Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतिध्वनी, पडसाद वगैरे अर्थ
प्रतिध्वनी, पडसाद वगैरे अर्थ बरोबर आहेत. अनु हा उपसर्ग लागतो तेव्हा मागाहून येणारा, अनुसरणारा असा अर्थ लागतो. रण् धातूचा (हे मला आज नव्यानेच कळलं) अर्थ आहे शब्द करणे म्हणजे आवाज करणे. त्यापासून रणन.
अनुध्वनी हा शब्द मला माहित नव्हता. मी echo साठी प्रतिध्वनीच वापरत होतो. पण अर्थानुसार अनुध्वनी जास्त योग्य आहे. मागाहून येणारा ध्वनी हा अनुध्वनी असं असावं.
रण् = नाद करणे
रण् = नाद करणे
यावरूनच
रण = तंटा; आवेशाचें भांडण; जोराजोराचा वादविवाद.
हा एक अर्थ आला असावा ?
आणि रणरण (ऊन) वगैरे..?
आणि रणरण (ऊन) वगैरे..?
रणकंदन आणि अर्थातच रणांगण पण
रणकंदन आणि अर्थातच रणांगण पण
रण = तंटा; आवेशाचें भांडण;
रण = तंटा; आवेशाचें भांडण; जोराजोराचा वादविवाद.>>>>>>
अरण्य - अ रण्य. ज्यात तंटा, भांडण,युद्ध नाही असे
त्यामुळेच "आरण्यक" ही वनात रचली गेली.
अरण्य - अ रण्य. ज्यात तंटा,
अरण्य - अ रण्य. ज्यात तंटा, भांडण,युद्ध नाही >>>> मस्तच !
आणि रणरण (ऊन) वगैरे..?
आणि रणरण (ऊन) वगैरे..?
>>>
हा अर्थ देखील ध्वनी कल्पूनच केलेला दिसतो
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%A3
अच्छा !
अच्छा !
आणि तिकडे उष्णता हा शब्द उश्णता असा लिहीलाय!!
अनुरणन आणि अ-रण्य + आरण्यक.
अनुरणन आणि अ-रण्य + आरण्यक.
अनुरणन- चांदीच्या घंटीचा नाजूक किणकिणाट दीर्घ ऐकू यावा असा सुंदर शब्द !
दोनही शब्दांचे बंगाली कनेक्शन ऋतुराज आणि अस्मिता यांनी उघड केलेय हा सुंदर योगायोग. होय, बंगाली सिनेमा होता अनुरणन नावाचा. राहुल बोस - रिया सेन दोनही आवडते कलाकार होते त्यात. लंडनहून हॉटेल बांधायला कोलकात्यात येतात, दोन जोडप्यांना एकमेकांचा सहचर आवडायला लागतो असे काहीसे कथानक होते.
बंगाली “आरण्यक” तर प्रसिद्धच आहे आणि विशेष म्हणजे बंगालीतून थेट मराठीत भाषांतरित झालेय.
मागच्या पानावरची सराय- सराईत चर्चा लक्षवेधी होती.
ऐकूणच या धाग्यावर मजा येते डॉ. कुमार _/\_
आणि मराठी " “आरण्यक”
आणि मराठी " “आरण्यक” (https://www.youtube.com/watch?v=PYNmAGaG9vU) देखील सुंदर आहे.
* एकूणच या धाग्यावर मजा येते >>>>
एकूणच या धाग्यावर तुम्हा सर्वांच्या अभ्यासपूर्ण आणि खेळकर सहभागामुळे मजा येते !
रुणुझुणु हा शब्दही 'रण्'
रुणुझुणु हा शब्दही 'रण्' धातूवरून आला आहे का?
अनिंद्य, खूप सुंदर प्रतिसाद.
अनिंद्य, खूप सुंदर प्रतिसाद.
छान प्रतिसाद अनिंद्य.
छान प्रतिसाद अनिंद्य. हो, तोच सिनेमा.
'आरण्यक' आवडले. इंग्रजीत 'it's a jungle out there' हे या भांडणतंटायुद्ध यांच्या अभावाच्या पूर्णपणे उलट होतं. ही एक गंमतच आहे.
अनुराधा नक्षत्र आहे. म्हणजे
अनुराधा नक्षत्र आहे. म्हणजे राधेस अनुसरणारे. खूपच डिव्होशनल असे हे सुरेख नक्षत्र आहे. माझा शुक्र व नेप्च्युन (युती) आहे या नक्षत्रातला. अजुन एक या नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्ती जगन्मित्र असतात. मैत्र ही भावना पराकोटीची आढळते. - वाचलेले ज्ञान.
माझा एक पूर्वीचा मित्र या नक्षत्रावर जन्मलेला आहे. जगन्मित्र आहे.
बरोबर !
बरोबर !
विशाखा कृष्णाच्या अष्टसखींपैकी एक. नक्षत्रात नंबर १६ वा. विशाखा हे राधेचे उपनाम. मागोमाग येणारे १७ वे नक्षत्र अनु- राधा
रच्याकने :
ग्राम्य मराठीत विशाखा- अनुराधा यांना जोडीने “उंदऱ्यामांजऱ्या” म्हणतात !
अर्रे सही अनिंद्य असे आहे होय
अर्रे सही अनिंद्य असे आहे होय?
>>> अरण्य - अ रण्य. ज्यात
>>> अरण्य - अ रण्य. ज्यात तंटा, भांडण,युद्ध नाही असे
खरंच का अशी व्युत्पत्ती आहे?
मी याबाबत साशंक आहे. आरण्यके वनात लिहिली गेली की त्यांचं पठण वनात करण्याचा प्रघात आहे?
हो, स्वाती. आरण्यक नावाची
हो, स्वाती. आरण्यक नावाची सिरीज आली होती तेव्हा मी शोधलं होतं तर दोन अर्थ सापडले होते.
आरण्यक - जे अरण्यात शिकवलं जातं किंवा पठण केलं जातं. वेदांमधे ऐतरेय आरण्यक आणि तैत्तिरीय आरण्यक आणि बृहदारण्यक आहेत म्हणे.
अरण्ये भवम् आरण्यकम्।
https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%...
आरण्यक - forest dweller - वनात भटकणारा
अरण म्हणजे distant / refuge
अरण म्हणजे distant / refuge असं इथे दिसतंय. (न झगडण्याचा संदर्भ मृत्यू इत्यादींसाठी विशेषण म्हणून आला आहे.)
म्हणजे वस्तीपासून दूर जागी (एकांतात) जाऊन चिंतण्यासारखे विषय आरण्यकांत हाताळले आहेत.
उपनिषदांमध्ये आरण्यके असं नव्हे, चारही वेदांचे प्रत्येकी संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असे चार विभाग पडतात.
हो वेदांमधे, करते दुरुस्त.
हो वेदांमधे, करते दुरुस्त.
उत्तम चर्चा आणि विचारांची
उत्तम चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण !
जवळपास गेले वर्षभर आपण सर्वांनीच या शब्दरंजनाचा आनंद लुटला आहे
सर्वांना धन्यवाद !!
इथून पुढची चर्चा तिसऱ्या भागात करावी : https://www.maayboli.com/node/84791
नवीन Submitted by अनिंद्य on
नवीन Submitted by अनिंद्य on 15 March, 2024 - 23:03 >> बापरे, म्हणजे आता मला मी_अनुपासून सावध राहिलं पाहिजे
आरण्यक चर्चा छान
आरण्यक चर्चा छान
आरण्यक म्हणजे रिलेटेड टू
आरण्यक म्हणजे रिलेटेड टू डेझर्ट म्हणतोय मोल्सवर्थबाबा. स्वाती म्हणतेय त्यानुसार वसतीपासून दूर याला जुळतय हेही
विशाखा
वावे/ विशाखा
“नक्षत्र”
“नक्षत्र”
सामो तुम्ही सर्व नक्षत्रांची all girls party असे काही लिहिले होते ना ? मजेशीर होते ते.
नक्षत्रासारखे सुंदर रूप ही उपमा स्री- पुरुष दोघांकरिता वाचलीय.
तसेच नक्षत्र उदित होते हे आपण जाणतो पण नक्षत्र“पडण्या”वरून काही मराठी म्हणी /वाक्प्रयोग आहेत. आता वापरात नाहीत. उदा.
पायावर नक्षत्र पडले - आयुष्यभर भटकत रहावे लागले
हातावर नक्षत्र पडले आहे = चोरी करण्याची सवय आहे
तोंडावर नक्षत्र पडले आहे = बडबड्या स्वभाव असणे
असो, इथून पुढची चर्चा तिसऱ्या भागात करावी म्हणतात कुमार तर तिकडे जाऊया.
मंडळी
मंडळी
चालू चर्चा आटोपल्यानंतर सर्वांनी नव्या शब्दचर्चेसाठी तिसऱ्या भागाकडे यावे ही विनंती. https://www.maayboli.com/node/84791
हा धागा मागे टाकूया
सॉरी, याच धाग्यावर
सॉरी, याच धाग्यावर लिहिल्याबद्दल.
पण मला ' अनुरणन ' चा वाक्यात उपयोग हवा आहे.
पुल्लिंगी शब्द आहे का हा?
ध्वनि अशा अर्थी असेल तर पुल्लिंगी च असावा.
अनुरणन मोल्सवर्थ आणि
अनुरणन मोल्सवर्थ आणि दातेनुसार नपुंसक.
मागे इथे मुलगा - मुलगी- मूल
अनुरणन नपुं बरोबर आहे.
Pages