भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चर्चा.
सकाळमध्ये दररोज भाषावैभव नावाचे शब्दांच्या महितीविषयक सदर येते.
त्यात तेलाविषयी खालील माहिती आली आहे ती रोचक वाटली.
तळून झाल्यावर कढईत उरलेल्या तेलासाठी ओरडेल, वरडेल किंवा दाढेल असे शब्द आहेत. तर विझलेल्या दिव्यातल्या उरलेल्या तेलासाठी दिपुष्ठेल असा शब्द आहे.

दिपुष्ठेल
>>> दिपुष्टाण, दिपोष्टाण (= विझविलेल्या दिव्याच्या वातीपासून सुटणारी घाण) हा शब्द कोड्यांमध्ये वारंवार भेटतो !

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%...

Improvement आणि improvisation यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. पण अनेकदा दोन्ही समानार्थी असल्या सारखे वापरले जातात
improvisation म्हणजे पूर्व तयारी नसताना आयत्यावेळी काहीतर सादर करणे , पियानोवादकांनी मूळ नोटेशन पासून फारकत घेणे असा अर्थ होतो, improvisation चा शॉर्ट फॉर्म improv. हा जास्त करुन स्टँड अप कॉमेडीच्या संदर्भाने वापरला जातो - एखादा शब्द किंवा विषय देऊन त्यावर आयत्यावेळी जोक्स सांगणे.
क्विल्ट करताना काही पॅटर्न नसताना छोटे छोटे तुकडे एकत्र जोडून शिवतात त्याला पण improv क्विल्टिंग म्हटलं जातं.
improvisation मधे सुधारणा किंवा दर्जात वाढ असे काही connotation नाही.

अवांतर भारतात अनेकदा इंटिमेशन हे सर्वनाम आणि इंटीमिडेशन हे त्याचं क्रियापद अशा अर्थाने वापरलेलं ऐकलं आहे. इंटिमिडेट मी अ‍ॅज सून अ‍ॅज पॉसिबल !
:कपाळबडवती:

शब्द भेटतो की आढळतो
>>>
आढळतो : प्रमाणभाषा
भेटतो : बोलीभाषा
मागे या मुद्द्यावर मायबोलीवर भरपूर चर्चा झाली आहे. मला हे बोलीभाषेतील क्रियापद या संदर्भात ( निर्जीव वस्तूशी जवळीक ) खूप आवडते म्हणून मी ते वापरतो.

लग्नासंबंधी काही रोचक :
१. तोड करणे = लग्न लावणे (बोलीभाषा)

२. प्रणु, परिणय = लग्न
प्रणय शब्द प्रणुवरुनच आला असावा काय ?
तसेच,
परिणय व प्रणय
यांच्यामध्ये काही अपभ्रंशाचे नाते असावे काय?

परिणय व प्रणय ?

असलाच संबंध तर व्यस्त असेल. परिणय झाल्यानंतर प्रणय रोडावतो असेच साधारण चित्र दिसते Lol

+१ Happy
प्रणय हा परिणयाविना देखील होऊ शकतो.

अपभ्रंश नसावा. एकात प्र उपसर्ग व दुसऱ्यात परि उपसर्ग आहे. दोन्हीत नी - नय = नेणे हा धातु वाटतो आहे. प्रने आधिक्य किंवा उत्कर्ष, उच्च स्थान वगैरे प्रतीत होते, परिने चहू बाजूंनी, सर्व प्रकारे, पूर्णत्वाने, इत्यादी अर्थ प्रतीत होतात.

१.
करभ [सं.] = उंट (लहान पिलू) >>
karwan (पर्शियन) = वाळवंटातील प्रवासी यात्रेकरूंचा तांडा >> कारवां (हिन्दी) >>>> caravan (इं)
….
२.
सराई = धर्मशाळा ( फा. सराय् वरुन)
caravan+ serai = caravanserai = धर्मशाळा ( व खानावळ)

.. असा हा उंटाचा भाषिक प्रवास !

वा! आवडले.
सराई हा शब्द पाणपोई या कवितेत वाचला होता.

लग्नसराई म्हणजे लग्नातली धर्मशाळा (=मांडव?) की लग्न करणार्‍या सरांची आई..

लग्नसराईत सराई हे 'सीझन', मोसम या अर्थाने असणार.
शेतीच्या बाबतीत जेव्हा कापणी-मळणी वगैरे करायची वेळ येते (हार्वेस्ट) त्याला सराई आली असं म्हणतात. 'आगोठ' म्हणजे पाऊस सुरू होण्याचा, जूनच्या सुरुवातीचा काळ.
हे कदाचित 'येणे' आणि जाणे, 'सरणे' या अर्थाने असू शकेल. 'सराई' बहुतेक 'भरभराटीचा काळ' याही अर्थाने बोली भाषेत वापरतात.

सराई म्हणजे (प्रवासातल्या) तात्पुरत्या मुक्कामाची जागा.
लग्नासाठी ‘वऱ्हाडं’ जमतात त्यांची सोय अशा ठिकाणी करतात. बहुधा त्यावरून ‘लग्नसराईचे दिवस आले’ असं म्हणायचा प्रघात पडला असेल का?

अगदी बरोबर !
जरा वेळाने मी सराईच्या दुसऱ्या अर्थाकडे येणारच होतो परंतु त्या आधीच चर्चा झाली हे फार उत्तम !

काल शब्दकोड्यात ‘धर्मशाळा’ हे शोधसूत्र देऊन तीन अक्षरी शब्द शोधायचा होता. तो आहे सराई. त्यावरूनच मग हे सर्व उत्खनन केले Happy
..
उत्तर प्रदेशमधील मुघलसराय (जुने नाव) या गावाच्या नावाची व्युत्पत्ती देखील वरीलप्रमाणेच असावी काय ? त्याचे ऐतिहासिक नाव मुघलचक अशी विकीनोंद आहे

अच्छा! उद्बोधक चर्चा.

ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे >> हो, खरंच की! हे विसरलोच.

पाणपोई या कवितेत >>>
कविता सुंदर आहे. कवी यशवंत म्हटल्यावर काय विचारायलाच नको !

त्यात सराई, नवाई आणि कमाई हे कडव्यांच्या शेवटी आलेले छान जुळले आहे

उद्बोधक चर्चा.
"सराईत लोक आले" याचे तीन अर्थ निघतात.

शोकांतिका आणि शोकात्मिका >>>
फार फरक नसावा.

माझा अंदाज :
शोकात्मिका = ज्या कलाकृतीची एकंदर प्रकृती दुःखमय आहे ती.

शोकांतिका = ज्या कलाकृतीमध्ये अनेक भावनात्मक प्रसंगांची गुंफण आहे पण शेवट दुःखद आहे ती.

जाणकारांनी खुलासा करावा.

भा रा भागवतांचं एक रहस्यकथांचं पुस्तक आहे - घुमट. त्यात 'कडुनिंबावरचा लगन्या' नावाच्या गोष्टीत 'इष्टाकण्या' हा शब्द आहे. याचा अर्थ काय?

वाक्यं अशी आहेत ....

' तर्कबुद्धीला न पटणार्‍या या गोष्टी म्हणजे निव्वळ थोतांड होय.' बूट-इष्टाकण्या घातलेल्या पायांपैकी एकाची लाथ टेबलाच्या पोटभागाला मारून बाबुराव बोलला.

बाबूराव इष्टाकण्यांतून झिरपलेला घाम पुसण्यात गर्क होता.

Pages