांबले तसे बायकोला जाऊन हे सांगितले. सहानुभुती तर नाही मिळाली, पण तरी दोघांनी मिळून त्याला झाप झाप झापले. च्यायला नाहीतर हा सीन उद्या चारचौघांत घडायचा...

आजचाच किस्सा
रमाबाई मला म्हणाल्या
"आई तिथे बस"
बसून काय करू रमा?
"चुपचाप पोई खा"
असं म्हणाली खरी, पण माता स्वतः भरवू लागली. घास भरवणे कसले, कोंबणे ते!
आणि म्हणे चावून खा Lol

D for W!!!!!

मुलगी 4 वर्षाची होती,
घरातून बाहेर लिफ्ट पर्यंत आल्यावर काहीतरी विसरलो म्हणून घरी परत गेलो.
मग लिफ्ट येई पर्यंत तिने इंटरव्ह्यू कम रोस्ट सेशन केले
मु - बाबा तू विसरलास? तू विसराळू झालायस?

मी - बाबा आता म्हातारा होत चालला आहे, म्हणून गोष्टी विसरतो ( हे उगाच )
मुलगी - मग आता तू मरणार??
मी नॉन प्लस झालो, पण इथपर्यंत तरी गोष्टी ठीक होत्या,

खाली पोहोचल्यावर एक आजी फेऱ्या मारत होत्या,
मुलगी - या आजी म्हाताऱ्या झाल्यात??

पुढचा प्रश्न काय असेल याचा मला अंदाज आला, आणि घाई घाई ने तिला स्कूटर वर चढवून तिकडून पसार झालो

>>>>>>>पुढचा प्रश्न काय असेल याचा मला अंदाज आला, आणि घाई घाई ने तिला स्कूटर वर चढवून तिकडून पसार झालो
=)) =))

एकदा इलेक्ट्रिशीअन स्वीच बोर्डचं काम करत होता.बहुतेक लो वेस्ट पँट असावी माझं इतकं लक्ष नव्हतं.
मुलगी (चार वर्षे) : अम्मा देख उसका ढु×× दीख रहा है.
नशीब इकडं लोकांना मराठी/हिंदी कळत नाही. Lol

Lol वाचलीस तू

आम्ही पूर्वी सतत फिरतीवर असल्यामुळे घरी टिव्ही नव्हता..दोन एक वर्षांपूर्वी जेव्हा टिव्ही आला तेव्हा शनिवार-रविवारी दोन तास मुलींसाठी आणि पुढचे दोन तास आम्हा मोठ्यांसाठी टिव्हीचा टाईम विभागून घेतलेला.. “Kids movie time” अशी मोठ्याने हाक मारली की त्या धावत यायच्या.. एकदा माझा भाऊ आणि वहिनी काही दिवस रहायला आले तेव्हा मुलींचा मुव्ही टाईम संपला आणि मी मोठ्या मुलीकडून रिमोट घेत म्हटले आता आम्हाला टिव्ही बघायचाय .. तर तीने ओके म्हणत मला रिमोट दिला आणि माझ्या भावाला ओरडून हाक मारून सांगितलं, “मामा, adult movie time” Lol ..तेव्हा पासून आम्ही ‘adult’ हा शब्द वापरायचं कमी करून ‘grown ups’ बोलू लागलो

धमाल प्रतिसाद एकेक Lol
काही वर्षांपूर्वी फूड चॅनलवर एक मॉडल टाईप बेकरी शेफ केक करून दाखवायच्या, हे मी नवऱ्याला सांगितले की कुकरीशोच्या मानाने फार हॉट बॉड बाई आहेत, आम्हाला वाटले तिचं लक्षं नाही पण कसचं , पुढच्या वेळी ते लक्षात ठेऊन लेकीने 'आई, हॉट बॉड काकू कपकेक दाखवताहेत ये पटकन' म्हणे! Proud

हा घरातलाच किस्सा!

बायकोच्या मैत्रिणीचे प्रेगनंसी मधले पोट बघून ५ वर्षाच्या मुलाने विचारलेले कि हे काय? तर त्याला सांगीतले "शी हॅज अ बेबी इन हर टमी".

नंतर घरी आल्यावर रात्री झोपताना बायकोच्या ब्रेस्ट कडे बोट दाखवून म्हणे, "मम्मा, डु यू हॅव टू बेबीज? वन हिअर ॲन्ड वन इन देअर?"

साधारणपणे १६-१७ वर्षांपूर्वीची घटना असेल. मी एकदा पुण्याहून मुंबईला एशियाडने जात होतो, मागच्या सीटवर एक पती पत्नी आणि साधारण ५-६ वर्षाचा लहान चुणचुणीत मुलगा असं कुटुंब होतं. उत्सवाचा अविरत झरा असावा त्याप्रमाणे तो लहान मुलगा सारखा काहीनाकाही तरी करत होता. पुस्तकातील कविता, गाणी म्हणणे, कधी आई वडिलांना काही प्रश्न असं सुरु होतं. अचानक लोणावळा गावची पाटी त्याने वाचली आणि फटाकडी मराठी चित्रपटातील रेखावर चित्रित झालेली लावणी त्याने गायला सुरवात केली. "लोणावळा खंडाळा कुठं-कुठं जायचं हनिमूनला", आणि अचानक त्याच्या आईचा आवाज आला, "आता पुरे झालं गाणं, गप्प बस".

मी माझ्या नवर्याला सान्गत होते की जीम ट्रेनर जेव्हा पेर्सनल ट्रेनिंग घेत नसतो तेव्ह त्याचे बराच वेळ फोन वर कोणाशी तरी काहितरि सुरु असते. मला असे म्हणायचे होते की जीम ट्रेनर चे अफेअर आहे आणि तो त्या मुलीसोबत खुप वेळ बोलतो.

चिरंजीव वय वर्शे ९, समोर असल्याने मल इतके उघड सांगणे शक्य नव्हते. पण नवर्याच्या लक्शात आले मला काय सांगाय्चय.

इतक्यात चिरंजीव उत्स्फुर्त पणे म्हणाले , " फोनवर ? हा.... म्हणजे पप्पांसारखे ना? "

नवरा तीन ताड उडाला.
मग दिव्य चिरंजीवांनी स्पष्टीकरण केले की 'पप्पा कसे ऑफिसचा फोन आला की खुप वेळ बोलतात ना.... तसे ना .:P Proud Proud

>>>>>>>नवरा तीन ताड उडाला.
मग दिव्य चिरंजीवांनी स्पष्टीकरण केले

आई ग्ग!!! स्ट्रेसबस्टर धागा आहे हा ही. =))

Pages