निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृण्मयी - असेच लक्ष असूद्यात व काही गडबड झाली असेल तर जरुर सुधारणा सुचवणे - एखादी शास्त्रीय गोष्ट परिपूर्ण स्वरुपात सगळ्यांपर्यंत पोचवली जावी एवढाच हेतू आहे. तसेच त्या क्रोमोसोम्स-जीन या आकृतीच्यावर ती लिंक दिलेली आहे - ती पुरेशी आहे का अजून काही करायला पाहिजे - जरुर कळवा.
बाकी सार्‍या नि ग प्रेमींचे मनापासून आभार ..... Happy

जेनेटिक्सचा उपयोग उत्तम प्रकारचे बी-बियाणे बनवण्याकरता -

आपण गहू- बाजरी सारख्या धान्यांची शेती करतो - यावर अनेक प्रकारचे रोग पडतात व धान्य उत्पादन कमी होते - या रोगांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबंध करता येतो - जसे कीटकनाशके, इ. - पण निसर्गात अशी काही जादू आहे की "वाईल्ड व्हरायटी" - म्हणजे निसर्गात आपोआप आलेले - म्हणून जे काही असते ते अशा रोगांना नैसर्गिकरित्या तोंड देऊ शकतात- मग शास्त्रज्ञ ती "वाईल्ड व्हरायटी" शोधून आपल्या नेहेमीच्या पिकांबरोबर त्याचा संकर घडवून आणतात -आता पुढे जे पीक येईल त्यात हा नैसर्गिकरित्या रोगप्रतिबंधक गुण उतरेल व आपले धान्य उत्पादन पुन्हा सुरळित चालू राहील. हे सगळे जेनेटिक्सचा अभ्यास करुन केले जाते.

एक गंमत - भारतात ऊसावर जे वेगवेगळे संशोधन होते त्याकरता ऊसाला जे तुरे येतात त्याचे फार महत्व आहे -पण हे तुरे सर्वत्र येतातच असे नाही. मात्र कोईंमतूर हे असे ठिकाण आहे (तेथील विशिष्ट वातावरणामुळे) जिथे उसाला हमखास तुरे येतातच - सहाजिकच भारताचे ऊसासंबंधी संशोधनाचे ते मुख्य ठिकाण आहे.

कोल्हापूर भागात पण बर्‍याच प्रमाणात तुरे येत्तात,,,

फड संभाळ तुर्‍याला गं आला... तूझ्या ऊसाला लागल कोल्हा गं............ Happy

पण याच जेनेटिक्सचा उप्योग करुन मोन्टानासारखी कंपनी बियाण्यामध्ये केमिकल्सही घालतेय ना, ज्याच्यामुळे माणुसच धोक्यात येऊ शकेल??

जिप्सी, सुंदर लेखाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!!!!

ऊसाचे तुरे : ऐकीव माहीती ::
ऊस एकदा लागवड केली की तीन पिकं घेता येतो. जर चौथ्यांदा पिक आले तर ते भXXX असते.
पहिल्या तीन पिकांना देखील वेगवेगळी नावे सांगितली होती.
हे जर खरे असेल तर, तीन पिकं झाल्यानंतर जमिनीची साफ-सफाई, मशागत... ईतर कामे न करता चौथ्या पिकाची वाट का पाहिली जाते?

मधु, माझ्या माहितीप्रमाणे उस जमिनीची अपरिमित अशी हानी करतो. उसलागवडीमुळे जमिनीचा कस पुर्णपणॅ निघुन जातो. म्हणुन तिन वर्षांनंतर एक वर्ष जमिन पडिक ठेवावी लागते. उसाची लागवड करतानाही पहिले सहा महिने जेव्हा उस लहान असतो तेव्हा हरभरा मुग इत्यादी जमिनीतला नायट्रोजन वाढवणारी पिके आंतरपिके म्हणुन घेऊन कस सांभाळायचा प्रयत्न केला जातो.

आज ऑफिसला येताना एक फुलोरा पाहिला.
पानं साधारण तिवरांसारखीच, पण हा फुलोरा वेलीवर होता,
फुलं करंजासारखी सफेद (किंवा फिक्कट गुलाबी) असावी. त्याची मांडणीही करंजाच्या फुलासारखीच होती. कुठलं असांव हे फुल?

रच्याकने, तुर्‍यासारखा फुलोरा येणारा (याच सीझनमध्ये) वृक्ष कोणता आहे. आज पाहिला पण नावं आठवत नाही आहे (एका मित्राने नाव सांगितलं होतं पण विसरलो). संपूर्ण झाडावर एकही पान नाही पण बारीक बारीक फुलांचा फुलोरा आहे.

आज ऑफिसला येताना एक फुलोरा पाहिला.
पानं साधारण तिवरांसारखीच, पण हा फुलोरा वेलीवर होता,
फुलं करंजासारखी सफेद (किंवा फिक्कट गुलाबी) असावी. त्याची मांडणीही करंजाच्या फुलासारखीच होती. कुठलं असांव हे फुल? >>>> अरे जिप्सी - फोटो टाकायला काय घेशील रे ......

शंशाक, ऑफिसला जात असल्याने फोटो नाही काढता आला.

बादवे, तिवरांच्या झाडाला (या सीझनला) छोटीछोटी लालसर रंगाची फळे येतात का?

जिप्सी, तिवराला हिरव्या रंगाची फळं लागतात.
आणि शक्य झालं तर वर म्हणालास त्या झाडांचे फुला-पानांचे फोटो देशील? म्हणजे शोधायला बरं पडेल. Happy

हे झाड कोणते? पुढे आलेल्या कळ्यांमधून लांब पाकळ्या निघत आहेत.
निग मुळे आजुबाजूंची झाडे बघायची छान सवय लागली आहे.

3_0.jpg4_0.jpg

सामी हे रबराचे झाद. । ह्याच्या चिका पासुन र्बर बनव्तत
Hyachya chikapasun rubber nirmiti kartat.

धन्यवाद जागू. लगेच उत्तर मिळाले पण. Happy

खालचे झाड कुठले. स्टेशन वर प्लॅट्फॉर्म ला लागूनच आहे. खूप दिवस उत्सुकता होती. काल स्टेशन वर गेल्यावर कॅमेरा काढून लगेच फोटो घेतला, इकडे शेअर करायचा म्हणून. सगळे लोकं बघत होते की ही अचानक फोटो काय काढतेय? Happy

6.jpg

अग हे umbarache jhad. Dattaguruncha vas asto hya jhadakhali mhanun pujahi keli jate hyachi. Dineshdancha lekhahi aahe hyachyavar.
hyachya mulat taha bhagel itke pani aste ase mi saguna baget aikle hote.

जागू, अग आमच्या कॉलनी मधे उंबराचे झाड आहे पण ते खूप उंच आहे. उद्या जमल्यास फोटो टाकेन.
हे फोटोतील झाड खुपच बुटके आहे आणि खालपासूनच भरपूर फळे लागली आहेत. आणि कॉलनीतल्या उंबराच्या झाडाला एकही फळ नाही .

Achha photo jara javalun kadhlastar kalel. Ek jungali jhad pan aste tyachi pane mothi astat.

सामी न जागु, हे उंबराचे झाड नाही. दुसरेच कसले तरी आहे. उत्तरेत याच्या या फळांची भा़जी करतात.

जिप्स्या, तो वेल घेवडा वर्गातल्या भाजीचा असेल. त्यांची पाने आणि फुले सेम करंज्यासारखी असतात.

शशांक, अतिशय छान महिती.

हा धागा मस्त असतो. नेहमी वाचतो पण प्रतिक्रीया प्रथ्मच देत आहे.

फक्त जिप्स्याला कमी छळा रे ........

जेनेटिक्सचा उपयोग पोल्ट्री इंडस्ट्रीकरता -

पोल्ट्री (कुक्कुटपालन) इंडस्ट्र्रीमधे साधारण दोन प्रकारचे पक्षी असतात - लेअर आणि ब्रॉयलर.
लेअर - अंडी देणारे (साधारण दिवसाला एक या प्रमाणे) हे पक्षी जास्त करुन फार वजनदार होत नाहीत व त्यांचे जे खाणे असते ते सगळे अंडी देण्याकडेच वळवलेले असते
ब्रॉयलर - हे पक्षी जे खातात ते त्यांचे वजन वाढण्याकडे वळवलेले असते (वेट गेन जास्त असते) - हे अंडी देण्यापेक्षा - चिकन -म्हणजेच खाण्यासाठी वापरले जातात.

या दोन्ही प्रकारांच्या पक्ष्यांचे ग्रँड पेरेण्टस असतात व त्यांच्याकडून अशी पैदास घडवली जाते की त्यात आयदर लेअर किंवा ब्रॉयलरच तयार होईल. (दोन्ही प्रकाराचे पेरेण्ट्स वेगवेगळे असतात - व त्यांच्या वाढीकडे विशेष लक्ष देऊन पुढील पिढीत हे लेअर आणि ब्रॉयलर तत्व उतरेल याकडे लक्ष दिले जाते)
अजून एक गमतीचा भाग म्हणजे - समजा एखादा पोल्ट्री मालक असे लेअर किंवा ब्रॉयलर प्रकारचे पक्षी घेऊन गेला व स्वतःच्या पोल्ट्री फार्ममधे त्याने त्यापासून पुढील पैदास करायचा प्रयत्न केला तर त्याला ते करता येत नाही - कारण हे मूळ पक्षी विकणारे अशा चातुर्याने (जेनेटिक्सचा अभ्यास केल्यामुळेच) ते पक्षी तयार करतात की जे स्वतःच लेअर किंवा ब्रॉयलर असतात -त्यांच्या पुढील पिढीत तो गुण उतरु शकत नाही -सहाजिकच पोल्ट्री मालकाला दरवेळेस त्या मूळ पक्षी विकणार्‍यांकडूनच पक्षी घ्यावे लागतात.
मग या पक्ष्यांना कोणते खाणे(फीड) देणे गरजेचे आहे, कोणत्या लशी देणे महत्वाचे आहे, कोणती औषधे द्यायला पाहिजे - हे सगळे ते मूळ पक्षी देणारे ठरवून त्यापासून स्वतःचा फायदा घडवून आणतात व पोल्ट्री मालकालाही (अशी कोणी काळजी घेणारे असल्याने) कुक्कुटपालन खूपच सुसह्य होते .... Happy

काही ठराविक लसी (मानवी) तयार करण्याकरता ठराविक प्रकारची अंडी वापरण्यात येतात - यांना स्पेसिफिक पॅथोजेन फ्री - ( एस. पी. एफ. ) अंडी म्हणतात - ही अंडी देणारे पक्षी काही खास वातावरणात वाढवले जातात - खास अन्न-पाण्याची सोय केली जाते - जेणेकरुन पोल्ट्रीमधे होणारे सर्वसाधारण रोग वा तत्सम जंतू (व विषाणू) पासून ही अंडी मुक्त असतात -सहाजिकच ही अंडी अतिशय महाग असतात व लस-उत्पादनाकरताच वापरली जातात. (एखादी लसीची व्हायल/ अँम्पूल जर तुम्ही नीट पाहिलीत तर त्या लेबलवर ही सगळी माहिती देणे अनिवार्य असते - त्यात जर हा शब्द असेल - सी ई सी बेस्ड व्हॅक्सीन - तर याचा अर्थ चिकन एंब्रियो फायब्रोब्लास्ट सेल्स - असा असतो - म्हणजेच ही लस ती एस. पी. एफ. अंडी वापरुन केलेली असतात.)

ही जी माहिती मी देत असतो त्यात कोणाला काहीही सुधारणा सुचवायची असल्यास जरुर सांगणे, तसेच जर काही तत्संबंधी शंका असतील तरीही जरुर विचारणे वा माझ्याकडून माहिती देण्यात एखादी चूक झाली असल्यास तेही मोकळेपणाने सांगणे ... कॉज, नोबडी इज फर्फेक्ट ... Happy

वेगवेगळ्या प्राणी, पक्षी यांच्या ब्रिडींग करता जेनेटिक्सचाच वापर करावा लागतो. विशेषतः हॉर्स ब्रिडींग, डॉग ब्रिडींग, कॅट ब्रिडींग हे अनेकांचे व्यवसाय असतात व त्यासाठी निष्णात जेनेटिसिस्टची गरज असते.

तसेच वेगवेगळ्या प्राणी, पक्ष्यांमधील जाती-जमातीत निसर्गतः किती मिळते -जुळतेपणा आहे हे त्या त्या प्राणी-पक्ष्यांच्या जाती-जमातीतील जेनेटिक मेक-अपवरुनच शोधले जाते.
उदा. - आपण - मानव व चिपांझी यांच्या डी. एन. ए. मधे ९६% साधर्म्य आहे - त्यामुळे कोणी माकडपणा केला तरी तो क्षम्यच म्हणायला हवा नाही का ?? Happy Wink

(http://news.nationalgeographic.co.in/news/2005/08/0831_050831_chimp_gene... )

साधना मला पण ते रानटी झाड वाटतेय, पण त्याला खुपच फळे आली आहेत.

उदा. - आपण - मानव व चिपांझी यांच्या डी. एन. ए. मधे ९६% साधर्म्य आहे - त्यामुळे कोणी माकडपणा केला तरी तो क्षम्यच म्हणायला हवा नाही का ?? > Happy

आली होळी, फुलांची रंगपंचमी फुलली.
http://epaper.loksatta.com/242443/indian-express/13-03-2014#page/15/2

शशांक छान माहिती... या जेनेटीक्स बाबतही त्या पुस्तकात छान चर्चा आहे..
उदा ... उंचावरची पाने खात खात जिराफाची मान लांब होत गेली पण स्वरयंत्र हरवले. पण असे सर्वच बदल पुढच्या पिढीत उतरतीलच असे नाही.... उदा. भारतात हिंदूंमधे कान टोचायची प्रथा आहे पण म्हणून नवीन बाळं काही टोचलेल्या कानाची जन्माला येत नाहीत.

माझ्या निरिक्षणाप्रमाणे उंबराचा असा काही सिझन नसतो. कधीही फळे लागतात त्याला. जंगलात जेव्हा इतर झाडांना फळे नसतात तेव्हा असे कुठलेतरी या वर्गातले झाड फळांनी बहरते आणि प्राण्यांच्या जेवणाची सोय होते.

कच्च्या उंबराची भाजी छान होते. कृती हव्येका ?

Pages