निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
जेनेटिक्स ही जीवशास्त्रातील
जेनेटिक्स ही जीवशास्त्रातील अतिशय मजेशीर आणि अतिशय उपयुक्त अशी शाखा आहे.
आपल्या शरीरातील सर्वसाधारण पेशीमधे जो केंद्रक (न्यूक्लिअस) असतो त्यात या गुणसूत्रांच्या जोड्या असतात.
(http://www.bbc.co.uk/schools/gcsebitesize/science/edexcel/classification... - येथून खालील आकृती साभार .....)
(या अशा २३ गुणसूत्राच्या (क्रोमोसोम्सच्या) जोड्या आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो - यातील X Y हे आपले लिंग(जेण्डर) ठरवतात )-
XX म्हणजे स्त्री (फिमेल) तर
XY म्हणजे नर किंवा पुरुष
ही गुणसूत्रे डि एन ए व काही प्रोटीन्सची (हिस्टोन) मिळून बनलेली असतात. या डि एन ए च्या ठराविक भागांना जीन असे म्हणतात - यामुळेच अनेक चांगल्या वा वाईट गोष्टी घडून येतात .... जसे आपल्या कातडीचा, डोळ्यांचा, केसांचा रंग यामुळेच ठरवला जातो तर यातूनच (ठराविक जीन्समधून) कधी कधी आपल्याला डायबेटिस वा संधीवात किंवा इतरही काही डिसअॅबिलिटिज मिळू शकतात.
आपले संपूर्ण शरीर कशा प्रकारे बनवायचे याची माहिती या जीन्समधे असते म्हणून याला ब्लु प्रिंटस म्हणतात व आपल्या शरीररचनेबरोबर (उंची, वजन, ठेवण, इ) अनेक सवयी (डावखुरा, अॅथलिट बॉडी, इ.) या जीन्समधेच असतात - आपण म्हणतो ना ही कला याच्या रक्तात आहे - वस्तुत: ती त्याच्या जीन मधे असते .....
अजूनही अशीच माहिती कधी कधी देत जाईन (इथल्या बर्याच जणांना हे माहित असेलही - त्यामुळे अजून कोणी जास्त सोप्या पद्धतीने सांगितले तर मला वाचायला आवडेलच..... )
शशांकजी, नवीन
शशांकजी, नवीन माहिती....
आत्ता ऑफिस कँटीनच्या बाहेरील बदामाच्या झाडावर छोटेसे घुबड पाहीले. कालही दिसले होते. बदामाच्या खोडाच्या रंगात अगदी सरमिसळ होऊन बसले होते. फांदीला जसे वरखाली उंचवटे आहेत त्याच आकारात देखील सरमिसळ झाले होते. थोड्याफार हालचाली वरून कळत होते.
अजूनही अशीच माहिती कधी कधी
अजूनही अशीच माहिती कधी कधी देत जाईन (इथल्या बर्याच जणांना हे माहित असेलही - त्यामुळे अजून कोणी जास्त सोप्या पद्धतीने सांगितले तर मला वाचायला आवडेलच..... )
बिन्दास द्या..मला नाही माहित. शाळेत असताना दहावीला हा धडा शिकल्यानंतर YY असेल तर काय असे बोलुन आम्ही खुप हसायचो... तेव्हा विकि नव्हते.
शशांक, मस्त माहीती. हे सगळे
शशांक, मस्त माहीती. हे सगळे शिकून / वाचून बरीच वर्ष झाली. आता परत वाचायला मजा येते
कधीकधी स्ट्रेस मिळवण्याचाही
कधीकधी स्ट्रेस मिळवण्याचाही उत्तम उपाय आहे मायबोली. इथल्या मेंबरांना विचारा>>>>>साधने, अगदी खरं!
परवा मी फ़ेबु. वर एक बातमी
परवा मी फ़ेबु. वर एक बातमी वाचली. कुठेतरी एक एलियन बाळ जन्माला आलय. फ़ोटॊ पण तसाच होता. आणि व्हिडीओ पण होता.
रच्याकने, एखाद्या नॉर्वेच्या
रच्याकने, एखाद्या नॉर्वेच्या माणसाने भारतीय माणसाशी लग्न केले तर होणा-या मुलाचा एक डोळा काळा आणि एक निळा असे होईल काय?? बहुतेक नसावे कारण मुल घडताना डोमिनंट जीन्सचा पगडा भारी पडतो असे कुठेतरी वाचलेले. पण होत असेल तर मला पाहायला आवडेल. मांजरांचे फोटो पाहिलेत मी असे.. एक डोळा हिरवा आनि एक पिवळा... ++++ साधना लैइ भारी.....
असेच काही नाही हा.. कधीकधी
असेच काही नाही हा.. कधीकधी स्ट्रेस मिळवण्याचाही उत्तम उपाय आहे मायबोली. इथल्या मेंबरांना विचारा >>>>साधना ........ हा हा हा हा
साधनाने वरच्या एका पोस्ट मधे म्हटल्याप्रमाणे ते डॉमिनंट आणि रेसिसिव्ह जीन्स असतातच - त्यामुळे आपला एक डोळा एका रंगाचा आणि दुसरा दुसर्याच असा होऊ शकत नाही (आई-वडिलांचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे असले तरीही ......)
पण कधी कधी आजी-आजोबांचे (त्यांच्या मुलांच्यात सप्रेस झालेले) जीन्स नातवंडामधे मात्र एकदम उठून येतात (अॅक्टिव्ह होतात)
xxy वा अशाच काही अॅबनॉर्मलिटिज असू शकतात - कॅटो नाईन टेल्स (का कॅट ऑफ नाईन टेल्स ???) या सिनेमातील गुन्हेगार अशीच काही अॅबनॉर्मलिटि असलेला दाखवलाय ....
एकंदरीतच जेनेटिक्स ही शाखा फारच रोचक आणि आपल्या अतिशय उपयोगाचीही आहे - स्टेम सेल्सचा सदुपयोग यातूनच निघालेला एक प्रकार आहे - अजून तरी प्रत्यक्षात काही हातात पडले आहे असे म्हणता येणार नाही पण भविष्यात नक्कीच काही उपयोग होऊ शकेल ....
शशांक जी उत्तम माहिती...
शशांक जी उत्तम माहिती...
जेनेटिक्सचा व्हॅक्सीनमधे (लस
जेनेटिक्सचा व्हॅक्सीनमधे (लस उत्पादनात) वापर -
एखादा रोग निर्माण करणारा जीवाणू (बॅक्टेरिया) वा विषाणू (व्हायरस) असेल तर शास्त्रज्ञ त्याच्यातील रोग निर्माण करण्याचा जीन शोधतात व तो जीन निकामी करुन (कधी काढून टाकून तर कधी त्यात बदल करुन) तोच विषाणू (नॉनव्हिरुलंट)अघातक स्वरुपाचा बनवतात -पुढे याचाच उपयोग लसीकरणाला करतात.
उदा. गोवराचा (मिझल्सचा) विषाणू हा एखाद्या गोवर झालेल्या रोग्यामधून वेगळा करतात - लॅबमधे वाढवतात आणि त्याची घातकता (व्हिरुलन्स) कमी करायचा प्रयत्न करतात मग तो अघातक (अॅटेन्यूएटेड) विषाणू लसीकरणाला वापरुन गोवर -प्रतिबंधक लस तयार करतात ..... (लाईव्ह अॅटेन्यूएटेड व्हॅक्सीन) - हा असा अघातक (अॅटेन्यूएटेड) विषाणू
आपले शरीर एक इम्युनोजेन म्हणून स्वीकारते व त्याविरुद्ध अँटिबॉडिज निर्माण करुन आपली प्रतिकारशक्ति (इम्युनिटी) विशेष बळकट करते. - इम्युनायझेशन..
हिपॅटायटिस बी या विषाणूतील एक प्रथिन निर्माण करणारा जीन (सरफेस प्रोटिन जीन) वेगळा करुन तो एखाद्या यीस्टमधे (यीस्टच्या सेल मधे) सोडतात - आता हा यीस्ट त्याच्या इतर प्रथिनांबरोबरच हा विषाणू-प्रथिनही तयार करतात - हा विषाणू प्रथिन वेगळा करुन लसीकरणाला वापरला जातो - (रिकॉब्मिनंट व्हॅक्सीन) - हे विषाणू-प्रथिन आपले शरीर एक इम्युनोजेन म्हणून स्वीकारते व त्याविरुद्ध अँटिबॉडिज निर्माण करुन आपली प्रतिकारशक्ति विशेष बळकट करते
मी इथे जेवढे भराभर लिहितो आहे तेवढी ही लस उत्पादनाची प्रक्रिया सोपी नसतेच तर प्रचंड गुंतागुंतीची असते...
हे सगळे समजायला अवघड वाटत असेल तर जरुर सांगा - अजून सोपे करायचा प्रयत्न करेन ....
कालच आई कोकणातून आली अणि हा
कालच आई कोकणातून आली अणि हा मेवा आणलाय सोबत--ओले काजू गर( गरम पाण्यात भिजवून सोललेले)
शशांकजी अतिशय सोप्या आणि समजेल अश्या शब्दांत माहिती देत आहात, गुड जॉब.
शशांकदादा मेरे को तो कितना
शशांकदादा
मेरे को तो कितना कुछ पत्याच नही है
मस्त माहिती, स्पेशली ती कणसांवाली गोष्ट मला मुळीच माहीत नव्हती
ऊ़जु,ओले काजू काय
ऊ़जु,ओले काजू काय इनव्हायटिंग आहेत.लकी आहात तुम्ही कोकणातल माहेर आहे तुमच!
शशांक जी न कडुन नेहमीच सुलभ आणि उपयोगी माहिती मिळते....
साधना , शशांक मस्त माहिती
साधना :फिदी:,
शशांक मस्त माहिती
एखाद्या नॉर्वेच्या माणसाने भारतीय माणसाशी लग्न केले तर>>>>>>३७७ बाफवरचे इथे धावतील.
एखाद्या नॉर्वेच्या माणसाने
एखाद्या नॉर्वेच्या माणसाने भारतीय माणसाशी लग्न केले तर>>>>>>३७७ बाफवरचे इथे धावतील
हायला, लक्षातच नाही आले माझ्या... कित्ती हुश्शार हो सर तुम्ही...
पण म्हणुन मीही सोडणार नाहीय अशी. माणुस असे म्हटले की त्यातुन बाईमाणुस वगळायचे काय?? बाई काय माणुस नाही?? मी ३७७ बाफवाली नसले तरी संयुक्ता आहे म्हटले
साधना
साधना
उजु, सुकलेले काजु भिजवुन ओले
उजु, सुकलेले काजु भिजवुन ओले केलेत की झाडावरचे ओले काजुगर आहेत? कोकणात काजु लागलेही काय? झाडे अजुन मोहोरावर असणार बहुतेक.
ओले काजु आणि दिनेशदा म्हटलं
ओले काजु आणि दिनेशदा म्हटलं कि जागुच्या घरचं गटग आठवतं.
जेनेटिक्सचा ह्यूमन इन्सुलिन
जेनेटिक्सचा ह्यूमन इन्सुलिन उत्पादनात वापर -
आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्या पोटातील पॅनक्रिया नामक ग्रंथीतून इन्सुलिन (एक हार्मोन) तयार होऊन ते रक्तात मिसळले जाते - या इन्सुलिनमुळेच आपल्या शरीरातील सर्व पेशींना साखर - ग्लुकोज उचलता येते (म्हणजेच इन्सुलिन अभावी साखर रक्तात तशीच न वापरता पडून रहाते -ज्याला आपण डायबेटिस म्हणतो)
.... डायबेटिस (टाईप १) च्या ट्रीटमेंट साठी शरीरात इन्सुलिन टोचणे (सब क्युटेनिअस) याला पर्याय नसतो. फार पूर्वी हे इन्सुलिन पोर्साईन (डुकराचे) किंवा बैलाचे असायचे - पण याप्रकारचे इन्सुलिन टोचताना एक अडचण अशी होती की हे इन्सुलिन फार शुद्ध नसल्याने त्या प्राण्यांची काही प्रथिने आपल्या शरीरात जाऊन त्याची अॅलर्जी येत असे.
रिकॉंबिनंट डी एन ए या तंत्रज्ञानाचा वापर करुन शास्त्रज्ञांनी पॅनक्रिया ग्रंथीतील - आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या इन्सुलिन तयार करणार्या बीटा सेल्स मधील "तो" जीन (इन्सुलिन तयार करणारा) काढून एका साध्या इ. कोलाय (E. coli) या जीवाणूत टाकला (प्रतिरोपित केला) त्यामुळे हा रिकॉंबिनंट इ. कोलाय आता चक्क मानवी इन्सुलिन तयार करु लागला - या शुद्ध स्वरुपातील इन्सुलिनमुळे आज मितीला अशा सर्व डायबेटिस पेशंट्सचा फारच फायदा झालेला आहे - नव्हे जीवदानच मिळाले आहे ...
शशांकजी खूप सुंदर माहिती
शशांकजी खूप सुंदर माहिती आम्हाला समजेल अशा पद्धतीने मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. सुरेख विवेचन.
उजू, ओले काजू इकडे पाठव.
उजू, ओले काजू इकडे पाठव.
जिप्सी , साधने,
धापा टाकणारी
धापा टाकणारी बाहुली.........बाप रे काय धागा पळ्तोय.. १/२ दिवसाचं रहिलंय वाचायचं.
शशांक मस्त माहिती!
रच्याकने, एखाद्या नॉर्वेच्या माणसाने भारतीय माणसाशी लग्न केले तर होणा-या मुलाचा एक डोळा काळा आणि एक निळा असे होईल काय?? बहुतेक नसावे कारण मुल घडताना डोमिनंट जीन्सचा पगडा भारी पडतो असे कुठेतरी वाचलेले. पण होत असेल तर मला पाहायला आवडेल. मांजरांचे फोटो पाहिलेत मी असे.. एक डोळा हिरवा आनि एक पिवळा...
>>>>>>>
साधना तुम बाज नही आओगी!
हो पण मीही अशी वेगवेगळ्या डोळ्यंची मांजरं पाहिलीयेत.
आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या
आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या इन्सुलिन तयार करणार्या बीटा सेल्स मधील "तो" जीन्स (इन्सुलिन तयार करणारा) काढून एका साध्या इ. कोलाय (E. coli) या जीवाणूत टाकला (प्रतिरोपित केला) त्यामुळे हा रिकॉब्मिनंट इ. कोलाय आता चक्क मानवी इन्सुलिन.......शशांक, नेहेमीप्रमाणे मस्तच.
उजू,
ओले काजू पाहून तोंडाला पाणी सुटलं.
शशांक,थोडक्यात चांगली माहिती
शशांक,थोडक्यात चांगली माहिती दिलीत. स्वतःला माहिती असलेलं शास्त्रीय ज्ञान सोप्या शब्दांत सांगता येणं सगळ्यांना शक्य होत नाही. तुम्ही वर दिलेली न्युक्लिअस - क्रोमोसोम - जीन डायग्राम या कॉपिरायटेड वेबसाइटवरची आहे तेवढं कृपया नमूद कराल का? तसंच जिथे जिथे एकवचनी आहे तिथे 'जीन्स'ऐवजी 'जीन'.
शशांकजी खूप मस्त माहिती!!
शशांकजी खूप मस्त माहिती!! अवघड विषय सोप करुन सांगितला.
उजु ओले काजु मस्त.
साधना, सायली ला लिहिलेस ते १०० टक्के पटले. ऑफिस मध्ये मा बो उघडत असत तर तेव्हाच लिहिल असत.
ऑफिस मधून सन्ध्याकळी घरी येऊन मा. बो. पहाते तर खूप काही घडलेले असते. मजा येते वाचायला.
शशांक, ते नवीन प्रकारचे
शशांक, ते नवीन प्रकारचे इन्शुलिन बाजारात आले का ?
इथे सर्वांनाच एक पुस्तक सुचवायचे आहे, शॅडोज ऑफ फर्गॉटन अन्सेस्टर्स हे कार्ल सगान आणि अॅन ड्रीयन यांचे पुस्तक, रमेश लऊळ यांनी याच नावाने भाषांतरीत केले आहे. खुप वाचनीय आहे अगदी मूलांनाही अवश्य द्या वाचायला.
माझे अजून पुर्ण वाचून झाले नाही... ( ५०० पाने ) पण जेवढे वाचले तेवढे खुपच आवडलेय.
उजू, आमच्या कोकणातले काजू
उजू, आमच्या कोकणातले काजू तूमच्या प्रकारच्या मसाल्यात शिजणार तर !
डोळ्यांच्या रंगावरुन
डोळ्यांच्या रंगावरुन आठवले.
बालिच्या फोटोत ज्याचा फोटो त्या केदारचे डोळे लहानपणी निळे होते. पुढे ४/५ वर्षाचा झाल्यावर ते असे झाले.
आता ते वहीनीच्या डोळ्यांसारखे आहेत. माझ्या भावाचे मात्र काळेच होते.
त्या पुस्तकातला एक
त्या पुस्तकातला एक उल्लेख..
अगदी पहिल्यांदा जेव्हा जीव निर्माण झाले त्यावेळी... बाहेरील अपायकारक घटक खुपच प्रभावी होते. त्यापासून एकट्या पेशीचे संरक्षण होणे कठीण होते. त्यावेळी काही पेशी एकत्र आल्या. त्यात त्यांना सुरक्षित वाटले. मग आणखी पेशी एकत्र येऊन त्यांचा समूह झाला.. त्या समुहाच्या बाहेरच्या थरातील पेशींना मात्र या घटकांचा सामना करावा लागला. त्यात त्यांचा बळी गेला पण त्या आवरणाखालच्या पेशी मात्र तगल्या.. मग त्या बाहेरच्या मृत पेशींचे काय झाले.. कचव ?
सुप्रभात पिवळा
सुप्रभात
पिवळा तॅबुबिया
<<<उजू, आमच्या कोकणातले काजू तूमच्या प्रकारच्या मसाल्यात शिजणार तर !>>>>>येस्स्स दा, बरोबर ओळखलत. तुम्ही सांगितलेल पुस्तक मिळवून वाचल पाहिजे आता. लायब्ररीत आहे का बघते आता.
सायली, मी कोकणातली नाही ग. आई काही कामानिम्मित्त गेलेली तेव्हा आणलेत तिने.
साधना, ओले काजूगर आहेत ते. रायगड्याच्या पायथ्याशी पळस म्हणून गाव आहेत , तिथल्या एकांच्या वाडितल्या काजूचे.
शशांकजी , नेहमीप्रमाणे मस्त माहिती.
Pages