निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
ओये, रिये हे "मनाचे श्लोक"
ओये, रिये हे "मनाचे श्लोक" वाचणं बंद करा.
(No subject)
बया बया बया! किती सुंदर हा
बया बया बया! किती सुंदर हा बया प़क्षी......
हा हिरकणा कोण?
हा हिरकणा कोण?
सायली, एक विनंती वरील फोटो जर
सायली, एक विनंती वरील फोटो जर इंटरनेटवरून घेतले असेल तर (साभार, सौजन्य) तसे नमूद कराल का?
जिप्सी... हो नक्की. धन्यवाद.
जिप्सी... हो नक्की. धन्यवाद.
काय धावतोय हा भाग!
काय धावतोय हा भाग! त्याच्यामागे धावता धावता मलाच दम लागला.:स्मित:
वर्षू, मानुषी, सायली, व बाकी सर्वांचे फोटो सुंदरच!
साधने, "आँखो देखा हाल " च, वर्णन मस्तच.
झरबेराताई अभ्यासाला पळाल्या काळजी करू नको.
गरीब(?) बिचार्या जिप्स्याला , सगळे टपले छळण्याला.
सायली फोटो मस्तच. दुसऱ्या
सायली फोटो मस्तच. दुसऱ्या पक्षाचे नाव काय? आता वेळेवर आले इथे नाहीतर बरेच फोटो आलेकी, प्रत्येकाची नावे लिहायचा आळशीपणा करते आणि वरचे सर्व फोटो सुंदर असं लिहिते.
घर पुन्हा बदललं .. आता
घर पुन्हा बदललं .. आता बल्कनीत उन्ह येत आहे..
पण उन्हाळ्याच कडक उन्ह सुरु होत आहे .. तर भाज्या, वांग, टोमॅटो ई. कुठलं या वातावरणासाठी (उन्हाळा) योग्य आहे?
मी मुंबईकर..
नर कोकिळ... फोटो अंतरांजलाहुन
नर कोकिळ...
फोटो अंतरांजलाहुन सभार......
फोटो अंतरांजलाहुन सभार......
फोटो अंतरांजलाहुन सभार......
ओरियेन्ट्ल डारटर असे नाव नेट
ओरियेन्ट्ल डारटर असे नाव नेट वरच कळले...
फोटो अंतरांजलाहुन सभार......
फोटो अंतरांजलाहुन सभार......
फोटो अंतरांजलाहुन सभार......
अन्जु मला पण नाव नाही
अन्जु मला पण नाव नाही माहिती... कोणी सांगेल का?
सायली फोटो मस्तच. पक्षीसफर
सायली फोटो मस्तच. पक्षीसफर झाली.
त्या दिवशी "पिंगळा" ओळखल (?)
त्या दिवशी "पिंगळा" ओळखल (?) आता "शिंगळा" (पक्षी ) कुठला ते सांगा.>>>>>>>
"शिंगळा" साठी (Scops Owl) हि लिंक पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Scops_owl
Sayali Paturkar फोटो मस्तच
Sayali Paturkar
फोटो मस्तच आहेत.
वा जिप्सी, कित्ती कित्ती
वा जिप्सी, कित्ती कित्ती हुशार आहात रे तुम्ही सगळे, मला कितीतरी नावेही माहिती नाहीत. धन्यवाद.
वा जिप्सी, कित्ती कित्ती
वा जिप्सी, कित्ती कित्ती हुशार आहात रे तुम्ही सगळे, मला कितीतरी नावेही माहिती नाहीत>>>>>अन्जू, मलाही हे माहित नव्हतं. सध्या श्रीकांत इंगळहळीकरांच "नवा आसमंत" वाचतोय त्यातुन हि माहिती समजेतय आणि तीच तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतोय इतकंच.
मायबोलीत प्रवेश देउन स्वागत
मायबोलीत प्रवेश देउन स्वागत केले त्याबद्दल मनापासून आनंद झाला.
साधना ,जागु तुमचे आभार .पूर्वीच्या सा-या गप्पा वाचताना दिवस्चे दिवस निघुन जाताएत. खुप मजा येतेय, खुप नवि माहितीसुध्दा.
मस्त श्रीमंत वाटतय. नवे शब्दही कळताहेत. जसं धन्स.खुप धन्स.
अन्जली अशीच येत राहा इथे.
अन्जली अशीच येत राहा इथे.
सायली, फोटो आन्तरजालावरुन टाकण्यापेक्षा तु स्वतः काढुन टाक ना. तसेही मायबोलीवर स्वतः काढलेले फोटो टाक
णे अपेक्षित आहे. जिथे अगदी जरुरीचे आहे पण स्वतः काढलेला फोटो नाही तिथे आन्तर जाल वापरलेले ठिकाय, पण एरवी आपण हा नियम पाळलेला बरा ना...
शिवाय स्वतः काढलेले फोटो टाकले की आपल्यालाही बरे वाटते, आपले फोटो कोणीतरी पाहिले म्हणुन... त्या फोटोतले पक्षी आपण ओळखु शक लो नाही त र इथे मदत होते. आपलेही सामा न्यज्ञान वाढते.
तुझ्या शेवटच्या फोटोत पांग्या-याच्या फुलाकडे बसलेला तो सुर्यपक्षी आहे. सनबर्ड. मराठित फुलचुख्या हेही नाव आहे त्याला.
जिप्स्या तुझा शिंगळा भलताच
जिप्स्या तुझा शिंगळा भलताच आखडु दिसतोय... हाय ब्रो ..
सुप्रभात
सुप्रभात
सुप्रभात!!! पोपटी, हिरवे,
सुप्रभात!!!
पोपटी, हिरवे, गुलाबी, काळपट, जांभळट... लहान, मोठे....एकाच भाजीतून मिळालेले रंगीत दाणे.
मराठवाड्यातले गारपिटीचे फोटो
मराठवाड्यातले गारपिटीचे फोटो बघून वाईट वाटले. उन्हाळा हिवाळा तर तीव्र असायचेच.. आता हे सुद्धा !
पोपटी, हिरवे, गुलाबी, काळपट,
पोपटी, हिरवे, गुलाबी, काळपट, जांभळट... लहान, मोठे....एकाच भाजीतून मिळालेले रंगीत दाणे.>>>>> यावरुन एक शास्त्रीय गंमत आठवली ........
हे असे एकाच कणसातले रंगीबेरंगी दाणे बघून एका महिला शास्त्रज्ञाला (डॉ बार्बरा मॅक्लिंटॉक) फार कुतुहल निर्माण झाले - तिने ते शोधून काढायचे ठरवले आणि "जंपींग जिन्स" (Jumping genes) या प्रक्रियेद्वारा हे घडते हे सांगायचा प्रयत्न केला - अर्थातच सुरुवातीला हे कोणी मानले नाही - पण मग काही वर्षांनी जेव्हा तिने हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवले तेव्हा (१९८३) तिला त्याकरता नोबेल पारितोषिक मिळाले -
आपल्या शरीरातील कुठल्याही पेशींमधे गुणसूत्राच्या २३ जोड्या असतात (अर्थातच काही ठराविक पेशी सोडून) या गुणसूत्रात आपल्या शरीररचनेचे सर्व आराखडे (ब्ल्यू प्रिंट्स) तयार असतात -त्यामुळेच आपल्या डोळ्यांचा, केसांचा रंग वगैरे ठरले जाते (जे आपल्याला आई-वडिलांकडून - पर्यायाने त्यांच्या आधीच्या पिढीकडून मिळालेले असते.)
या गुणसूत्रामधील काही "जीन्स" हे एका गुणसूत्राच्या जोडीतून दुसर्या गुणसूत्राच्या जोडीकडे जाऊ शकतात - ट्रान्सपोजान - हे डॉ बार्बरा मॅक्लिंटॉक या प्रसिद्ध महिला शास्त्रज्ञाने दाखवून दिले...
अन्जु, देवकी, साधना खुप खुप
अन्जु, देवकी, साधना खुप खुप धन्यवाद.....
साधना, तुम्ही सुचवलेल पटतय मला.. नक्की प्रयत्न करीन....
जिप्सी हा शिंगळा काल नेट वर खुप शोधला, पण नाही सापडला... मला अंदाज होताच
घुबड प्रजातितला च असेल... अजुन नव नविन माहिती येऊन देत...
मधुमकरंद , अरे व्वा! कमाल आहे नाही.
शशांक जी छान माहिती.....
ही रंगिबेरंगी कणसे मला
ही रंगिबेरंगी कणसे मला हवियेत, आत्ताच्या आत्त्ता....... :भ्याआआआआआआआआआआ करुन रडणारी बाहुली:
सायली, आहे नेटवर. scops owl या नावाने. जिप्स्याने लिंक दिलिय की विकिची.
रच्याकने, एखाद्या नॉर्वेच्या माणसाने भारतीय माणसाशी लग्न केले तर होणा-या मुलाचा एक डोळा काळा आणि एक निळा असे होईल काय?? बहुतेक नसावे कारण मुल घडताना डोमिनंट जीन्सचा पगडा भारी पडतो असे कुठेतरी वाचलेले. पण होत असेल तर मला पाहायला आवडेल. मांजरांचे फोटो पाहिलेत मी असे.. एक डोळा हिरवा आनि एक पिवळा...
मला कनी निळ्या डोळ्यांची लैच हौस आहे
(रच्याकने एलिझाबेथ टेलरचे डोळे मॉव रंगाचे होते... असे डोळे खुपच रेअर.. तिला हे जीन्स कुठुन मिळाले असतील??? )
अन्जली, स्वागत आहे,इथे येउन
अन्जली, स्वागत आहे,इथे येउन खरच खुप माहिती मिळते, मुख्य म्हणजे आपण आपल्या
आवडीचे काही करतो आहे याचे समाधान मिळते... नाही तर बायकांना स्वता:ची आवड
जोपासायला वेळच मिळत नाही.
स्ट्रेस घालवण्या चा उत्तम उपाय आहे मायबोली.....
स्ट्रेस घालवण्या चा उत्तम
स्ट्रेस घालवण्या चा उत्तम उपाय आहे मायबोली.....
असेच काही नाही हा.. कधीकधी स्ट्रेस मिळवण्याचाही उत्तम उपाय आहे मायबोली. इथल्या मेंबरांना विचारा
Pages