निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
साधना आता माझा दुसरा प्रश्न
साधना आता माझा दुसरा प्रश्न
माझ्या या लिंकवर असलेल्या प्रचि २८ मध्ये पिंगळा आहे कि घुबड?
हा पिंगळा. माझ्याकडेही असाच
हा पिंगळा. माझ्याकडेही असाच फोटो आहे डोळ्यात डोळॅ घालुन बघणारा...
आपल्याला दिसणारे शहरी घुबड रंगाने पांढरे असते. ज्याला बार्न ओउल म्हणतात ते.
पास झाले काय हो सर? पेढे
पास झाले काय हो सर? पेढे द्याना मग....
पास झाले काय हो सर? पेढे
पास झाले काय हो सर? पेढे द्याना मग....>>>>पास झाल्यावर पेढे "विद्यार्थ्यांनी" द्यायचे असतात ना कि "सरांनी".
सगळे लेक्चर्स अटेंड करणारे,
सगळे लेक्चर्स अटेंड करणारे, सरांना मागुन शेंड्या न लावणारे, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पटापटा देणारे विद्यार्थी आता दुर्मिळ झालेत. तेव्हा असे विद्यार्थी आपल्याला लाभलेत हे आपलेच भाग्य समजुन सरांनी पेढे वाटायला हवेत अशी परिस्थिती आलीय आता.
तेव्हा पेढे पाठवा फटाफट. आधी उत्तर बरोबरे का ते सांगा.
आज सकाळीच एक पिवळा तबेबुया
आज सकाळीच एक पिवळा तबेबुया फुललेला पाहिला - संपूर्ण झाड पिवळ्याधमक फुलांनी फुललेलं ....
(हा फोटो मात्र आंतरजालावरुन साभार... )
अनेक ठिकाणी जकरंदाही फुललाय आणि जांभळानेही मोहोर धरलाय ....
(No subject)
सगळे लेक्चर्स अटेंड करणारे,
सगळे लेक्चर्स अटेंड करणारे, सरांना मागुन शेंड्या न लावणारे, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पटापटा देणारे विद्यार्थी आता दुर्मिळ झालेत. तेव्हा असे विद्यार्थी आपल्याला लाभलेत हे आपलेच भाग्य समजुन सरांनी पेढे वाटायला हवेत अशी परिस्थिती आलीय आता. >>>>>>>>.साधने, हे मात्र खरं आहे. हल्ली सरांना उद्धटपणे बोलणारे, शिव्या देणारे विद्यार्थीच जास्त दिसतात. तेव्हा तुझ्या सरांनीच पेढे द्यायला पाहिजेत. (तुला मिळाले की मल पण दे ग :फिदी:)
(No subject)
हा स्वर्गीय नर्तक आहे ना?
हा स्वर्गीय नर्तक आहे ना? कुठे दिसला तुम्हाला?
हा छोटा दोस्त कोण? जिप्सी +
हा छोटा दोस्त कोण? जिप्सी + शशांक जी.....
(No subject)
होय वर्षा.. स्वर्गीय नर्तक /
होय वर्षा.. स्वर्गीय नर्तक / स्वर्ग नाचण पील्लु आहे, गुगल वर सापडले..
मला तो स्वर्गिय नर्तक दुर्गा
मला तो स्वर्गिय नर्तक दुर्गा टेकडीवर दिसलेला. मी बसलेले त्याच्या अगदी समोरच्या झाडाच्या फांद्यांवर घिरट्या घालत होता. इतका क्युट पक्षी मी कधीच पाहीला नाहीये.
(No subject)
सायली, तुला कुठे दिसले हे
सायली, तुला कुठे दिसले हे क्युटीज?
रिया हे खास तुझ्या साठी....
रिया हे खास तुझ्या साठी....
अरेवा, वरचे सर्व फोटो सुंदर
अरेवा, वरचे सर्व फोटो सुंदर आहेत.
फ.बी वर आले होते, इथे शेयर
फ.बी वर आले होते, इथे शेयर केलेत..
शोभा वाढदिवसाच्या खुप
शोभा वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा...
शोभा, वा दि च्या हार्दिक
शोभा, वा दि च्या हार्दिक शुभेच्छा!
मस्त रंगल्याएत गप्पा!!
सगळ्यांचेच फोटो सुंदर आहेत. आणि मला वाटतं पक्षी आणि फुलं ही देवाची विशेष लाडकी बाळं आहेत; म्हणून देवाने त्यांना 'विशेष' रंग-रूप दिलंय!!
सायली, वरचे सर्व फोटो सुंदर
सायली,
वरचे सर्व फोटो सुंदर आहेत.>.. +१
शांकली + १००>>>>>>सगळ्यांचेच
शांकली + १००>>>>>>सगळ्यांचेच फोटो सुंदर आहेत. आणि मला वाटतं पक्षी आणि फुलं ही देवाची विशेष लाडकी बाळं आहेत; म्हणून देवाने त्यांना 'विशेष' रंग-रूप दिलंय!!
सायली, हे फोटोज तू नसतील
सायली, हे फोटोज तू नसतील काढले तर इथे चालतील का हे एकदामबो प्रशासनाकडुन कन्फर्म करुन घे
तू टाकलेल्या फोटोतला स्वर्गिय नर्तक नाही. मी पाहिलेला पांढरा शुभ्र आणि काला-निळा होता
हा फोटो मी काढलेला नाही. एका
हा फोटो मी काढलेला नाही. एका फेबु मित्रांनी काढलेला आहे. छान न अगदी
बापरे हे पोपट काय जिवावर उदार
बापरे हे पोपट काय जिवावर उदार झालेत.....
काय मस्त फोटो आहे.
काय मस्त फोटो आहे.
बी अप्रतिम फोटो. धान्याची
बी अप्रतिम फोटो. धान्याची पोती आहेत त्यातले दाणे खायला पोपट चिकटलेत अगदी त्याला.
शशांक पिवळा टॅबेबुया बहाव्यासरखा बहरलेला मी बघितलेला नाहिये अजून. हिरवट राखाडी रंगाची पानं अगदी बरोबरीने असत्तात. ते ही झाड सुन्दर दिसत. हिरव आणि पिवळ काँबिनेशन छान जमत.
(No subject)
बेळगावला असा पिवळा टॅबेबूया,
बेळगावला असा पिवळा टॅबेबूया, रस्त्याच्या कडेने खुप बघितला होता. आपल्याकडे बेळगावचे कुणी नाही का ?
सायलीच्या फोटोमधला तो झुपकेदार शेपटीचा पक्षी.. मी बालिमधे बघितला होता. पण अनेक सुंदर पक्षी पिंजर्यात असल्याने त्यांचे फोटो पूर्ण घेता आले नाहीत.
बी, मुंबईला रे रोड च्या समोर धान्याची गोदामे आहेत. तिथे पण असेच पक्षी धान्याच्या पोत्यावर तुटून पडलेले असतात.. पण नवल म्हणजे त्यात बगळेच जास्त असतात. बगळ्यांना शेंगदाण्याची चटक कशी लागली कुणास ठाऊक ?
आणि पेढे कोण वाटतंय म्हणे !
Pages