निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
मुंबईतही मी भांडुप-नाहुरच्या
मुंबईतही मी भांडुप-नाहुरच्या दरम्यान (रेल्वे लाईनच्या बाजुलाच) बहरलेला नीलमोहर (जॅकरांदा) पाहिलाय,
मुंबईतला एकमेव असेल. मला
मुंबईतला एकमेव असेल. मला मुंबईत पळस आणि जॅकरांदा अजुन कधीच भेटले नाहीत
नीलमोहोरासारखाच गम ग्वायकम
नीलमोहोरासारखाच गम ग्वायकम म्हणजेच गायत्रीची झाडे पण आता बहरू लागतील. राणीच्या बागेत तर आहेतच पण फोर्टमधे टॅमरींड लेनमधून आत गेल्यावर जे चर्च लागते, त्याच्या आवारात पण आहेत. फुले देखणी, तिरंगी ( निळी, आकाशी आणि पांढरी )... गोंद औषधी आणि पुर्वी कोर्टात ऑर्डर ऑर्डर म्हणत जज्जसाहेब जो लाकडी हातोडा आपटत असत तो या झाडाचा..
शशांक, मी ज्ञानेश्वरी वाचली नाही पण ज्या व्यक्तींच्या तोंडून निरुपण ऐकले ते जन्मभर विसरणार नाही.
पण ही ओवी मात्र मेघना पेठेच्या, सहोदरा कथेत वाचली होती.
मधु, पांढर्या कुड्याचे नेहमी झुडूपच असते पण अगदी क्वचित त्याचा मोठा वृक्ष होतो. गोव्यातल्या जून्या चर्चच्या मागे आहे तो.
याच्या फुलांची अणि शेंगाची पण भाजी करतात. राजापूरपासून पुढे गोव्यापर्यंत याची भरपूर झाडे डोंगरावर आहेत.
पण आता फुलांची भाजी करून खाणारेच थोडे लोक राहिलेत. या भाज्या वर्षातून काही दिवसच मिळतात पण
आवर्जून त्या खाव्या असा पुर्वी दंडक होता, भाजी तर चवदारच पण त्यातही औषधी.
तलवारीसारख्या शेंगा येणार्या
तलवारीसारख्या शेंगा येणार्या झाडांचे एक खास कूळ आहे. वारस वृक्षाला पण अश्याच शेंगा येता, पिवळसर गुलाबी रंगाची ( मोतिया ) खुप छान फुले येतात त्याला.
जिप्सी, साधनाला आठवत असेल, आमच्या बरोबर राणीच्या बागेत एक विजय म्हणून गृहस्थ होते. मी या झाडाचा पत्ता सांगितल्यावर ते थेट त्या गावी जाऊन त्याला बघून आले.. आणि गाव कुठलं तर पर्वरी, गोवा.
एका झाडासाठी मुंबई ते गोवा प्रवास करणारा तो खरा वृक्षमित्र !
मी काल हि ५ पुस्तके ऑर्डर
मी काल हि ५ पुस्तके ऑर्डर केली
१. पाणथळीतले पक्षी Author: किरण पुरंदरे
२. माईंचा स्वयंपाक Author: माई देशपांडे
३. अनवट Author: मिलिंद गुणाजी
४. पक्षी - आपले सख्खे शेजारी Author: किरण पुरंदरे
५. नवा आसमंत - Author: श्रीकांत इंगळहळीकर
माईचा स्वयंपाक (मायबोलीकर अभिजीतने सुचवलं) हे बहिणीसाठी आणि उरलेली माझ्यासाठी
जिप्सी, साधनाला आठवत असेल,
जिप्सी, साधनाला आठवत असेल, आमच्या बरोबर राणीच्या बागेत एक विजय म्हणून गृहस्थ होते>>>>>हो दिनेशदा. राणीबागेत प्रदर्शनाच्यावेळेस सोनसावर पाहताना त्यांची आठवण काढली होती.
जिप्सी कुठुन ऑर्डर
जिप्सी कुठुन ऑर्डर केलीस...
मला खुप मराठी पुस्तक घ्यायची आहेत.
माईचा स्वयंपाक (मायबोलीकर
माईचा स्वयंपाक (मायबोलीकर अभिजीतने सुचवलं) हे बहिणीसाठी आणि उरलेली माझ्यासाठी >>>>>
हे जिप्सी - हे उलटसुलट झालेलं नाही ना ?????
जिप्स्या आम्ही कुठे म्हटल
जिप्स्या आम्ही कुठे म्हटल बायकोसाठी?
जागु मी पण ह्येच म्हणायला
जागु मी पण ह्येच म्हणायला आले होते....
माईचा स्वयंपाक (मायबोलीकर
माईचा स्वयंपाक (मायबोलीकर अभिजीतने सुचवलं) हे बहिणीसाठी आणि उरलेली माझ्यासाठी >>>>> मी अग्दी नीट वाचलंय - बाकी जागू आणि वर्षू - तुम्ही तुमच्या मनातलं वाचताय....
प्रा. घाणेकरांचे, व्हॅली ऑफ
प्रा. घाणेकरांचे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे मराठीतले पुस्तकही संग्रही ठेवण्यासारखे आहे. तिथल्या बहुतेक फुलांची त्यांनी छान ओळख करून दिलेली आहे. त्यांनी या वयात तिथला प्रवास केला हे वाचून मला थोडी आशा ठेवायला जागा आहे.
नमस्ते! झाडांच्या निगे बद्दल
नमस्ते!
झाडांच्या निगे बद्दल विचारायचे असल्यास हाच धागा वापरावा का? मला तुळशी च्या निगेबद्दल विचारायचे आहे. माझे तुळशीचे रोपटे फारच फिक्के पडले आहे. कुठेही कीड वगैरे दिसत नहिये. त्यामुळे कळत नाही काय झाले आहे. मी दिवसातून एकदाच पाणी देते. सध्या त्या रोपट्याला त्याच्या वाढीच्या मानाने कुंडी व माती व्यवस्थित आहे असे वाटते .
शशांक, जागू, वर्षूदी जिप्सी
शशांक, जागू, वर्षूदी
जिप्सी कुठुन ऑर्डर केलीस...>>>>वैशाली, मी बूकगंगा साईटवरून ऑर्डर केलीत सगळी पुस्तके.
प्रा. घाणेकरांचे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे मराठीतले पुस्तकही संग्रही ठेवण्यासारखे आहे>>>>आता हे पुस्तकं शोधतो.
दिनेशदा, फेबुवर एक मेसेज पाठवला होता, पाहिला का?
जिप्स्या मलाही घ्यायचीआहेत
जिप्स्या मलाही घ्यायचीआहेत पुस्तके. तुला फोन करते नंतर.
ई-पूर्वाई उन मिळते का रोपाला? तुळशीची एक जात फिक्कट रंगाची पण असते. फोटो टाकलात तर बरे होईल.
माझ्याकडचा खायच्या पानाचा वेल. आता भरपूर पाने आली आहेत. पण त्याच करायच काय? घरात कोणी खात नाही. गोड पान कधीतरी मोठ्या सण-समारंभाला म्हणजे कोणाच्या लग्नात वगैरे असल्यास. आरोग्यासाठी हे चांगल असत का?
जागू पाने इथे पाठवून दे. मला
जागू पाने इथे पाठवून दे. मला नुसते किंवा बडीशोप घालून खायला आवडते. अग पान नुसते खाणे रक्तशुद्धीसाठी चांगले आहे. माझ्याकडे मघई पानांचा वेल आहे. मायबोलीकर Srd यांनी दिलाय.
जागू, पान, चूना आणि काथ
जागू, पान, चूना आणि काथ तिन्ही अल्कलाईन. मसाल्याचे जेवण झाल्यावर अगदी सगळ्यांनी खायला हरकत नाही. त्यात कंकोळ, कापूर, गुलकंद, बडीशेप असे मोजकेच घटक घातले तरी चांगले.
पालकाच्या घड्या केल्यास तश्या त्याच्या पण करता येतील. सांजोरी वड्या त्या पानांच्याच करतात.
वरचे जिन्नस घालून ते सर्व कुटून उन्हात आणि फ्रिजमधे वाळवता येते.
तंबाखू मात्र अर्थातच नाही.
तंबाखू मात्र अर्थातच नाही. दोन्ही मुलींना अगदी कणभर चुना व काथ घालून खायला दे. कॅल्शियम मिळेल.
काथाने घसा सुधारतो आणि हिरड्यांसाठी पण तो चांगला.
जागु, पानाचा वेल मस्त
जागु, पानाचा वेल मस्त वाढलाय.. विडयाची पान पचनासाठी पण चांगली असतात.
मी पण लावलाय, पण छोटा आहे अजुन.... तांबुल करुन फ्रीज मध्ये ठेवु शकतेस...
दिनेशदा यांनी सांगितलेली idea
दिनेशदा यांनी सांगितलेली idea मस्त आहे, सर्व एकत्र करून कुटून वाळवण्याची.
आम्ही नायजेरियात, बाकीचे
आम्ही नायजेरियात, बाकीचे काहीच जिन्नस न मिळाल्याने च्यवनप्राश घालून पान खायचो. पानाचा वेल मात्र माझ्या एका मित्राने तिथे नेला होता आणि छान वाढला होता तिथे.
हा वाळवलेला प्रकार छान टिकतो.
हा वाळवलेला प्रकार छान टिकतो. रंगाने काळपट दिसतो खरा पण चवीला छानच लागतो. बाजारात अनेक दुकानात तो असतो. मसाला पानात घालतात ते ( खोबरे सोडून ) सर्व जिन्नस घालायचे.
सुखद(माझा लेक), त्याच पोट
सुखद(माझा लेक), त्याच पोट दुखल की आई पणती वर विडयाच पान गरम करुन पोटावर
ठेवुन कापडाची पट्टी बांधते... आराम मिळतो..
कधी कधी पोट दुखत नसतांना देखिल तो आजी कडुन सगळी सोंगं करुन घेतो...
आम्ही मागे अंबेजोगाईला गेलो
आम्ही मागे अंबेजोगाईला गेलो होतो तिथे आम्हाला कुटलेल्या विड्याचा प्रसाद मिळाला होता, खूप छान लागतो.
अरे वा सायली, पोटदुखीचा उपाय
अरे वा सायली, पोटदुखीचा उपाय सांगितलास.
दिनेश द गायत्रीची झाड कसे
दिनेश द गायत्रीची झाड कसे असते? कधी पाहिले नाही... फोटो शेयर करा ना!
हो अग अन्जु, विशेषतः तान्ह्या
हो अग अन्जु, विशेषतः तान्ह्या मुलांसाठी खुपच फायदयाचा आहे.
पोटदुखीचा उपाय >>>>>
पोटदुखीचा उपाय >>>>> मोठ्यांसाठी - संजीवनी गुटी -
(घटक - विडंग, सुंठ, पिपळी, हरितकी, बिभितक, अमलकी, वचा, गुडची, शुद्ध भल्लातक, शुद्ध वत्सनभ) १-२ गोळ्यांनी लगेच गुण येतो.
शशांक, त्रयोदशगुणी विड्याचे
शशांक, त्रयोदशगुणी विड्याचे घटक मिळाले तर छान.. ( केशर, कस्तुरी पण असणार त्यात. )
त्रयोदशगुणी विड्याचे घटक >>>>
त्रयोदशगुणी विड्याचे घटक >>>> दिनेशदा - हे सगळे घटक जरा उलगडून सांगा बरं प्लीज ...
Pages