भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, इंटरेस्टिंग माहिती.

मराठी आणि कन्नड मधले अर्थ जवळपास विरुद्ध आहेत! >> अर्थ तोच आहे पण contexts वेगळे आहेत. हिंदीत सकारात्मक दृष्टीने वाक्यात वापरला जातो तर मराठीत नकारात्मकता दर्शवली जाते.

बरोबर मामी. मला असेच म्हणायचे होते...

गांधीजी के निरर्गल भाषण से मै बहुत प्रभावित हुआ...!

संजय राऊत यांचे निरर्गल बोलणे म्हणजे अळवावरचे पाणीच म्हणायचे झाले!

बरोबर? Happy

अर्गल = अडसर 


हो, याच अर्थी वाचलाय. अडसर दूर करणेसाठीची देवीची प्रार्थना म्हणून मार्कण्डेय ऋषी रचित “अर्गला स्तोत्र” प्रसिद्ध आहे

भग
या शब्दाचे विभिन्न अर्थ आहेत :
ऐश्वर्य, नशीब, भेग, चीर, लिंग, योनी.

एक शंका :
भग आणि भोग यांचा काही संबंध असावा का ?
अर्थात भोग दोन्ही प्रकारचे असतात.

अमा Lol
आंगो, भग संस्कृतात आहे. ते (भग) ज्याच्याकडे आहे तो भग-वान्

जेव्हा एखाद्या सेवेचे तीन स्तर (levels) असतात त्यांना primary, secondary and tertiary ही इंग्लिश नावे आहेत.

हेच तीन शब्द मराठीत लिहायचे झाल्यास, प्राथमिक हा शब्द नेहमीच वापरला जातो. परंतु, पुढच्या दोन स्तरांसाठी
द्वितीयकतृतीयक
ही रुपे सहसा वापरात दिसत नाहीत; पण शब्दकोशात हे दोन्ही शब्द आहेत.

परवा एका पेपरातल्या बातमीत असं वाक्य वाचले :
या कर्जातून राज्यातील आरोग्याच्या तृतीयक सेवेचे बळकटीकरण होणार आहे”.

अगदी बरोबर. माझ्या मते किंचित नाही; पूर्णच.
जेव्हा एखाद्या सेवेचे आपण चढत्या श्रेणींमध्ये वर्णन करतो आहोत तेव्हा दुय्यम व तिय्यम नाही चालणार असे मला वाटते.
जेव्हा आपण सर्वात महत्त्वाचे पासून कमी महत्त्वाचे अशा उतरत्या श्रेणीबद्दल बोलत असू तेव्हा दुय्यम व तिय्यम योग्य वाटतात.

तसेच द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय यांचे अर्थ पण वेगळे होतील..(?)

द्वितीयक व तृतीयक हे भाषांतरित वाटू शकतात. पण मग त्यांच्यासाठी सुयोग्य असे "मायमराठीतले" शब्द कोणते ?

प्रथम >>>>> प्राथमिक
हे जर सर्वमान्य आहे तर मग त्यावरील त्या दोन शब्दांनाही हरकत असू नये.
?

कुमार सर, तुमचे दुय्यम तिय्यमच्या बाबतीत ' उतरत्या ' श्रेणीचे विवेचन पटण्यासारखे आहे.
कारण दुय्यम हा शब्द आपण कमी महत्त्वाचे, लोअर ( Happy ? ) अशा अर्थाने वापरतो.

*वैय्यर्थ म्हणजे काय
>>>
निरर्थकता (सामान्य संदर्भानुसार).
योग्य तो शब्दकोश शोधायला हवा.

(मानवी जीवनाचे वैय्यर्थ ... )

अच्छा..! Happy धन्यवाद.
मला विशेष / उलटा अर्थ किंवा उपरोध...असे काहीतरी वाटत होते...

Turning point ला वळणबिंदू असा शब्द वाचला.

शब्दश: भाषांतर वाटले.

मराठीत दुसरा योग्य पर्यायी शब्द सुचवा लोकहो.

झणी, झणे
= १. (क्रिवि.) लौकर; त्वरित; जलदीने [सं.क्षणे]
२. ( उअ.) कदाचित; न जाणो; नाही तर; निषेधार्थी अव्यय

हा शब्द केशवसुतांच्या ‘आम्ही कोण?’ या कवितेत असा येतो :

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥

माझी शंका :
वरील ओळीत झणीचा अर्थ काय ?
कदाचित ? का अन्य काही ?

Pages