मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हा किस्सा अस्मादिकांचा......

आमच्या पार्ल्याचे आमचे फॅमिली डॉ. म्हणजे आमचे अगदी फॅमिली फ्रेंड च होते. आम्ही झाडुन सगळे हरणखेडकर मंडळी त्यांचे औषध घ्यायचो, ह्या डॉ. काकांच्या तीसर्‍या मुलाची आणि माझी Date of Birth सेम आहे, एकदा त्यांनी मला तपासता तपासता हे सांगितले....आता खरे तर ही अतिशय normal गोष्ट, पण मुळात मी एकुलता एक आणि माझ्या सख्ख्या काकाला ही एकुलती एक मुलगी, त्या मुळे एखाद्या व्यक्ती ला ३ मुले असु शकतात अशी मला कल्पनाच नव्हती. मी त्यांना म्हण्ट्ले.....बापरे डॉ. काका, तुम्हाला ३ मुले आहेत ???? ते बिच्चारे लाजुन लाल झालेत आणि म्हणालेत...हो रे...आहेत...आता काय करणार Lol
हा किस्सा घडला तेव्हा मी ४-५ वर्षांचा असीन, पण मग घरी आल्यावर आई नी चांगली कान उघडणी केली होती.
गम्मत म्हणजे आई, मामा व मावशी आणि बाबा, काका आणि आत्या असे दोन्ही कडे ३-३ अपत्ये आहेत हे मला लक्षातच आले नव्हते. Lol

अशक्य किस्से :):)

माझी भाची वय वर्षे आठ. तिचा या पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे. म्हणून बहिणीने पार्टी ठेवली आहे.
निमन्त्रितांपैकी एकजण काही कारणाने घरी आली होती. तिने विचारले,
'काय मग, तयारी झाली की नाही? काय घेतलं आईबाबांनी?'
हिचे उत्तर- 'बाबांनी कालच दुकानात नेलं होतं. खूप कपडे घेऊन दिले.पण आणखी अजूनही मिळणार आहेत.'
'कसे काय ?'
बहिणीची मैत्रीण विचारती झाली.
उत्तर आले.
'तुमच्याकडून......'

बहीण गार.

हाऊ कम यू नेव्हर किस हर? लाईक अ‍ॅलिस्टएअर्स डॅड? ऑर रेशल्स डॅडी?
<<
बाप्रे!
या वाक्याचा अर्थ मला लागला तसाच तुम्हाला लागतोय का? 42.gif

इब्लिस.. ___/\__/\___

मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन बाहेरच आहोत. त्यामुळे त्याचा मराठी गाण्यांशी फारसा संबंध नव्हता आणि हेच मला खटकत होतं. मराठि सारेगमप ली'ल चॅम्प्स सुरु असतानाची गोष्ट..

एकदा मी त्याला हा कार्यक्रम ऐकायला जबरदस्तीने बसवले. पल्लवीताईचा लाडका 'मोदक' प्रथमेश रानडे गात होता, माझं खूप आवडतं गाणं..'जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा...'

मुलानी खुप पेशंस दाखवत पुर्ण गाणं ऐकल आणि खुश होउन म्हणाला,'आई, आता मला पण मराठी गाणं थोडं थोडं कळायला लागलय हां..'बटांना' म्हणजे ढुंगणाला ना...?

मी अवाक....तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..
आमच्या घरात अतिशय गाजलेला कीस्सा आहे हा!!

मुलानी खुप पेशंस दाखवत पुर्ण गाणं ऐकल आणि खुश होउन म्हणाला,'आई, आता मला पण मराठी गाणं थोडं थोडं कळायला लागलय हां..'बटांना' म्हणजे ढुंगणाला ना...? >>>> प्रचंड हसतिये मि

स्वप्नांची राणी, मागे कुणाच्यातरी लेकरांनी असाच एका फेमस उर्दू शब्दाचा अर्थ बदलून ठेवला होता, आज तुमच्या लेकाने अजून एका शब्दाचा. परत कधीही हा शब्द वापरताना हसू येणारच. खात्रीच..... Happy

अफाट किस्सा आहे.

जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा...'>>

'बटांना' म्हणजे ढुंगणाला ना...? बापरे . अफाट.. मि अर्थ लावुन वाचतेय.. Rofl

Pages