Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उलट मीच थँक्यू म्हणायला
उलट मीच थँक्यू म्हणायला पाहिजे तुम्हाला धनुडी. तुम्हीच प्रतिसाद टिकवण्याबद्दल सुचवलं होतं.
लष्टक
लष्टक
हा शब्द नेहमीच्या कोशात नाही परंतु जालावरील अन्य काही संदर्भांमध्ये
लष्टक लावणे - झंझट लावणे
असा अर्थ दिला आहे.
"शबलित”चा नक्की कसा अर्थ
"शबलित”चा नक्की कसा अर्थ घ्यावा ?>>>>>>
शबल म्हणजे मिश्र का?
Pied Kingfisher कवड्या खंड्या यालाच शबल धीवर असंही एक नाव आहे. याचा रंग काळा पांढरा असतो
शबल म्हणजे मिश्र का?
शबल म्हणजे मिश्र का?
>>> एक अर्थ तसा दिसतोय :
शबल a Variegated. n Confused intermixture.
वझे शब्दकोश
..
पण वरती मी दिलेल्या वाक्यामध्ये असा दिसत नाहीये.
तिथे तो क्षीण या अर्थीच दुसरा तसा शब्द, असं वाटतं आहे.
? दुर्बल
ऋग्वेद काळात मुक्तछंद नव्हता
ऋग्वेद काळात मुक्तछंद नव्हता >>
हरचंद पालव, इतकं विस्तृत लिहील्याबद्दल आधी दंडवत घ्यावा! किती व्यासंगी लोक आहेत मायबोलीवर!
हरचंद पालव आपल्या व्यासंगास
हरचंद पालव, इतकं विस्तृत लिहील्याबद्दल आधी दंडवत घ्यावा! किती व्यासंगी लोक आहेत मायबोलीवर! >>>>>> अगदी अगदी सहमत
हपा आपल्या व्यासंगास दंडवत...
हरचंद पालव, इतकं विस्तृत
हरचंद पालव, इतकं विस्तृत लिहील्याबद्दल आधी दंडवत घ्यावा! किती व्यासंगी लोक आहेत मायबोलीवर!+१११११११११११११११११११
आमचा पण दंडवत स्विकारा हर्पा
आमचा पण दंडवत स्विकारा हर्पा _/\_
>>>"शबलित”चा नक्की कसा अर्थ
>>>"शबलित”चा नक्की कसा अर्थ घ्यावा ?>>>>>>
हिंदीत असे अर्थ दिलेत - चितकबरा, रंग बिरंगा
https://www.hindwi.org/hindi-dictionary/meaning-of-shablit
>>किती व्यासंगी लोक आहेत मायबोलीवर!>>> +१
हर्पा, वाचनीय पोस्ट!
हर्पा, वाचनीय पोस्ट!
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे मी बाष्पगद्गगदित झालो आहे. त्यात व्यासंग वगैरे म्हटल्यावर माझा सखाराम गटणे झाला आहे.
तरी मी ‘हर्प्या, हर्प्या,
तरी मी ‘हर्प्या, हर्प्या, लेका बालिष्टर का नाही झालास?!’ म्हणणार होते.
(No subject)
(No subject)
वैशिष्ट्यपूर्ण ..अनूढ, अनूढा
वैशिष्ट्यपूर्ण ..
अनूढ, अनूढा = लग्न न झालेला; अविवाहित. [सं.]
अनूढमातृत्व = विवाहपूर्व मातृत्व.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
( पण नुसता ‘नूढ’ शब्द नाही).
कारण ते अ+नूढ नाही, अन् + ऊढ
कारण ते अ+नूढ नाही, अन् + ऊढ आहे.
ऊढ म्हणजे विवाहित. नवविवाहितेला नवोढा म्हणतात ते त्यावरूनच.
ऊढ म्हणजे विवाहित.>>> छान.
ऊढ म्हणजे विवाहित.>>> छान.
आता गंमत पहा :
उढा = बांबूचा एक प्रकार
मोल्सवर्थ शब्दकोश
इथे उ (ह्रस्व) आहे.
पावन आणि अनल दोन्हीचा अर्थ
पावन आणि अनल दोन्हीचा अर्थ अग्नी असा आहे ना? मग विष्णु सहस्रनामात एकाच श्लोकमध्ये ही नावे जोडून का? काही फरक आहे का त्यांच्यात?
भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः ।
कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥ ३२॥
पावक हवे
अग्नी = पावक हवे
= (पावन करणारा) अग्नि
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95+
आय सी धन्यवाद कुमार सर.
आय सी धन्यवाद कुमार सर.
(तू) तिन्ही (भूत, वर्तमान,
(तू) तिन्ही (भूत, वर्तमान, भविष्य) काळाचा नाथ, (तूच) वायू , (तूच) पवित्र अग्नी। असे आहे का ते?
“ह्रदयाविष्करण” असा शब्द अडला
“ह्रदयाविष्करण” असा शब्द अडला. कोशात सापडेना. य. न. केळकर लेखक असल्याने चूक होण्याची शक्यता नव्हती.
नंतर “उखळबेरीज” हा अडलेला शब्द कोशात शोधतांना “विष्करण” चा उलगडा झाला !
उखळबेरीज, उखळापाखळ = दोषा विष्करण करणें,
दुष्कृत्य उजेडांत आणणें
मग हृदयाविष्करण म्हणजे ओपन
मग हृदयाविष्करण म्हणजे ओपन हार्ट सर्जरी का?
विष्करण >> आविष्करण असावे.
… हृदयाविष्करण म्हणजे ओपन
… हृदयाविष्करण म्हणजे ओपन हार्ट सर्जरी का ? ….
Pouring the heart out याअर्थी होते त्यांच्या मनोगतात:-)
आविष्करण - प्रकट करणे ,
आविष्करण - प्रकट करणे , उघडकीस आणणे
उखाळी - उखाळीपाखाळी - एखाद्याचे वैगुण्य काढून उपस्थित केलेले भांडण.
दोन्ही अर्थ शब्दरत्नाकर - वा गो आपटे.
@ हर्पा, भरत आभार!
@ हर्पा, भरत
आभार!
या परिचित फळाचे दुसरे नाव
या परिचित फळाचे दुसरे नाव मजेदार आहे..
..
..
..
'हरपर रेवडी'
रोचक. हे आधी कधी ऐकले नाही
रोचक.
हे आधी कधी ऐकले नाही
शब्दकोड्याची कृपा !
शब्दकोड्याची कृपा !
अच्छा! कोहळा काढण्यासाठी जो
अच्छा! कोहळा काढण्यासाठी जो देतात तोच आहे ना हा?
मजेशीर नाव.
Pages