भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुखर चर्चा व (सचित्र) विणकाम आवडले. Happy

तुला फारेन्डाचं आवडतं 'धागे तोड लाओ… रोशनी से नूर के' माहीत नाही का?
>>>> 'बोल ना हलके हलके' माझंही भयंकर आवडतं गाणं आहे. पण यात पिवळा पितांबर कुठे आहे? 'पितांबराची पिवळी रंगछटा मजला तू आण' म्हटलं तर पुनरुक्तीचा दोष लागणार नाही. ('नूर' म्हणजे दैवी तेज/आभा आणि 'रोशनी' म्हणजे प्रकाश. दैवी तेजातून निघालेल्या प्रकाशाच्या दोन चार किरणांचे दुवे आण' म्हटल्या सारखं वाटतं हे)
चूभूद्याघ्या. Happy

क्रोशामधील नाजूक मुखर्‍या आवडल्या. आता हे शब्द व्यवहारात, आवर्जून वापरले पाहीजेत तरच ते पक्के होणार.

>>> 'नूर' म्हणजे दैवी तेज/आभा आणि 'रोशनी' म्हणजे प्रकाश
दैवीबैवी कै नैये! Proud
नूर म्हणजेही प्रकाशच - आठवा : कोह-ए-नूर (आपला कोहिनूर), नूरजहाँ (light of the world)
आभा, तजेला, लस्टर याही अर्थी वापरला जातो हे बरोबर. आठवा :'हँसता हुआ नूरानी चेहरा'. त्याउलट बेनूर म्हणजे लॅकलस्टर.
(हजारों साल नर्गि़स अपनी बेनूरी पे रोती है
बडी़ मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा!)

"नवऱ्याची बहीण" यासाठीचे नेहमीचे नातेवाचक शब्द म्हणजे
वन्स, नणंद आणि वहिनी.

एक वेगळाच ३ अक्षरी एकारांत शब्द नव्याने समजला.
….
…..
विचार करताय थोडा वेळ ?
मग लिहीतो….

वहिनी नाही हो नणंदेसाठी??
फारतर कजाग, ढालगज म्हणू शकता Biggrin
कोणता बरं असेल???
तसच मेहुण्यासाठी (बहिणीचा नवरा म्हणून) जरा छान शब्द हवा. दाजी आहे पण तो फारच गावाकडचा वाटतो.

वहिनी नाही म्हणत नणंदेला.
आणि ‘वन्स’ही नाही. वन्सं! Happy
(वेगळा शब्द म्हणून ‘ट्वाइस’ (twice) सुचवायचा मोह होत होता. Proud )

मानव बरोब्बर !
..
होणजे/ से
(मोल्सवर्थ शब्दकोश)

त्याच्या मूळ भाषेची कल्पना नाही परंतु त्याचा झालेला अपभ्रंश खालील प्रकारे असावा असा अंदाज:

होणजे >>व्हणजे >>>वन्सें >>> वन्सं

आणि
अपभ्रंशांची तर ही घ्या यादी:

वनसें = वहिनी + असा
वैनसें, वैससें, वंतसें

हुश्श Happy

ते वरती, दीदीचा नवरा (वर) म्हणून दीदावर = मेव्हणा असं लॉजिक लावलं होतं मी (किंवा दीदी ज्याला आवर घालते तो दीदावर).

छान !
..
मराठीत मेव्हणा हा शब्द अनेकार्थी आहे:
बहिणीचा नवरा, बायकोचा भाऊ, मामेभाऊ.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%81%...)

परंतु हिंदीच्या काही बोलीभाषांमध्ये संबंधित दोन नात्यांसाठी स्वतंत्र शब्द वापरले जातात :
*बहनोई = बहिणीचा नवरा
* साला = बायकोचा भाऊ .

आणि..
दाते शब्दकोशानुसार:

साला =
१ बायकोचा भाऊ; २ बहिणीचा नवरा. (या अर्थानें आज फारसा रूढ नाहीं).
३. एक शिवी.

दीदावर Happy

BTW, आपल्याकडे दोन बहिणींचे नवरे एकमेकांचे साढू किंवा साढूभाऊ. समहाऊ, कानाला बरा नाही वाटत हा शब्द.

उर्दूत त्यांच्यासाठी सुंदर शब्द आहे - हमजुल्फ !

तेलुगुमधे ते बावा किंवा बावागारू (validated by अमा)

कन्नडमधे बहुतेक बहिणीच्या नवऱ्याला बावा म्हणतात. जावयाला अळिया.
गारू..तसा कन्नडमधे अवरू आहे.
हमजुल्फ भारी आहे शब्द. हमसफर म्हणजे सहप्रवासी, मग हमजुल्फची व्युत्पत्ती काय आहे?

हा पण एक शब्द :

सवसा = साडू; बायकोच्या बहिणीचा नवरा. [सं. स्वसा = बहीण]
(दाते शब्दकोश)

होणजे नव्हता ऐकला कधी शब्द. कुठल्या भागात प्रचलित आहे/होता हा?
हमजुल्फही नव्हता ऐकला. (एकाच केसाने गळा कापला गेलेले दोघं? Proud )

होणजे कुठल्या भागात प्रचलित आहे >>>

व्हणजे-से = व्हंजी

व्हंजी =
स्त्री. १ (माण.) वहिनी. २ (कों.) नणंद. [वहिनी + जी]

जर 'व्हंजी' हे सर्वांचे मूळ मानले तर मग माणदेश व कोकण असे दिसतेय

Pages