Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पानद = गांवांतून शेतांतून,
पानद = गांवांतून शेतांतून, दोन कुंपणांमधून जाणारी अरुंद वाट.
(पांद=पाऊल)
त्याचे हे इतके सारे अपभ्रंश आहेत :
पाणद, पाणंद, पाणंध, पाणंदी, पाणंधी, पाळंद व पांदी
(विक्रम करतो की काय हा शब्द !)
पांदी’ या शब्दाचा वापर असलेले हे एक सूचक वाक्य:
सरकारने थोडेसे डोळे वटारले की, ते लगेच कान पाडून, शिंगं मोडून पांदीचा रस्ता धरतात.
<<<पांदी’ या शब्दाचा वापर
<<<पांदी’ या शब्दाचा वापर असलेले हे एक सूचक वाक्य:>>>
पांदीतलल्या खट्याळ पाण्याची घुंगर छुमछुमली
हे
माझीच एक कविता "परंपरा" तित वापरलय...
आमच्याकडे खोल ओघळीला पांद बोलतात. साधारण फेब्रुवारी, मार्च पर्यंत तिला उथळ पाणी असते . त्यातच शेतात जाणारी पायवाट असते.
द सा
द सा
अरे वा ! सुंदर आहे ती ओळ.
तो शब्द तसा गोंडस आहे !
पांदी पाणंद, पाणंदी म्हणजे
प्रतिसाद दोनदा पडला. एक काढून टाकला.
पांदी पाणंद, पाणंदी म्हणजे
पांदी पाणंद, पाणंदी म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याची वाट, असे वाचले होते. पावसाळ्यानंतर ती एक सुंदर पायवाट बनते. ती अरुंद म्हणजे झऱ्याचे पाणी वाहून नेईल इतकीच असते. पाणी वाहून वाहून ती बाकीच्या जमिनीपेक्षा थोडी खोलगट होते. ओलसरपणामुळे बाजूला झाडझाडोरा उगवतो. छान वाटतं चालायला. थंड शीतल एकांत, पातेऱ्याची सळसळ वगैरे.
पांदीत भेटलंस, आंगाक खेटलंस
हातांत धरलंस हात, जालो झिनाझिनाट!
थोडीशी बोरकरांच्या कवितेसारखी भासणारी ही कविता महेश केळूसकर ह्यांची आहे.
ही कविता महेश केळूसकर ह्यांची
ही कविता महेश केळूसकर ह्यांची
>>> सुरेख ! आवडलीच.
होड, होडा व होडी !
होड, होडा व होडी !
एका लेखात हे वाक्य वाचले:
.. दोघांच्यात जाहीर कर्मकांड करण्याची ‘होड’ लागली.
इथे, होड= पैज; पण; शर्यत
..
आता साधर्म्य असलेल्या तीन शब्दांचे विभिन्न अर्थ पाहू:
*मूळ : [सं. होड् = जाणे)
* होड= पैज; पण; शर्यत, करार
* होडा = मोठेपणा, अहंकार.
* होडी /होडकी/ होडके
सर्वपरिचित आहेतच.
होडके हा शब्द संस्कृत उडूप
होडके हा शब्द संस्कृत उडूप वरून आला असावा.
होडो, होडलो हे शब्द कोंकणीत अजूनही प्रचलित आहेत. आशीर्वाद देताना होड्डो जा असे म्हणतात . म्हणजे तू वृद्ध व्हावेस, वृद्ध होईपर्यंत जगावेस . आपल्याकडेसुद्धा म्हाताssरा हो बाळा किंवा मोठा ss हो असे म्हणतात. त्यावरून मोठेपणा, अहंकार असा अर्थ आला असावा. म्हणजे वृद्ध हा मूळ शब्द दिसतो.
होड्डो जा >>>> छान !
होड्डो जा >>>> छान !
गोवा प्रांतात होडरकर आडनाव आढळते.
'होडर'चा होडीच्या व्यवसायाशी काही संबंध असेल काय ?
होडू, होडे, होडो, होडौ, होडं,
होडू, होडे,
होडो, होडौ, होडं, होड: हे शब्द पण शोधले पाहिजेत आता.गेम ऑफ थ्रोनस् मधला होडोर
गेम ऑफ थ्रोनस् मधला होडोर आठवला. त्याच्या नावाची व्युत्पत्ती हे एक रहस्य आहे या मालिकेत. पण ते यापैकी नाही.
छान माहिती.
छान माहिती.
>>>पांदी >>>
पांदी नावाची मिरचीची एक जात असते
छान माहिती.
ड पो
पांदीत भेटलंस, आंगाक खेटलंस
पांदीत भेटलंस, आंगाक खेटलंस
हातांत धरलंस हात, जालो झिनाझिनाट!
हीरा ही पूर्ण कविता द्या ना _/\_
<<<म्हाताssरा हो बाळा किंवा
<<<म्हाताssरा हो बाळा किंवा मोठा ss हो असे म्हणतात.>>>
दिर्घायु हो..
हीरा...तुमचं पांदिचं वर्णन अगदी बरोबर... उथळ पाण्याच्या बाजूला कधी दाट बारीक गवताची गादी असते. तिला बेदांड म्हणतात आमच्याकडे. कुठे, कुठे पानकनिसही असते....झाडझाडोरा असल्याने ही वाटुली खरंच रमणीय असते.
बेदांड
बेदांड
>> एकदम झकास शब्द .. लय आवडला !
आमच्याकडे खोल थोडं रुंद
आमच्याकडे खोल थोडं रुंद ओहोळाला बेंद हा शब्द आहे. बहुदा त्यातही बेंदाड असते. त्यावरून बेंद म्हणत असावेत.
बालचंद्र
बालचंद्र
हा गोड शब्द लक्ष्मण लोंढे यांच्या वैज्ञानिक लेखनात वाचला.
अर्थ : अवकाशात पाठवलेला मानवनिर्मित उपग्रह.
फारच गोड (इथे 'क्यूट' जास्त
फारच गोड (इथे 'क्यूट' जास्त चपखल आहे) शब्द आहे हा
पांदी मिरची :
पांदी मिरची :
इथे मुंबईत बाजारात त्या मिरचीला पांडी मिरची म्हणतात.
बृहदकोशानुसारएकाकी= एकटा;
बृहदकोशानुसार
एकाकी= एकटा; एकला.
एकटा = एकला, दुसऱ्या खेरीज.
असे अर्थ आहेत.
परंतु, त्या दोन्ही शब्दांमध्ये संदर्भानुसार फरक आहे असे वाटते.
एकटा हा स्वतःच्या इच्छेने एकटा (प्रपंचाविना) राहत असतो.
एकाकी (पडलेला) म्हणजे लोकांनी टाकून दिलेला / दुर्लक्ष केलेला
असे मला वाटते.
?
>>> एकाकी (पडलेला) म्हणजे
>>> एकाकी (पडलेला) म्हणजे लोकांनी टाकून दिलेला / दुर्लक्ष केलेला
किंवा ती मनाची अवस्थाही असू शकते, नाही का? एखाद्याला गोतावळ्यातही एकाकी वाटू शकतं. (alone Vs. lonely).
आणि माणूस 'एकटा' परिस्थितीमुळेदेखील असू शकतो, पण तो एकांतप्रिय असला तर त्याला एकाकी वाटेलच असंही नाही.
या यादीत 'एकांडा'ही घालता येईल का? हा स्वेच्छेने एखाद्या कामा/मोहिमेवर एकट्याने काम करणारा शिलेदार.
'एकांडा' धाडसी, उत्साही असतो
'एकांडा' धाडसी, उत्साही असतो. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%...)
एकटा तसा असेलच असे नाही
(पडलेला) ह्या क्रियापदाने
(पडलेला) ह्या क्रियापदाने अर्थ बदलतो. एकटा पडलेला - हा देखील स्वतःहून एकटा नसून लोकांनी टाकल्यामुळे, सोडून गेल्यामुळे एकला आहे.
>>>बालचंद्र>>> सुंदर शब्द
>>>बालचंद्र>>> सुंदर शब्द आहे.
काल रस्त्याने जात असताना दोन
काल रस्त्याने जात असताना दोन बांधकाम मजुरांचा संवाद ऐकला. एकजण त्यांच्या ठेकेदाराची वाट पाहत खूप वेळ बसून कंटाळले होते. मग ते दुसऱ्याला म्हणाले,
"अरं, मी वाढूळ बसलोय"
मला कुतूहल वाटल्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना पुन्हा तो शब्द व त्याचा अर्थ विचारला. तेव्हा ते म्हणाले,
"अहो, लई वेळ बसलोय".
वाढूळ या शब्दाबद्दलची ही सर्व रंजक माहिती:
मूळ संस्कृत : वृद्धवेला
प्राकृत : वाढवेळ
मराठी अर्थ : पुष्कळ वेळ
आणि
हे सारे अपभ्रंश:
वाढूळ, वाढुवेळ, वाढोळ,वाडहोळ.
ऊठ पंढरीच्या राजा वाढवेळ झाला
ऊठ पंढरीच्या राजा वाढवेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला
ओ हो!
ओ हो!
गदिमा, सुधीर फडके, आणि प्रसाद सावकार.....
अप्रतिमच.
'दि ' आणि 'क ' घेऊन केलेल्या
'दि ' आणि 'क ' घेऊन केलेल्या या दोन अक्षरी शब्दांची गंमत पहा:
दिक् = दिशा
दिक = मर्यादा
दिक्क = खिन्न, चकित, आजारी.
या तीन शब्दांचे उगम अनुक्रमे:
संस्कृत, प्राकृत आणि अरबी.
‘आलय’ हा प्रत्यय लावून अनेक
‘आलय’ हा प्रत्यय लावून अनेक सामासिक शब्द तयार झालेत.
त्यातले देवालय, भोजनालय, मंत्रालय, केशकर्तनालय.. इत्यादी सर्वपरिचित आहेत.
‘कलालय’ हा पूर्वी न ऐकलेला शब्द वाचनात आला.
सहसा त्यासाठी ‘कलादालन’ प्रचलित आहे.
Pages