मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मुलगी कांदे बटाटे यासाठी एकच शब्द वापरायची 'कान्दाते' आणि मग आम्ही हि तोच शब्द घरात प्रचलित केला ..........नवख्याला कळायचे नाही Happy

रविवारी कुठल्या तरी चॅनेलवर शोले लागला होता. ठाकूरचे हात कापण्याचा सीन संपल्या वर चिरंजीवाने ही तोच 'सनातन' प्रश्ण विचारला... Proud

बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला. खेडेगावात गर्दीने भरलेल्या बसमध्ये लहान मुलाला कडेवर घेऊन एक गृहस्थ उभे होते. मुल खूप रडत होते. बहुदा भूक लागली असेल. शेवटी न राहवून बाजूला बसलेल्या एका कॉलेजच्या मुलीने त्याला आपल्या जवळ घेतले. मुलगा थोडा वेळ शांत झाला. पण लगेच "दुदू दे" म्हणून तिला हट्ट करू लागला. तिने शांत करायचा प्रयत्न केला. पण हा काही केल्या आपला हट्ट सोडायलाच तयार नाही. हळू हळू प्रकार सगळ्या गर्दीच्या लक्षात आला. ती बिचारी कावरीबावरी झाली. मुल सोडत नव्हते तरीही कसेबसे पुन्हा त्याला त्या गृहस्थांच्या हवाली करून पुढे येईल त्या स्टोप वर उतरून निघून गेली. आख्खी गर्दी ऑकवर्ड होऊन गालात हसत होती.

आहेच मुळी, दीमा!

अहो, माझं सोडा हो. मी नकली गामा पैलवान आहे. खरा गामा पैलवान होता तो सुद्धा रोजचा नित्याचा व्यायाम करतांना ईश्वराचा जप करीत असे. त्यामुळे त्याचा रोजचा सराव जणू एक लांबलचक नित्यपाठच झाला होता. दैनंदिन आयुष्याचं ईश्वरीकरण करा, हेच सनातन धर्म सांगतो. म्हणून गामा पैलवान म्हंटलं की सनातन धर्म आणि सनातन धर्म म्हंटलं की गामा पैलवान जोडीनं आलेच.

आ.न.,
-गा.पै.

काल लेकीचा (४.५ वर्षे) अभ्यास घेतानाचा किसा.

मी: NO नो
लेक : NO नो
मी : GO गो
लेक : GO गो
मी : TO टू
लेक : बाबा हे टी.ओ. "टो" का बरं नाही?
म्हटलं यार आता काय एक्स्पेलेनेशन देऊ म्हणून विचारात पडलो असतांना तिनीच डोकं चालवलं अन स्वतःच्या लॉजीकनी उत्तर शोधून तीच मला सांगू लागली...
बाबा... TO ला लाडाने म्हणायचं का? जसं तू मला सोनू म्हणतोस तसा... (मी चाट पडलो ते लॉजिक पाहून)

माझा मुलगा १२-१२ वर्षाचा असेल तेव्हाच किस्सा आहे. अमेरिकेत वाढलेला असूनही मराठी बोलतो म्हणून आम्हाला त्याचा फार अभिमान. माझ्या नवऱ्याला नेहमी ट्रिप ला जाताना गाडी काढताना 'जय गजानन महाराज कि ' असं म्हणायची सवय आहे. आम्ही smokey mountains च्या ट्रिप ला निघालो होतो. सोबत माझे आईवडीलही होते. गाडी सुरु केल्याबरोबर मुलगा जोरात ओरडला 'राम नाम सत्य हॆ '. आम्ही अवाक. बर झालं आईवडिलांना ह्या अमेरिकन नातवंडांची सवय आहे. ते एकदम हसायला लागले आणि माझा ताण कमी झाला.

असाच तो लहान असताना साबा अमेरिकेला आलेल्या. त्यांना रोज सूर्यपूजा करून अर्घ्य देण्याची सवय होती. त्याने एक दोन दिवस बघितलं आणि आजीला म्हणाला 'हे असं करत जाऊ नकोस , तुला पोलीस पकडून नेतील'. त्यावरून नांतर साबा माझ्यावर तोंडसुख घेत्या झाल्या.

चिरंजीव वय वर्षे ५ - त्याच्या मम्मीबरोबर मंडईत फिरत होते.
अचानक काय आठवले कुणास ठाऊक, म्हणतो कसा तेही अगदी मोठ्याने "मम्मी बघ माझे केस पांढरे झाले, आता मी म्हातारा झालो का!"

आजुबाजुचे लोक दोघांकडे पाहून हसू लागले. Lol

<<,आमचे चिरंजीव ..वय वर्षे २. रेडिओ किंवा टीव्ही वर गाणी लागली की "गाणं" असं ओरडतात तेही त्यांच्या सेल्फ मेड लँग्वेज मध्ये. जे ऐकणार्‍याला अतिशय अक्षेपार्ह वाटू शकतं (शब्द इथे लिहू शकत नाही. बोलीभाषेत त्याचा अर्थ पार्श्वभाग असा आहे.)
परवा पाहुण्यांसमोर हा प्रकार करून लाजवलं चिरंजीवांनी.<<< Lol Lol

नुकतीच आमच्या सौं नी सांगितलेली घटना... आमचे चिरंजीव, वय ५.५, पुण्यातील एका नावाजलेल्या आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणार्या शाळेत जातात, तिथे मागील महिन्याच्या पेरेंट-टिचर मिटींग ला त्याच्या एका वर्गमित्राच्या आई-वडिल दोघांना ही भेटायला बोलावले.... त्या मुलाच्या व्रात्यपणाचा यथासांग पाढा वाचून दाखविण्यात आला व जाताना हळूच त्याच्या बाबांना विचारले... तुम्ही ड्रिंक्स घेता का हो ? मुलाच्या बाबांची फुल्ल विकेट पडली.. का असे विचारल्यावर क्लास टिचर म्हणाल्यात "...नाही आम्ही हिंदी वर्णमाला उदाहरणांसहित घेत होतो तेव्हा तुमचा मुलगा "च" से चरखा वगैरे म्हणायच्या भानगडीत न पडता "च" से "चखना" म्हणाला आहे. Lol
कहर म्हणजे ह्या पोराच्या आईने बाहेर येवुन हे तमाम मैत्रिणिंना सांगितले.....

परवा माझी लहान बहीण तिच्या अडिच वर्षे वयाच्या मुलाला घेऊन घरी आली. मी नुकतेच माझ्या मुलाचे कपाट आवरले होते आणि न लागणारे कपडे बाजूला ठेवले होते. त्यात नविन शर्ट होता जो मुलाने एकदाच वापरला होता आणि आता त्याला तो लहान झाला होता, म्हणून मी तो बहीणिकडे तिच्या मुलासाठी दिला. तर तिच्या मुलाने तो शर्ट तिच्या हातातून घेतला, त्याला एक-दोन वेळा ऊलटा-पालटा करून बघितला आणि परत तिच्या हातात देत म्हणाला" आई छान वाटतोय शर्ट घे..'
आम्ही सगळे त्याच हे वाक्य ऐकून जाम हसू लागलो.

Pages