निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, अविनाश बिनीवाले लोकसत्तामध्ये वेगवेगळया प्रांतांतील न्याहारी लिहायचे त्यात बेलफळ बंगाल आणि पूर्वांचलमध्ये सकाळी न्याहारीला खातात हा लेख होता, मी तो वाचलाय. >>>>> याचे संकलित पुस्तक प्रकाशीत झाले आहे "महारष्ट्राबाहेरील न्याहारी", मला अजून मिळाले नाही.

पार्वतीने जेव्हा तप केले त्यावेळी ती केवळ बेलाच्या पानावर पडलेले दंव चाटूनच दिवस काढत असे. पुढे आणखी कठोर तपश्चर्या करताना तिने तेही सोडले.... म्हणून ती अपर्णा.>>>>> असेच खडतर तप ती करत होती म्हणून कळवळून तिची आई तिला "अगं नको" (उ मा), बास आता .... म्हणत होती म्हणून पार्वती म्हणजेच "उमा" असेही नाव आहे ....
बाकी शैलजा - पर्वताची कन्या वगैरे खूप नावेही आहेत ....

म्हणून पार्वती म्हणजेच "उमा" असेही नाव आहे>>>>शशांक, लगेचच हे गाणं आठवलं. Happy

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर

(चित्रपट: मानिनी, स्वरः सुमन कल्याणपूर)

(विषयांतराबद्दल क्षमस्व Happy )

मधुमकरंद धन्यवाद, पुस्तकाबद्दल संगितल्यासाठी.

शशांकजी, मस्त माहिती उमा नावाची.

स्पॅथोडियाच्या फुलांचीच चर्चा कायम होते. त्याच्या फळांकडे दुर्लक्ष होते. मी कधीही त्याची फळे पाहिली नाहीयेत. स्पथोडीयाचे झाड पानांनी इतके भरलेले असते की त्याची फळे दिसणे अशक्यच.

रियाने आज परत तिच्या झाडाचे फोटो टाकले, त्याची पाने मला स्पॅथोडीयासारखी वाटली. म्हणुन स्पॅथोडीयाची फळे म्हणुन गुगल सर्च केला. तर चक्क होडीसारख्या शेंगा असलेले स्पथोडीया दिसले. त्याच्या त्या होडीच्या आत कापुस नाहीय तर अभ्रकासारखे पारदर्शक काहीतरी आहे आणो त्यात त्याच्या बीया आहेत.

आता स्पथोडीयावर लक्ष ठेऊन त्याच्या शेंगा बघेन.

spathodea fruit pod असे इमेजेस मध्ये सर्च केले की सुरवातीलाच त्याच्या शेंगा दिसतात.

रियाने टाकलेले फोटो इथे रात्री टाकते.

रियाच्या होड्या रिकाम्या आहेत पण आतमध्ये लेअर्समध्ये बीया असतात असे तिने मागच्या पानावर लिहिलेय.. त्यामुळे हेच असावे.

साधनाताई, मी पाहील गुगलून, त्या बियांच्या भोवती पातळ पापुद्रा आहे. असा पापुद्रा शेवग्याच्या बियांभोवती पण असतो. अर्थात थोडा लहान असतो हा जरा मोठा आहे.

शशांक जी, लै भारी...

दिनेश दा, कीती कीती माहिती आहे तुम्हाला सगळ्याच गोष्टींची.. जुनी गाणी काय, फुलं झाडं काय,
नविन रेसिपीस काय, देश- विदेश.. तुम्ही खुप अदभुत आहात... एनसायक्लोपिडीया आहात....

दिनेश ला तर क्रेडिट आहेच , जिप्सी ला सुद्धा गाण्यांची खूप माहिती आहे.. पटापटा डोक्यात ( तोंडातही??) येतात त्याच्या .. थीम पाहिली रे पाहिली की Happy

स्मरणशक्तीपेक्षा डोक्यात लिंकिंग चांगले झाले आहे ! एक नाव निघाले कि सगळे आठवते.

साधना, काळ्या कुड्याच्या शेंगा बघितल्यास का ? घारापुरीला झाड आहे म्हणजे उरणला पण असणार. त्याच्या शेंगा अगदी खास असतात. आधी वेगवेगळ्या वाढून त्या परत चिकटतात व त्यांचा ओ किंवा डी सारखा आकार होतो. त्यातल्या बियांनाही केस असतात आणि त्या औषधी पण आहेत. बहुतेक इंद्रयव असे काहीतरी नाव आहे.

या प्रत्येक पंखधारी बियांबद्दल अटेंबरो साहेब म्हणतात. या प्रत्येक बिया म्हणजे जणू एक हेलिकॉप्टर असते.
प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे पण आतल्या पॅसेंजरला जराही धक्का न लावता योग्य जागी पोहोचवायचे काम मात्र चोख करतात. दुर्दैवाने तसे डिझाईन कॉपी करणे आपल्याला मात्र अजून जमलेले नाही.

स्निग्धा शेवग्याच्या शेंगांबद्दल बोलते आहे आहे पण आता मानवाच्या हस्तक्षेपामूळे त्या बिया एवढ्या जड झाल्या आहेत कि शेंगा तडकल्या तरी त्या वार्‍यावर उडू शकत नाहीत. झाडाखालीच पडतात. खरं तर शेंगाही तीन भागात तडकाव्या अशी मूळ योजना आहे निसर्गाची पण त्याही आता मांसल झाल्याने तडकत नाही. जागूच्या अंगणात झाड आहे. ती दुजोरा देईलच.

दिनेशदा, मला फक्त त्या बिया भोवती सुध्दा पापुद्रा असतो इतकच पटकन लक्षात आलं म्हणुन उल्लेख केला. त्या वार्‍यावर उडत नाहीत, शेंगा सुध्दा तडकत नाहीत हे उगदी खरं.

माझ्या घराजवळ एक झाड आहे त्याला सुध्दा अशाच प्रकारच्या बिया बघीतल्या आहेत, मध्य भागी बी, अगदी डाळीच्या दाण्याइतकीच, आणि त्याच्या भोवती गोल पापुद्रा. वरच्या फोटोतला पापुद्रा फार पातळ आहे पण मी ज्या झाडाबद्दल म्हणते आहे त्याचा पापुद्रा जरा जाड असतो. मला त्याच नाव माहिती नाही पण आता लक्ष ठेवेन आणि फोटो काढेन.

रियाचे झाड - स्थॅथोडिया - होडीसारख्या आकाराच्या रिकाम्या शेंगा आणि शेंगातल्या सुकलेल्या बिया.

इतके पर्णहीन स्पॅथोडिया मी पहिल्यांदाच पाहिले. अमच्याकडचे स्पॅथोडीया पानांनी गच्च भरलेले असतात.

रच्याकने काही प्रश्न पडलेत......

१. स्पॅथोडीयाला अगदी ठसठशीत फुले लागतात. रियाच्या ऑफिस आवारात पंचविसेक झाडे आहेत असे ती म्हणाली., तरी रियाला एकही फुल दिसले नाही????....

२. रियाला झाडावरचे फुल दिसले नहई पण जमिनीवरच्या शेंगा दिसल्या. ती बहुतेक जमिनीकडे पाहात चालत असेल. पण मी कायम झाडांकडे पाहात चालत असतानाही मला एकदाही स्पॅथोडियाच्या होड्या दिसल्या नाहीत... मला काय झालेय???????

३. मुंबईत स्पॅथोडीया फुलतोय. पुण्यात तो फुलुन त्याला शेंगा लागुन, त्या वाळून जमिनीवर पडल्याही..... पुण्यात सगळॅ असेच फास्ट फॉरवर्ड असते काय???????????

Happy Happy

हो साधना, स्पॅथोडियाच वाटतंय. Happy

या लिंकवरचे प्रचि २ बघ. पाने सारखेच आहे. Happy
http://www.maayboli.com/node/34138

इतके पर्णहीन स्पॅथोडिया मी पहिल्यांदाच पाहिले. अमच्याकडचे स्पॅथोडीया पानांनी गच्च भरलेले असतात.>>>>अगदी अगदी. Happy

चला, रियाच्या होडीचे कोडं सुटलं एकदाचं Proud

. स्पॅथोडीयाला अगदी ठसठशीत फुले लागतात. रियाच्या ऑफिस आवारात पंचविसेक झाडे आहेत असे ती म्हणाली., तरी रियाला एकही फुल दिसले नाही????....>>>> हे एक कोडेच आहे हं!!

२. रियाला झाडावरचे फुल दिसले नहई पण जमिनीवरच्या शेंगा दिसल्या. ती बहुतेक जमिनीकडे पाहात चालत असेल. पण मी कायम झाडांकडे पाहात चालत असतानाही मला एकदाही स्पॅथोडियाच्या होड्या दिसल्या नाहीत... मला काय झालेय???????>>> हे पण दुसरं कोडं आहे खरं!!

३. मुंबईत स्पॅथोडीया फुलतोय. पुण्यात तो फुलुन त्याला शेंगा लागुन, त्या वाळून जमिनीवर पडल्याही..... पुण्यात सगळॅ असेच फास्ट फॉरवर्ड असते काय???????????>>>>>>> नाही, पुण्यात आणि मुंबईमधे वातावरणाच्या फरकामुळे फ्लॉवरिंग थोडे फार मागे पुढे होईल पण फास्ट फॉरवर्ड वगैरे भानगड नाही.

अरे वा छान आहेत रियाच्या ऑफिसमध्ये असलेल्या झाडांच्या होड्या. स्पाथोडीया म्हणतात का. धन्यवाद सगळ्यांना, इथे आल्याने खरंच खूप माहिती मिळते.

भस्म विलेपित वरुन लहानपणाच्या गंमती आठवल्या. माझ्या एका भावाला तोंडाला क्रिम फासण्याचा खुप नाद होता आणि इतके फासायचा की चेहरा पांढरा दिसायचा. त्याने क्रिम फासले की मी भस्मविलेपित रुप काय दिसतेय म्हणुन त्याला चिडवायचे. Happy

अपर्णा नावामागची एक वेगळी कथा मी ऐकलेली. हरतालिकेच्या उपवासाला केळी न शहाळीच खातात कारण खाताना आवाज होता कामा नये. आणि आवाज का नको तर पार्वतीने शंकर प्राप्तीसाठी तप करताना फक्त पानेच खाल्ली. म्हणुन तिचे नाव अपर्णा. पण मला ही गोष्ट अजिबात पटलेली नव्हती. जर पाने खाउन राहिली तर मग 'अ'पर्णा कशी? आणि पाने खाताना नक्कीच आवाज होणार. मुळात हे आवाज न करणा-या गोष्टीच हरताळकेला का चालतात हेही मला कळले नाही कधी.

या मुली कामाला लागल्या !
स्पॅथोडीयाला जेवढी फुले येतात त्या मानाने शेंगा कमीच लागतात.
मुंबई पुण्यामधे मला तेवढा फरक नाही जाणवला पण पुढे नगरकडे गेलो की अनेक झाडे वेगळी दिसू लागतात.
खास करुन कडूनिंब, शिरीष, बाभूळ.. अगदी परत बघून ओळख पटवावी लागते.

या स्पॅथोडीया चे उगमस्थान आमच्या आफ्रिकेतले युगांडा बरं का ! युगांडा फ्लेम ट्री असे पण नाव आहे.

( हे लिहिताना मला शशांक आणि शांकली.. आम्ही मुळ पुरंदर गडावरचे बरं का, म्हणून तर एवढी फुलांची आवड आहे, असे म्हणताहेत असा भास होतोय. )

या स्पॅथोडीया चे उगमस्थान आमच्या आफ्रिकेतले युगांडा बरं का ! युगांडा फ्लेम ट्री असे पण नाव आहे.

आमच्या????????? आता कोणीतरी येऊन म्हणेल माणसाचे उगमस्थान आफ्रिका बरे.. तिथुनच तो जगभर पसरला... Happy

आज सकाळीच आमच्याकडे जुगलबंदी चालु होती/. दोन दयाळ विरुद्ध एक कोकिळ...

त्याला बघुन ऐशु ही कविता गायला लागली Happy

Robin :

Robin sang sweetly, When the days were bright:

'Thanks, thanks for summer,' He sang with all his might.

Robin sang sweetly, In the autumn days,

'There are fruits for everyone; Let all give praise.'

In the cold and wintry weather, Still hear his song:

'Somebody must sing,' said Robin 'Or winter will seem long.'

When the spring came back again, He sang, 'I told you so!

Keep on singing through the winter It will always go.'

Anonymous

रॉबिन वर्षभर का गात असतो याची त्याने कारणे दिलीत..

माणसांनीही असाच विचार करुन पुर्ण वर्ष आनंदी असावे रॉबिनसारखेच. अगदी दु:खातही गावे, नाहीतर दु:खे उगीच लांबतील Happy

Pages