आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रत्येक वेळी त्याचा कर्णधाराशी सबंध असतोच असे नाही
>>>>

प्रत्येक कर्णधार धोनी असतोच असे नाही.

नुकतेच गावस्कर यांनी म्हटले की त्यांना आयपीएल खेळायला मिळाले असते तर चेन्नईकडून खेळायला आवडले असते. आणि याचे कारण सांगताना ते म्हणाले महेंद्रसिंग धोनी.. नामही काफी है Happy

सिलेक्टीव्ह पहाणं हे खरं ज्ञात्याचं पहाणं अश्या अर्थाचं एखादं संस्कृत सुभाषित नसेल तर ते कुणाला तरी सांगून तयार करून घ्यावं.

आयपीएलच्या हिंदी कॉमेंट्रीच्या एका मनोरंजनात्मक सेक्शनमधे गावसकरला ‘तू आज आयपीएल खेळत असतास, तर तुझी टीम कुठली असती’ हा प्रश्न होता. त्यावर त्याने ‘मुंबई इंडियन्स‘ असं उत्तर दिलं. त्यावर इर्फान पठाणने, ‘मुंबई व्यतिरिक्त इतर कुठली?‘ असं विचारल्यावर गावसकरने सीएसकेचं नाव घेताना आधी श्रीनिवासनच्या भारतीय क्रिकेटमधल्या योगदानाचा गौरवानं उल्लेख केला (पहिलं कारण) आणि नंतर धोनीचा (दुसरं कारण).

मुंबईचा माणूस मुंबईच बोलणार ना पहिले. नाहीतर पुन्हा त्यावरून ट्रोल करतील सोकॉल्ड क्रिकेटप्रेमी Happy
त्यानंतर त्याने चेन्नई आणि धोनीचे नाव घेतले त्यात काय ते समजून जा आता. बरे झाले फेरफटका तुम्ही हे ईथे सांगितलेत. आता लोकांचा विश्वास बसेल Happy

बाकी रोहीत शर्माचा उल्लेख सातत्याने वडापाव करणे खेदजनक आहे.
>>>
ऋषभ पंत ला चुम्मा म्हणणं ही...
दक्षिण भारतात चुम्मा चा अर्थ वृथा / फुकाचा / उपयोग शून्य / फालतू असा होतो...

नको सर! तुमच्या कर्तृत्वाचं श्रेय आम्हा पामरांना देऊ नका. तुम्ही विधानं भिरकवायची, रस्ता खणायचा आणि आम्ही वस्तुस्तिथी चे मिणमिणते दिवे लावत तुमच्या मागे फरफटत जाणार्या धाग्यांवर चालत रहायचं ही पूर्वापार परंपराच ठीक आहे.

बाकी रोहीत शर्माचा उल्लेख सातत्याने वडापाव करणे खेदजनक आहे.
>>>
ऋषभ पंत ला चुम्मा म्हणणं ही...
>>>

बर्रं !

रहाणेला शुभेच्छा Happy

IMG_20230427_164545.jpg

>>नुकतेच गावस्कर यांनी म्हटले
उद्या उठुन दस्तुरखुद्द गावस्करांच्या खेळींचे क्रेडिटही तू धोनीला द्यायला मागे पुढे पाहणार नाहीस याची खात्री आहे Wink

>>तूच इथे वेळोवेळी पालथ्या घड्याचा संदर्भ दिलायस ना रे?
तो आहेच रे!! पण तुमच्या संततधारेने काही फरक पडलाय का याचा अदमास घेत होतो Wink

>>नको सर! तुमच्या कर्तृत्वाचं श्रेय
तुझा उपरोधही घड्यावरुन घरंगळत जाणाऱ्या पाण्यासारखा वाया गेला Rofl

जैस्वालची बॅटींग अक्षरशः 'प्रेक्षणीय' आहे. मजा येते बघायला. बटलर आणि आता संजू अँकर करतायत इनिंग.

"तुझा उपरोधही घड्यावरुन घरंगळत जाणाऱ्या पाण्यासारखा वाया गेला" - Lol

जैस्वालची बॅटींग अक्षरशः 'प्रेक्षणीय' आहे. >> Happy अजून रॉ वाटतो पण त्याचा हाय स्कोअर कंव्हर्जन रेट खतरा आहे - विशेषतः डोमेस्टिक मधे

राहाणेचे जुने होम ग्राउंड आहे त्यामूळे मजा येईल इथे त्याला बघायला. जुरेल नक्कीच स्पेशल फाईंड आहे. पाथिराणाला कसला ठोकलाय.

"जुरेल नक्कीच स्पेशल फाईंड आहे" - 'सुलझा हुआ' प्लेयर वाटतो.

"अजून रॉ वाटतो पण त्याचा हाय स्कोअर कंव्हर्जन रेट खतरा आहे - विशेषतः डोमेस्टिक मधे" - डोमेस्टीक मधे मोठे स्कोअर्स आहेत त्याचे आणि फास्ट करतो मोठे स्कोअर्स. चांगलं लक्षण आहे.

पडिक्कलचे पण आजचे प्लेसमेंट त्याच्या फॉर्मच्या मानाने चांगले होते!!

बॉल चांगलाच फिरतोय..... चहल, अश्विन, झंपा धम्माल आणतील पण बोल्ट ज्या सुरुवातीला विकेट्स काढून प्रेशर आणतो तो रोल आज दुसऱ्या कुणाला तरी करायला लागेल!!

आज बोल्ट हवाच होता. गायकवाडचा खरा कस लागला असता नि कॉनवे - बोल्ट द्वंद पहायला मजा आली असती.

मस्त केली बॉलिंग रॉयल्सनी. झांपा! आणि आता होल्डर नी पण चांगली टाकली. स्पिनर्स जोरात आहेत ह्या वेळी. तडाखेबंद फटकेबाजीच्या ह्या काळात पेस ऑफ बॉलिंगच इफेक्टिव ठरु शकते. आधी कसं नव्हतं जमत काय माहित. आता सुपर फास्ट बॉलिंग वलनरेबल वाटत आहे.

मस्त केली बॉलिंग रॉयल्सनी >> विशेषतः पहिल्या ४ ओव्हर्स. तिथे मुसक्या बांधल्या नि मग पुढचे रन रेट नि विकेट्स मूळे सोपे होत गेले. होल्डरच्या जागी बोल्ट आला कि अजून जोम धएल रॉयल्स ची बॉलिंग.

धोनी आज का वर आला नाहि जाडेजाच्या जागी ? लेफ्ट राईत कॉम्बो झाला असता ना ? जाडेजाला वर्ल्ड कप चा सराव दिला जातोय का ?

Pages