निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली.. अगं साधनाचं नेहमीच बरोबर अस्तं..

ह्याला म्हणतात अज्ञानातले आनंद.... Happy वर्षू तु अशीच आनंदी राहा... Happy माझे बिंग फोडू नकोस.

एल निनो आहे का काय ते माहित नाही पण या वर्षी नोवेंबरपासुनच सुरवात झाली. कधी पडली नव्हती इतकी थंडी पडली आणि आता हे.

आधीच निवडणुकांमुळे महागाई भरमसाट वाढलीय/ अजुन वाढणार आहे. आणि आता त्यात विकत घ्यायलाही भाज्या उरलेल्या नाहीयेत Sad Sad अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे एकदम.

रच्याकने, जिप्सी तू हे वाचू नकोस रे ..... तुझे अजून तरी नवे कोरे दिवस आहेत त्या अज्ञानात सुख मानून घे.. (सध्यातरी.... ) नंतरचे नंतर...

पुढचे का लिहिले एवढ्यातच?? उगीच बिचा-याला कशाला घाबरवता???

जिप्स्या तु पुर्ण नकोस रे वाचु.... फक्त एकच वाक्य वाच..

अगं माझ्याकडे सेम होतं फक्त रंग बराच डार्क होता. एकदम डार्क जांभळा. तिनचार वर्षे तरी टिकलेलं. नंतर गेलं.

कोकण सोडुन सर्वत्र अवकाळी पावसाने/गारांनी थैमान घातले आहे. Sad कालच्या बातमीत शेकडो शेळ्या-मेंढ्या, ७-८ मोरांचा मृत्यु झाल्याचे दाखवत होते. Sad

उजु, तुला कोणकोणत्या फुलांचे फोटोज पाहिजे होते (इशिताच्या प्रोजेक्टसाठी) त्याची लिस्ट ईमेल कर (किंवा एसएमएस कर) ना. तुला हायरेज फोटोज पाठवतो.

बादवे, माज्याकडच्या एडेनियमला कळ्या आल्या आहेत. Wink उजु, टुकटुक Proud

फार मोठा बॅकलॉग भरुन काढायचाय आता. वाचेन सावकाश. जेवढ वाचल ती माहिती फोटो नेहमीप्रमाणेच मस्त......>>अनुमोदन.
खूप मस्त माहिती वाचतेय. निग म्हणजे माहितीचे भांडार आहे.

एल निनो आहे का काय ते माहित नाही

एल निन्यो (Niño= लहान मुलगा) हा विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या वातावरणात होणारा बदल आहे. यामुळे शीत आणि उष्ण प्रवाहांच्या (समुद्रावरून वाहणारे वारे) मार्गांत बदल होतो. या लहान मुलाची एक बहिण सुद्धा आहे. La Niña effect मध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागरातले पाणी (sea surface temperature) थंड होते, पण Niña मुळे आपत्ती येण्याचे प्रमाण Niño च्या तुलनेत फारच कमी आहे. आपला पाऊस दक्षिण अमेरिकेतून (एक्वादोर, कोलंबियाच्या आसपासचा भाग) इथे येतो. तो पाऊस मेक्सिको, उसगावातल्या दक्षिणी राज्यांमध्येही जातो पण आपल्या एवढा नाही. या आधी भारतात २००९ मधला दुष्काळाला एल निन्यो कारणीभूत होता. पण त्यामुळे पावसावरही परिणाम होऊ शकतो. साधारण दर २-१४ वर्षांनी ते होत असते, पण गेल्या ४० वर्षात त्यात इतका बदल झाला आहे कि आता ते अनियमित झाले आहेत.
मान्सून, एल निन्यो, विषुववृत्तीय हवामान यांच्यात झालेला थोडासा बदल पण खूप ठळक पणे दिसून येतो. एल निन्यो मुळेच पाऊस पडतो असे नाही पण तो आपला पाऊस रेग्युलेट करू शकतो. कारण दोघांचा उगम दक्षिण अमेरिकेजवळ होतो.
हि माहिती मला N.Y. आपटे यांच्या एका सेमिनार मधून मिळाली. ते मौसम विभागाचे माजी डेप्युटी डायरेक्टर आहेत.

या वर्षी पोलार व्हर्टेक्स मुळे उत्तर पूर्व अमेरिका मध्ये खूप थंडी होती, याचा परिणाम तिथल्या करंट्स वर झाला आणि बहुतेक त्यामुळेच हे चक्र बिघडले असावे, असे मला वाटते.

लहानपणी मला वाटायचे की मुंबईत कधीतरी बर्फ पडेल का? पडला तर कित्ती मज्जा......

आता ह्या बहिणभावाच्या (अव)क्रुपेने माझे हे (दु:)स्वप्न साकार होईल अशी भीती आहे का?????

आता ह्या बहिणभावाच्या (अव)क्रुपेने माझे हे (दु:)स्वप्न साकार होईल अशी भीती आहे का?????

झाल तर बरच आहे. तेवढा तुलाच बर्फात उगवण-या झाडांचा अभ्यास करता येईल. Proud
पण मग मुंबईतली उर्वशी मेली तर चालेल वाटतं तुला? Uhoh

मुलांना कंट्रोल करणारे पालक कुठल्या थराला जातात हे बघुन घे. तुझी मुले परिक्षेच्या वयात येतील तेव्हा तुला गुगलमॅप वरुन कंट्रोल करावे लागेल...

वरचे सगळे फोटो सुंदर.

सगळीकडे निसर्ग कोपलाय? बिचारा शेतकरी हताश झालाय.

जिप्सी, कोकणात जरी अवकाळी पाऊस झाला नसला तरी सतत बदलत्या हवामानामुळे कोकणातपण परिस्थिती वाईट आहे, आमच्या गावाला देवगड तालुक्यात सगळ्या आंब्याचा मोहोर करपला आहे आणि यंदा आंबा खूप मोहोरला होता.

साधना Proud

आमच्या गावाला देवगड तालुक्यात सगळ्या आंब्याचा मोहोर करपला आहे आणि यंदा आंबा खूप मोहोराला होता.>>>>> Sad

हेमा धन्यवाद... आज अजुन काही फोटो टाकते आहे.

वर्षू निल+ उजु, खुप सुंदर फोटो...

मधु मकरंद.. बॉटलब्रश खुपच सुरेख... याची पान चुरगाळली की निलगीरी सारखा सुवास येतो.

मनुषी सुरेख फोटो... पेन्टींग्स वाटतायत.. निसर्गासारखा मोठा चित्रकार कोण....

पण आपण वावरतोय हायटेक जगात...टेक्नॉलॉजी च्या इतक्या मागे लागले आहोत की
निसर्गाच्या विरुद्ध जाउन प्रगती करायला निघालोत. हे सगळे रुतुचक्र बदलण्याच्या मागे
आपणच जवाबदार आहोत.७०%प्र्र्रूथ्वी पाण्यानी आच्छादली असुन... अनेक गावे पाण्याच्या
थेंबा पासुन वंचित आहेत... पाण्यासाठी त्यांना कीती तरी मैल प्रवास करावा लागतो...

जिप्सी म्हणतोय त्या प्रमाणे नागपुर नजिकच्या बरेच गावात अकाळी पाउस आणि गारा ह्या मुळे
शेकडो पोपट म्रुत्युमुखी पडलेत..एका गावात तर ६०० ची संख्या आहे... बिचारे निष्पाप जीव... यात
त्यांची काय चुक?... ईवलेसे जीव, ईवली-ईवली घरटी त्यांची... महाभयंकर पावसा पुढे त्याचा काय
निभाव लागणार? खुप हळहळ वाटते...

हेमा धन्यवाद... आज अजुन काही फोटो टाकते आहे.

वर्षू निल+ उजु, खुप सुंदर फोटो...

मधु मकरंद.. बॉटलब्रश खुपच सुरेख... याची पान चुरगाळली की निलगीरी सारखा सुवास येतो.

मनुषी सुरेख फोटो... पेन्टींग्स वाटतायत.. निसर्गासारखा मोठा चित्रकार कोण....

पण आपण वावरतोय हायटेक जगात...टेक्नॉलॉजी च्या इतक्या मागे लागले आहोत की
निसर्गाच्या विरुद्ध जाउन प्रगती करायला निघालोत. हे सगळे रुतुचक्र बदलण्याच्या मागे
आपणच जवाबदार आहोत.७०%प्र्र्रूथ्वी पाण्यानी आच्छादली असुन... अनेक गावे पाण्याच्या
थेंबा पासुन वंचित आहेत... पाण्यासाठी त्यांना कीती तरी मैल प्रवास करावा लागतो...

जिप्सी म्हणतोय त्या प्रमाणे नागपुर नजिकच्या बरेच गावात अकाळी पाउस आणि गारा ह्या मुळे
शेकडो पोपट म्रुत्युमुखी पडलेत..एका गावात तर ६०० ची संख्या आहे... बिचारे निष्पाप जीव... यात
त्यांची काय चुक?... ईवलेसे जीव, ईवली-ईवली घरटी त्यांची... महाभयंकर पावसा पुढे त्याचा काय
निभाव लागणार? खुप हळहळ वाटते...

झाल तर बरच आहे. तेवढा तुलाच बर्फात उगवण-या झाडांचा अभ्यास करता येईल. फिदीफिदी
पण मग मुंबईतली उर्वशी मेली तर चालेल वाटतं तुला? >>>>> साधनाला अगदी "घरातलाच आहेर" मिळाल्याने "जिप्सी"भौंना काय आनंदाच्या उकळ्या फुटून राहिल्यात .... Happy Wink

जिप्सी - तुला काय वाटलं - आता तर सुपात होतास आणि जातं पाह्यलंच नाही अजून ??? .... (नाही, म्हटलं.. भरडला जाशील तेव्हा कळेल बच्चमजी.... Happy Wink .... जाते हलके घेणे .... Happy Wink

अभ्यासाला लागा बाईसाहेब.. परवा पेपर आहे.. >>>>> हे कोणाला सांगतीएस साधना?????, आपलीच कायम परीक्षा असते.. - लग्नाआधी काय नि नंतर काय ..... Happy Wink
तेव्हा टेन्शन नही लेनेका .... हा हा हा हा .... "आई"च्या भूमिकेतून लवकर बाहेर पड कशी - ते "स्वीट सिक्स्टिन लक्षात" ठेवत जा बरं .....

ते आभ्यासाला लागा वॉज सो टिपिकल मॉमपणा >>>> हे बघा अजून एक सोनुकली ... (आईला जाम पिडून, चिडवून परत तिच्या गळ्यात पडून हसणारी - "टिपिकल परी" का काय ते तसलंच काहीतरी .....) Happy Wink

त्या दिवशी "पिंगळा" ओळखल (?) आता "शिंगळा" (पक्षी ) कुठला ते सांगा.
(विकिपिडियावर मराठीत "शिंगळा" शोधुन कॉपी करू नका. "पक्ष्या" ऐवजी "मासा" सापडेल. :-))

शशांकदादा Proud
मी परी? वॉव :पांढरा फ्रॉक घालून डोक्याला रिबिन बांधुन गोल गोल फिरणारी बाहुली : Proud

जिप्स्या, कान इकडे कर मला तुला एक विचारायचंय!
(इतक्यात लाडू दिलेस ना? इतक्या लगेच पेढे पण? :फिदी:;) )

Pages