Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वि. का. राजवाडे यांच्या
वि. का. राजवाडे यांच्या लेखनात काही
शब्दरूपे आणि शब्दप्रयोग आपण आता वापरतो त्या मराठीपेक्षा निराळे दिसले. जसे :
वाट पहाणे = मार्गप्रतीक्षा करणे
दृष्टिगोचर = दृग्गोचर
बडदास्त = बरदास्त
दिसेनासे = दिसत नासे झाले
बाजारहाट = हाट बाजार
हास्यास्पद = हास्यकारक
निंदानालस्ती = निंदाकुत्स्ना
अखंड = बिनखळ / खळ न पडता (मारा केला)
पाढा = पाडा
निवडणे = वेणून काढणे
कट्टर भक्त = कट्टे भक्त
गंमत वाटली वाचतांना, भाषेचा एक वेगळाच फ्लेवर
आ हा !निवडणे = वेणून काढणे
आ हा !
निवडणे = वेणून काढणे
कट्टर भक्त = कट्टे भक्त
हे खासच आहेत; भलतेच आवडले.
रच्याकने...
अनिंद्य
आता बहुतेक तुम्ही भाषेमध्ये विद्यावाचस्पती करण्याचा संकल्प सोडलेला दिसतोय...
चांगलेच आहे .
शुभेच्छा !!
ड्रेस कोड साठी वस्त्रसंहिता
ड्रेस कोड साठी वस्त्रसंहिता हा शब्द अलीकडे वृत्तपत्रात वाचण्यात आला.
वेणून काढणे :
वेणून काढणे :
साफसफाई, रान/ तण वेचून काढणे; कपाटाची, घराची साफ सफाई करून नकोत त्या वस्तू काढून टाकणे ह्यासाठी दक्षिण कोंकणात बेणणे, बेणणी करणे हे शब्द रोजच्या भाषेत आहेत.
हास्यास्पद आणि हास्यकारक हे शब्द सध्याच्या मराठीत समानार्थी नाहीत. हास्यास्पद म्हणजे हसण्याजोगे. उदा. लज्जास्पद, निंदास्पद वगैरे. हास्यकारक म्हणजे हास्य निर्माण करणारे. लज्जास्पद म्हणजे लाज वाटावी असे ( कृत्य) निंदास्पद म्हणजे निंदेला पात्र, दुसऱ्याने निंदा करावी असे वक्तव्य, कृत्य.
हास्यास्पद आणि हास्यकारक हे
हास्यास्पद आणि हास्यकारक हे शब्द सध्याच्या मराठीत समानार्थी नाहीत.
+१
बरोबर. म्हणूनच निराळे भासले वाचतांना
एका साप्ताहिक मराठी
एका साप्ताहिक मराठी शब्दकोड्यात बेरीज असे शोधसूत्र होते.
त्याचे उत्तर सुमत असे आहे.
सुमत मराठी शब्दकोशात तरी दिसत नाही. हिंदी कोशात आहे:
https://educalingo.com/mr/dic-hi/sumata
बेरीज फारसीमधून आलेला आहे. सुमतच्या उत्पत्तीबद्दल कुतूहल वाटते.
बारव = पायऱ्या असलेली
बारव = पायऱ्या असलेली विहीर.
(वापी हा पण त्याचा समानार्थी).
जलव्यवस्थापनासाठी बारवांचे जतन व संवर्धन यावरील एक चांगला लेख :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/preservation-and-conservat...
वाचतोय. बरेच नवीन शब्द समजले
वाचतोय. बरेच नवीन शब्द समजले.
बेणणे- दक्षिणच नाही, उत्तर
बेणणे- दक्षिणच नाही, उत्तर कोकणातही वापरतात हा शब्द
‘मुखर’ हा शब्द अलीकडे क्वचित
‘मुखर’
हा शब्द अलीकडे क्वचित वाचनात येतो.
= बडबड्या, बोलका, बोलघेवडा, वाचाळ
या शब्दाचा वापर केलेली दोन सुंदर वाक्ये अलीकडेच वाचली:
१. त्या मुखपृष्ठांवर दिसणारी छायाचित्रे आणि ठळक अक्षररचना त्या कादंबऱ्यांमधील जीवन नेमकेपणाने मुखर करतात.
२. पण अलीकडेच, ‘चित्रपटासारखे दृश्यमाध्यम आधी ललितसाहित्यावर अवलंबून होते, तसे आता नाही’ ही शहाणीवही त्यांनी मुखर केली होती.
मुखरित असाही शब्द बरेच वेळा
मुखरित असाही शब्द बरेच वेळा वापरला गेलेला वाचला आहे. किंबहुना मुखरित हाच अधिक वापरात होता/ आहे.
मुखर प्रमाणे ‘मूर्धन्य’ हा
मुखर प्रमाणे ‘मूर्धन्य’ हा शब्दसुद्धा दिसत नाही.
खरंय. तो सामान्य वाचनाचा
खरंय. तो सामान्य वाचनात आल्याचे काही आठवत नाही.
फार पूर्वी तो एका विशेष चर्चेत ऐकला होता.
ही घ्या ती मूर्धन्य अक्षरे:
ऋ, ट, ठ, ड, ढ, ण, र्, ष.
हो, मीही ‘मुखरित’च वाचला आहे.
हो, मीही ‘मुखरित’च वाचला आहे.
महादेवी वर्मांचं ‘मुखर पिक, हौले बोल’ हे गीत आठवलं त्यावरून.
इथे साधारण ३:१२ला सुरू होतं.
मुखर आणि मूर्धन्य दोन्ही
मुखर आणि मूर्धन्य दोन्ही हिंदीत मात्र वापरात आहेत. स्वातींचे उदाहरण घेतले तर महादेवी वर्मांना दोन्हीं लागू होतात -
हिंदी साहित्य की मूर्धन्य रचनाकार
छायावादी काव्य की मुखर कवयित्री
भैरव रागात एक ख्याल आहे, भोर
भैरव रागात एक ख्याल आहे, भोर भयो म्हणून (विलंबित एकतालात), त्याच्या अंतऱ्यात तो मुखर शब्द येतो.
बोलत तमचर मुखर सुहावन निशी तमा (हे तमा काय आहे माहीत नाही... की तिथे समा पाहिजे?)
बिगत भई उजियारी
तमा म्हणजे रात्र, बिगत - सर
तमा म्हणजे रात्र, बिगत - सर(ले)ली
पण मग 'निशी तमा' म्हणजे
पण मग 'निशी तमा' म्हणजे वटवृक्षाच्या झाडाखाली पिवळं पीतांबर नेसल्यापैकी झालं ते.
ओह! तम म्हणजे अंधःकार बिगत , उजियारी भई. आता आलं लक्षात. उषःकाल होता होताच्या उलट अवस्था आहे. काळरात्र जाता जाता उषःकाल होई, वाढवेळी मनमोहना, ऊठ, जागा होई.
अंधारी (तमा) रात्र (निशी)
अंधारी (तमा) रात्र (निशी) सरली, आणि आता उजेड (उजियारा) होत आहे.
(न धरि शस्त्र करी मी…)
हो, आता माझ्या डोक्यात
हो, आता माझ्या डोक्यात उजियारा पडला.
तुला फारेन्डाचं आवडतं 'धागे
तुला फारेन्डाचं आवडतं 'धागे तोड लाओ… रोशनी से नूर के' माहीत नाही का? नेसतात भलेभलेही पिवळा पीतांबर वृत्तपूर्तीसाठी.
आईला! हे भारी आहे. माहीत
आईला! हे भारी आहे. माहीत नव्हतं आणि आधी नीट लक्ष नव्हतं दिलं शब्दांकडे.
(No subject)
वरील चांगल्या चर्चेमुळे 'मुखर
वरील चांगल्या चर्चेमुळे 'मुखर' हा शब्द मुखर झाला आहे !
मोदकाच्या कळ्यांना 'मुखर्या
मोदकाच्या कळ्यांना 'मुखर्या'ही म्हणतात हे त्यावरून सहज आठवलं.
हे अजून एक:
हे अजून एक:
मुखरी = मडकें, कापड इ॰ ला पडलेलें बारीक भोक
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%...
आमच्या क्रोशातही मुखऱ्या
आमच्या क्रोशातही मुखऱ्या असतात
या त्या मुखऱ्या. कुमार सर
या त्या मुखऱ्या. कुमार सर म्हणतात तसं कापडाला बारीक भोक पडावं तसं, फक्त किनारीला विणतात हे.
अवल झकास ! आवडल्याच
अवल
झकास ! आवडल्याच
दोन साधर्म्य असणारे शब्द- फरक
दोन साधर्म्य असणारे शब्द- फरक फक्त न आणि ण चा; परंतु ते पूर्ण वेगळे आहेत:
१. पानपिसा = वेडा, अति उत्सुक
(प्राकृत उगम)
२. पाणपिसा = अति पावसामुळे न भरलेले धान्याचे कणीस.
Pages