निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/20832
माझा इथे आहे पण शा. गं, ने काढलेले फोटो जास्त छान आहेत.
सर्व प्रथम धन्यवाद दिनेशजी
सर्व प्रथम धन्यवाद दिनेशजी माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण केल्याबद्दल. दोन्हि लेख मिळाले. आपला लेख खूप आवडला. सा़क्षात काव्य आहे हा लेख म्हणजे. अप्रतिम !! आणखी वर्णन करायला शब्द थिटे आहेत. फोटो पाहून दिल खुश हो गया. आजचा दिवस सार्थकी लागला. परत परत लेख वचण्यात आणि फोटो पाह्ण्यात मग्न होते म्हणुन प्रतिसादास वेळ लागला. अजूनही मन भरलेलं नाहीये. मला पूण्याचा सुधा चालणार होता आपण मला त्याच्या जन्मभूमीतलाच दाखवलात.
आपण म्हणता त्या प्रमाणे फोर्ट मध्ये चर्चच्या आवारात आहे एक जॅकरंदा पण तो फुलत नाही म्हणावा तसा मुंबईच्या दमट हवेत!!
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥४२८॥अ९ - श्लोक -३१||
दिनेशदा - ही ओवी माहित होती पण नेमकी कुठे आहे हे बघण्यासाठी एका समर्थ व्यक्तिची मदत घ्यावी लागली...
रच्याकने तुम्ही ज्ञानेश्वरीचाही बराचसा अभ्यास केलेला दिस्तोय .......
सर्व प्रथम धन्यवाद दिनेशजी
सर्व प्रथम धन्यवाद दिनेशजी माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण केल्याबद्दल. दोन्हि लेख मिळाले. आपला लेख खूप आवडला. सा़क्षात काव्य आहे हा लेख म्हणजे. अप्रतिम !! आणखी वर्णन करायला शब्द थिटे आहेत.>>>>>> हेमा वेलणकर, दिनेशदांना साक्षात डॉ. शरदिनी डहाणूकरांचा वरदहस्त आहे ....
डॉ. शरदिनी डहाणूकरांचे "वृक्षगान" एकदा चाळून बघा म्हणजे लक्षात येईल - या सर्वच मंडळींना (डॉ. शरदिनी, दिनेशदा, डॉ. हेमा साने, इ.) झाडे-पाने-फुले यांचे कसे जगावेगळे प्रेम आहे ते ......
शशांकजी, अगदि सगळ्यांच्या
शशांकजी, अगदि सगळ्यांच्या मनातले विचार तुम्ही ईथे दिलेत.
मी आत्ता एका बैठकीत नि.गची १३ पाने वाचून काढली. मध्यन्तरी मला ईथे यायलाच वेळ मिळत नव्हता.
आज माझा रविवार कारणी लागला असे वाटले.
शशांकजी हल्ली तुम्ही
शशांकजी हल्ली तुम्ही ज्ञानेश्वरीवर खूप दिवसात निरुपण नाही केलेत, मी मिस करतेय.
इथे बरेच लोकं माहितीचा खजिना आहेत हेमा, प्रामुख्याने दिनेशदा, शशांकजी, शांकली, जागू. काहींची नावे राहिली असल्यास माफ करा. ह्या धाग्यावर आल्यावर खूप प्रसन्नता येते.
वृक्षगान मीपण वाचले नाहीये, आता वाचीन.
वृक्षगान आहे माझ्याकडे. ते
वृक्षगान आहे माझ्याकडे. ते माझे आवडते पुस्तक आहे. ते ही पुस्तक खूप सुंदर आहे. त्यातली सगळी चित्रं ही छानच आहेत. पण त्यात फोटो नाहीत फुलांचे किंवा झाडांचे !! अर्थात ते लेखिकेने हेतु पुरस्सरच केले असणार.
शशांकजी खरचं आहे, इथे सिद्धहस्त मंडळी आहेत.
ओके दिनेशदा, पाहीन करून
ओके दिनेशदा, पाहीन करून
सध्या तरी त्या झाडांवर तिन्ही ऋतूमध्ये लक्ष ठेवणे हे मुख्य काम आहे
आजच्या लोकरंगमधेच हे लिहिलंय
आजच्या लोकरंगमधेच हे लिहिलंय - की निसर्ग आपल्या अवती-भवतीच आहे. त्यासाठी कुठे जंगलात, हिलस्टेशन, ई. ठिकाणीच जायची काय गरज आहे? आपल्याला दररोज दिसणारी झाडे, रोपे, पक्षी, आकाश याकडे जरासा वेळ देऊन पाहिले तर किती आनंद होतो आपल्याला.... पण तसा थोडासाच वेळ देणे गरजेचे आहे, नीट पहाणे महत्वाचे आहे ....
आपल्या बागेत फुललेले एखादे फुल पहायला वेळ काढावा लागतो -
फार पूर्वी मी कुठेसे वाचले होते की ती निसर्गवेडी व्यक्ति झाडांशी, फुलांशी बोलत असे - आजच्या लोकरंगमधेच अजून एका वृक्षवेडीचे वर्णन आहे - जवळजवळ दोन वर्षे ती त्या झाडावर बसून होती - (२०० फूट उंचीचा "लुना" वृक्ष आणि त्याच्यावर चढून बसलेली ज्युलिया) - ती त्या झाडाशी संवाद साधत होती - झाडही तिला प्रतिसाद देत होते -सारेच कल्पनेपलिकडील ....
आपणही येता-जाता वेगवेगळ्या वा नेहेमीच्या झाडांकडे, रोपांकडे - वेगवेगळ्या ऋतूत पहात असू तर तो इतका आनंदाचा काळ असतो की बस्स ... आमच्या कंपनीतल्या वेगवेगळ्या रोपांवर प्रेमाने हात फिरवत जायला मला स्वतःला फार आवडते .... खूप सुखद संवेदना असते ती ....
स्पॅथोडीया : मुंबईत झाडे बहरू
स्पॅथोडीया :
मुंबईत झाडे बहरू लागली आहेत. मी पण त्याच्या शेंगा कधी पाहिल्या नाहीत. आता लक्ष ठेवावे लागेल.
काल शनिवार : सोसायटी आवारात तीन फुलोरे पाहीले. जांभूळ, बदाम आणि कडुनिंब... मन प्रसन्न, प्रसन्न!
मार्च २०१४: या महिन्याची खरेदी :
परीसरात दिसणार्या पक्षांची माहीती आणि फोटो.
अरे व्वाह, मस्तय पुस्तक. धन्स
अरे व्वाह, मस्तय पुस्तक. धन्स मधुरा.
श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच "नवा आसमंत" आणि आता मधुराने सांगितलेलं वरचं पुस्तक हि या महिन्याची खरेदी असणार.
साधना, काळ्या कुड्याच्या
साधना, काळ्या कुड्याच्या शेंगा बघितल्यास का ? घारापुरीला झाड आहे म्हणजे उरणला पण असणार. त्याच्या शेंगा अगदी खास असतात. आधी वेगवेगळ्या वाढून त्या परत चिकटतात व त्यांचा ओ किंवा डी सारखा आकार होतो. त्यातल्या बियांनाही केस असतात आणि त्या औषधी पण आहेत. बहुतेक इंद्रयव असे काहीतरी नाव आहे. >>>>>
दिनेशदा, काळा कुडा बोरिवली नॅशनल पार्क मधे पाहिला होता. तिथे पांढरा आणि लाल कुडादेखील आहे.
माहीतगारांनी सांगितल्याप्रमाणे, पांढरा कुडाच्या शेंगा जोडीने येतात. जिथे सुरु होतात तेथे जोडलेल्या असतात. लाल कुडाच्या शेंगा चिकटून जोडीने वाढतात. तर काळा कुडाच्या शेंगा दोन्ही बाजुने टोकाला जोडलेल्या.
पांढरा कुडा: याच्या मुळावरची साल कुटजारीष्टकात वापरतात.
Majhyakade varchevte pakshi
Majhyakade varchevte pakshi pustak aahe.
छान छान माहिती कळतीये.. खूप
छान छान माहिती कळतीये..
खूप सुंदर आहे पुस्तक्,मधू
सुप्रभात!!!! ऑफिसच्या वाटेवर,
सुप्रभात!!!!
ऑफिसच्या वाटेवर, शुक्रवारी घरी जाताना निष्पर्ण झालेला पिंपळ आज कोवळ्या, लालसर, तुकतुकीत पानांनी स्वागताला उभा होता.
स्पॅथोडीया :
आज बरोबर लक्ष ठेवले, कुपरेज बागेतल्या झाडांना शेंगा लागलेल्या दिसल्या. बसमधूनच पाहिल्या. हिरव्या दिसत होत्या.
एक प्रश्न पडला, बहुतेक शेंगा खाली लोंबकळणार्या वाढतात (शेवगा, बहावा, गुलमोहोर...) मग याच वरच्या दिशेला का वाढत असतील?
सुप्रभात
सुप्रभात
कागज के फूल
कागज के फूल
रंग ले आये हैं, रुप ले आये
रंग ले आये हैं, रुप ले आये हैं... कागज के फूल, फूल अरे फूल, खुशबु कहाँसे लाएगें ...... हे एक जुने गाणे आठवले ...
फोटु मस्त आहेत गं ....
वर्षु नील गुलाब आणि कागजके
वर्षु नील गुलाब आणि कागजके फूल दोन्ही सुन्दर !! ह्या फुलांच नाव काय?
ह्या फुलांच नाव काय? >>>>
ह्या फुलांच नाव काय? >>>> ओळखा पाहू - शोधा जरा गुगलून बरे ....
शशांकजी मी न गुगलताच सांगते.
शशांकजी मी न गुगलताच सांगते. ही कार्नेशनची फुले आहेत. आमच्याकडे पूर्वी ह्यांची शेती व्हायची. शेती म्हणजे भाजी लावलेल्या शेतांमध्ये ह्यांचे वाफे लावले जायचे. फार सुंदर असतात ही फुले. आमच्याकडे ह्यातील सिंगलच्या फुलांची लागवड व्हायची. माझ्या खुप आवडीची होती ही फुल. आमच्याकडे ह्या फुलांना पीनची फुले म्हणायचे.
कागदी फुले ही आमच्याकडे लावली जायची. हल्ली दिसत नाहीत. पण महाबळेश्वरला मला दिसली मागील वर्षी. ह्यावर्षी बी शोधायचे आहे.
वर्षुताई दोन्ही फोटो सुंदर.
वर्षुताई दोन्ही फोटो सुंदर.
हेलीकेनीयाची तोरणे डुलू लागली
हेलीकेनीयाची तोरणे डुलू लागली आहेत.
वा जागू, सुंदर.
वा जागू, सुंदर.
माझ्या कुंडीतील भजीच्या
माझ्या कुंडीतील भजीच्या पानांचा ओवा.
शनिवारी केळवे बीचला गेलो
शनिवारी केळवे बीचला गेलो होतो. ठाणे-घोडबंदर रस्त्यावर (आणि पुढे वरई फाट्यापासुन केळवे गावापर्यंत) जागोजागी चैत्रचाहूल दिसंत होती. पळस, काटेसावर, पांगारा, वरूण (वायवर्ण) मस्तपैकी फुललेत. निसर्गाची रंगपंचमी सुरू झालेली आहे.
पूर्व द्रुतगतीमार्गावर विक्रोळी ते घाटकोपर रस्त्यावर गुलाबी टॅबेबुया आणि पुढे घाटकोपर डेपोच्या रस्त्यावर "कॅश्युरीना"सोसायटीच्या आवारात पिवळा टॅबेबुया झळकतोय. इथेच कॉर्नरवर रस्त्यावरच नर्सरी आहे तिथे विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आहे (अगदी राणीबागेतील प्रदर्शनाची आठवण यावी इतकी )
हो आमच्याइथेही शाल्मली/सावर,
हो आमच्याइथेही शाल्मली/सावर, गीरीपुष्प फुलांनी बहरलेत.
वा!!जागु... सुंदर आहेत तुझी
वा!!जागु... सुंदर आहेत तुझी हेलीकेनिया...
दिनेश दा, निलमोहर नागपूर ला
दिनेश दा, निलमोहर नागपूर ला ब-याच ठिकाणी दिसतो....
खुपच लक्षवेधक वृक्ष आहे आणि तुम्ही नेहमी प्रमाणेच खुप सुंदर फुलवला...
धन्यवाद..
बहरलेला नीलमोहोर फार म्ह्णजे
बहरलेला नीलमोहोर फार म्ह्णजे फारच सुरेख दिसतो.
Pages